ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे दुःखद निधन

0
99

मुंबई -कन्संट्रक्शन् ,पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी आदी एकांकिका तसेच छिन्नं, इमला,रज्जू, चौकोन,इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त नाटकांचे लेखक जेष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी आज मंगळवार दि ७मे रोजी मुलुंड येथिलं इस्पितळात रात्रौ ८-३० वा. दुख:द निधन झाले. चारच दिवसां पुर्वी त्यांना छातीत दुखत असल्या कारणाने इस्पितळात दाखलं करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी ,कन्या ,जावई,आणि नात असा परिवार आहे.