Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

देवगडात सातपैकी चार ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा

E-mail Print PDF
देवगडात सातपैकी चार ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा
देवगड : देवगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सातपैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. भाजप व स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी एक तर फणसगाव ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने विजय मिळविला. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या रामेश्वर ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनेलने यश मिळविले. पावणाई व वानिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने गाव पॅनेलच्या माध्यमातून सत्ता मिळविली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या वळिवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता आणून आरोग्यमंत्र्यांची शान राखली.
शिवसेनेकडे वळिवंडे, वानिवडे, पावणाई, विठ्ठलादेवी अशा चार, तर स्वाभिमानकडे रामेश्वर तर शिरवली ग्रा. पं. वर भाजपने वर्चस्व मिळविले. पावणाई ग्रा. पं. वर शिवसेनेचे पप्पू लाड सरपंचपदी विराजमान झाले असले तरी त्यांनी गाव विकास पॅनेलमधून निवडणूक लढविली असल्याचे त्यांनी सांगितले. तर फणसगाव ग्रा. पं. मधून स्वाभिमान पक्षाच्या माजी पं. स. सदस्य सुभाष नारकर यांच्या पत्नी सायली नारकर या विजयी झाल्या असल्या तरी त्यांनी गाव पॅनेल असल्याचे सांगितले.

देवगड : देवगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सातपैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. भाजप व स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी एक तर फणसगाव ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने विजय मिळविला. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या रामेश्वर ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनेलने यश मिळविले. पावणाई व वानिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने गाव पॅनेलच्या माध्यमातून सत्ता मिळविली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या वळिवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता आणून आरोग्यमंत्र्यांची शान राखली.शिवसेनेकडे वळिवंडे, वानिवडे, पावणाई, विठ्ठलादेवी अशा चार, तर स्वाभिमानकडे रामेश्वर तर शिरवली ग्रा. पं. वर भाजपने वर्चस्व मिळविले. पावणाई ग्रा. पं. वर शिवसेनेचे पप्पू लाड सरपंचपदी विराजमान झाले असले तरी त्यांनी गाव विकास पॅनेलमधून निवडणूक लढविली असल्याचे त्यांनी सांगितले. तर फणसगाव ग्रा. पं. मधून स्वाभिमान पक्षाच्या माजी पं. स. सदस्य सुभाष नारकर यांच्या पत्नी सायली नारकर या विजयी झाल्या असल्या तरी त्यांनी गाव पॅनेल असल्याचे सांगितले.

केळुसला आंबा बागेत अग्नितांडव

E-mail Print PDF
केळुसला आंबा बागेत अग्नितांडव
वेंगुर्ले : केळुस-सडा येथील प्रशांत कुंदनलाल चावला यांच्या ५० एकर क्षेत्रातील आंबा कलम बागेस आग लागून सुमारे ५० लाखाचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. आगीचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामस्थ तसेच आकाश फिश मिलच्या ८० कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या २२०० हापूस आंबा कलमांपैकी ७५० कलमे या आगीत खाक झाली. बागेतील कामगारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती बागेचे व्यवस्थापक अनिल नाईक यांना मोबाईलवरून दिली. चव्हाण हे तात्काळ कुडाळ नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबासोबत केळुसकडे निघाले असता हुमरमळा-आंदुर्ले येथे अग्निशमन बंबाच्या गाडीचे पाटे तुटल्याने गाडी तेथेच राहिली. त्यानंतर नाईक या आगीची कल्पना वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला दिली. या आगीची माहिती सडा येथील आकाश फिश मिलला समजताच आकाश फिशच्या व्यवस्थापनाने आपल्या पाणी टँकरसह ८० कामगारांना आग विझविण्यासाठी घटनास्थळी पाठविले. तब्बल १२ टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू होते. केळुस ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याने वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबास परत पाठविण्यात आले. मात्र, डोंगर उतार भागातील आग विझली नसल्याचे लक्षात येताच या अग्नीशमन बंबास पुन्हा पाचारण करण्यात आले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

वेंगुर्ले : केळुस-सडा येथील प्रशांत कुंदनलाल चावला यांच्या ५० एकर क्षेत्रातील आंबा कलम बागेस आग लागून सुमारे ५० लाखाचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. आगीचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामस्थ तसेच आकाश फिश मिलच्या ८० कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या २२०० हापूस आंबा कलमांपैकी ७५० कलमे या आगीत खाक झाली. बागेतील कामगारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती बागेचे व्यवस्थापक अनिल नाईक यांना मोबाईलवरून दिली. चव्हाण हे तात्काळ कुडाळ नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबासोबत केळुसकडे निघाले असता हुमरमळा-आंदुर्ले येथे अग्निशमन बंबाच्या गाडीचे पाटे तुटल्याने गाडी तेथेच राहिली. त्यानंतर नाईक या आगीची कल्पना वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला दिली. या आगीची माहिती सडा येथील आकाश फिश मिलला समजताच आकाश फिशच्या व्यवस्थापनाने आपल्या पाणी टँकरसह ८० कामगारांना आग विझविण्यासाठी घटनास्थळी पाठविले. तब्बल १२ टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू होते. केळुस ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आल्याने वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबास परत पाठविण्यात आले. मात्र, डोंगर उतार भागातील आग विझली नसल्याचे लक्षात येताच या अग्नीशमन बंबास पुन्हा पाचारण करण्यात आले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

