कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने चौदा प्रवासी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर

सावंतवाडी दि.०४ -:कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या एकूण 14 मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज मळगाव रेल्वे स्टेशन मास्तर संतोष महाजन यांना देण्यात आले. यावेळी सचिव सतीश पाटणकर खजिनदार विनोद रेडकर नकुल पार्सेकर भाई देऊलकर अशोक देसाई वेर्ले सरपंच सुरेश राऊळ माजगाव सरपंच दिनेश सावंत राजेंद्र सावंत सुरेंद्र मुळीक प्रदीप घुगे दिनकर परब, रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन अध्यक्ष अजय तानावडे आदी उपस्थित होते.सावंत पुढे म्हणाले,जिल्ह्यातील पंधरा लाख पेक्षा जास्त रयत कामानिमित्त मुंबईला वास्तव्यास आहे त्यांना वेळोवेळी गावी येतांना गुरांसारखा प्रवास करावा लागत आहे. याबाबत गेली पंधरा वर्षे सातत्याने मागणी करुनही रेल्वे प्रशासन जुमानत नाही.याठिकाणी रेल्वे टर्मिनसचा दर्जा देण्यात आला मात्र प्रमुख गाड्यांना येथे थांबा नसल्याने याला टर्मिनस का म्हणातात हे अद्याप कळाले नाही.दरम्यान प्रवाशांच्या मागण्यासाठी 19 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मळगाव रेल्वे स्टेशन येथे लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असुन या मागण्या मान्य न झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर कुठेही तीव्र आंदोलन करण्यात येणार अशा इशाराही सावंत यांनी दिला.

Related Articles

Back to top button