राणेंच्या दहशतीखालील कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय

राणेंच्या दहशतीखालील कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय

Print
राणेंच्या दहशतीखालील कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय
चिपळूण ः राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या दहशतीखाली वावरणाऱया कार्यकर्त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळाला आहे. विखुरलेला कार्यकर्ताही एकत्र येऊ लागला असून कामाला लागला असल्याचा टोला विधान परिषदेचे उपसभापती व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरूवारी येथे लगावला. यावेळी त्यांनी विविध स्तरावर अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारसह शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली.
मिरजोळी येथील शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त चिपळूण दौऱयावर आलेल्या ठाकरे यांनी गुरूवारी येथील येथील शासकीय विश्रामगृहात कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरकारची सध्याची धोरणे आणि त्यामध्ये आलेले अपयश यावर टीका केली. ते पुढे म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने फडणवीस सरकारला गेल्या तीन वर्षात पूर्ण करता आलेली नाहीत. शेतकरी, कामगार व मजुरांच्या प्रश्नासह विविध आघाडयांवर हे सरकार अपयशी ठरल्याने जनतेत रोष निर्माण झाला असून सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी जनता २०१९ची वाट पहात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या कारभारावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे नियंत्रणच राहिलेले नाही. काही अधिकारीच सध्या सरकार चालवत असल्याचा आरोप केला. कर्जमाफी योजनेचेही तीनतेरा वाजलेले असून यामध्ये प्रचंड गोंधळ समोर आला आहे. ११ जून रोजी कर्जमाफीची घोषणा करूनही अद्याप शेतकऱयांना त्याचा लाभ मिळालेला नाही. जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही.
भीमा-कोरेगाव येथील घटनेत बाहेरील शक्तींचा सहभाग असल्याचे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशीं झाली पाहिजे. मुळातच हे सरकारचे अपयश आहे. तेथील घटना जर पूर्वनियोजित होती तर सरकारला त्याची माहिती असायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. मुख्यमंत्र्याकडेच गृहखात्याचा अधिकार असल्याने अशा घटना वाढत आहेत, असे म्हणता येणार नाही. यापूर्वी अनेकांकडे अशा दोन्ही जबाबदाऱया होत्या. मात्र घटना वाढत चालल्याने आपोआपच गृहविभागावर शिंतोडे उडतात. गृहविभागाचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूण ः राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या दहशतीखाली वावरणाऱया कार्यकर्त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळाला आहे. विखुरलेला कार्यकर्ताही एकत्र येऊ लागला असून कामाला लागला असल्याचा टोला विधान परिषदेचे उपसभापती व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरूवारी येथे लगावला. यावेळी त्यांनी विविध स्तरावर अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारसह शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली.मिरजोळी येथील शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त चिपळूण दौऱयावर आलेल्या ठाकरे यांनी गुरूवारी येथील येथील शासकीय विश्रामगृहात कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरकारची सध्याची धोरणे आणि त्यामध्ये आलेले अपयश यावर टीका केली. ते पुढे म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने फडणवीस सरकारला गेल्या तीन वर्षात पूर्ण करता आलेली नाहीत. शेतकरी, कामगार व मजुरांच्या प्रश्नासह विविध आघाडयांवर हे सरकार अपयशी ठरल्याने जनतेत रोष निर्माण झाला असून सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी जनता २०१९ची वाट पहात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या कारभारावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे नियंत्रणच राहिलेले नाही. काही अधिकारीच सध्या सरकार चालवत असल्याचा आरोप केला. कर्जमाफी योजनेचेही तीनतेरा वाजलेले असून यामध्ये प्रचंड गोंधळ समोर आला आहे. ११ जून रोजी कर्जमाफीची घोषणा करूनही अद्याप शेतकऱयांना त्याचा लाभ मिळालेला नाही. जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही.भीमा-कोरेगाव येथील घटनेत बाहेरील शक्तींचा सहभाग असल्याचे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशीं झाली पाहिजे. मुळातच हे सरकारचे अपयश आहे. तेथील घटना जर पूर्वनियोजित होती तर सरकारला त्याची माहिती असायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. मुख्यमंत्र्याकडेच गृहखात्याचा अधिकार असल्याने अशा घटना वाढत आहेत, असे म्हणता येणार नाही. यापूर्वी अनेकांकडे अशा दोन्ही जबाबदाऱया होत्या. मात्र घटना वाढत चालल्याने आपोआपच गृहविभागावर शिंतोडे उडतात. गृहविभागाचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.