Tuesday, Jan 23rd

Headlines:

मुंबई

स्वा. सै. चारठाणकर सेवागौरव पुरस्कारडॉ. राजू पाटोदकर यांना जाहिर

E-mail Print PDF
स्वा. सै. चारठाणकर सेवागौरव पुरस्कार
डॉ. राजू पाटोदकर यांना जाहिर
मुंबई, दि. 16 : मुंबईतील रंगकर्मी, कलावंत डॉ. राजू पाटोदकर यांना मराठवाड्याचा प्रतिष्ठीत
समजला जाणारा सेलू, जिल्हा परभणी येथील स्वा. सै. विनायक चारठाणकर प्रतिष्ठानचा सेवागौरव पुरस्कार
जाहिर झाला आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ही निवड करण्यात आली आहे. तर
सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ.जगदिश कुलकर्णी, मुंबई व साहित्य व समीक्षा क्षेत्रातील कार्याबद्दल
मा.श्री.प्रभाकर महाजन, बीड यांची सेवागौरव या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दोन डिसेंबर रोजी सेलू येथे होणाऱ्या समारंभात पुण्यातील प्रख्यात वास्तुविशारद डॉ.आनंद
पिंपळकर व श्री. प्रशांत आडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र
आणि स्मतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सेलू येथील स्वा. सै. विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानतर्फे मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक,
सांस्कृतीक कलाक्षेत्रातील सर्वोतम कामगिरी बद्दल सामाजिक कृतज्ञता नोंद म्हणून हा सेवा गौरव पुरस्कार
दरवर्षी दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचे तिसावे वर्ष आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे चिटणीस ॲड.श्रीकांत
वाईकर यांनी दिले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी व मूळ बीड
येथील रहिवासी असलेल्या डॉ.राजू पाटोदकर यांनी 1990 च्या दशकात मराठवाड्यात रंगकर्मी कला व क्रीडा
अकादमी या नाट्यसंस्थेमार्फत द्विराज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, पथनाट्य महोत्सव व स्पर्धा यांचे यशस्वी
आयोजन केले. त्यांनी एकांकिका, मराठी नाटकातून काम देखील केले आहे. त्यासोबत मराठी, हिंदी टीव्ही
मालिका, मराठी चित्रपटांतून विविध भूमिका करत आपला अभिनयाचा छंद जोपासला आहे. विविध
वर्तमानपत्रांतून सांस्कृतिक विषयावर त्यांचे लिखाण सुरु आहे. पत्रकारिता या क्षेत्रात ‘श्री. अमिताभ बच्चन
यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद’ या विषयावर शोधनिबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळविली
आहे.
डॉ. राजू पाटोदकर हे मुंबई मंत्रालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 20 वर्षापासून
अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांना यापूर्वी अप्रतिम मिडियाचा उत्कृष्ट पत्रकारिता चौथा स्तंभ हा पुरस्कार,
पुणे येथील लळित रंगभूमीचा लळित युवा पुरस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उत्कृष्ट
अधिकारी गौरव प्राप्त झाला आहे.
मुंबई,  : मुंबईतील रंगकर्मी, कलावंत डॉ. राजू पाटोदकर यांना मराठवाड्याचा प्रतिष्ठीतसमजला जाणारा सेलू, जिल्हा परभणी येथील स्वा. सै. विनायक चारठाणकर प्रतिष्ठानचा सेवागौरव पुरस्कारजाहिर झाला आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ही निवड करण्यात आली आहे. तरसामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ.जगदिश कुलकर्णी, मुंबई व साहित्य व समीक्षा क्षेत्रातील कार्याबद्दलमा.श्री.प्रभाकर महाजन, बीड यांची सेवागौरव या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.दोन डिसेंबर रोजी सेलू येथे होणाऱ्या समारंभात पुण्यातील प्रख्यात वास्तुविशारद डॉ.आनंदपिंपळकर व श्री. प्रशांत आडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्रआणि स्मतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सेलू येथील स्वा. सै. विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानतर्फे मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतीक कलाक्षेत्रातील सर्वोतम कामगिरी बद्दल सामाजिक कृतज्ञता नोंद म्हणून हा सेवा गौरव पुरस्कारदरवर्षी दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचे तिसावे वर्ष आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे चिटणीस ॲड.श्रीकांतवाईकर यांनी दिले.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी व मूळ बीडयेथील रहिवासी असलेल्या डॉ.राजू पाटोदकर यांनी 1990 च्या दशकात मराठवाड्यात रंगकर्मी कला व क्रीडाअकादमी या नाट्यसंस्थेमार्फत द्विराज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, पथनाट्य महोत्सव व स्पर्धा यांचे यशस्वीआयोजन केले. त्यांनी एकांकिका, मराठी नाटकातून काम देखील केले आहे. त्यासोबत मराठी, हिंदी टीव्हीमालिका, मराठी चित्रपटांतून विविध भूमिका करत आपला अभिनयाचा छंद जोपासला आहे. विविधवर्तमानपत्रांतून सांस्कृतिक विषयावर त्यांचे लिखाण सुरु आहे. पत्रकारिता या क्षेत्रात ‘श्री. अमिताभ बच्चनयांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद’ या विषयावर शोधनिबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळविलीआहे.डॉ. राजू पाटोदकर हे मुंबई मंत्रालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 20 वर्षापासूनअधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांना यापूर्वी अप्रतिम मिडियाचा उत्कृष्ट पत्रकारिता चौथा स्तंभ हा पुरस्कार,पुणे येथील लळित रंगभूमीचा लळित युवा पुरस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उत्कृष्टअधिकारी गौरव प्राप्त झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी

