संगमेश्वर येथील जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात
संगमेश्वर-माखजन येथील व्यापारी शैलेश जनार्दन धामणस्कर यांच्या जनरल स्टोअर्स दुकानाला मध्यरात्री आग लागून आगीत दुकान भस्मसात झाले. यात दुकानाचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत धामणस्कर यांनी पोलिसांत तक्रार दिली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.