शेतकर्‍यांनी काजू लागवडीला प्राधान्य द्यावे-जिल्हाधिकारी

E-mail Print PDF

कुडाळ-  खर्च कमी, उत्पादन जास्त, मार्केट दारात असे काजू पीक आहे. आपला जिल्हा काजू पिकात देशात पहिला आहे. शेतकऱयांनी काजू लागवडीला पहिले स्थान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी येथे काजू परिषदेत केले. नरेगांतर्गत काजू लागवडीसाठी प्रस्ताव तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

सिंधु कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळय़ाच्या आजच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात येथे जिल्हा बँकेतर्फे काजू परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा शुभारंभ चौधरी यांच्या हस्ते झाला. जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा परब, योगेश परुळेकर, चंद्रशेखर देसाई, सुरेश बोवलेकर, विजय सावंत, बाळकृष्ण गाडगीळ, राजाराम मावळकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गात साठ हजार हेक्टर क्षेत्र पड आहे. गतवर्षी आठ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. जि. प.च्या माध्यमातून दोन हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आल्याने आता 52 हजार हेक्टर क्षेत्र पड आहे. या पड जमिनीवर काजू लागवड करावी. या लागवडीचा दहा वर्षांत परिणाम दिसेल. काजू आधारित प्रधान अर्थव्यवस्थेसाठी आणि देशात या जिल्हय़ाचा असलेला या पिकाचा पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी काजू लागवड महत्वाची आहे.

जमीन चढ-उताराची असली, तरी या लागवडीसाठी ती चालते. खर्च कमी, उत्पादन जास्त, टिकावू आणि या पिकासाठी बाजारपेठ शोधावी लागत नाही. ती आपल्या दारात येते. येथील शेतकऱयांनी या पिकासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन काम केले पाहिजे. कोकण कृषी विद्यापीठ काजूच्या नवनवीन जाती शोधत आहे. शेतकऱयांना हे विद्यापीठ माहिती देत आहे. शेतकऱयांनी त्याचाही उपयोग करून घ्यावा. काजूची जुनी झाडे काढावीत. तेथे नवीन काजू लागवड करावी, असेही चौधरी यांनी सांगितले.

आचरा टेंबली येथे प्राचीन कोरीव शिल्प सापडले

E-mail Print PDF

आचरा- आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे. चौकोनी आकाराच्या दगडावर दोन स्त्राrया पिंडी घेऊन बसल्याचे चित्र कोरण्यात आले आहे. खोदलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकताना मातीत ठेकेदाराला चौकोनी आकाराचा दगड सापडला होता. शिल्प सापडल्याची चर्चा आचरा परिसरात सोशल मीडियावर रंगली होती.

आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करताना खडकाळ भाग खोदून माती व दगड बाजूला टाकताना हे कोरीव शिल्प सापडले आहे. एका ठेकेदाराच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू होते. सपाटीकरण करताना काढलेली माती दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकली जात होती. त्यावेळी त्या मातीत चौकोनी आकाराचा दगड ठेकेदारास दिसून आला. कुतुहलापोटी ठेकेदाराने तो दगड बाजूला काढून घेत इतर कामगारांच्या सहाय्याने ती साफ करण्यास सुरुवात केली असता, त्यावर कोरीव काम केले असल्याचे त्याला आढळून आले. शिल्प मिळाल्याची बातमी आचरा परिसरात सोशल मीडियावर वाऱयासारखी पसरली आणि ते शिल्प बघण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी पाहायला मिळत होती.

किल्ले सिंधुदुर्गवर एका दिवसात विक्रमी १२ हजार पर्यटक

E-mail Print PDF

मालवण - कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालवणात नाताळ सुटीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांनी मालवणनगरीसह किनारपट्टी फुलून गेली आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गावर रविवारी (२४) एका दिवसात १२ हजार या विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील चिवला बीच, बंदर जेटी, रॉकगार्डन परिसर तसेच तारकर्ली,  देवबाग,  वायरी,  तळशील-तोंडवळी,  घुमडे याठिकाणीही पर्यटनाचा आनंद लुटण्यास पर्यटकांची मोठी गर्दी होती.

