आंब्याच्या बागेत काम करणार्‍या नेपाळी महिलेने केली गळफास लावून आत्महत्या

0
33

राजापूर ः तालुक्यातील कुंभवडे येथे आंबा बागेत काम करणार्‍या मनिषा एकेद्रा केसी या नेपाळी महिलेने बागेतील घराच्या छताला ओढणी बांधून आत्महत्या केली. सदरची महिला कुंभवडे येथील देसाई यांच्या बागेत काम करीत होती. तिने अचानक गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत तपास करीत आहेत.