Tuesday, Jan 23rd

Headlines:

कोकणी माणूस हाताळायला सोपा ः राज ठाकरे

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकणी माणूस सरकारच्या दृष्टीने हाताळायला अगदी सोपा झालाय, त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. कोणीही येऊन येथील माणसांची फसवणूक करताना दिसत आहे. राजकीय पक्षही एकमेकांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करून आपले भाव वाढवून घेत आहेत. परप्रांतीय येथे घुसून जमिनी खरेदी करतात तरीही आम्ही गप्पच, ही स्थिती आता सुधारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाचा वणवा पेटत आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून त्यावरून जोरदार राजकारणही उसळले आहे. या वातावरणात मनसेचे अध्यक्ष राजक ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा सुरू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ग्रीन रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे शिष्टमंडळ आपणाला भेटल्याचे त्यांनी सांगितले.
विविध राजकीय पक्षांच्या भुमिकांबाबत बोलताना कोणी काय भुमिका घेतो याचे देणघेणं नसून स्थानिक जनतेला काय हवे हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राजकीय पक्षांचे स्वतःचे अजेंडे असतात, भूमिका असतात, आपली भूमिका नाणार येथील स्थानिकांशी चर्चा करून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजापूर नगराध्यक्ष काझींचे पद पुन्हा एकदा धोक्यात

E-mail Print PDF
राजापूर ः राजापुरचे नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी यांचे नगराध्यक्षपद पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविताना काझी यांनी सादर केलेला मच्छीमार दालदी समाजाचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने फेरतपासणीमध्येही अवैध ठरवून तो जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निर्णयाविरोधात काझी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवताना मच्छीमार दालदी समाजाचा दाखला सादर केला होता. मात्र याबाबत स्विकृत नगरसेवक अनिल कुडाळी व नगराध्यक्षपदाचे सेनेचे पराभूत उमेदवार अभय मेळेकर यांनी जोरदार आक्षेप घेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून काझी यांना उपविभागिय अधिकारी राजापूर यांनी वितरीत केलेला मच्छिमार या जातीचा दाखला अवैध ठरविला होता. त्यानंतर काझी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अपिल दाखल केले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिताला फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याप्रकरणी फेरतपासणी करून आदेश जारी केला आहे. यामध्ये कागदोपत्री पुरावे, पोलीस दक्षता पथकाचे अहवाल, अर्जदार हनिफ काझी तर्फे विधीज्ञ, तक्रारदार अभय मेळेकर, अनिल कुडाळी व त्यांच्यातर्फे विधीज्ञ यांनी मांडलेले म्हणणे व युक्तीवाद विचारात घेता अर्जदार हनिफ काझी यांची जात मच्छीमार (दालदी) इतर मागासवर्ग असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे अर्जदार काझी यांना उपविभागिय अधिकारी राजापूर यांनी वितरीत केलेला मच्छिमार या जातीचा दाखला क्र २१६०/ १६ निर्गम दि.१८/१०/२०१६ हा अवैध ठरविण्यात येऊन रद्द व जप्त करण्यात येत आहे. असा फेर निकाल दिला आहे. या निकालाने शहरातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

आपली वाटचाल अराजकतेकडे : राज ठाकरे

E-mail Print PDF
 रत्नागिरी : सरकार सगळीकडे नियंत्रण ठेऊ पाहत आहे. त्यामुळे आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर रत्नागिरी येथे राज ठाकरे बोलत होते. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींच्या बोलण्यावरुन आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे, हे स्पष्ट होते. सरकार न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करु पहात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आपला देश केवळ अडीच माणसं चालवत आहेत. मात्र, सरकारच्या हे अंगाशी येईल, असेही ते म्हणाले.

शाळा बंदचा निर्णय शिक्षण कायद्याप्रमाणेच

E-mail Print PDF
शाळा बंदचा निर्णय शिक्षण कायद्याप्रमाणेच
रत्नागिरी ः राज्यात १३०० शाळा बंद करून शिक्षकांसह विद्यार्थी शेजारच्या शाळेत हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आह़े शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहूनच हा निर्णय घेण्यात आला आह़े प्राथमिक शिक्षण १ क़ि म़ी अंतरावर आणि उच्च प्राथमिक ३ क़ि म़ी अंतरावर उपलब्ध असाव़े या तरतुदींना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आह़े, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल़े
येथील एम. डी. नाईक सभागृहाच्या मैदानात ११ ते १३ जानेवारीपर्यंत ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ गुरूवारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी शिक्षण विद्या प्राधिकरण संचालक सुनील मगर, जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, उपसंचालक मकरंद गोंधळी, गंगाधर म्हमाणे, सुनील चौहान, दिनकर पाटील, शिक्षण सभापती दीपक नागले, नगराध्यक्ष राहुल पंडित, डाएटचे प्रा.डॉ.आय. शी. शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिरगांव सरपंच वैशाली गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
१३०० शाळा बंद करण्याचा आपला निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या ठिकाणी १० च्या आत पटसंख्या होती, त्या मुलांचा सर्वांगिण विकास होत नव्हता. तसेच शिक्षकांनाही या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबवताना काही अडचणी येत होत्या. या सगळया गोष्टींचा अभ्यासपूर्ण विचार करून या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. या कमी संख्या असलेल्या शाळेतील मुलांचे नुकसानच होत होते. या मुलांना इतर शाळांमध्ये वर्ग केल्याने त्यांचा आता चांगल्या अर्थाने विकास होत असल्याचेही यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले. शिक्षण हक्क कायद्याच्या बाहेर जाऊन एकही शाळा बंद होणार नाह़ी प्राथमिक शिक्षण १ क़ि म़ी आणि ३ क़ि म़ी वर उच्च प्राथमिक शिक्षण देण्याची हमी कायम राहिल़ शासकीय धोरणात चूक असेल तर आम्ही अशी शाळा बंद करणार नाह़ी संबंधितांनी तसे लक्षात आणून द्याव़े, असे आवाहन तावडे यांनी केल़े

