समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा प्रयोगिक तत्वावर राबविण्याचा जि.प.चा निर्णय

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात अनेक आकर्षक असे समुद्रकिनारे असून हे किनारे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांचा मोठा ओघ या सागरी किनार्‍याकडे असल्याने किनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर कचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे. हे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक यंत्रणांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला मर्यादा पडत असल्याने हे किनारे स्वच्छ आणि सुंदर दिसावेत यासाठी बीच क्लिनिंग या अद्ययावत उपकरणाद्वारे किनारे स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हा परिषद या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा उभी करणार आहे. ही यंत्रणा उभी करण्यासाठी सुमारे २० ते ३० लाख रु. खर्च येणार असून ग्रामपंचायतीमार्फत ही यंत्रणा राबविण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे. यासाठी सामाजिक संस्थांमार्फतही ही यंत्रणा भाडे तत्वावर देण्याचा विचार असून सध्या तरी प्रायोगीक तत्वावर एके ठिकाणीच ही यंत्रणा उभी केली जात असून ही यंत्रणा यशस्वी झाल्यानंतर अन्य किनार्‍यावरही अशी यंत्रणा राबविण्याचा विचार सुरू आहे.

Related Articles

Back to top button