Tuesday, Jan 23rd

Headlines:

तालुकाच्या बातम्या

शिक्षक समिति शाखा खेडची कार्यकारीणी सभा उत्साहात संपन्न

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति शाखा खेड कार्यकारीणीची सभा तालुकाध्यक्ष   शिक्षक भवन येथे आयोजीत करण्यात आली होती.
अध्यक्ष अजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुरवातीला सरचिटणीस आनंद वळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व इतिवृत्त्त वाचन करुन ते कायम करण्यात आले. त्यानंतर तालुकाध्यक्ष अजित भोसले यांनी संघटनेची वाटचाल,संघटनेसमोरील आव्हाने,संघटनेची वाढत असलेली ताकद यांचे विस्तृतपणे स्पष्टीकरण करुन ज्या विचारांनी नविन सभासद समितिकडे आकर्षित होत आहेत त्यांचा विश्‍वास सार्थकी लावू असे स्पष्ट केले.
पतपेढीचे संचालक सुनिल सावंत यांनी शिक्षक पतपेढीच्या विविध योजनांची सखोलपणे माहीती दिली.तसेच या सभेत त्रैयवार्षिक अधिवेशना विषयी चर्चा करुन हे अधिवेशन २० एप्रिल२०१४ रोजी घेण्याचे ठरवण्यात आले.या झालेल्या चर्चेत जिल्हा कार्यालयीन चिटणीस पर्शुराम पेवेकर, शिक्षण समिति सदस्य सुनिल दळवी,जिल्हा प्रतिनिधी गोविंद यादव,संजय सुर्वे,सुनिल तांबे,तालुका उपाध्यक्ष विलास सकपाळ यांचा सहभाग होता.
यानंतर सभेमध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी,वरीष्ठ वेतनश्रेणी,शिक्षणसेवक फरक बिले,आर.टी.आय.कायदा,शालेय पोषण आहार,शालार्थ वेतन प्रणाली या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेला सर्व सभासद बहुसं‘येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी या उपस्थितांचे सरचिटणीस आनंद वळवी यांनी आभार मानले व सभेची सांगता केली.

भरणे येथे शेतकरी माहीती व सल्ला केंंद्र

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी ) : शेतीची उत्पादकता व पवनव्यवस्था या दोन्ही बाबतीत अडचणी आहेत.देशाच्या आणि राज्याच्या सकल घरेलू उप्तादनातील वाढीचा दर सतत वाढत आहे.विकासाच्या या वाढत्या आलेखामुळे शहरातील ग‘ाहकांचे उत्पन्न ही वाढले असून , शेतमालाची मागणी ही वाढली आहे.ही मागणी उच्च मुल्यवर्धीत व गुणवत्त्ता पूर्ण शेतमालाची मालकी आहे.या बदललेल्या बाजाराची आव्हाने स्विकारण्यासाठी शेतकरी व बाजारव्यवस्था स्पर्धाक्षम करणे आवश्यक आहे.याकरिता शेतकर्‍यांसाठी कृषी विस्तार सेवांमध्ये सुधारणा आणि बाजार व्यवस्थेत सुधारणा करणे  या दोन्ही बाबी विचारात घेवून जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे.
कृषी विस्तार कार्यरत असलेल्या कृृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा या योजनेशी सलंग्न  व सहकार्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविला जातो. या दोन्ही योजनांचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना कृषी विस्तार सेवा मध्ये आम्याच्या माध्यमातून सुधारणा करणे, प्रशिक्षण , क्षमता वृद्धी आणि सुधारीत तंत्रज्ञान पोहोचविणे हे आहे.या उद्देशाने भरणे येथे शेतकरी माहिती व सल्ला केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत.सदर केंद्राचे उद्घाटन बबन भोसले (जिल्हा शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते शेतकर्‍यांच्या उपस्थित करण्यात आले. या  केंद्रामध्ये शेतकर्‍यांना कृषी विषयक विविध योजनांची माहिती तसेच कृषी संलग्न विभाग जसे पशुसंवर्धन , मस्यसंवर्धन , सामाजिक वनीकरण व पणन  विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान याचे मार्गदर्शन त्यांच्या समस्यांवर सल्ला, उपाययोजना मिळणार आहे.
तालुक्यातील सर्व शेतकरी शेतकरी बंधूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी प्रकल्प उपसंचालक श्री.माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. घोडके , रत्नागिरी येथील श्री. चव्हाण , पणन तंत्रज्ञ श्री. कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्री. काशिद ,चंद्रमणी रुके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ. अनुष्का मोहिते यांनी केले.