रत्नागिरी ः राज्यात १३०० शाळा बंद करून शिक्षकांसह विद्यार्थी शेजारच्या शाळेत हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आह़े शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहूनच हा निर्णय घेण्यात आला आह़े प्राथमिक शिक्षण १ क़ि म़ी अंतरावर आणि उच्च प्राथमिक ३ क़ि म़ी अंतरावर उपलब्ध असाव़े या तरतुदींना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आह़े, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केल़ेयेथील एम. डी. नाईक सभागृहाच्या मैदानात ११ ते १३ जानेवारीपर्यंत ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ गुरूवारी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी शिक्षण विद्या प्राधिकरण संचालक सुनील मगर, जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, उपसंचालक मकरंद गोंधळी, गंगाधर म्हमाणे, सुनील चौहान, दिनकर पाटील, शिक्षण सभापती दीपक नागले, नगराध्यक्ष राहुल पंडित, डाएटचे प्रा.डॉ.आय. शी. शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिरगांव सरपंच वैशाली गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.१३०० शाळा बंद करण्याचा आपला निर्णय अतिशय योग्य आहे. ज्या ठिकाणी १० च्या आत पटसंख्या होती, त्या मुलांचा सर्वांगिण विकास होत नव्हता. तसेच शिक्षकांनाही या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबवताना काही अडचणी येत होत्या. या सगळया गोष्टींचा अभ्यासपूर्ण विचार करून या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. या कमी संख्या असलेल्या शाळेतील मुलांचे नुकसानच होत होते. या मुलांना इतर शाळांमध्ये वर्ग केल्याने त्यांचा आता चांगल्या अर्थाने विकास होत असल्याचेही यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले. शिक्षण हक्क कायद्याच्या बाहेर जाऊन एकही शाळा बंद होणार नाह़ी प्राथमिक शिक्षण १ क़ि म़ी आणि ३ क़ि म़ी वर उच्च प्राथमिक शिक्षण देण्याची हमी कायम राहिल़ शासकीय धोरणात चूक असेल तर आम्ही अशी शाळा बंद करणार नाह़ी संबंधितांनी तसे लक्षात आणून द्याव़े, असे आवाहन तावडे यांनी केल़े

.. तर रिफायनरीला भाजपचाही विरोध ः विनोद तावडे

E-mail Print PDF
.. तर रिफायनरीला भाजपचाही विरोध ः विनोद तावडे
रत्नागिरी ः रिफायनरीमुळे स्थानिक जनतेचे नुकसान होणार असेल तर आमचीही भूमिका रिफायनरी प्रकल्प नको, अशीच आहे. मुख्यमंत्री याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमंत्री यांनी सांगितले. खा. विनायक राऊत यांनी लँडमाफियांबाबत जो आरोप केला आहे, त्याचे पुरावे द्यावेत, नावे जाहीर करावीत, असे आव्हानदेखील ना. तावडे यांनी शिवसेनेच्या खासदारांना दिले आहे.
शिक्षणाची वारी या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे गुरूवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

रत्नागिरी ः रिफायनरीमुळे स्थानिक जनतेचे नुकसान होणार असेल तर आमचीही भूमिका रिफायनरी प्रकल्प नको, अशीच आहे. मुख्यमंत्री याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमंत्री यांनी सांगितले. खा. विनायक राऊत यांनी लँडमाफियांबाबत जो आरोप केला आहे, त्याचे पुरावे द्यावेत, नावे जाहीर करावीत, असे आव्हानदेखील ना. तावडे यांनी शिवसेनेच्या खासदारांना दिले आहे.शिक्षणाची वारी या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे गुरूवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

कणाद क्लासेसच्या राज वाडकरच नेत्रदीपक यश

E-mail Print PDF
कणाद क्लासेसच्या राज वाडकरच नेत्रदीपक यश
रत्नागिरी ः दरवर्षीप्रमाणे कणाद क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे.
यामध्ये राज वाडकर मॅथ्स ३-१००/१०० (८४ टक्के), आदित्य कदम मॅथ्स ३-९९/१०० (७१ टक्के), अमन खतीब मॅथ्स १-८७/१०० (७५ टक्के), अलिना खतिब मॅथ्स १- ८१/१०० (७३ टक्के) गुण मिळविले. याशिवाय मॅथ्स ३ मध्ये ऋषिकेश गुणीजन-८९, प्रथमेश दाते-८८, ओमकार राणे-८६, यश दाभोळकर-८३, अविनाश हाके-८० व संकल्प चव्हाण-७८ यांनी उज्वल यश संपादन केले.

रत्नागिरी ः दरवर्षीप्रमाणे कणाद क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे.यामध्ये राज वाडकर मॅथ्स ३-१००/१०० (८४ टक्के), आदित्य कदम मॅथ्स ३-९९/१०० (७१ टक्के), अमन खतीब मॅथ्स १-८७/१०० (७५ टक्के), अलिना खतिब मॅथ्स १- ८१/१०० (७३ टक्के) गुण मिळविले. याशिवाय मॅथ्स ३ मध्ये ऋषिकेश गुणीजन-८९, प्रथमेश दाते-८८, ओमकार राणे-८६, यश दाभोळकर-८३, अविनाश हाके-८० व संकल्प चव्हाण-७८ यांनी उज्वल यश संपादन केले.

Page 8 of 2713