Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर

E-mail Print PDF
सिंधुदुर्ग :-चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. शनिवारी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वेधशाळेने ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिल्यानंतर बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कणकवली तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी नावीन्यपूर्ण प्रतिकृती बनवाव्यात-आमदार नीतेश राणे

E-mail Print PDF
कणकवली - कणकवली तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी नावीन्यपूर्ण प्रतिकृती बनवाव्यात, ज्या देशाच्या प्रगतीस चालना मिळणा-या असाव्यात. कणकवली तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी बनविलेल्या प्रतिकृती वाखाणण्याजोग्या असून भविष्यात या मुलांमधूनच वैज्ञानिक घडावेत यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, कणकवली सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जि. प. सदस्य श्रीया सावंत, पं. स. सदस्य प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष मधुकर वाडेकर, कार्याध्यक्ष विजयराव चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष अभिमन्यू लाड, विज्ञान प्रदर्शन नियोजन समितीचे अध्यक्ष आनंदराव साटम आदी मान्यवर उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून मिळणारा निधी फारच अपुरा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरून विज्ञान प्रदर्शनासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष घालून विज्ञान प्रदर्शन भव्य-दिव्य होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या आंगणेवाडीची यात्रा जानेवारी २७ पासुन

E-mail Print PDF
सावंतवाडी : जानेवारीच्या २७ तारखेपासून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा भरणार आहे. यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. यावर्षीही यात्रोत्सवात १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.  जत्रोत्सवाची तारीख देवीने दिलेल्या आदेशानुसार निश्चित झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे लागून होते. कोकणात जाणा-या गाड्यांचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणा-या यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे.

विनापरवाना स्पिरिटची वाहतूक करणारा टँकर बांदा येथे पकडला.

E-mail Print PDF
सावंतवाडी : विनापरवाना स्पिरिटची वाहतूक करणारा टँकर बांदा येथे पकडला. स्पिरीटसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात

आंबोलीतील महादेव भिसेंच्या छायाचित्रास आंतरराष्ट्रीय पुरस्कार

E-mail Print PDF
आंबोलीतील महादेव भिसेंच्या छायाचित्रास आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला.
सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला.
निसर्गातली कला कॅमेर्‍याच्या लेन्समधून टिपत महादेवने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गाचं नाव कोरलंय. ‘सेंच्युरी एशिया’ या अत्यंत प्रथितयश मासिकातर्फे आयोजित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ स्पर्धेत या विभागातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचं पारितोषिक पटकावले आहे. नुकत्याच द रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रोख रक्कम, एक कॅमेरा बॅग, प्रमाणपत्र आणि भारतातील कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये सफारी हे या पुरस्काराच स्वरूप आहे. आशिया खंडातील पाच हजाराहूनही अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता आणि काका भिसे हा त्या सगळ्यात अव्वल ठरला आहे. सेंच्युरी एशिया या मासिकामध्ये त्याचा हा फोटो प्रकाशित देखील करण्यात आला आहे.
आंबोली बुश या बेडकाला एका किटकांच्या लारवयांनी पकडलेले असल्याचा हा फोटो असून हा कीटकांचा लारवा या बेडकांना भविष्यात या बेडकांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. असा शोधनिबंधही यावर लिहिण्यात आला. हा शोधनिबंध व काका भिसे यांनी काढलेला तो बेडकाचा फोटो या दोघांनाही मिळवून हा मानाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक काका भिसे यांना मिळाले.

सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला. सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला. निसर्गातली कला कॅमेर्‍याच्या लेन्समधून टिपत महादेवने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गाचं नाव कोरलंय. ‘सेंच्युरी एशिया’ या अत्यंत प्रथितयश मासिकातर्फे आयोजित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ स्पर्धेत या विभागातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचं पारितोषिक पटकावले आहे. नुकत्याच द रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.रोख रक्कम, एक कॅमेरा बॅग, प्रमाणपत्र आणि भारतातील कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये सफारी हे या पुरस्काराच स्वरूप आहे. आशिया खंडातील पाच हजाराहूनही अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता आणि काका भिसे हा त्या सगळ्यात अव्वल ठरला आहे. सेंच्युरी एशिया या मासिकामध्ये त्याचा हा फोटो प्रकाशित देखील करण्यात आला आहे.आंबोली बुश या बेडकाला एका किटकांच्या लारवयांनी पकडलेले असल्याचा हा फोटो असून हा कीटकांचा लारवा या बेडकांना भविष्यात या बेडकांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. असा शोधनिबंधही यावर लिहिण्यात आला. हा शोधनिबंध व काका भिसे यांनी काढलेला तो बेडकाचा फोटो या दोघांनाही मिळवून हा मानाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक काका भिसे यांना मिळाले.

उंटाने घेतला मालकाचाच चावा!

E-mail Print PDF
मालवण- तारकर्ली समुद्र किनारी गेले काही दिवस पर्यटकाना उंट सफर घडवणार्‍या व्यावसायिकाला त्यांच्याच एका उंटाने चावा घेतला. रविवारी दुपारी दोन उंटांचे लागलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या लखन शिंदे (४५) हा गेला असता एका संतप्त उंटाने त्याच्या हाताचा जोरकस चावा घेतला.  यामुळे लखन शिंदे याच्या हाताला खोल जखम होवून स्नायू तुटले व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. सहकार्‍यांनी लखन याला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तातडीने उपचार केले. लखन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अनोख्या चाव्याची चर्चा बंदर परिसर व शहरात सुरू होती.

