लोटे येथे एस.टी. बस अपघातात एक गंभीर

लोटे ः येथे विनती कंपनीसमोर बोरीवली रत्नागिरी या एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कराड येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बोरीवली चिपळूण गाडी चिपळूणच्या दिशेने येत असता दुचाकीस्वार सुभाष धोंडू कदम (५०, रा. सोनगाव, खेड) हे आपल्या दुचाकीने सोनवडेकडे चालले असता विनती कंपनी समोर बसची दुचाकीला धडक बसली व सुभाष कदम दूरवर फेकले गेले.

Related Articles

Back to top button