शिक्षणाधिकाऱयांचा राजकीय पक्षाला पाठींबा

शिक्षणाधिकाऱयांचा राजकीय पक्षाला पाठींबा

Print
शिक्षणाधिकाऱयांचा राजकीय पक्षाला पाठींबा
रत्नागिरी ः रत्नागिरीत माळनाका येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘टॉप स्कोअरर्स’ या कार्यक्रमासाठी शाळांना आदेश देऊन जि. प. च्या शिक्षणाधिकाऱयांनी एका राजकीय कार्यक्रमाला पाठींबा दिल्याचा आक्षेप भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केला आहे. याप्रकरणी राजकीय पक्षाला पाठींबा देणाऱया शिक्षणाधिकाऱयांवर कारवाईची मागणी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे शेवडे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्यावतीने माळनाका येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी ‘टॉप स्कोअरर्स’ हा कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. या कार्यक्रम शासकीय नसतानाही जि. प. च्या शिक्षणाधिकाऱयांनी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी येथील शाळांना आदेश दिले होते. हा कार्यक्रम राजकीय पक्षाचा होता. मात्र त्याला शिक्षणाधिकाऱयांनी पक्षपातीपणा करून जणू राजकीय पाठींबाच दिला असल्याचा आरोप भाजपाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष तथा एक शिक्षणसंस्था चालक म्हणून सतीश शेवडे यांनी केला आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी सकाळी १० वाजल्यापासून उपस्थित होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत त्या कार्यक्रमस्थळी त्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा प्रत्यय आला. एखादया राजकीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना तासनतास तिष्ठत ठेवणे राजकीय दृष्टया योग्य नाही. मात्र शिक्षणाधिकाऱयांमुळेच विद्यार्थ्यांची ससेहोलपट करण्यात आली. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या शिक्षणाधिकाऱयांवर कारवाईची मागणी आपण पक्षाच्यावतीने रत्नागिरी दौऱयावर येत असलेल्या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी ः रत्नागिरीत माळनाका येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या ‘टॉप स्कोअरर्स’ या कार्यक्रमासाठी शाळांना आदेश देऊन जि. प. च्या शिक्षणाधिकाऱयांनी एका राजकीय कार्यक्रमाला पाठींबा दिल्याचा आक्षेप भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केला आहे. याप्रकरणी राजकीय पक्षाला पाठींबा देणाऱया शिक्षणाधिकाऱयांवर कारवाईची मागणी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे शेवडे यांनी सांगितले आहे.शिवसेनेच्यावतीने माळनाका येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी ‘टॉप स्कोअरर्स’ हा कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. या कार्यक्रम शासकीय नसतानाही जि. प. च्या शिक्षणाधिकाऱयांनी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी येथील शाळांना आदेश दिले होते. हा कार्यक्रम राजकीय पक्षाचा होता. मात्र त्याला शिक्षणाधिकाऱयांनी पक्षपातीपणा करून जणू राजकीय पाठींबाच दिला असल्याचा आरोप भाजपाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष तथा एक शिक्षणसंस्था चालक म्हणून सतीश शेवडे यांनी केला आहे.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी सकाळी १० वाजल्यापासून उपस्थित होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत त्या कार्यक्रमस्थळी त्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा प्रत्यय आला. एखादया राजकीय कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना तासनतास तिष्ठत ठेवणे राजकीय दृष्टया योग्य नाही. मात्र शिक्षणाधिकाऱयांमुळेच विद्यार्थ्यांची ससेहोलपट करण्यात आली. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या शिक्षणाधिकाऱयांवर कारवाईची मागणी आपण पक्षाच्यावतीने रत्नागिरी दौऱयावर येत असलेल्या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सांगितले आहे.