कॉलेज युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

E-mail Print PDF
मालवण - मालवण-गवंडीवाडा येथे राहणार्‍या प्राची रामदास चव्हाण (१९) या कॉलेज युवतीने रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसर्‍या वर्षाला शिकत होती. परीक्षेच्या तणावामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. परीक्षा जवळ आल्याने रविवारी सकाळी ११  वा. च्या सुमारास ती घरातील एका खोलीत अभ्यासासाठी गेली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी प्राची बाहेर आली नाही म्हणून  आई तिला पाहण्यासाठी खोलीत गेली असता प्राची छपराच्या वाश्याला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते. प्राचीला अभ्यासाचे टेन्शन आल्याने तिने आत्महत्या केली, असे प्राचीच्या वडिलांनी  सांगितल्याची माहिती तपासीक अंमलदार विवेक नागरगोजे यांनी दिली आहे.

मालवणमधील समुद्रात दांडी बीच सी वॉटरपार्क पर्यटकांच्या सेवेला

E-mail Print PDF
मालवण - येथील समुद्राखालील अनोख्या विश्‍वाची भुरळ देशी, विदेशी पर्यटकांना पडली आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंगचा आनंद लुटण्यास येणार्‍या पर्यटकांना तसेच बच्चे कंपनीला पर्यटनाचा वेगळा आनंद लुटता यावा, यासाठी बेरोजगार, स्थानिक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक अशा चाळीस जणांनी या महिन्यात एकत्र येत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांची गुंतवणूक करून समुद्रात दांडी बीच सी वॉटरपार्क हा प्रकल्प साकारला आहे.
पर्यटन जिल्ह्यात शासनाकडून वेगळे उपक्रम राबविणे गरजेचे असताना शासनाची कोणतीही मदत न घेता स्थानिकांनी कोकण किनारपट्टीवरील हा पहिला सहकार तत्त्वावरील प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना वेगळा आदर्श घालून दिला आहे. या महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जागतिक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अशाप्रकारचे वॉटरपार्क प्रकल्प समुद्रात उभारले जातात. बच्चे कंपनीसह पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी असते. येथे दाखल होणार्‍या पर्यटकांना नावीन्यता देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत या पर्यटन प्रकल्पाची उभारणी केली आहे. स्थानिक मच्छीमारांना व अन्य वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांना कोणताही त्रास न होता येथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकल्पाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.
बंदर विभागालाही याबाबत पत्र देण्यात आले असून, सर्व प्रकारच्या परवानगीची पूर्तता करून या वॉटरपार्क प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा मानसही आज दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे झालेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
वॉटरपार्क प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेटसह अन्य सर्व सुरक्षेच्या उपाययोजना असणार आहेत. जीवरक्षकांची नियुक्तीही केली जाणार आहे. येथे आलेल्या पर्यटकाला सुरक्षितरीत्या पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी कोणतीही कमी ठेवली जाणार नाही. अगदी माफक दरात जास्त सुरक्षा व जास्त पर्यटन आनंद ही संकल्पना राबविली जाणार आहे.
कोणत्याही प्रकारे मासेमारी व्यावसायिकांना या वॉटरपार्कचा अडसर होणार नाही. या हेतूने अगदी किल्ले सिंधुदुर्गच्या समोरच केवळ काही फूट कामात या वॉटरपार्कची उभारणी सुरू आहे. उभारणी दरम्यान अनेक पर्यटक वॉटरपार्कमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. मात्र, लवकरच उभारणी पूर्ण झाल्यावर पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, असे व्यावसायिकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सर्जेकोट समुद्रात हायस्पीड ट्रॉलर पकडला

E-mail Print PDF
मालवण - सर्जेकोट बंदरापासून अकरा वाव खोल समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारा मलपी कर्नाटक येथील एक हायस्पीड ट्रॉलर सागरी व मालवण पोलिसांनी सागरी गस्तीदरम्यान ताब्यात घेतला. हायस्पीड नौकेत बांगडा, बळा, म्हाकुल, सौंदाळा, दोडी आदी प्रकारची २७ क्रेट मासळी सापडली. पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला असून कारवाईचा प्रस्ताव शुक्रवारी तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, देवगड पाठोपाठ मालवण येथील सागरी पोलिसांनी गस्ती दरम्यान अनधिकृत मासेमारी करणाऱया नौकेला जेरबंद केल्याने स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांचे थेट पकडलेल्या नौकेवर जाऊन अभिनंदन केले.
सर्जेकोट समुद्रात हायस्पीड नौकेला अनधिकृत मासेमारी करताना सागरी पोलिसांच्या ‘सिंधुदुर्ग ५’ या गस्ती नौकेने पकडले. त्यानंतर मालवण बंदरात आणून पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला. कर्नाटक येथील गणेश पालन यांच्या मालकीची ‘कस्तुरी फिशर्स बाबा’ (केए ०२ एमएम ४७३४) ही नौका पकडण्यात आली. बोट पकडल्याची माहिती सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांनी मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व मत्स्य विभागाला दिली. त्यानंतर नौका मालवण बंदरात आणून पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला. सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, विलास तोरसकर, सोमनाथ पवार, ए. जी. ढोलये, जवूर शिरगावकर, हरिश्चंद्र जायभाय, संदीप सरकुंडे आदींच्या पथकाने कारवाई केली. मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, विल्सन डिसोझा, आशिष भाबल, भाऊ नाटेकर तसेच मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी श्रीकांत वारुंजीकर यांनी पंचनामा केला.

Page 4 of 375