E-mail Print PDF
मुंबई ः कोकण रेल्वे मार्गावर आधी उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी मनमाड (नाशिक) सावंतवाडी नवी रेल्वे सुरू करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरू करण्यात आली आहे. या नव्या गाडीमुळे प. महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे.
००१२८ मडगांव-कोल्हापूर अशी नवी विशेष गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी गुरूवारी धावेल. आठवड्यातून ही गाडी एकदाच धावणार आहे. या गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावर नवी विशेष गाडी सुरू झाली आहे. याआधी मनमाड-सावंतवाडी अशी विशेष गाडी आठवड्यातून शनिवारी या दिवशी धावणार आहे.

बीएमएस परीक्षेचे तब्बल ९ पेपर फुटल्याचे निष्पन्न

E-mail Print PDF
मुंबई - शुक्रवारी बीएमएस परीक्षेचे एक दोन नव्हे तर तब्बल प्रथम सत्र परीक्षांचे ९ पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले असून, वेगवेगळ्या परिसरात सात कॉलेज विद्यार्थ्यांसह अकराजणांना शुक्रवारी आंबोली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अंधेरीतील एमव्हीएम कॉलेजमध्ये बीएमएसच्या ई-कॉमर्स ऍण्ड डिजिटल मार्केटिंग या विषयाचा पेपर व्हॉटअपवर फुटल्याचे उघडकीस येताच रात्री उशिरा आंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या ११ विद्यार्थ्यांच्या चौकशीतून ९ पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने गुरुवारी बीएमएसच्या मार्केटिंग ई-कॉमर्स ऍण्ड डिजिटल मार्केटिंग या विषयाचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी हा पेपर एका विद्यार्थ्याच्या व्हॉटअपवर दिसून आल्याने तिथे उपस्थित ज्युनियर सुपरवायझरला धक्काच बसला होता. मोबाईल प्रश्‍नपत्रिकाच पाहिल्यानंतर त्यांनी ती माहिती मुंबई विद्यापीठाला कळविली. विद्यापीठाने रात्री उशिरा आंबोली पोलिसांत तक्रार दिली आणि आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने तपासाला सुरुवात करून संशयितांची धरपकड सुरू केली होती. रात्री उशिरा एका विद्यार्थ्यांला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर इतर काहींची नावे समोर आली. शुक्रवारी सकाळपर्यंत वेगवेगळ्या परिसरातून आंबोली पोलिसांनी अकराजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात एका कॉलेज कर्मचार्‍यासह तीन दलाल आणि सात विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सिग्नल वायर जळाल्याने मरेची वाहतूक विस्कळीत

