Monday, Jan 22nd

Headlines:

रायगड

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2017 संपन्न

E-mail Print PDF
जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2017 संपन्न
अलिबाग - क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या सहकार्याने  जिल्हास्तर युवक महोत्सव स्पर्धेचे दि. 23  व 24 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार उपस्थित होते.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था, स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धांचे परिक्षण श्री.चेतन पाटील, श्री.विशाल अभंगे, श्री.संतोष वाघमारे, श्री. अमोल कापसे, श्री.देवेंद्र केळुसकर, श्री.सुशिल साईकर, सौ.हर्षदा माणगांवकर यांनी केले.युवा महोत्सवात लोकनृत्य, पखवाज, तबला, हार्मोनियम, कथ्थक, भरतनाट्यम, वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वक्तृत्व स्पर्धेत कविता ढाकवळ,माणगाव - प्रथम क्रमांक, गीता कातकरी,मुरूड - द्वितीय क्रमांक, पखवाज स्पर्धेत विराज म्हात्रे, मानी, अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर, शहाबाज, अलिबाग - द्वितीय क्रमांक, हार्मोनियम स्पर्धेत विशाल पाटील, आवास, अलिबाग - प्रथम क्रमांक, सौरभ भोईर, भिलजी, अलिबाग - द्वितीय क्रमांक,  तबला वादन स्पर्धेत प्रसाद वैशंपायन,खानाव,अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर,शहाबाज,अलिबाग - द्वितीय क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत नमन गृप,अलिबाग - प्रथम क्रमांक , एस. ओ. एस. बालग्राम युवा गृप - द्वितीय क्रमांक, कथ्थक स्पर्धेत देवेश्री थळे,थळ-अलिबाग - प्रथम क्रमांक, सलोनी पाटील, चेंढरे,अलिबाग - द्वितीय क्रमांक तर भरतनाट्यम स्पर्धेत तेजल धनावडे, अलिबाग - प्रथम क्रमांक, कृपा नाईक, थळ,अलिबाग - द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तर युवा महोत्सवामधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी मुंबई येथे होणाऱ्या विभागस्तर युवा महोत्सवाकरीता पात्रता मिळविली असून स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना दि. 24 नोव्हेंबर, 2017 रोजी माळरान, कृषी पर्यटन केंद्र, राजमळा, अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री.प्रल्हाद सोनुने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात आले.
अलिबाग - क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या सहकार्याने  जिल्हास्तर युवक महोत्सव स्पर्धेचे दि. 23  व 24 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार उपस्थित होते.जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था, स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धांचे परिक्षण श्री.चेतन पाटील, श्री.विशाल अभंगे, श्री.संतोष वाघमारे, श्री. अमोल कापसे, श्री.देवेंद्र केळुसकर, श्री.सुशिल साईकर, सौ.हर्षदा माणगांवकर यांनी केले.युवा महोत्सवात लोकनृत्य, पखवाज, तबला, हार्मोनियम, कथ्थक, भरतनाट्यम, वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वक्तृत्व स्पर्धेत कविता ढाकवळ,माणगाव - प्रथम क्रमांक, गीता कातकरी,मुरूड - द्वितीय क्रमांक, पखवाज स्पर्धेत विराज म्हात्रे, मानी, अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर, शहाबाज, अलिबाग - द्वितीय क्रमांक, हार्मोनियम स्पर्धेत विशाल पाटील, आवास, अलिबाग - प्रथम क्रमांक, सौरभ भोईर, भिलजी, अलिबाग - द्वितीय क्रमांक,  तबला वादन स्पर्धेत प्रसाद वैशंपायन,खानाव,अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर,शहाबाज,अलिबाग - द्वितीय क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत नमन गृप,अलिबाग - प्रथम क्रमांक , एस. ओ. एस. बालग्राम युवा गृप - द्वितीय क्रमांक, कथ्थक स्पर्धेत देवेश्री थळे,थळ-अलिबाग - प्रथम क्रमांक, सलोनी पाटील, चेंढरे,अलिबाग - द्वितीय क्रमांक तर भरतनाट्यम स्पर्धेत तेजल धनावडे, अलिबाग - प्रथम क्रमांक, कृपा नाईक, थळ,अलिबाग - द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तर युवा महोत्सवामधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी मुंबई येथे होणाऱ्या विभागस्तर युवा महोत्सवाकरीता पात्रता मिळविली असून स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना दि. 24 नोव्हेंबर, 2017 रोजी माळरान, कृषी पर्यटन केंद्र, राजमळा, अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री.प्रल्हाद सोनुने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात आले.