सूर्यकूल प्र‘तिष्ठानचा आरोग्यविषयक उपक‘म स्तुत्य: ऍड. बुटाला

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) सूर्यकूल प्र‘तिष्ठान खेड, हॅथवे साईस्टार केबल नेटवर्क, साईसेवा मंडळ आणि केईएम रुग्णालय - मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचा ग‘ामीण भागातील अनेक रुग्णांना लाभ घेता आला. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक‘म निश्‍चितच स्तुत्य आहे असे प्रतिपादन खेडचे प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ऍड.सुधीर बुटाला यांनी केले. 
सूर्यकूल प्र‘तिष्ठान खेड, हॅथवे साईस्टार केबल नेटवर्क, साईसेवा मंडळ आणि केईएम रुग्णालय - मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने भरणे नाका येथील नवभारत हायस्कूलच्या प्रांगणात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरामध्ये जवळपास चार हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.  
डॉ.संतोष सलागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचा मंत्र देणारे पत नाट्य सादर करुन या शिबीराचे उद्घाटन करण्यात  आले. या महाशिबीरात नेत्रतपासणी, त्वचा रोग, बालरोग, तपासणी , ह्वदयरोग, वैद्यकीय तपासणी ,कान,घसा,नाक, ई.सी.जी आदी विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ११ कक्षाबरोबर औषधालय देखील उभारण्यात आले होते.
या शिबीरात तज्ज्ञ डॉ.संतोष सलागरे , सर्जन डॉ.श्रीपाल राव, डॉ.समिर रोगे, त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. विद्या खारकर, डॉ. सुनंदा महाजन, कान , नाक, घसा तज्ज्ञ डॉ. विक‘ांत साठे, ह्वदयरोग तज्ज्ञ डॉ.चरण गांजेकर काम करीत होते.
या महाशिबीराला माजी आमदार शिवराम दळवी, सिध्दीविनायक ट्रस्टचे  अध्यक्ष सुभाष मयेकर, अतिरिक्त मु‘यकार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, जि.प.सदस्य अजय बिरवटकर यांनी भेट दिली. यावेळी सूर्यकूल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय भुजबळ, उद्योजक सदानंद कदम, साईसेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पराडे, सचिव गजानन वजराटकर, कुणबी शिक्षण संस्थेचे सचिव ऍड.तु.ल.डफले, माजी माजी सरपंच राजाभाऊ बैकर, सरपंच सुनील चिले, आदी मान्यवर उपस्थित होते.

gy`©Hy$b à«{VîR>mZMm Amamo½`{df`H$ CnH«$_ ñVwË`: A°S>. ~wQ>mbm

IoS> (à{V{ZYr) gy`©Hy$b à«{VîR>mZ IoS>, h°Wdo gmB©ñQ>ma Ho$~b ZoQ>dH©$, gmB©godm _§S>i Am{U Ho$B©E_ é½Umb` - _w§~B© `m§À`m g§`wŠV {dÚ_mZmZo Am`moOrV H$aÊ`mV Amboë`m Amamo½` {e~ramMm J«m_rU ^mJmVrb AZoH$ é½Um§Zm bm^ KoVm Ambm. gm_m{OH$ ~m§{YbH$sÀ`m _mÜ`_mVyZ am~{dÊ`mV Ambobm hm CnH«$_ {ZpíMVM ñVwË` Amho Ago à{VnmXZ IoS>Mo à{gX²Y {dYrVÁk A°S>.gwYra ~wQ>mbm `m§Zr H$obo.  

gy`©Hy$b à«{VîR>mZ IoS>, h°Wdo gmB©ñQ>ma Ho$~b ZoQ>dH©$, gmB©godm _§S>i Am{U Ho$B©E_ é½Umb` - _w§~B© `m§À`m g§`wŠV {dÚ_mZmZo ^aUo ZmH$m `oWrb Zd^maV hm`ñHy$bÀ`m àm§JUmV Amamo½` {e~ramMo Am`moOZ H$aÊ`mV Ambo hmoVo. `m Amamo½` {e~ram_Ü`o Odinmg Mma hOma é½Um§Mr VnmgUr H$aÊ`mV Ambr.   

S>m°.g§Vmof gbmJao `m§À`m _mJ©Xe©ZmImbr Amamo½`mMm _§Ì XoUmao nV ZmQ>ç gmXa H$éZ `m {e~ramMo CX²KmQ>Z H$aÊ`mV  Ambo. `m _hm{e~ramV ZoÌVnmgUr, ËdMm amoJ, ~mbamoJ, VnmgUr , ˆX`amoJ, d¡ÚH$s` VnmgUr ,H$mZ,Kgm,ZmH$, B©.gr.Or AmXr {d{dY àH$maÀ`m d¡ÚH$s` godm CnbãY H$éZ XoÊ`mgmR>r 11 H$jm~amo~a Am¡fYmb` XoIrb C^maÊ`mV Ambo hmoVo.

