Tuesday, Jan 23rd

Headlines:

ईडू विरोधात १४ जणांची पोलिसांकडे धाव

E-mail Print PDF
चिपळूण ः ईडूमधील विविध स्किममध्ये भरलेले पैसे मिळणार नाहीत याची कल्पना आल्यानंतर आता गुंतवणूकदारांनी पोलीस स्थानकात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी धाव घेतली असून त्यांनी १५ लाख १३ हजार ५३२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आठ बँक खाती गोठविली आहेत. चौकशीमध्ये रवी किरण याचे एक पॅनकार्ड बनावट असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान चिपळुणकरांना ऑनलाईन गंडा घालणार्‍या ईडूअर्नच्या प्रकरणात काही राजकीय पुढार्‍यांचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून या सर्वांची यादी देखील ईडूच्या हार्डडिस्कमध्ये सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणत्या पक्षाचे कोण कोण आहेत, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. त्या पुढार्‍यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची तयारी देखील पोलिसांनी केली आहे.

प्लास्टीक पिशवी द्या, कापडी पिशवी घ्या

E-mail Print PDF
रत्नागिरी ः साफसफाई करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दि गिफ्ट ट्रीने राबविलेला कार्यक्रम चांगला आहे. प्रत्येक शहरात प्लास्टीक  पिशवी द्या, कापडी पिशवी घ्या हा उपक्रम प्लास्टीक कचरा उचलण्यासाठी महत्वाचे पाउल असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दि गिफ्ट ट्रीच्या आयोजित कार्यक्रमात केले. रत्नागिरी शहरात मारुती मंदिर सर्कल येथे दि गिफ्ट ट्री कडून प्लास्टीक पिशवी द्या कापडी पिशवी घ्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष राहुल पंडित बोलत होते.

रत्नागिरीची कचराकुंडी मुक्तीकडे वाटचाल

E-mail Print PDF
रत्नागिरी ः इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येवू शकते. सध्या रत्नागिरी शहरात कचर्‍याच्या आणि दुर्गंधीच्या संकटाविरूद्धची लढाई सुरू आहे. मच्छिमार्केट परिसरात जिथे कचर्‍याचे ढिग दुर्गंधी अन कुत्रे, गुरांचा उपद्रव दिसायचा तो परिसर रांगोळ्यांनी सजला होता. रत्नागिरी आणखी काही ठिकाणी स्वच्छ आणि सुंदरतने नटली होती. हे चित्र कायम रहावे अशी आता नागरिकांची अपेक्षा आहे.

विद्यार्थीनीचा विनयभंग ः शिक्षकाविरूद्ध गुन्हा

E-mail Print PDF
लांजा ः शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना मठ येथील मराठी शाळेत घडली असून आठवीमध्ये शिकणार्‍या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संशयित शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनई चौघड्यांच्या सुरात श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह संपन्न

E-mail Print PDF
संगमेश्‍वर ः राज्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टका, मंत्रोपचारांच्या मंगल वातावरणात कोंडगावी श्री देवी गिरजा हिच्याबरोबर थाटात संपन्न झघला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत गर्दी केली होती.
आंगवली येथील मुळ मठात विवाहापुर्वीचे सर्व विधी झाल्यावर श्री देव मार्लेश्‍वराची मूर्ती, चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लीकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न झाली.

रिफायनरी भागात प्रक्षोभ

E-mail Print PDF
राजापूर ः रिफायनरीविरोधात स्थानिक लोकक्षोभ तीव्र झघलेला असतानाच रविवारी कुंभवडे येथे कोकण रिफायनरी प्रकल्पाविरोधी संघर्ष समितीची जनजागृती सभा सुरू असतानाच तेथे आलेल्या कुंभवडेतील एका ग्रामस्थाला चोप दिल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेली व्यक्ती ही जनमिनीची दलाल असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवाय यावेळी प्रकल्पविरोधकांनी दलाली करणार्‍यांच्या नावाची यादी नाटे पोलिसांकडे दिल्याचे समजते.

Page 6 of 2713