पावस येथे विचित्र अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

पावस येथे विचित्र अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

Print
पावस येथे विचित्र अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी
पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद समाधीस्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या टेंपो ट्रव्हलरचे अचानक बेक निकामी होवून या टेंपोने समोरून येणाऱया एसटीला धडक देत पुढे जात आणखी दोन दुचाकीस्वारांनाही उडवल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातानंतर टेंपो ट्रव्हलर रस्त्यानजीकच्या विद्युत रोहित्रावर जाऊन धडकला. यावेळी झालेल्या स्पार्किंगमुळे टेम्पो ट्रव्हलरने पेट घेतला. मात्र रिक्षाचालक व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानमुळे पुढील अनर्थ टळला. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड सागरी महामार्गावरील पावस एसटी स्टॅण्डसमोर बुधवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातात योगेश जोशी (२२, कुर्धे) व समीर पाध्ये (३०, कोळंबे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील लोकांना घेऊन सांगली-जत येथील टेम्पो ट्रव्हलर (क्र. एमएच ०२ एल ३३६३) रवींद्र श्रीमंत नलावडे पावसच्या स्वामी स्वरूपानंद समाधी स्थळाला भेट देण्यासाठी चालले होते. त्यांची गाडी रत्नागिरी-पावस बायपासवरील आराध्य हॉटेलजवळील तीव्र उतारावरून खाली येत असताना अचानक ब्रेक निकामी झाले. यामुळे टेंपो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी समोरून येणाऱया एसटी बसला टेंपोची जोरदार धडक बसली. या धडकेत एसटीचा टायर फुटला तर टेंपोचे एक चाक निखळले. यापुढे जात ट्रव्हलरने समोरून येणाऱया दोघा दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार समीर पाध्ये व योगेश जोशी हे दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर टेम्पो ट्रव्हलर पावस मार्गावरील नार्वेकर यांच्या मालकीच्या रामेश्वर हॉटेलसमोरील प्रमुख ट्रान्सफॉर्मरवर जाऊन धडकला. या जबरदस्त धडकेने ट्रान्सफॉर्मरचे पोल वाकले आणि स्पार्किंग होऊ लागले. स्पार्किंगमुळे ट्रव्हलरने पेट घेतला. हे स्पार्किंग जवळपास अर्धा तास सुरू होते.

पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद समाधीस्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या टेंपो ट्रव्हलरचे अचानक बेक निकामी होवून या टेंपोने समोरून येणाऱया एसटीला धडक देत पुढे जात आणखी दोन दुचाकीस्वारांनाही उडवल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या विचित्र अपघातानंतर टेंपो ट्रव्हलर रस्त्यानजीकच्या विद्युत रोहित्रावर जाऊन धडकला. यावेळी झालेल्या स्पार्किंगमुळे टेम्पो ट्रव्हलरने पेट घेतला. मात्र रिक्षाचालक व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानमुळे पुढील अनर्थ टळला. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड सागरी महामार्गावरील पावस एसटी स्टॅण्डसमोर बुधवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.या अपघातात योगेश जोशी (२२, कुर्धे) व समीर पाध्ये (३०, कोळंबे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील लोकांना घेऊन सांगली-जत येथील टेम्पो ट्रव्हलर (क्र. एमएच ०२ एल ३३६३) रवींद्र श्रीमंत नलावडे पावसच्या स्वामी स्वरूपानंद समाधी स्थळाला भेट देण्यासाठी चालले होते. त्यांची गाडी रत्नागिरी-पावस बायपासवरील आराध्य हॉटेलजवळील तीव्र उतारावरून खाली येत असताना अचानक ब्रेक निकामी झाले. यामुळे टेंपो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी समोरून येणाऱया एसटी बसला टेंपोची जोरदार धडक बसली. या धडकेत एसटीचा टायर फुटला तर टेंपोचे एक चाक निखळले. यापुढे जात ट्रव्हलरने समोरून येणाऱया दोघा दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार समीर पाध्ये व योगेश जोशी हे दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर टेम्पो ट्रव्हलर पावस मार्गावरील नार्वेकर यांच्या मालकीच्या रामेश्वर हॉटेलसमोरील प्रमुख ट्रान्सफॉर्मरवर जाऊन धडकला. या जबरदस्त धडकेने ट्रान्सफॉर्मरचे पोल वाकले आणि स्पार्किंग होऊ लागले. स्पार्किंगमुळे ट्रव्हलरने पेट घेतला. हे स्पार्किंग जवळपास अर्धा तास सुरू होते.