पनवेल येथे आजपासून राज्यस्तरीय ज्युनियर कुस्ती स्पर्धा 1500 खेळाडुंचा सहभाग; जय्यत तयारी

E-mail Print PDF
पनवेल येथे आजपासून राज्यस्तरीय ज्युनियर कुस्ती स्पर्धा
1500 खेळाडुंचा सहभाग; जय्यत तयारी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- पनवेल च्या कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी मध्ये  शुक्रवार दि.1 ते  रविवार दि.3 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सौजन्याने व  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हि 40 वी स्पर्धा आहे. आमदार बाळाराम पाटील हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील  पाटील, कर्नाला स्पोर्टस  ॲकेडमीचे अध्यक्ष विवेक पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष नामदेव राव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,खजिनदार सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
1 डिसेंबर रोजी खेळाडूंचे कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमीमध्ये आगमन  होईल, त्यांचे वजन केल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाईल.सर्व खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था व्ही. के. हायस्कूल येथे करण्यात आली आहे.
दि.2 आणि 3 डिसेंबर रोजी दोन सत्रांत स्पर्धा होतील. मॅट वर रंगणाऱ्या या स्पर्धांच्या साठी तीन आखाडे सज्ज करण्यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना  निवास व्यवस्था ते कर्नाळा स्पोर्ट्स ॲकेडमी मध्ये ने आण करण्यासाठी तीन बसेस ची सोय करण्यात आली आहे.
संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वय समिती, आखाडा समिती, निवास समिती, भोजन समिती, स्वागत समिती, वाहतूक समिती, पारितोषिक समिती, प्रसिद्धी समिती, मंडप समिती, अर्थ समिती, स्टोअर समिती, वजन समिती वैद्यकीय समिती, स्टेज समिती आणि संचालन समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे.

अलिबाग - पनवेल च्या कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी मध्ये  शुक्रवार दि.1 ते  रविवार दि.3 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सौजन्याने व  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हि 40 वी स्पर्धा आहे. आमदार बाळाराम पाटील हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील  पाटील, कर्नाला स्पोर्टस  ॲकेडमीचे अध्यक्ष विवेक पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष नामदेव राव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,खजिनदार सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत. 1 डिसेंबर रोजी खेळाडूंचे कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमीमध्ये आगमन  होईल, त्यांचे वजन केल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाईल.सर्व खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था व्ही. के. हायस्कूल येथे करण्यात आली आहे. दि.2 आणि 3 डिसेंबर रोजी दोन सत्रांत स्पर्धा होतील. मॅट वर रंगणाऱ्या या स्पर्धांच्या साठी तीन आखाडे सज्ज करण्यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंना  निवास व्यवस्था ते कर्नाळा स्पोर्ट्स ॲकेडमी मध्ये ने आण करण्यासाठी तीन बसेस ची सोय करण्यात आली आहे.           

 संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनासाठी समन्वय समिती, आखाडा समिती, निवास समिती, भोजन समिती, स्वागत समिती, वाहतूक समिती, पारितोषिक समिती, प्रसिद्धी समिती, मंडप समिती, अर्थ समिती, स्टोअर समिती, वजन समिती वैद्यकीय समिती, स्टेज समिती आणि संचालन समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे.

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

E-mail Print PDF
दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH-06/BX ही नवीन मालिका सोमवार दि.4 डिसेंबर, पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे नावे काढलेल्या फी च्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करावे.
जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध क्रमांक व आकारले जाणारे शुल्क याची माहिती कार्यालयात इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यक्तिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करण्याऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास शासकीय महसूल वाढीसाठी प्राथम्य देण्यात येईल.
आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठी कार्यपध्दती कार्यालयाच्या सुचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तींकडून फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वत:कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी केले आहे.