सलग सुट्ट्यांचा विचार करता गेल्या दोन दिवसात येथे मोठ्या संख्येने देशी, विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गसह स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग ,बनाना राईड, जेटस्की, पॅरासेलिंगचा तसेच अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास गर्दी झाली होती. आजही किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हजारो पर्यटकांची गर्दी बंदर जेटीवर झाल्याचे दिसून आले. बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या वाहनांनी फुलून गेला होता. दांडी येथे साकारण्यात आलेल्या दांडी सी वॉटरपार्कच्या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बंदर जेटी परिसर पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरात पर्यटकांसह राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली दाखल झाल्या आहेत. चिवला बीच समुद्रात विविध शाळकरी मुले आज समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यात मग्न असल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या आगमनामुळे शहरासह परिसरातील तसेच तारकर्ली, देवबाग या भागातील रिसॉर्ट, निवास न्याहारी फुल झाल्या आहेत. पर्यटकांच्या निवार्‍याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल्स, लॉजिंग, निवास न्याहारी तसेच अन्य पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आहे. खानावळीमध्ये साडे अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेवणावळी सुरू असल्याचे चित्र आहे. मासळीचे दर आवाक्यात असल्याने मत्स्य खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे बाजारपेठेतही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प केवळ मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठीच- खास . विनायक राऊत

E-mail Print PDF
देवगड :-नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प केवळ मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठीच केला जात आहे. अदानींचे चोचले पुरविण्यासाठीच रिफायनरीच्या माध्यमातून कोकणाला फसविले जात असल्याचा आरोप खास . विनायक राऊत यांनी केला . मच्छीमारी व्यवसाय तसेच आंबा, काजू आदी फळपिकांवरही प्रकल्पामुळे गंभीर परिणाम होणार आहे. अशा घातकी प्रकल्पांपेक्षा मच्छीमारी, आंबा व्यवसाय यावर आधारित व निसर्गाला हानी न पोहोचविणारे प्रकल्प राबवावेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकल्पामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक आहे व १ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, असे गाजर दाखविले जात आहे. हा केवळ भूलभुलय्या आहे असे खासदार राऊत म्हणाले.

ओखी चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

E-mail Print PDF

सिंधुदूर्ग : मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीतील गावांना ओखी चक्रीवादळाचा फटका बसला असून त्यातून महावितरणही सुटलेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिर्लोट खाडी येथे 4 तारखेला सायंकाळी विजेचे दोन खांब कोसळले आहेत. वादळामुळे खांब उभारणे जोखमीचे बनल्याने सोमवारी सायंकाळपासून सहा गावातील 347 घरांचा वीजपुरवठा बंद आहे.

दोडामार्ग भागात कुनाळकट्टा 33 केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या तिल्हाली 11 केव्ही फिडरवर दुपारी बिघाड झाला. त्यातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र त्यावरील 18 रोहित्रांवरील 565 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

कणकवली विभागात कनेडी 33 केव्ही उपकेंद्रातील 11 केव्ही नरवडे फिडरवर मंगळवारी (दि. 05) सकाळी 9.05 वाजता बिघाड झाला. त्यावरील काही भागाचा वीजपुरवठा 9.50 वाजता सुरळीत झाला. तर उर्वरित वीजपुरवठा दुपारी दीड वाजेच्या सुमारास संपूर्णपणे सुरळीत करण्यात यश मिळाले.

तळेबाजार उपकेंद्रातील टेंभीवली 11 केव्ही फिडरवर वीज वाहिनी तुटल्यामुळे 12.58 वाजता बिघाड झाला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो सुरू करण्यात आला. माणगाव भागातही सकाळी 7.35 वाजता बिघाड झाला होता. तीन तासात बिघाड दुरूस्त करुन 10.35 वाजता फिडर सुरू करण्यात आला.

 

 

सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची गस्तीनौका बुडाली

E-mail Print PDF
सिंधुदुर्ग-सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची गस्तीनौका बुडाली. पोलिसांची सिंधू 5 ही नौका बुडाली. लाटांच्या तडाख्याने पाणी शिरल्याने बोट बुडाली.

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग समुद्र किनार्‍यावर केरळ आणि तामीळनाडुच्या नौका दाखल

E-mail Print PDF
सिंधुदुर्ग :-ओखी वादळाचा मोठा फटका केरळ आणि तामिळनाडूतील मच्छीमारांना बसला आहे. या वादळामुळे अनेक मच्छीमार बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग समुद्र किनार्‍यावर केरळ आणि तामीळनाडुच्या एकूण ६८ नौका पोहचल्या आहेत. ज्यामध्ये ६६ नौका या केरळच्या तर दोन नौका तामीळनाडुच्या आहेत. यामध्ये ९५२ मच्छीमार आहेत. हे सर्व मच्छीमार सुरक्षित आहेत .

Page 3 of 375