Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

आगामी निवडणुकांची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंकडे सोपवणार

नवी दिल्ली - भाजपतर्फे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेचे विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे महाराष्ट्राची एकछत्री जबाबदारी देण्याचे सूतोवाच येथील वरिष्ठ भाजप वर्तुळातून आज मिळाले. प्रदेशाध्यक्ष व सर्व नेत्यांनी मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्यात, असे सूत्र निश्‍चित झाल्याचे समजते. २०१४ नंतर भावी पंतप्रधानपदासाठी आतापासूनच धावाधाव करणार्‍या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष अद्याप ठरविलेला नाही. राज्यात गडकरी व मुंडे गटांतील वाद विकोपाला गेल्याने अखेर दिल्लीतील नेतृत्वाने यात हस्तक्षेप केला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अंतिम फेरीत मुंडे यांचे एकछत्री नेतृत्व किंवा सुधीर मुनगंटीवार व देवेंद्र फडणवीस ही दोनच नावे रिंगणात आहेत. मात्र, त्यांना अनुक्रमे मुंडे व गडकरी यांचा टोकाचा विरोध आहे.

Page 153 of 153