`m {e~ramV VÁk S>m°.g§Vmof gbmJao , gO©Z S>m°.lrnmb amd, S>m°.g{_a amoJo, ËdMm amoJ VÁk S>m°. {dÚm ImaH$a, S>m°. gwZ§Xm _hmOZ, H$mZ , ZmH$, Kgm VÁk S>m°. {dH«$m§V gmR>o, ˆX`amoJ VÁk S>m°.MaU Jm§OoH$a H$m_ H$arV hmoVo.

`m _hm{e~rambm _mOr Am_Xma {edam_ Xidr, {gÜXr{dZm`H$ Q´>ñQ>Mo  AÜ`j gw^mf _`oH$a, A{V[aŠV _w»`H$m`©H$mar A{YH$mar S>m°. h[af OJVmn, {O.n.gXñ` AO` {~adQ>H$a `m§Zr ^oQ> {Xbr. `mdoir gy`©Hy$b à{VîR>mZMo AÜ`j g§O` ^wO~i, CÚmoOH$ gXmZ§X H$X_, gmB©godm _§S>imMo AÜ`j AéU namSo>, g{Md JOmZZ dOamQ>H$a, Hw$U~r {ejU g§ñWoMo g{Md A°S>.Vw.b.S>\$bo, _mOr _mOr gan§M amOm^mD$ ~¡H$a, gan§M gwZrb {Mbo, AmXr _mÝ`da CnpñWV hmoVo.

 

खोपी येथे ’कृषीपर्यटन’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खोपी येथे सम्राट अशोक स्वयंरोजगार सेवा उद्योग सहकारी संस्थेच्या वतीने ’कृषीपर्यटन’कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष कुणाल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या या  उपक्रमांदरम्यान येथे आलेल्या पर्यटकांना परीसरातील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.
या कार्यशाळेला विविध भागातून पर्यटकांनी मोठया सं‘येने उपस्थित  होते. या कार्यशाळेत कृषी पर्यटनाबाबतची प्रात्यक्षिके सादर करुन  कृषी पर्यटनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित  पर्यटकांनी तालुक्यातील रघुवीर घाट,कुंभाड जंगल पर्यटन,खोपी शिरगाव धरण परीसर,बुध्द विहार,राम मंदिर,शंकर मंदिर व काळकाई मंदिर यांची सफर करण्याचा आनंद घेतला. कोकणच्या विकासाला चालना, कोकण व्हिजन २०-२०,  कोकणचा कॅलिफोर्निया या विषयांवर सखोलपणे चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेला लवेल कृषी विभाग मंडल अधिकारी वामन कदम, खेड कृषी व्यवस्थापिका सौ.अनुष्का मोहिते, खोपी कृषी विभागप्रमुख योगेश अत्रे, माजी संचालक अशोक कदम,मुंबई येथील समाजसेवक संतोष भोईर,यांच्यासह संस्था पदाधिकारी व पर्यटक मोठया सं‘येने उपस्थित होते.

खेड येथे २६ रोजी जिल्हास्तर नृत्य स्पर्धा

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजी मित्रमंडळातर्फे २६ ते २८ एप्रिल या कालावधीत विविधांगी कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले असून २६ रोजी रात्री ९ वाजता जिल्हास्तर नृत्य स्पर्धा होणार आहे.
नगरसेवक व मंडळाध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक मिलींद इवलेकर यांच्या माध्यमातून वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला व औषधोपचार केले जाणार आहेत. मिरज येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अजित मेहता, डॉ. स्वप्नील अडवलकर, डॉ. तन्म्य मेहता, डॉ.मगदूम यांचे सहकार्य लाभणार आहे.
२७ एप्रिल रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक‘म व २८ एप्रिल रोजी सत्यनारायणाची महापूजा याचबरोबर सायंकाळी ७ ते१० यावेळेत महाप्रसाद आदी कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे.

गुलामोहीद्दीन पालेकर कृषी विभागाच्या वतीने सन्मानित

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृृषी विभाग यांच्या मार्फत शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी बक्षीस योजने अंतर्गत मौजे शिव येथील गुलमोहीद्दीन पालेकर यांना नुकतेच बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पालेकर हे त्यांच्या प्रक्षेत्रावर वेगवेगळ्‌या कृषी व पशुसंवर्धन योजना यशस्वीपणे राबवित आहेत.त्यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावर आंबा, काजू, नारळ अशा विविध फळझाडांची लागवड करुन त्यापासून दरवर्षी ते भरघोस उत्पादन घेत आहेत. सतत कृृषी विभाग व दापोली विद्यापीठाशी संपर्कात राहून सुधारित तंत्रज्ञानाचा आपल्या प्रक्षेत्रावर अवलंब करीत आहेत.
शेती विषयक तसेच पशुसंवर्धन विषयक प्रत्येक योजना ते यशस्वीपणे राबवून त्यातून उत्पन्न घेत आहेत. नुकतेच फेब‘ुवारी महिन्यात नागपूर येथे झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या शेतीविषयक आस्थेमुळे व त्यांच्या शेतीमधून प्रत्येकवेळी नवनविन काही करण्याच्या दूर दृष्टीमुळे त्यांचा शेतकरी सल्ला समीती (आत्मा)च्या सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी काशीद यांच्याकडून पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बबन भोसले,रामचंद्र आखाडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी बहुसं‘येने उपस्थित होते.

