अडीचशे कोटी खर्चुन होतो अत्यंत निकृट दर्जाचा रस्ता

गुहागर ः गुहागर तालुक्यातील साखरीत्रिशूळ गावामध्ये शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सुमारे २ कोटी ४२ लाख रुपये खर्चुन पाच कि.मी. अंतराचे रस्त्याचे काम सुरू झाले आहे परंतु सदरील रस्त्याच्या ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम न करता आपल्या मर्जीनुसार कोट्यावधी रुपयांच्या रस्त्याचे काम करत आहे. त्यामुळे रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनला आहे. इतक्या मोठ्या बजेटचे काम सुरू असताना उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अभियंता त्या कामाकडे फिरकलेला नाही. मात्र साखरीत्रिशूळ ग्रामपंचायतीने तक्रार करताच अभियंत्यांना जाग आली आहे. या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच सचिन म्हसकर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button