E-mail Print PDF
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा ते खडवली दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वे मार्गावरील सिग्नलची वायर जळाल्याने डाऊन मार्गावरील लोकल एक तास विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने  चाकरमान्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांना याचा फटका बसला.
मध्य रेल्वेच्या विस्कळीतपणाचे रडगाणे सतत चालूच आहे. काहीना काही बिघाड होऊन रेल्वे सेवेचे तीनतेरा वाजतात. गुरुवारी पुन्हा तसाच प्रकार घडला. कामावरून सुटणार्‌या चाकरमान्यांच्या वेळेवरच टिटवाळा ते खडवली दरम्यान लोकलचा खोळंबा झाला होता. त्याचा फटका कल्याणपासून पुढे सीएसटीपर्यंतच्या प्रवाशांना बसला. या मार्गावरील केबल अचानकपणे जळली आणि वाहतूक काही काळ ठप्प झाली.
घटनास्थळी कामगारांनी धाव घेऊन वायर दुरूस्तीचे काम केले. ते काम पूर्ण होण्यास एक तास लागल्याने पुढील वाहतूक विस्कळीत झाली. कसारा लोकल आंबिवलीपर्यंत चालवण्यात आली तर आसनगाव लोकल आसनगाव स्थानकात सुमारे दोन तास उशिरा पोहोचली. सायंकाळच्या वेळीच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.वायर जळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा काही काळाकरिता टिटवाळा ते खडवली दरम्यान बंद झाली होती, त्यामुळे लोकल गाड्यांच्या डाऊन धीम्या मार्गावर एकामागोमाग रांगा लागल्या होत्या, परंतु हळूहळू लोकल सुरू करण्यात येऊन सुमारे अर्धा तास लोकल नियमित वेळेच्या उशिरा धावल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही वायर जळाली की कुणी  जाळली याचा शोध आता लोहमार्ग पोलीस घेत आहेत.

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार

E-mail Print PDF
मुंबई - आर्थिक गर्तेत असलेल्या ‘बेस्ट’ला तारण्यासाठी प्रवाशांच्याच खिशाला हात घालण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने बस तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बस प्रवास येत्या काळात महागण्याची चिन्हे आहेत.
बसभाडे आणि पास दरवाढीला काल बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटावर १ ते १२ रुपये आणि मासिक पासासाठी ४० ते ३५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासातील दरवाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल.

राणेंच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक ७ डिसेंबरला

E-mail Print PDF
मुंबई - कॉंग्रेसला रामराम ठोकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणार्‍या नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहीती देण्यात आली.
कॉंग्रेस सोडून नव्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी राणे यांनी कॉंग्रेसकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा २२ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. विधान परिषद सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना निघून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून २७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या ठिकाणी शौचालय बांधणार : स्वामी चक्रपाणी

E-mail Print PDF
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव आज पुन्हा होणार आहे. यात हॉटेल अफरोज, याकूब स्ट्रीट येथील शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारत या संपत्तीचा समावेश आहे. दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांचा लिलाव करण्याचा याआधी देखील प्रयत्न झाला होता. मात्र ही संपत्ती घेण्यास कोणी पुढे आले नव्हते.
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सीबीआयने दाऊदच्या १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. यापैकी हॉटेल अफरोज, शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारत यांचा लिलाव आज करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.
याआधी २०१५मध्ये माजी पत्रकार बालाकृष्णन यांनी हॉटेल अफरोजची बोली लावली होती. ही बोली त्यांनी जिंकली देखील. मात्र बोली जिंकल्यानंतरची रक्कम त्यांना भरता आली नाही. तर २००२मध्ये दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी देखील असा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या दोघांनाही त्या काळात मोठी प्रसिद्धी मिळवली होती.
दाऊदची हुंडई गाडी विकत घेतल्याचा दावा करून ती पेटवून दिल्यामुळे प्रसिद्ध मिळवणार्‍या स्वामी चक्रपाणी यांनी देखील आज होणार्‍या लिलावामध्ये सहभाग घेतल्याची चर्चा आहे. आज होणार्‍या लिलावात दाऊदची संपत्ती आपल्या ताब्यात मिळाली तर येथे शौचालय बांधणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