अलिबाग - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH-06/BX ही नवीन मालिका सोमवार दि.4 डिसेंबर, पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे नावे काढलेल्या फी च्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करावे.जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध क्रमांक व आकारले जाणारे शुल्क याची माहिती कार्यालयात इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यक्तिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करण्याऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करता येईल व अशा अर्जदारास शासकीय महसूल वाढीसाठी प्राथम्य देण्यात येईल.आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठी कार्यपध्दती कार्यालयाच्या सुचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तींकडून फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वत:कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी केले आहे.

जागतिक एड्स नियंत्रण पंधरवाड्यास जनजागृती रॅलीने प्रारंभ

E-mail Print PDF
जागतिक एड्स नियंत्रण पंधरवाड्यास जनजागृती रॅलीने प्रारंभ
अलिबाग - जागतिक एड्स नियंत्रण दिन (1 डिसेंबर 2017) व पंधरवाड्याचा  प्रारंभ जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करुन करण्यात आला. जिल्हा रुग्णालयापासून निघालेल्या या रॅलीने अलिबाग शहरातील प्रमुख मार्गांवरुन जनजागृती केली.
या जनजागृतीपर रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी , पोलीस उपअधिक्षक निगो,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ) डॉ. सुहास कोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभा आधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना एचआयव्ही एडस निर्मूलन व एचआयव्ही ग्रस्थांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याबाबत शपथ दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात  करण्यात आली. शहरातील महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी नाका यामार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय प्रांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्या शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी  एचआयव्ही एड्स विषयी घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.अँड ई. सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्रीम. अर्चना जाधव, कल्पना गाडे, सचिन जाधव, राजकुमार बिराजदार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, विदुला नटे,रक्तपेढी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार,  एआरटीमधील  डेटा मॅनेजर सौ. कोमल लोखंडे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, औषधनिर्माती सायली म्हात्रे, सीसीसी को. आर्डिनेटर श्रीम. प्रेमा खंडागळे, विहान प्रकल्प ओआरडब्लु सौ. जागृती गुंजाळ, वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत तसेच प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी व स्वयंसिद्धा संस्थेच्या सूचिता  साळवी व सहकारी, नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्याशाळा येथील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिम सुतार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
एडस जनजागृतीपर उपक्रमांच्या जिल्ह्यातील आयोजनाची रुपरेषाः-
शुक्रवार दि. 1 डिसेंबर, रोजी सकाळी 10 वाजता आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे येथे आयपीसीएल कंपनी नागोठणे यांचे मार्फत एचआयव्ही / एड्सविषयी माहिती मार्गदर्शन तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एआरटी केंद्र अलिबाग यांचेमार्फत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरीता स्नेहमेळावा तसेच धिरुभाई अंबानी हॉस्पीटल लोधिवली यांचेमार्फत एचआयव्ही/एड्सविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.  1 डिसेंबर, रोजी जे.एस.डब्ल्यु. डोलवी येथे जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा या कार्यक्रमाचे जे.एस.डब्ल्यु. येथील लेबर कॉलनी येथे दुपारी साडेतीन  वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करुन सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कालावधीत जे.एस.डब्ल्यु.  स्टील प्रा.लि. डोलवी ता.पेण यांच्या मार्फत मोबाईल आयसीटीसी व्हॅनला डिजिटल आयसीटीसी व्हॅन तयार करुन त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागामध्ये फिरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात येणार आहे.
शनिवार दि.2 डिसेंबर रोजी तहसिलदार पनवेल यांच्यामार्फत तहसिलदार कार्यालय पनवेल येथे डापकू व विहान प्रकल्प पनवेल यांच्या समन्वयाने एचआयव्हीसह जगणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवा सवलती (एक खिडकी योजना) एकाच ठिकाणी मिळतील या करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.3 डिसेंबर रोजी सायं. 6 ते 7 या वेळेत दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन पेण  यांच्या मार्फत ऑक्रेस्टाचे आयोजन करुन करमणूकीतून एचआयव्ही/एड्स विषयी शास्त्रीय माहिती देवून इच्छूक असणाऱ्या व्यतींचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यु स्टील प्रा.लि. डोलवी पेण येथील इनसाईट प्लॅट मुख्य कॅटीनच्या जवळ घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन  पेण यांच्यामार्फत विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करण्यात आले आहे.
जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा 2017 चे घोषवाक्य माझे आरोग्य माझा अधिकार हे असून डापकू मार्फत विविध स्थलांतरीत कामगार, ट्रक ड्रायर्व्हस, रिक्षाचालक, क्लिनर, कॉलेजमधील युवक युवती विविध कंपन्यांमधील काम करीत असलेले कामगार तसेच हॉटेलमधील कामगार यांचे करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग - जागतिक एड्स नियंत्रण दिन (1 डिसेंबर 2017) व पंधरवाड्याचा  प्रारंभ जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करुन करण्यात आला. जिल्हा रुग्णालयापासून निघालेल्या या रॅलीने अलिबाग शहरातील प्रमुख मार्गांवरुन जनजागृती केली.या जनजागृतीपर रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी , पोलीस उपअधिक्षक निगो,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ) डॉ. सुहास कोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभा आधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना एचआयव्ही एडस निर्मूलन व एचआयव्ही ग्रस्थांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याबाबत शपथ दिली.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात  करण्यात आली. शहरातील महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी नाका यामार्गे पुन्हा  जिल्हा सामान्य रुग्णालय प्रांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्या शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. यावेळी  एचआयव्ही एड्स विषयी घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली.हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील जिल्हा  आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.अँड ई. सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर, आयसीटीसी समुपदेशक श्रीम. अर्चना जाधव, कल्पना गाडे, सचिन जाधव, राजकुमार बिराजदार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, गणेश सुतार, विदुला नटे,रक्तपेढी  प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार,  एआरटीमधील  डेटा मॅनेजर सौ. कोमल लोखंडे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, औषधनिर्माती सायली म्हात्रे, सीसीसी को. आर्डिनेटर श्रीम. प्रेमा खंडागळे, विहान प्रकल्प ओआरडब्लु सौ. जागृती गुंजाळ, वाहनचालक महेश घाडगे, किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील, संकेत घरत तसेच प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी व स्वयंसिद्धा संस्थेच्या सूचिता  साळवी व सहकारी, नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्याशाळा येथील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिम सुतार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.  एडस जनजागृतीपर उपक्रमांच्या जिल्ह्यातील आयोजनाची रुपरेषाः-शुक्रवार दि. 1 डिसेंबर, रोजी सकाळी 10 वाजता आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे येथे आयपीसीएल कंपनी नागोठणे यांचे मार्फत एचआयव्ही / एड्सविषयी माहिती मार्गदर्शन तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एआरटी केंद्र अलिबाग यांचेमार्फत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरीता स्नेहमेळावा तसेच धिरुभाई अंबानी हॉस्पीटल लोधिवली यांचेमार्फत एचआयव्ही/एड्सविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.शुक्रवार दि.  1 डिसेंबर, रोजी जे.एस.डब्ल्यु. डोलवी येथे जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा या कार्यक्रमाचे जे.एस.डब्ल्यु. येथील लेबर कॉलनी येथे दुपारी साडेतीन  वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करुन सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कालावधीत जे.एस.डब्ल्यु.  स्टील प्रा.लि. डोलवी ता.पेण यांच्या मार्फत मोबाईल आयसीटीसी व्हॅनला डिजिटल आयसीटीसी व्हॅन तयार करुन त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागामध्ये फिरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात येणार आहे.शनिवार दि.2 डिसेंबर रोजी तहसिलदार पनवेल यांच्यामार्फत तहसिलदार कार्यालय पनवेल येथे डापकू व विहान प्रकल्प पनवेल यांच्या समन्वयाने एचआयव्हीसह जगणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवा सवलती (एक खिडकी योजना) एकाच ठिकाणी मिळतील या करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.3 डिसेंबर रोजी सायं. 6 ते 7 या वेळेत दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन पेण  यांच्या मार्फत ऑक्रेस्टाचे आयोजन करुन करमणूकीतून एचआयव्ही/एड्स विषयी शास्त्रीय माहिती देवून इच्छूक असणाऱ्या व्यतींचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आले आहे.मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यु स्टील प्रा.लि. डोलवी पेण येथील इनसाईट प्लॅट मुख्य कॅटीनच्या जवळ घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये दि रुरल ॲण्ड यंग फाऊंडेशन  पेण यांच्यामार्फत विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करण्यात आले आहे.जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा 2017 चे घोषवाक्य माझे आरोग्य माझा अधिकार हे असून डापकू मार्फत विविध स्थलांतरीत कामगार, ट्रक ड्रायर्व्हस, रिक्षाचालक, क्लिनर, कॉलेजमधील युवक युवती विविध कंपन्यांमधील काम करीत असलेले कामगार तसेच हॉटेलमधील कामगार यांचे करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे संघर्ष समितीने घेतला आक्रमक पवित्रा

