रशियन विमानाने लँडिंगच्या वेळी घेतली पेट , दुर्घटनेत किमान 41 लोकांचा मृत्यू
मॉस्को -मॉस्को विमानतळावर रशियन विमानाने लँडिंगच्या वेळी घेतली पेट.या दुर्घटनेत किमान 41 लोकांचा मृत्यू झाला.
हे विमान एक सुखोई सुपरजेट-100 होतं. मॉस्कोच्या शेरेमेत्येवो विमानतळावरून ते संध्याकाळी 6.02 मिनिटांनी मरमांस्कच्या दिशेने उडालं. या विमानाने यशस्वी टेकऑफ केलं खरं, मात्र वैमानिकांनी काही वेळाने तांत्रिक बिघाड झाल्याचा इशारा देत आपत्कालीन लँडिंग करण्याचं ठरवलं. धावपट्टीवर उतरताच विमानाच्या इंजिनने पेट घेतला.
तपासकर्त्यांनुसार विमानात एकूण 78 प्रवासी होते – पायलटसह 5 कर्मचारीही. त्यापैकी फक्त 37 लोकांचा जीव वाचू शकला आहे