Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

कोर्लईतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

E-mail Print PDF
मुरुड- जंजिरा - राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत कवळे व अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्लईमधील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. मुरुड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष भरत बेलोसे हे सातत्याने या भागातील नागरिकांशी संपर्कात होते. जर या भागाचा विकास करावयाचा असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीशिवाय पर्याय नाही हे ओळखून येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत टप्प्याटप्प्याने प्रवेश केला.

अंमली पदार्थ प्राशन केल्यामुळे १४ तरुण अत्यवस्थ

E-mail Print PDF
खोपोली -  रंगपंचमीचा आनंद लुटल्यानंतर सरबतात अंमली पदार्थ टाकून प्राशन केल्यामुळे १४जणांना बाधा झाली असून, या १४जणांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर गावातील वाल्मिकनगर येथील ही मुले असून रंगपंचमी खेळल्यानंतर या मुलांनी सरबत घेतले व त्यानंतर त्यांना चक्कर येणे, गरगरणे अशा प्रकारचा त्रास सुरु झाला. या सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले. संबंधित सरबत विक्रेत्याला या प्रकरणी ताब्यात घेतले असून, या तरुणांनी अंमली पदार्थ कुठून आणले, याबाबतचे गूढ कायम आहे. मात्र अशा प्रकारे अंमली पदार्थ खुलेआम सरबतवाल्याकडे मिळत असतील तर याबाबत पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

पेणच्या नगराध्यक्षा भारती पाटील यांचा राजीनामा

E-mail Print PDF
पेण - पेण नगराध्यक्षा भारती पाटील यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे. त्यामुळे गेली अनेक दिवस सुरु असलेल्या पेण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून पेण नगर परिषदेतील राजकीय कलहामुळे वातावरण तापले होते. नगर परिषदेतील हा राजकीय वाद पक्षश्रेष्ठींकडेही गेला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी भारती पाटील यांना मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. पक्षादेश मिळताच मार्च महिना संपताच १ एप्रिल रोजी भारती पाटील यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.

राष्ट्रवादीच्या १४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

E-mail Print PDF
रोहे - रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात १४जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर झालेली हाणामारी शिवीगाळ करुन, काठ्यांचा वापर, दगडफेक, कौलारु घरे फोडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन करण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वातावरण तंग असून, पोलीस तपास सुरु आहे.

Page 266 of 266