
चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्पात
चिपळूण- चिपळूण वासियांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी आवश्यक असलेली वातानुकुलीन यंत्रणा आता येथे दाखल झाली आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहरातील हे नाट्यगृह गेले पंधरा वर्षे बंद आहे .हे नाट्यगृह सुरू व्हावे यासाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. निषेध म्हणून नाट्यगृहाच्या बाहेर कार्यक्रम करण्यात झाले तर कधी पारावरच कार्यक्रम करण्यात आले.अनेक नाट्यप्रेमींनी सह्यांची मोहीम देखील राबवली मात्र नूतनीकरणाच्या कार्यक्रमात देखील चालढकल होत आहे.गेली सात वर्षे नूतनीकरणाचे काम सुरू आहे ते अद्यापही पूर्ण झालेले नाही मात्र लवकरच चिपळूणकरांची नाटय़गृहाची प्रतीक्षा संपेल असे चित्र आहे