गावरई येथे वाचनालय सुरु

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गावरई येथे दानशूर श्री.दत्ताराम रामाणे यांचे मार्फत वाचनालय सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावरई गावचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण कुटरेकर हे होते. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गावरई गावचे सरपंच श्री. दिनेश जावळे,मुख्याध्यापक श्री.दिगंबर निखार्गे, शिक्षक  श्री.अनिल गोरिवले,सौ.गोरिवले, सौ.तडवी,  पोलिस पाटील श्री. पांडूरंग कुटरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महादेव माने, उपाध्यक्ष सौ.विजया पवार, सदस्य श्री.लक्ष्मण पवार, सौ. सीता आईनकर, सौ.संध्या खळे, सौ.अर्पिता कुटरेकर, श्री.संदीप जावळे, श्री.भिमराव तांबे, सौ.अनिषा तांबे, श्री.अमोल तांबे, श्री.मनोहर कुटरेकर, श्री.गंगाराम घडवले, श्री.भागोजी मांडरे, श्री.रावजी करबेले, श्री.बाबूराव जावळे, सौ.सुलोचना मांडरे, आदि मान्यवर उपस्थितीत होते.
श्री.रामाणे हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी वाचनालयाला ५ हजार रु.किंमतीचे कपाट व ५ हजार रु.किंमतीची विविध विषयांवरील पुस्तके भेट दिली.

उन्हाळी सुट्टीदरम्यान किलबिल कँम्पचे आयोजन

E-mail Print PDF
दापोली (शहर वार्ताहर)ः-दापोली शहरात उन्हाळी सुट्टीनिमित्त बच्चे कंपनीसाठी खास किलबिल कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला, संस्कारवर्ग व बौध्दिक खेळ असे या सुट्टीतील कँम्पचे स्वरुप ठेवण्यात आले आहे.
शहरातील दापोली शिक्षण संस्थेच्या चैतन्य सभागृहात हा वर्ग होणार आहे. १७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत स.९ः३० ते दु.१२ः३० या वेळेत हे वर्ग घेण्यात येणार आहेत. शहर परिसरातील अनुश्री जोशी, प्राची बर्वे, लीना मंडलीक तीन महिलांनी एकत्र येऊन या खास वर्गाचे आयोजन केले आहे. १५ एप्रिल पर्यंत या वर्गासाठी इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची नावे दयावीत असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रवेश शुल्क ३०० रु आकरण्यात येणार आहे. या कँम्पच्या अधिक माहितीसाठी ९४२२६३६२७३, ९७६५३१४९९०, ७८७५५४६७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.ेे

पांगारी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सभा

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी)  दाभीळ पांगारी पंचक्रोशीतील कॉग्रेस आयचे ज्येष्ठ  कार्यकर्ते श्री. अमिनभाई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉग्रेस कार्यकत्यार्ंंची सभा तालुका अध्यक्ष ऍड. श्री. विकास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेला कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर दळवी, माजी तालुका अध्यक्ष श्री.बंडुकाका खोत, महमद अली दळवी, य्ाुवक अध्यक्ष अस्लम दळवी, सोनू कांब्रे, नझर बर्डे, राष्ट्रवादीचे श्री. विनायक पाष्टे, रामचंद्र येलवे, कॉग्रेसचे भोई समाजाचे नेते श्री. संतोष कांब्रे तसेच पांगारी व दाभीळ गावतील सर्व नागरिक उपस्थित होते.यानंतर पांगारी महाकाळवाडी येथेहि बैठक संपन्न झाली. भोई समाजाचे नेते श्री.प्रकाश वाटेकर, संतोष महाकाळ, महिला अध्यक्षा सौ.मनिषा महाकाळ, श्रीधर मींडे तसेच सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भोई समाजाच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस मधुकर दळवी यांनी समाधानकारक उत्तर दिल्याने सर्व ग्रामस्थ कॉग्रेस आघाडीच्या पाठीशी ठाम राहणार आहेत असा निर्धार यावेळी करण्यात आला.

Page 1 of 2

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
  • »