हॅथवे कंपनीची रत्नागिरी, दापोली येथे २८ पासून हॅथवे इंटरनेट सेवा सुरू

रत्नागिरी ः निसर्गसंपन्न, सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रागांमुळे कोकण पर्यटनाबरोबरच फलोद्यात म्हणून जगाच्या नकाशावर ओळखला जातो. अशा कोकणामध्ये हॅथवे इंटरनेटद्वारे संपूर्ण जगातच नव्हे तर देश-विदेशात वेगळी ओळख व्हावी. तसेच स्थानिक तरूण बेरोजगारांना आर्थिक उन्नतीची पहाट निर्माण व्हावी याच उदात्त हेतूने खेडनंतर रत्नागिरी, दापोली येथे हॅथवेचे इंटरनेटची सेवा कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती साईस्टार हॅथवे डेटाकॉम प्रा. लि.चे संचालक मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक, कोकणातील प्रतिथयश शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कम यांनी साई रिसॉर्ट येेथे पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यानी यावेळी कोकणसह मुंबईमध्ये आपलं कोकण या नवीन न्यूज चॅनेलचा १ जूनपासून शुभारंभ करीत असल्याचीही घोषणा श्री. कदम यांनी केली.
यावेळी मुंबई महानगरातील महाराष्ट्र नंबर वनचे संपादक संदीप चव्हाण, मास्ट मिडियाच्या सौ. स्वाती घोसाळकर , आपलं कोकणचे संपादक सदानंद जंगम, मुंबई गावदेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. कदम यांनी कोकण विकासासाठी इंटरनेट सेवा किती महत्वाची आहे हे नमूद करताना हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया तसेच त्यांचे सुपुत्र अनिकेत कदम यांनी अनेक गोष्टी कोकणवासियांना मिळाव्यात म्हणून नवनवीन कल्पना विकसित केल्या आहेत. आज जगाला इंटरनेटची गरज आहे. हॅथवे इंटरनेट ही अशी सेवा आहे की, संपूर्ण जगाने त्याचा लाभ उठविलेला आपण पाहतो. खेडमध्ये गेली तीन वर्षे हॅथवे इंटरनेट सेवा अतिशय उत्तम प्रकारे सुरू असून आता या सेवेचा विस्तार वाढवून २८ पासून रतगिरी व दापोली येेथे सेवा सुरू करताना मला आनंद होतोय असे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.
यानंतर आपलं कोकण हे आपल्या घरातील टी.व्ही. मधून दिसावे, आज कोकणात काय चाललंय, यात बातम्या, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडाबरोबर आरोग्य, कृषि, कोकणातील पारंपारिक लोककलेचा आविष्कार, एकांकिका स्पर्धा आदी बाबतची अत्यंत देखणा देखावा घरबसल्या दिसावा याच उद्देशाने हे चॅनेल काम करेल असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button