समुद्रातील मुंबईच्या विस्ताराला गती

E-mail Print PDF
मुंबई - ‘मेट्रो-३’ आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पात मोठया प्रमाणावर निर्माण होणार्‍या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी कफ परेडमधील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रात ३०० एकर जमीन निर्माण करून तेथे ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. भराव टाकून निर्माण करण्यात येणार्‍या भूभागासाठी सर्वेक्षण करण्याचे कंत्राट पालिकेने एका संस्थेला दिले आहे. त्याच्या जोडीनेच या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि भूभागावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी अनुक्रमे गोव्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) आणि ‘नीरी’वर सोपविण्यात येणार आहे. मच्छीमार बांधवांचे पुनर्वसन, जेट्टी उभारणे, कांदळवनाचा अभ्यास आदी विविध कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान उभारण्यात येणारा ‘मेट्रो-३’ आणि नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारण्यात येणार्‍या सागरी किनारा मार्ग या दोन्ही प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणावर टाकाऊ माती निर्माण होणार आहे. तसेच या प्रकल्पांच्या आड येणार्‍या झाडींचीही कत्तल करावी लागणार आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन ढळण्याची शक्यता आहे. प्रकल्पांमध्ये निर्माण होणार्‍या मातीची विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समुद्रात निर्माण होणार्‍या ३०० एकर भूखंडावर ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या मुंबईच्या ४३७.७१ चौरस कि.मी. क्षेत्रफळात ३०० एकराची भर पडणार आहे.

गोरेगावमध्ये म्हाडा बांधणार ५ हजार घरे

E-mail Print PDF
मुंबई - पुढील वर्षीच्या मे महिन्यात म्हाडातर्फे १ हजार घरांची सोडत काढली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी केली. त्याचबरोबर येत्या तीन वर्षात गोरेगावमध्ये पाच हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.  म्हाडाच्या ८०३ घरांची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मेमध्ये काढण्यात येणार्‌या सोडतीतील घरांमध्ये  ६० टक्के घरे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी असतील. सध्या काढलेल्या सोडतीतील घरे रेडीरेकनरच्या दरापेक्षा २५ टक्के कमी दरातील आहेत असेही वायकर यांनी सांगितले. तर अत्यल्प आणि अल्प गटातील घरांची जास्त मागणी असल्याने आम्ही या गटातील जास्त घरे बांधणार असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी सांगितले.
५० हजार स्वस्त घरे २०२२ सालापर्यंत प्रत्येकाला घर या संकल्पनेंतर्गत एमएमआरडीए परिसरात ५० हजार स्वस्त घरे उपलब्ध होतील असे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यभरात अडीच लाख घरे बांधण्यास मंजुरी मिळली असून यातील ५० हजार घरे ही मुंबई मेट्रो रिजनमधील असतील. ही घरे सर्वसामान्यांसाठी बांधण्यात येणार असल्याचे विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केले. तसेच आठवड्याभरात गोरेगावमधील ५ हजार म्हाडाच्या घरांसाठी निविदा निघणार आहेत. गोरेगाव पश्‍चिम येथील पहाडी नगर येथील १८ एकरचा भूखंड म्हाडाच्या ताब्यात मिळाला आहे.

Page 5 of 168