Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

पाकिस्तानमधील एमक्यूएमचे नेते अल्ताफ हुसेन यांना लंडनमध्ये अटक

लंडन - पाकिस्तानातील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) नेते अल्ताफ हुसेन यांना मंगळवारी पोलिसांनी लंडनमध्ये अटक केली. त्यांच्यावर हवाला व्यवहाराचा आरोप आहे. दरम्यान, या अटकेची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एमक्यूएम ही पाकमधील शक्तीशाली संघटना आहे. अल्ताफ हुसेन यांच्या अटकेचे वृत्त समजताच एमक्यूएमचा बालेकिल्ला असलेल्या कराचीत व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली. कराचीतील ब्रिटनच्या दूतावासाभोवती बंदोबस्त वाढविला आहे.

नायजेरियात फुटबॉल मैदानावर बॉम्बस्फोट; ४०जण ठार

कानो- नायजेरियामध्ये एका फुटबॉलच्या मैदानावर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ४० जण ठार झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदमवा राज्यातील मुबी शहरामध्ये असलेल्या एका मैदानावर रविवारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये ४० जण ठार झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुस्लीम संघटना बोको हरामने हा स्फोट घडवून आणला आहे. फुटबॉलचा सामना संपल्यानंतर हा स्फोट झाला. यामुळे मृतांमध्ये खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रदुषण रोखण्यासाठी चीन सरकार ५० लाख जुन्या वाहनांवर बंदी घालणार

बीजिंग- हवेची शुद्धता वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून चीन सरकार देशातील सुमारे पन्नास लाख जुन्या वाहनांवर बंदी घालणार आहे. यामध्ये केवळ राजधानी बीजिंग शहरातील तब्बल ३३ लाख कार बंद करण्यात येणार असल्याचे येथील सरकारने जाहीर केले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृद्धीनंतर मागील काही दशकांमध्ये वाढलेले प्रदूषण नियंत्रणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, त्यामुळे जनतेतून संताप उसळला असून, चीनमधील हवा, पाणी आणि माती यांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे चीनने ही पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणासंदर्भातील नियंत्रण आणण्यासाठीचे लक्ष्य २०११ ते २०१३ या काळात गाठता आले नाही, त्यामुळे चीनचे मंत्रिमंडळ, राज्यसभेने आणखी कडक पाउले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तानातील भारतीय वाणिज्य दूतावासावर अतिरेक्यांचा हल्ला

काबूल-  अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शस्त्रास्त्रांनी सज्ज चार अतिरेक्यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला चढवला. आयटीबीपी आणि अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांनी सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीनंतर सर्व अतिरेक्यांना ठार केले. सर्व भारतीय आणि राजनैतिक कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्‌याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.  अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांनी सांगितले की, हल्लेखोरांकडे मशीन गन आणि रॉकेट संचलित ग्रेनेडही होते. आयटीबीपीच्या जवानांनी एका हल्लेखोराला दूतावासाच्या भिंतीवर चढताना ठार केले, तर तीन हल्लेखोरांना अफगाणिस्तानच्या सुरक्षा जवानांनी ठार केले. दूतावासाच्या परिसरातच वाणिज्य दूताचे निवासस्थानही आहे. हल्ला झाला त्या वेळी दूतावासात स्थानिक अफगाण नागरिकांबरोबरच नऊ भारतीयही होते. ते सर्व जण सुरक्षित आहेत.

अफगाणिस्तानातील भारतीय वाणिज्य दूतावासावर अतिरेक्यांचा हल्ला

काबूल-  अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शस्त्रास्त्रांनी सज्ज चार अतिरेक्यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला चढवला. आयटीबीपी आणि अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांनी सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीनंतर सर्व अतिरेक्यांना ठार केले. सर्व भारतीय आणि राजनैतिक कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्‌याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.  अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांनी सांगितले की, हल्लेखोरांकडे मशीन गन आणि रॉकेट संचलित ग्रेनेडही होते. आयटीबीपीच्या जवानांनी एका हल्लेखोराला दूतावासाच्या भिंतीवर चढताना ठार केले, तर तीन हल्लेखोरांना अफगाणिस्तानच्या सुरक्षा जवानांनी ठार केले. दूतावासाच्या परिसरातच वाणिज्य दूताचे निवासस्थानही आहे. हल्ला झाला त्या वेळी दूतावासात स्थानिक अफगाण नागरिकांबरोबरच नऊ भारतीयही होते. ते सर्व जण सुरक्षित आहेत.

