जिल्ह्यातील मासेमारी दोन महिने बंद

रत्नागिरी ः महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जलधी क्षेत्रात यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वरील ६१ दिवसांच्या कालावधीत बंदी आदेश मोडल्यास सर्व सबंधितांविरोधात कारवाई करून मासळी जप्त करण्यात येणार आहे. सागरी किनार्‍यापासून खोल समुद्रात मासेमारीला जाणार्‍या नौकांना केंद्र शासनाचे धोरण, मार्गदर्शन सूचना लागू राहणार आहेत. बंदीच्या कालावधीत मासेमारी केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ चे कलम ४ अन्वये तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यात नौकेसह मासळी जप्त करण्याची तरतूद आहे. बंदीच्या कालावधीत यांत्रिकी नौकेला अपघात झाल्यास शासनाकडून काणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही. मच्छिमारी सहकारी संस्थांच्या यांत्रिकी नौका या कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्यांनी पुरस्कृत केलेले योजनेचे अर्ज लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

Related Articles

Back to top button