पोलीस पाटलांना अच्छे दिन मानधनात दुप्पटीने वाढ

जिल्ह्यातील पोलीस पाटलांना अच्छे दिन आले आहेत त्यांना असलेले तीन हजार मानधनावरून आता सहा हजार पाचशे रुपये मानधन करण्यात आले आहे एक वर्षापूर्वी शासनाने याबाबतची घोषणा केली होती आता त्याची अंमलबजावणी होत आहे गावागावात घडणाऱ्या लहानमोठ्या घटना पोलीस स्थानकात पोचवण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो त्यामुळे पोलीस पाटलांना चोवीस चोवीस तास काम करावे लागते असे असतांना त्यांना देणार येणारे मानधन मात्र अल्प स्वरूपात होते या मानधनात वाढवावी अशी त्यांच्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती ती शासनाने मान्य केली आहे

Related Articles

Back to top button