Tuesday, Jan 23rd

Headlines:

उद्या एस.टी.चे वेळापत्रक कोलमडणार!

E-mail Print PDF
रत्नागिरी ः एस. टी. कर्मचाऱयांची खात्यांतर्गत लिपीक टंकलेखक परीक्षा १७ जानेवारी रोजी होत असून त्याचा परिणाम एस. टी. वेळापत्रकावर होणार आहे. जिल्हयातून २०० वाहक व ६८ चालक व अन्य कर्मचारी या परीक्षेला बसले आहेत. त्यामुळे बुधवारी २६८ कर्मचार्‍यांची कमतरता विभागाला भासणार असून त्याचा परिणाम एस. टीच्या फे़र्‍यांवर होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार असून प्रवाशांनी एक दिवस सहकार्य करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.
रत्नागिरी विभागात मुळातच ३०० चालक-वाहकाची कमतरता आहे. त्यातच बुधवारी २६८ कर्मचारी लिपीक पदाच्या खातेंतर्गत परीक्षेसाठी जाणार आहेत. त्यामुळे उर्वरीत मनुष्यबळावरच कामचे नियोजन करावे लागणार आहे. अडीचशेहून अधिक कर्मचारी या परीक्षेला जाणार असल्याने वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे सहकार्य अपेक्षित आहे. विद्यार्थी वर्गाचा फटका बसून यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे बारटक्के यांनी सांगितले.
ही परीक्षा एस. टी. विभाग खात्यांतर्गत असल्याने इतक्या मोठया संख्येने कर्मचारी परीक्षा देत आहेत. त्यामुळे शेकडो फे़र्‍या रद्द कराव्या लागणार असून याची नोंद सर्व प्रवाशांनी घ्यावी असे आवाहनही रत्नागिरी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नेपाळी खलाशांचे प्रमाण घटले

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रोजगाराच्या शोधात मच्छिमार नौकांवर काम करण्यासाठी जिल्हयात येणा़र्‍या नेपाळी खलाशांच्या संख्येत मोठया प्रमाणावर घट झाली आहे. सागरी सुरक्षेबाबतच्या कडक निर्बंधांमुळे नेपाळी खलाशांची संख्या ३०० ने कमी झाल्याचे दिसून आले आहे. कामगार म्हणून आलेले नेपाळी लोक विविध बेकायदेशीर कृत्यांमध्ये आढळल्यानंतर या खलाशांसाठी नोंदणी व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असून या नियमांमुळे खलाशांची संख्या रोडावली आहे.
केंद्र शासनाकडून नेपाळी कामगारांची नोंदणी अत्यावश्यक करण्यात आली असून कस्टम विभाग व सागरी सुरक्षा विभाग यांच्यामार्फत ओळखपत्र नसलेल्या खलाशांवर कारवाई करण्याचे धारण शासनाने राबविले आह़े रत्नागिरी जिल्हा सागरी सुरक्षा विभागाकडे झालेल्या नोंदणीनुसार २०१६ साली विविध नौकांवर काम करणाऱया नेपाळी खलाशांची संख्या २ हजार इतकी होती. २०१७ मध्ये खलाशांची ही संख्या घटून १७६३ वर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात बांग्लादेश मार्गावरून म्यानमारमधील रोहिंग्या लोक येत असल्याची माहिती समोर आली होती रत्नागिरी जिह्यात देखील अशा प्रकारे अनेक रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत असल्याचे समोर आल्यानंतर पोलीसांकडून कडक पावले उचलण्यात आली होती.
कमी पैशात पडेल ते काम व कष्ट करण्याची तयारी असल्याने स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांकडून नेपाळी खलाशांना नेहमीच पसंती दिली जात़े त्यामुळे मच्छिमार नौकांवर हे कामगार सर्रास पहायला मिळतात. नेपाळहून येणार्‍या या कामगारांना व्हिसा व पासपोर्टची आवश्यकता नसल्याने त्यांना भारतात येणे सुलभ आहे. कष्टाचे काम करण्याच्या तयारी असल्याने त्यांना रोजगारही सहजपणे उपलब्ध होतो. रत्नागिरीच्या विविध बंदरात तर या लोकांनाच पहिली पसंती मिळते.

१२ हजाराची लाच घेताना हवालदार सापडला रंगेहाथ

E-mail Print PDF
रत्नागिरी ः वाळूचे ट्रक सोडविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार गणेश भागवत नाळे (४७) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे तीन ट्रक पकडण्यात आले होते. ट्रक सोडविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच त्याने मागितल्याचा आरोप करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव यांनी सहकार्‍यांसोबत सापळा लावला होता. गणश नाळे याला १२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

शंकर घाणेकर स्मृती स्पर्धा १७ पासून

E-mail Print PDF
रत्नागिरी ः नगर परिषद आयोजित व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेली नटवर्य कै. शंकर घाणेकर स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला १७ जानेवारीपासुन प्रारंभ होणार आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात ३ दिवस चालणार्‍या या स्पर्धेत २५ एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यात मुंबई, ठघणे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कलाकृतींचा समावेश आहे.

कोकण रेल्वेत प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती सुरू

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची तड लावण्यासाठी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या कर्मचारी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना प्रकल्पविरहित कर्मचारी भरती सुरू असल्याबद्दल चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

प्रजासत्ताक दिनी मच्छिमारांचे उपोषण

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून रत्नागिरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीविरोधात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा अखिल भारतीय महाराष्ट्र कृती समितीच्यावतीने पारंपारिक मच्छिमारांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन नेटने मच्छिमारीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे आरोप कृती समितीने केले आहेत. परवाने असलेले २७४ पर्ससीनधारक आहेत. मात्र परवाना नसणारे १५० पर्ससीन व २५० मिनी पर्ससीन नौकांपैकी अनेकजण बेकायदा पर्ससीन मासेमारी करत आहेत. संबंधित अधिकार्‍यांशी त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार आहेत असे आरोप कृती समितीने केले आहेत.

Page 5 of 2713