E-mail Print PDF
पनवेल : पेट्रोल-डिझेलमधील भेसळ नियंत्रणात आल्यानंतर पंप चालकांनी मापात पाप करण्याचे सूत्र अवलंबिल्याने वाहन चालक, मालकांची लूट सुरू आहे. वजन, मापे नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्यांना चाप लावून पेट्रोल पंपांवर होणारी लूट त्वरित थांबबावी, असे आदेश तहसीलदार दीपक आकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पनवेल तालुक्यातील विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर मापात काळंबेरं होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी यावरून हाणामारीच्या घटना घडल्याची नोंदही पोलिस ठाण्यात आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना पत्र पाठवून संबंधीतांची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल, मंगळवारी (दि. 28) आकडे यांच्या दालनात झाली.
वजन, मापे नियंत्रण विभागाचे अधिकारी भंगारे यांनी पनवेल शहर व तालुक्यात 34 पेट्रोल पंप असल्याची माहिती दिली. गेल्या सहा महिन्यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि आमच्या पथकाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविली असल्याची माहिती बैठकीत दिली.
यावर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आक्षेप नोंदविला आणि ही मोहीम सातत्याने राबविली गेल्यास पेट्रोल पंप चालकांवर वचक राहील. वजन, मापे नियंत्रण विभागाला कधी तरी जाग येतेच कशी, असा रोखठोक प्रश्न विचारताच अधिकारी गर्भगळीत झाले.
पेट्रोल पंपांवर मालक अनेकदा डिझेल, पेट्रोल नसल्याचे फलक लावून वाहनचालकांची दिशाभूल करीत आहेत. ते खातेदारांना काळ्याबाजाराने आणि तेही उधारीवर डिझेल देवून कृत्रिम डिझेल टंचाई निर्माण करतात असे निदर्शनास आणून दिले. पेट्रोल पंप चालक ऐनकेन प्रकारे वाहन चालकांची लुबाडणूक करीत असल्याने ती थांबवण्यात यावी, अशी मागणी संघर्षने लावून धरली.
आकडे यांनी, ही लूट थांबविण्याचे आदेश देताना सर्व पंप आणि त्यांचे मीटर सखोलतेने तपासून घ्यावेत. मोहिमेत आपण आणि संघर्ष समिती सदस्य सहभागी होऊ. तसेच महिनाभरात सर्व पेट्रोल पंप तपासून त्याचा अहवाल सादर करावा, असे आकडे यांनी निर्देश दिले.
या बैठकीत वजन, मापे नियंत्रणचे निरीक्षक रमेश मारणे, सु. प्र. भंगाळे , पुरवठा विभागाचे राठोड, बीपीएल कंपनीचे वितरक पाटील तसेच संघर्षचे कांतीलाल कडू, माधुरी गोसावी,चंद्रकांत शिर्के, मंगल भारावड, भारती जळगावकर, किरण तळेकर, विक्रम रमाधरणे, पिरमभाई पटेल आदी जण उपस्थित होते.

क्रीडा प्रकारातील विजेता मुंबई उपनगर सांस्कृतिक प्रकारातील विजेता ठाणे

E-mail Print PDF

पालघर - क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये निर्णय क्षमता, खिलाडूवृत्ती, संघभावना इत्यादी बाबींची  वाढ होऊन  त्याचा फायदा दैनंदिन प्रशासकीय कामाकाजात होऊन कार्यक्षमता वाढण्यासही याचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

कोंकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2017-18 चे पारितोषिक वितरण व समारोह समारंभ आदिवासी विकास तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत विवा कॉलेज ग्राऊंड (जुने), विरार (प) येथे झाला. त्यावेळी  ते बोलत होते.  यावेळी  आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, माजी राज्य मंत्री राजेंद्र गावीत, कोंकण विभागीय आयुक्त, डॉ.जगदिश पाटील, कोकण विभागीय उपआयुक्त (महसूल) सिध्दराम शालीमठ,   जिल्हाधिकारी पालघर डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी ठाणे डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर दिपेंद्रसिंह कुशवाह, कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर मिलिंद बोरीकर, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी खेळाडू उपस्थित होते.

