Tuesday, Jan 23rd

Headlines:

समस्या सुटत नाहीत तोपर्यंत कसोप सडावासीयांचा प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः जोपर्यंत पाण्यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत, तोपर्यंत पुढील प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कसोप सडा येथील नागरिकांनी घेतला आहे. फणसोप आणि कसोप या दोन गावांमध्ये हा परिसर येतो. येथे उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यासाठी स्वतंत्र नळपाणी योजना सुरु व्हावी यासाठी सतत मागणी केली. परंतु लोकवर्गणीच्या घोळामुळे ही योजना रखडली आहे. गावातील कचरा उचलण्याचे नियोजन नाही. या सर्व समस्या सुटत नाहीत तोपर्यंत पुढील कुठल्याही निवडणुकीत मतदान केले जाणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

आरडीसी बँक अधिकारी, कर्मचारी दिसू लागले ड्रेसकोडमध्ये

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बँक अधिकारी, लिपीक आणि वाहन चालकांना वेगवेगळ्या रंगाचे ड्रेसकोड देण्यात आले आहेत. बँकेचे हवालदार आणि शिपाई यांना पूर्वीचाच अनुक्रमे पांढरा आणि खाकी ड्रेसकोड कायम ठेवण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या ड्रेसकोडची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. ड्रेसकोडबरोबरच बँकेतील सर्वांना आपले ओळखपत्र दिसेल असे ठेवण्याची सक्तीही करण्यात आली आहे.

शेतकरी कर्जवाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

E-mail Print PDF
संगमेश्‍वर (प्रतिनिधी) ः तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून कर्जवाटप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्य शेतकरी यापासून वंचित राहिलेला असून,  या कर्ज वाटपामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेस सरकारने ४ टक्के व्याजाने शेतकर्‍यांना कर्ज देण्यास सांगितले आहे. परंतु संबंधित अधिकारी आपल्या मनाप्रमाणे वागत असल्यानेच हा भ्रष्टाचार झाला असल्याचे श्री. शेट्ये यांनी यावेळी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुन कर्ज वाटपाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनास प्रारंभ

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः शहरामध्ये गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्याबाबत पतितपावन मंदिरात नुकतीच बैठक झाली. नव्या वर्षाची स्वागतयात्रा भव्य, दिव्य अशी असावी या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. यावर्षी जास्तीत जास्त चित्ररथ आणि हिंदू बांधव सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचा विचारही या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, पतितपावन देवस्थानचे अध्यक्ष ऍड. बाबा परुळेकर, निमंत्रक आनंद मराठे यांच्यासह अनेक हिंदू समाजाचे नेते उपस्थित होते. दरम्यान, या स्वागत यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेेण्यासाठी ९ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता पतितपावन मंदिर येथे बैठक होणार आहे.

रत्नागिरी शहराला जूनअखेरपर्यंत पुरेल इतका शीळ धरणात पाणीसाठा

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील अनेक गावांची पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत असताना रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणात मात्र जूनअखेर पुरेल इतका पाणीसाठा आहे. २.२२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शीळ धरणात असून, हे पाणी जूनअखेरपर्यंत मिळू शकते, असे रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी विभागाचे अभियंता श्री. गमरे यांनी सांगितले. पाण्याअभावी पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु पाईपलाईन बिघाड किंवा वीज समस्या निर्माण झाली तर मात्र पाणीपुरवठा खंडीत होऊ शकतो. धरणात पाणी नाही म्हणून शटडाऊन करण्याची वेळ येणार नाही, असेही अभियंता श्री. गमरे यांनी सांगितले.

लांजा परिसरात सौरदीपच्या बॅटर्‍या जाताहेत चोरीस

E-mail Print PDF
लांजा (प्रतिनिधी) ः तालुक्यातील गावच्या वाड्यावाड्यांवर असलेल्या सौरदीपच्या बॅटर्‍या चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. बॅटरी चोरीमुळे सौरदीप बंद पडू लागले आहेत. सौरदीप उभारण्यासाठी सुधारीत योजनांतून आणि तंटामुक्ती योजनेच्या बक्षीस रक्कमेतून खर्च केला जात आहे. परंतु सौरदीपच्या बॅटर्‍या चोरीस जाऊ लागल्याने काही दिवसांतच हा परिसर अंधारमय होऊ लागले आहेत. अनेक बॅटर्‍या चोरीस गेल्या आहेत. परंतु अद्याप तक्रार मात्र कुणीही केलेली नाही.

Page 2705 of 2713