Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

बांधकाम ठेक्याच्या वाढीव रक्कमेवरुन ठेकेदाराची आत्महत्या

E-mail Print PDF
ashok-mestri1सिंधुदुर्ग - घराच्या बांधकामाच्या ठेक्याची वाढीव रक्कम घरमालक देत नसल्याच्या कारणावरुन मालवण तालुक्यातील हेदूळ येथील अशोक तुकाराम मेस्त्री (४९) या ठेकेदाराने कसाल येथे ज्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला, त्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. अशोक मेस्त्री यांनी कसाल- वझरेवाडी येथे राहणारे अंकुश शिवराम गावडे यांच्या नवीन घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. या घराचे बहुतांशी काम पूर्ण झाले होते. दरवाजे लावणे शिल्लक होते. अशोक मेस्त्री यांनी चिठ्ठीत ‘आपण केेलेल्या घराच्या बांधकामाचे ठरल्यापेक्षा अधिक काम झाले. त्याची वाढीव रक्कम संबंधित घरमालकाकडे आपण मागत होतो. परंतु ती दिलेली नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे,’ असे लिहून ठेवले होते.

आम्ही अस्तित्वाची लढाई जिंकली - प्रमोद जठार

E-mail Print PDF
कणकवली - नगरपंचायत निवडणुकीत आमचा पराभव झालेला नाही, तर आम्ही अस्तित्वाची लढाई जिंकली आहे. कॉंग्रेसने साम-दाम-दंड-भेद वापरून आमचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला; पण शहरवासीयांच्या पाठबळावर आम्ही आमची ताकद दाखवून दिलीय. मागच्या निवडणुकीत शहर आघाडीचा एकच सदस्य होता. आता आमचे चार सदस्य आहेत. पुढच्या निवडणुकीत सोळा सदस्य होतील आणि सत्ता आमचीच असेल, असा विश्‍वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित होते.

कणकवलीत ७१.९५ टक्के मतदान

E-mail Print PDF
kankavli-voting1कणकवली- येथील नगरपंचायतीसाठी आज मतदारांनी उत्स्फूर्तपणे हक्क बजाविला. एकूण सरासरी ७१.९५ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत झाले. एकूण मतदानात ७६ टक्के पुरुष, तर ६८ टक्के महिलांनी हक्क बजाविला. शहरात चार प्रभागांतील सतरा जागांसाठी वीस मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे कुठल्याच मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. कडक उन्हाचा तडाखा असला तरी प्रत्येक मतदारासाठी वाहन व्यवस्था असल्याने उच्चांकी मतदान झाले. अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान शांततेत झाले.

ट्रकमधून दीड लाखाचे चोरीचे दागिने पळवणार्‍यांना पकडले

E-mail Print PDF
silver1वैभववाडी/कणकवली- फोंडा येथे चोरी करून ट्रकमधून दीड लाखांचे दागिने पळविणार्‍याला वैभववाडी पोलिसांनी आज पाठलाग करून पकडले. करूळ तपासणी नाका येथून या पाठलागाला सुरवात झाली. ही घटना आज सकाळी घडली. कणकवली पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे संशयित ट्रकचालक पांडुरंग खोत याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्याला कणकवलीचे पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय बाबर यांनी दिली. फोंडा एसटी स्थानकालगत मुख्य बाजारपेठेत विजय कसवणकर यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांनी काल (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद केले होते. मध्यरात्री अज्ञाताने दुकानावरील लोखंडी छपराचे पत्रे कापून आत प्रवेश केला आणि आतील सुमारे एक लाख ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लांबविले. हा प्रकार श्री. कसवणकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती.

चिरेखाणीच्या प्रश्‍नाला राज्य सरकारच जबाबदार : माजी पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू

E-mail Print PDF
सावंतवाडी- सरकारने चिरेखाणींबाबत राज्याची नियमावली, कायदा केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडे वेळेत म्हणणे सादर न केल्यामुळेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत चिरेखाणींचा प्रश्‍न निर्माण झाल्याची माहिती माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली. मानव साधन विकास संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त ते आज येथे आले होते. श्री. प्रभू म्हणाले, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील चिरेखाणीचा प्रश्‍न हा राज्य सरकार मुळेच निर्माण झाला. गाडगीळ समिती अहवालाचा आणि चिरेखाणींचा सूतराम संबंध नाही. गाडगीळ समितीच्या विरोधात नाही. समितीने काय अहवाल सादर केला आहे, ते केंद्राने जाहीर करावे लागेल. ही समिती कॉंग्रेस आघाडीच्या केंद्राने गठीत केली आहे. हरियाना येथील खाणींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने काही निर्बंध घातले. त्यामध्ये पर्यावरणीय दाखल्याची अट घालण्यात आली; मात्र हरियानातील खाणी व कोकणातील खाणी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.’’

Page 375 of 375