यावेळी सवरा म्हणाले की, या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील खिलाडूवृत्तीचे वातावरण तयार होते. या खिलाडूवृत्तीचा दैनंदिन प्रशासकीय काम करण्यास उपयोग होतो. कामामधील अनेक आवाहने पेलण्याची ताकद या स्पर्धांमधूनच मिळत असते.  महसूल विभागाच्या स्पर्धेला निधी व शासकीय सुट्टी या मागणीबाबत शासन स्तरावर मी प्रयत्न करीन.

पालघर जिल्हा नवीन जिल्हा असला तरी, या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल   जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे व टीमचे विशेष अभिनंदन करतो तसेच या स्पर्धेत विजेत्या संघांचे अभिनंदन करतो.  व या स्पर्धेसाठी  ज्या ज्या संस्था व व्यक्तींनी मदत केली त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.  तसेच कोकण विभागाने  राज्य स्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळविण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे आवाहनही सवरा यांनी यावेळी केले.

या स्पर्धेतील क्रीडा प्रकारातील  विजेता संघ मुंबई उपनगर,  उपविजेता रत्नागिरी, तृतीय क्रमांक सिंधुदूर्ग.

या स्पर्धेतील सांस्कृतिक प्रकारातील समुहानूसार प्रथम विजेता संघ ठाणे, द्वितीय मुंबई उपनगर, तृतीय रत्नागिरी.

पुढील वर्षाच्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा  रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.

संविधान दिनानिमित्त येथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे  सामूहिक वाचन केले.

कॉँग्रेसची सुटलेली मोट बांधण्यासाठी ज्येष्ठांचा पुढाकार, पनवेलमध्ये पार पडली बैठक

E-mail Print PDF
पनवेल/प्रतिनिधी - गुजरातच्या निवडणुकीमुळे तिथे दांडी यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात देशभर कॉंग्रेसला पोषक वातावरण राहील, असे मत व्यक्त करून पनवेल कॉंग्रेसची मोट पुन्हा बांधण्यासाठी आज, ज्येष्ठांची विचार विनिमय बैठक संपन्न झाली. तळागाळातील कॉँग्रेसजनांना एकत्र आणण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
जिल्हा कॉँग्रेस विचार सेलचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या पनवेल येथील निवासस्थानी ही बैठक रमणिकशेठ माखेजा आणि ऍड. गजानन पाटील यांनी आयोजित केली होती. त्यावेळी पक्ष संघटनेला  नवे रूप देण्यावर एकमत झाले.
बैठकीला माजी उपनगराध्यक्ष रमणिकशेठ माखेजा, माजी तालुकाध्यक्ष अँड. गजानन पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे, माजी नगराध्यक्ष मोतीलालशेठ बांठीया व सईद मुल्ला, माजी नगरसेवक आबा खेर, जिल्हा चिटणीस शशिकांत बांदोडकर, ज्येष्ठ नेते अखिल अधिकारी, सैफुद्दीन बोरा, कॉँग्रेस विचार सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल कडू, नवीन पनवेल विभागीय अध्यक्ष सुधीर मोरे, अशोक बहिरा आदी मोजकीच मंडळी उपस्थित होती.
कॉँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे, ती कधी संपुष्टात येणारी नाही. समाजधारेच्या अनुषंगाने जात असताना राजकीय पक्षांची पडझड होत असते, ती अनेकदा कॉँग्रेसची झाली. आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असा संदेश घेवून गावोगावी जावून पक्ष संघटना लवकरच नव्याने उभी करू या, असे मत उपस्थितांनी मांडले.
पूर्वीचा काळ पक्षाच्या विचारधारेने भारावलेला होता. तो काळ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंत चव्हाण यांचा होता, कुशल संघटक आणि कार्यकर्त्यांची अचूक नाळ जाणणार्‍या वसंतदादांचा  होता, बॅ. अंतुले, मोपलवार आणि इंदिरा, राजीव गांधींचा होता. आजही पक्षात तीच शिस्त आहे. सोनिया आणि राहुल गांधी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कार्यकर्त्यांचा तोच विश्‍वास आहे. स्थानिक पातळीवर काही वैचारिक मतभेद असू शकतात परंतु, कॉँग्रेस अभेद्य ठेवण्यासाठी ते मतभेद बाजूला सारून नजिकच्या काळात सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे यशस्वी पर्यंत करू, या असा मतप्रवाह व्यक्त करण्यात आला.
आबा खेर आणि शशिकांत बांदोडकर यांच्यावर जुन्या आणि निष्ठावंत कॉँग्रेसजनांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच येत्या पंधरा दिवसात दूसरी बैठक आणि संघटना बांधण्यासाठी दिशा ठरविण्यात येईल, असे ठरले. त्यानुसार पक्ष बांधणीच्या दिशेने पहिले पाऊल आजच टाकण्यात आले.

