Tuesday, Jan 23rd

Headlines:

अस्वस्थ अशोक वालमना पोलिस गाडीत कोंबले

E-mail Print PDF
रत्नागिरीः पोलिसांच्या अटकेत असलेले रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेचे नेते अशोक वालम यांची प्रकृती खालावलेली असतानाही मंगळवारी पोलिसांनी त्यांना राजापूर न्यायालयात हजर केले. नातेवाईकांनी वालम यांना रुग्णवाहीकेतून नेण्याची केलेली मागणी धुडकावून लावत पोलीस गाडीत अक्षरशः कोंबून नेल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. वालम यांचे नातेवाईक व समर्थकांनी पोलीसांच्या या कृतीचा निषेध केला असून रिफायनरी विरोधी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या विरोधात कुंभवडे येथे सुरू असलेल्या बैठकीत प्रकल्प समर्थक व विरोधकांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी अशोक वालम व त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी अटक झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वालम यांना रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र वालम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी रात्रीच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वालम यांच्या छातीत दुखत असून जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
खासगी रूग्णालयात आवश्यक वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर वालम यांना पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी खासगी रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे प्रमाणपत्र देताच वालम यांना न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. त्यावेळी वालम यांच्या नातेवाईकांनी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रुग्णवाहीकेतून नेण्याची मागणी केली.
नातेवाईकांची मागणी धुकावून वालम यांना अस्वस्थ अवस्थेत स्ट्रेचरवरूनच पोलीस गाडीमध्ये अक्षरशः कोंबण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीचा वालम कुटुंबिय व समर्थकांनी तीव्र निषेध केला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण तणावाचे बनले होते. वालम समर्थकांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजेच्या घोषणांनी रुग्णालय परिसर दणाणून गेला होता.
रिफायनरी प्रकल्प विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे पोलीस व प्रशासनाने नाहक त्रास देण्यास सुरूवात केली आहे. हे आंदोलन मोडून काढण्याचा पोलीसच डाव खेळत आहेत. वरिष्ठ स्तरावरून आलेल्या दबावाखाली सर्व यंत्रणा काम करत आहे. या त्रासामुळे अशोक वालम यांना काही झाले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनानाची राहील असे वालम यांच्या पत्नी आश्विनी वालम यांनी सांगितले. आता तर आमच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली जात असल्याचा गौप्यस्फोट वालम यांनी केला आहे.

कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

E-mail Print PDF
चिपळूण ः सातारा जिल्हयातील कोयना धरण परिसरात मंगळवारी दुपारी १.०५ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली असल्याची माहिती कोयना धरण उपकरण विभागाकडून देण्यात आली.
गेल्या १० नोव्हेंबर रोजीही ३.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी देवरूखसह जिल्हयातील काही भागात त्याचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून २२.४ कि. मी. अंतरावर असलेल्या वारणा खो़र्‍याच्या जावळी गावच्या दक्षिणेला ४ कि. मी. अंतरावर होता. त्याची खोली ९ कि. मी.असल्याची माहिती सदर कार्यालयाकडून देण्यात आली. याचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झालेला नसल्याचेही सांगण्यात आले.

शिक्षक वैजनाथ कांबळे अखेर निलंबीत

E-mail Print PDF
राजापूर ः राजापूर तालुक्यातील तळगाव येथील अंगणवाडी सेविकेशी अश्लील वर्तन करणारा तळगाव केंद्रशाळा क्र. १ मधील शिक्षक वैजनाथ महादेव कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सभापती सुभाष गुरव यांनी दिली. या कारवाईमुळे तळगाव परिसरातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
तळगाव केंद्रशाळेतील शिक्षक वैजनाथ महादेव कांबळे यांनी त्यांच्याच दुचाकीवरून अंगणवाडीमध्ये चाललेल्या सेविकेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेने राजापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर संशयित आरोपी शिक्षक कांबळे यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद तळगाव परिसरासह संपूर्ण तालुकाभर उमटले होते. गैरकृत्य करणाऱया या शिक्षकाला निलंबीत करावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होते.
या घटनेनंतर पंचायत समिती सुभाष गुरव यांनी तात्काळ उपसभापतींसह सर्व सदस्यांना घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षण सभापती यांची रत्नागिरी येथे भेट घेवून कांबळे यांना निलंबीत करण्याची मागणीही केली होती. तसेच तळगाव ग्रामस्थांनीही या घटनेचा निषेध करत जोपर्यंत शिक्षकाचे निलंबन होत नाही, तोपर्यंत गावातील कोणत्याही शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक दिवस पाचही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सभापती गुरव यांनी ग्रामस्थांची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी मुलांना शाळेत पाठविले होते.
या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकेशी गैरकृत्य करणारा शिक्षक वैजनाथ कांबळे याच्यावर शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. दि.२ जानेवारीपासून कांबळे यांचे निलंबन करण्यात आले असून तसे पत्र तालुका पंचायत समितीला प्राप्त झाले आहे. गैरकृत्य करणारे शिक्षक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने तळगाव परिसरातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच सभापती सुभाष गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.

