आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Print
चिपळूण (प्रतिनिधी) - आजाराला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजता पेढे- परशुराम येथे घडला. कृष्णकांत शशिकांत जाधव (३३) असे या तरुणाचे नाव आहे.
कृष्णकांत हा आजारी होता. त्यामुळे त्याने घरात कोणीही नसताना आत्महत्या केली. याची माहिती त्याचे चुलते मारुती जाधव यांनी पोलिसांना दिली असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा तपास हे.कॉ. जी.व्ही. घाणेकर करीत आहेत. कृष्णकांत यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व अन्य परिवार आहे.