नवी मुंबईसह पनवेल तालुक्यात अवकाळी पाऊस

E-mail Print PDF
नवी मुंबई - नोव्हेंबरअखेरीस थंडीचा कडाका सुरू होऊन आठवडा पूर्ण होत नाही. तोच आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून ढगाळ वातावरण  निर्माण झाले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. यामुळे कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले.
थंडीचा जोर काहीसा वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी पनवेलसह नवी मुंबईत झालेल्या पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले. त्यामुळे गारवा आणखीणच वाढला आहे. परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे.
आठवडाभरापासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. सकाळी पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, पनवेलचा ग्रामिण भाग, उलवे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. उलवे येथे जोरदार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारंबळ उडाली.

नवी मुंबई विमानतळ परिसरात बेकायदा बांधकामे

E-mail Print PDF
नवी मुंबई - नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या सिडकोने मंजूर केल्याने गाभा क्षेत्रातील घरांत फेरबदल, वाढीव बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी सिडकोकडे आल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी वाढीव अथवा नवीन बांधकाम करू नये, असे सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्रात घर देतो, असे सांगून फसविण्याचे प्रकारही होऊ लागले आहेत. विमानतळ गाभा क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम तसेच सध्या असलेल्या घरात वाढीव बांधकाम केल्यास त्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजच्या सुविधा मिळणार नाहीत, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील गाभा (कोअर) क्षेत्रासाठी एक हजार १६० हेक्टर जमिनीची आवश्यकता असून तेवढी जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. या प्रकल्पात १० गावांतील ६७१ हेक्टर जमीन कगदोपत्री संपादित करण्यात आली आहे. या गावांतील तीन हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वडघर, वहाळ, कुंडेवहाळ या गावांशेजारील मोकळ्या जागेत केले जाणार आहे. त्यासाठी तेथे भूखंड आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांनी काही गरजेपोटी घरांची निर्मिती केली होती. सिडकोने भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या मान्य करून हा प्रकल्प पुढे कसा जाईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांनी आहे त्या घरात बदल करून अतिरिक्त बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे काही भूमाफियांनी मोकळ्या जागेत नवीन बांधकामे हाती घेतली आहेत. अशा प्रकारची अतिरिक्त बांधकामे झाल्यास यानंतर या वाढीव अथवा नवीन बांधकामांच्या बदल्यात पुनर्वसन पॅकेजमध्ये अंतर्भाव करून जादा मोबदला मिळवण्याचा काही प्रकल्पग्रस्तांचा इरादा आहे.
या बांधकामाबरोबरच काही भूमाफिया विमानतळ गाभा क्षेत्रात बेकायेदशीर इमारती बांधून त्या परस्पर गरजवंतांना विकत आहेत. स्वस्त आणि मस्त घरे मिळत असल्याने काही मुंबईकर या फसवणुकीला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. सिडकोत अनेक तक्रारी आल्याने सिडकोने या भागात घरे घेणार्‍या सर्वाना सजग केलेले आहे. या दहा गावांतील सर्व जमीन मोकळी केली जाणार असून त्याला कुंपण घातले जाणार आहे.

Page 2 of 266