नरेंद्र मोदींचे अमेरिकेत स्वागत करु : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रधान बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार हे स्पष्ट होताच अनेक बड्या देशांचा सूर बदलला आहे. आधी अधिकृत मागणी केली नसूनही व्हिसा देणारच नाही अशी भाषा करणार्‍या अमेरिकेने मोदींचे स्वागत करू असे सांगितले. जगाचे आर्थिक केंद्र असणा-या अमेरिकेने आपल्या जुन्या भूमिकेत बदल केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही स्वागत करू, असे ओबामा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा लवकरच मोदींशी फोनवरुन बोलणार आहेत, असेही ओबामा प्रशासनाने सांगितले.
याआधी २००२ च्या दंगलीचा ठपका ठेवून अमेरिकेने मोदींना व्हिसा देणार नाही असे सांगितले होते. भारताच्या सुप्रीम कोर्टाने मोदींना दंगलप्रकरणात दोषी धरले नसूनही अमेरिका व्हिसा न देण्याच्या धोरणावर ठाम होती. एवढेच नाही तर अमेरिकेतील मानवाधिकार संघटना मोदींविरोधात आक्रमक झाल्या होत्या. पण भारतात सत्तांतर होण्याची चिन्हे दिसू लागताच अमेरिकेने सोईस्कररित्या आपले धोरण बदलले. भारतातील अमेरिकेच्या राजदूतामार्फत ओबामा प्रशासनाने मोदींशी संपर्क साधला. अमेरिकेचे काही प्रतिनिधीही मोदींना भेटले.

बिल क्लिटंन यांनी माझा गैरफायदा उठवला : मोनिका लेविन्स्की

वॉशिंग्टन - ’अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बिल क्लिटंन यांच्याशी असलेले शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने असले तरी क्लिटंन यांनी आपला गैरफायदा उठवला,’ असे व्हाइट हाउसमधील तत्कालिन कर्मचारी मोनिका लेविन्स्की हिने म्हटले आहे. ’आमच्यातील संबंध जाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली होती,’ असेही तिने म्हटले आहे. क्लिटंन आणि मोनिका लेविन्स्की यांच्यातील संबंधांची माहिती १९९८ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेत खळबळ उडाली होती. त्यानंतर मोनिकाने नोकरीचा राजीनामा दिला. मोनिकाने त्या वेळीही या प्रकरणावर फारसे भाष्य केले नव्हते. मात्र, सुमारे १६ वर्षांनी ’व्हॅनिटी फेअर’ मासिकात तिने लेख लिहून मनातील खदखद व्यक्त केली आहे. ४० वर्षीय मोनिका म्हणते, ’अध्यक्ष क्लिटंन आणि माझ्यात जे काही घडले त्याचा मला खेद आहे. माझ्या भूतकाळाभोवती आणि इतरांच्या भविष्यकाळावर बोलणे आता थांबवले पाहिजे. माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने थांबविण्याचा माझा निर्धार आहे.’ ’माझे आणि क्लिटंन यांच्यातील संबंध हे दोन प्रौढ व्यक्तींमधील संबंध होते; पण ते उघड झाल्यानंतर मला सार्वजनिक निंदेला सामोरे जावे लागले. यामुळे माझ्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळाली,’ असेही मोनिकाने म्हटले आहे.

फेसबुकवर आहेत १० कोटी बनावट खातेदार, भारतात सर्वाधिक प्रमाण

सॅनफ्रान्सिस्को - फेसबुकच्या पोर्टलवर १० कोटींपेक्षा जास्त बनावटी खाते असल्याचे अंदाज स्वत: फेसबुकने वर्तवले आहे. बनावटी खात्यांचे प्रमाण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये अधिक आहे. जगभरात फेसबुकच्या पोर्टलवर ५० लाखांपासून १.५ कोटी अनावश्यक खात्यांची नोंद आहे. याबाबत नियामक संस्था असलेली एसईसीला फेसबुकने कळवले आहे.  एसईसीनुसार, नियम व अटींना बाजूला सारून एक किंवा त्यापेक्ष अधिक फेसबुक खातं सुरू करण्यात आले असेल, असे एसईसीचा अंदाज आहे.आपल्या मुख्य प्रोफाइलपेक्षा वेगळे प्रोफाइल बनवून त्याचा वापर करणे असा बनावट फेसबुक खात्याचा अर्थ होतो. अशा खात्यांमुळे फेसबुकला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कंपनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सिरियातील आत्मघाती हल्ल्यात १८जण ठार

दमास्कस - सिरियाच्या हमा प्रांतातील दोन शहरांमध्ये शुक्रवारी झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांत किमान १८ जण ठार झाले. मृतांमध्ये ११ मुलांचा समावेश आहे.हमा प्रांतातील जिब्रिन आणि अल-हमेरी शहरांत हे स्फोट झाले. जिब्रिनमध्ये झालेल्या पहिल्या स्फोटात १७, तर अल-हमेरीमधील स्फोटात १ जण ठार झाले. जिब्रिनमधील मृतांमध्ये ११ मुलांचा समावेश आहे. हल्लेखोरांनी वाहनातच स्वत:ला पेटवून देत हा स्फोट घडवला. दुसरीकडे होम्स शहरावर लष्कराने ताबा मिळवला आहे. त्या ठिकाणी मंगळवारी झालेल्या विविध स्फोटांत १०० जण ठार, तर असंख्य नागरिक जखमी झाले. दुसरीकडे होम्समध्ये बंडखोरांनी वाटाघाटीची तयारी दाखवली आहे. मानवी हक्क संघटनेच्या म्हणण्यानुसार १ हजार बंडखोर या कारवायांतून माघार घेणार आहेत; परंतु अद्याप करारानुसार माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

Page 10 of 24