Tuesday, Jan 23rd

Headlines:

कंटेनरने तीन वाहनांना चिरडले

E-mail Print PDF

रत्नागिरी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव बाजारपेठेत शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कंटेरने दुचाकीसह तीन वाहनांना चिरडल्याची खळबळजन घटना घडली. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातत दुचाकीवरून प्रवास करणारे महावितरणचे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े याप्रकरणी कंटेरचालक निषाद अब्दुल रहेमान मडती (ऱा केरळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली आह़े
महावितरणचे सहाय्यक मुख्य अभियंता वैभव महाडिक व कर्मचारी शरद गंगाराम मोहिते (55, ऱा खेडशी बौद्धवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांनाही शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े मात्र दान्ही जखमींच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने अधीक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आह़े
अपघाताबाबत अधिक माहित अशी की, निषाद अब्दुल रहेमान मडती हा आपल्या ताब्यातील कंटेनर (केएल 42 ई 3033) घेवून केरळ ते रत्नागिरी असा प्रवास करत होत़ा कुवारबाव बाजारपेठेतील शिवसेना शाखेजवळ आल्यानंतर त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. नियंत्रण हरवलेल्या कंटेनरने समोर असलेला छोटा हत्ती (एमएच 08 डब्लू 5469) ऍक्टिवा व झायलो कार(एमएच 08 झेड 2275 ) या वाहनांना जोरदार धडक दिल़ी दुचाकीला दिलेली धकड इतकी भीषण होती की दुचाकी कंटेनरच्या पुढच्या बाजुने आत घुसली. या अपातात दुचाकीवर असलेले महावितरणे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े तर छोटा हत्ती व झायलो कारचेही मोठे नुकसान झाले आह़े
सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी झाली होत़ी मात्र पोलीस व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल़ी या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल झेरे हे अधिक तपास करत आहेत़
रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव बाजारपेठेत शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कंटेरने दुचाकीसह तीन वाहनांना चिरडल्याची खळबळजन घटना घडली. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातत दुचाकीवरून प्रवास करणारे महावितरणचे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े याप्रकरणी कंटेरचालक निषाद अब्दुल रहेमान मडती (ऱा केरळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली आह़ेमहावितरणचे सहाय्यक मुख्य अभियंता वैभव महाडिक व कर्मचारी शरद गंगाराम मोहिते (55, ऱा खेडशी बौद्धवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांनाही शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े मात्र दान्ही जखमींच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने अधीक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आह़ेअपघाताबाबत अधिक माहित अशी की, निषाद अब्दुल रहेमान मडती हा आपल्या ताब्यातील कंटेनर (केएल 42 ई 3033) घेवून केरळ ते रत्नागिरी असा प्रवास करत होत़ा कुवारबाव बाजारपेठेतील शिवसेना शाखेजवळ आल्यानंतर त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. नियंत्रण हरवलेल्या कंटेनरने समोर असलेला छोटा हत्ती (एमएच 08 डब्लू 5469) ऍक्टिवा व झायलो कार(एमएच 08 झेड 2275 ) या वाहनांना जोरदार धडक दिल़ी दुचाकीला दिलेली धकड इतकी भीषण होती की दुचाकी कंटेनरच्या पुढच्या बाजुने आत घुसली. या अपातात दुचाकीवर असलेले महावितरणे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े तर छोटा हत्ती व झायलो कारचेही मोठे नुकसान झाले आह़ेसकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी झाली होत़ी मात्र पोलीस व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल़ी या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल झेरे हे अधिक तपास करत आहेत़

बेकायदा पर्ससीन मच्छिमारांचे २६ रोजी उपोषण

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून रत्नागिरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीविरोधात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा अखिल भारतीय महाराष्ट्र कृती समितीच्यावतीने पारंपारिक मच्छिमारांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन नेटने मच्छिमारांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे आरोप कृती समितीने केले आहेत. परवाने असलेले २७४ पर्ससीनधारक आहेत. मात्र परवाना नसणारे १५० पर्ससीन व २५० मिनी पर्ससीन मासेमारी करत आहेत. संबंधित अधिकार्‍यांशी त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार आहेत असे आरोप कृती समितीने केले आहेत.

विकासकामांंचा २० कोटीचा निधी पुन्हा आरोग्य उपकेंद्राकडे वळवला

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमधून केंद्र शासनाच्या योजनांमधील २० कोटी जिल्ह्यातील विकासकांना वापरण्याबाबत निर्णय झाल्याने समाधान व्यक्त होत असतानाच आता त्यातील ६ कोटी जि.प. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरूस्तीस दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. निधी अपुरा पडत आहे. अशा परिस्थितीत हा निधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ६ कोटी देवून वळविला तर रस्त्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

एटीएमचा पीन मिळवून भामट्यांनी रक्कम लांबविली

E-mail Print PDF
रत्नागिरी ः बँकेतून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. त्याला आधार कार्ड लिंक करावयाचे असल्याने त्याचा नंबर व सीव्हीही नंबर घेवून बँक खात्यातून ५ हजार रुपये लांबविल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रथमेश रमेश साळुंखे (१९, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रथमेशला त्याच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. बोलणार्‍याने मी दिपक शर्मा बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. त्याला आधार कार्ड लिंक करावयाचे असल्याने त्याचा नंबर व एटीएमचा सीव्हीव्ही कोड १६ अंकी नंबर द्या असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून प्रथमेशने सर्व माहिती दिली.

सा. बां. ची विकासकामांकडे पाठ - दत्ता कदम

E-mail Print PDF
लांजा ः सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजामार्फत तालुक्यातील विकास कामांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच कामांबाबत माहिती देण्याबाबत होत असलेला हलगर्जीपणा व टाळाटाळ या विरोधात येत्या २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी दिला आहे.

भोस्ते घाटात कंटेनर कलंडला, जीवितहानी टळली

E-mail Print PDF
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात एका अवघड वळणावर भरधाव वेगातील कंटेनर दुसर्‍या मालवाहू ट्रकवर पलटी झाला. मात्र त्या ट्रकचालकाचे दैव बलवत्तर म्हणून तो चालक बालंबाल बचावला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या कंटेनर चालकाला ट्रकचालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Page 3 of 2713