दुकान नोंदणी परवाने वितरण बंद

E-mail Print PDF
रत्नागिरी ः राज्यातील भाजपा शासनाने हक्काचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे स्त्रोत बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. दुकान नोंदणी परवाना (शॉप ऍक्ट लायसन्स) बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असून त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातून मिळणारा हक्काचा ५० लाख रुपयांचा महसूल बुडणार आहे.
इंग्रजांच्या राजवटीत गुमास्ता कायदा लागू करण्यात आला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शॉप ऍक्ट लायसनचा पर्याय स्वीकारून महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील व्यापार्‍यांना अशा प्रकारचा परवाना घेण्याचे कोणतेही बंद नसल्याने त्यांना त्यातून अनिश्‍चित कालावधीसाठी सूट देण्यात आली आहे. काही ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीत झाले असून त्या क्षेत्रातही ही अट शासनाने अद्यापपर्यंत लागू केलेली नाही. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड नगर पालिका क्षेत्रातील सुमारे १२ हजार व्यापार्‍यांच्या परवानगीची नोंदणी केल्यानंतर दरवर्षानी त्याचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नुतनीकरण केले जाते. १ ते ९ कामगार असलेले दुकान, उपाहारगृह, लॉजिंग आदी आस्थापनांना हा कायदा लागू करण्यात आला आहे.

शाखाधिकार्‍याकडूनच बँकेला ४ लाखांना गंडा

E-mail Print PDF
संगमेश्वर ः संगमेश्वर बाजारपेठेतील कोकण मर्कटाईल को. ऑप. बँकेच्या तत्कालिन शाखाधिकाऱयाने कर्जदाराच्या मदतीने बॅकेची ४ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जदाराला बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज मंजूर करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार व तत्कालीन शाखाधिकाऱया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जुलै २०१२ ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत बँकेचे विद्यमान शाखाधिकारी जिनत रफिक अहमद वागळे (४७ रा. उद्यमनगर रत्नागिरी) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनगिरी येथील मुबीन इब्राहिम कापडे यांना घर बांधणीसाठी कर्ज हवे होते. त्यांनी संगमेश्वर बाजारपेठेतील कोकण मर्कटाईल को. ऑप. बँककडे कर्जासाठी अर्ज सादर केला होता. मात्र कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती.
त्यामुळे तत्कालीन शाखाधिकारी तौफिक इब्राहिम मालीम यांच्याशी संगनमताने कापडे यांनी कर्जप्रकरणासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे खोटी असल्याचे माहित असतानाही मालीम यांनी कर्ज मंजूर करून बँकेची फिर्यादीत म्हटले आहे. तत्कालीन शाखाधिकारी मालीम व कर्जदार मुबीन कापडे यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी बँकेचा विश्वासघात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार या दोघांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक वालम यांना अटक, जामीन, पुन्हा अटक

E-mail Print PDF
राजापूर ः तालुक्यातील नाणार पसिरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून रविवारी कुंभवडे येथे झालेली हाणामारी व मनाई आदेश असताना नाटे पोलीस ठाण्यात जमावाने केलेला प्रवेश अशा दोन गुह्यात उभय बाजुच्या २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मनाई आदेश भंगप्रकरणी कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासह १० जणांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यांना राजापूर न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजाराच्या सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, पंढरीनाथ आंबेरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी लगेच अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना पुन्हा अटक केली.
नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात रविवारी कुंभवडे हायस्कूलमध्ये बैठक सुरू असताना तेथे मारहाणीचा प्रकार घडला. यामध्ये कुंभवडे येथील पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आंबेरकर यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेरकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात अशोक वालम, त्यांची पत्नी व मंगेश चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या मारहाणीनंतर सुमारे आठशे जणांचा जमाव मनाई आदेशाचा भंग करत नाटे पोलीस ठाण्यात गेला होता. त्यामुळे नाटे पोलीसांनी अशोक वालम यांच्यासह २३ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी अशोक वालम, विलास नार्वेकर, सचीन कोरगावकर, मंगेश चव्हाण व नितीन जठार यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर सुरक्षीततेच्या कारणास्तव वालम यांना रत्नागिरीत नेण्यात आले होते. या सर्वांना राजापूर न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता प्रत्येकी १५ हजाराच्या जामीनावर सुटका करण्यात आली. त्याचवेळी दर रविवारी नाटे पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Page 4 of 2713