Tuesday, Jan 23rd

Headlines:

रायगड

विद्यार्थ्यांचा आधार नंबर नाही तर पगार नाही...

E-mail Print PDF
विद्यार्थ्यांचा आधार नंबर नाही तर पगार नाही...
पनवेल ः ऑनलाईन कामाच्या दडपणाने शिक्षकवर्ग पुरता हैराण झाला असताना आता एक नवा अजब फतवा शिक्षण खात्याने काढल्याने राज्यातील शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधार नंबर जर पूर्णपणे नोंदवले नाहीत तर फेब्रुवारीचा पगारच मिळणार नसल्याचा सज्जड दम व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशाद्वारे शिक्षकांना देण्यात आला आहे. तसेच जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर नोंदवले जातील. तेवढेच विर्द्याी संचमान्यतेसाठी विचारात घेतले जाणार असल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक विद्यार्थ्यांच्या आधाराविना निराधार होण्याची भीती शिक्षक वर्गात निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये शासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल ः ऑनलाईन कामाच्या दडपणाने शिक्षकवर्ग पुरता हैराण झाला असताना आता एक नवा अजब फतवा शिक्षण खात्याने काढल्याने राज्यातील शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधार नंबर जर पूर्णपणे नोंदवले नाहीत तर फेब्रुवारीचा पगारच मिळणार नसल्याचा सज्जड दम व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशाद्वारे शिक्षकांना देण्यात आला आहे. तसेच जेवढ्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर नोंदवले जातील. तेवढेच विर्द्याी संचमान्यतेसाठी विचारात घेतले जाणार असल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक विद्यार्थ्यांच्या आधाराविना निराधार होण्याची भीती शिक्षक वर्गात निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये शासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने गुटखा विक्रीला घालणार लगाम

E-mail Print PDF
पनवेल - राज्य शासनाची सक्तीची बंदी असतानाही पनवेलसह राज्यात सर्वत्र गुटखा विक्री तेजीत सुरू असल्याने व्यसनाधिनता वाढीस लागली आहे. प्रामुख्याने गुटखाच्या आहारी जाणार्‍यांमध्ये तरूणांचा समावेश जास्त आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच ‘गुटखा मुक्त पनवेल’, ची संकल्पना राबवून ती अंमलात आणण्याचा निर्धार पनवेल संघर्ष समितीने केला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने काही दिवसातच हा संकल्प तडीस नेण्याचा निर्धार संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी मनावर घेतला आहे.
पनवेल शहर, महापालिका क्षेत्रासह तालुक्यातील गावोगावी, नाक्यानाक्यावर गुटख्याची बेकायदेशीर विक्री चढ्या भावाने सुरू आहे. राज्य शासनाच्या बंदी आदेशाची सर्रासपणे पायमल्ली होत आहे. त्यातच गुटखा विक्रीमुळे तरूण मोठ्या प्रमाणात कॅन्सरसारख्या महाभयानक आजाराचे बळी ठरत आहेत. याविषयी समाजात जनजागृती करून गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने पाऊल उचलले आहे. रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख दिनेश संगत, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे याशिवाय महाराष्ट्र पोलिस महासंचालकांचीही याबाबतीत मदत घेवून उद्या, सुरू होणार्‍या नवीन वर्षाचा संकल्प म्हणून पनवेल तालुका गुटखा मुक्त करण्याचा मानस केला असल्याची माहिती कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक, महाराष्ट्र भूषण, राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग यांच्याशी कडू यांनी दोन वर्षापूर्वी संपर्क साधला होता. डॉ. बंग यांनी चंद्रपूर जिल्हा तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प त्यावेळी केला होता. कडू यांना त्यांनी, रायगड जिल्ह्यात व्यसनाधितेला बळी पडणार्‍या तरूण पिढीला वाचविण्यासाठी काही ठोस कामगिरी करण्याचे सुचित केले होते. त्यांच्या निर्देशाप्रमाणे तंबाखूइतकाच भयानक असणार्‍या आणि त्यातही राज्य शासनाची बंदी असताना सर्रास विकल्या जाणार्या गुटख्याला पनवेल तालुक्यातून मुठमाती देण्याचा संकल्प संघर्ष समितीने केला असून तो तडीस नेला जाईल.
पनवेल तालुक्यासोबतच ही मोहिम रायगड जिल्ह्यात सर्वत्र राबविण्याचा प्रयत्न संघर्ष समितीचा राहिल. व्यसनमुक्तीचे रायगडात रेवदंडा येथे मोठे केंद्र आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची इच्छाशक्ती असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रायगडसह देश, विदेशात व्यसन मुक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या संकल्पनेनुसार रायगडातील गुटखा विक्री नेस्तनाबूत करण्यासाठी संघर्ष समितीला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहेत. ते ते प्रयास करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे, अशी माहिती कडू यांनी नव वर्षाच्या संकल्पाविषयी प्रसार माध्यमांना दिली.

तरूणांमध्ये वाचन संस्कृती रूजावी म्हणून कोमसापने केली वाचक-मंचाची स्थापना

E-mail Print PDF
ठाणे:वाचन संस्कृती तरूणांमध्ये रूजावी आणि ती वर्धिष्णू व्हावी हा सकारात्मक उद्देश मनात धरून कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेने वाचक- मंचाची स्थापना केली दर तीन महिन्यांनी वाचक मंचाचा कार्यक्रम होणार असल्याचे कोमसाप ने जाहीर केले, जास्तीत जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन कोमसापने केले आहे.या निमित्ताने एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला. आपण काय वाचले, मग ती कथा, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, काव्यसंग्रह आणि इतर ललित लेखन यापैकी काहीही असो, वक्त्याने साधारण पाच मिनिटात त्या साहित्याचे रसग्रहण म्हणा, विवेचन म्हणा श्रोत्यांसमोर सादर करावयाचे.
या श्रुंखलेतील पहिले पुष्प काल ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाले. सदर कार्यकमास विशेष अतिथी म्हणून विवेक मेहेत्रे ,नंदकुमार टेणी ’डॉ महेश केळुस्कर व कवी शशिकांत तिरोडकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जेष्ठ समीक्षक डॉ अनंत देशमुख यांनी भूषविले.या वेळी 
कोमसाप ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात उपक्रमाचे उदिष्ट थोडक्यात विदित केले. नंतर नंदकुमार टेणी व विवेक मेहेत्रे यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले. विवेक मेहेत्रे, यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे चित्रकार लेखक, स्वतः कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी आपल्या भाषणात काय वाचावे, कसे वाचावे याचा सोदाहरण उहापोह केला.
तदनंतर उपस्थितांपैकी बारा वक्त्यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर भाष्य केले. तसेच ते पुस्तक जरूर वाचावे अशी श्रोत्यांना विनंती केली.विविध वक्त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे व.पु.काळे, पु. ल. दुर्गा भागवत असे कितीतरी विषय हाताळले.

सुधागड तालुका रहिवासी सेवासंघ, आयोजित कबड्डी स्पर्धेसाठी तालुका संघांना आवाहन

E-mail Print PDF
ठाणे,  : सालाबादपमाणे यंदाही शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यातर्फे मावळी मंडळ मैदान, चरई, ठाणे येथे वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील ग्रामस्थ कीडा मंडळांनी आपल्या संघाची नोंद करून अर्ज  25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत संस्थेच्या कार्यालयात क्रीडासमितीप्रमुख प्रकाश शिलकर (मो. : 9224932857), व सरचिटणीस राजू पातेरे(8424855284) यांच्याकडे जमा करावे.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे दरवर्षी तालुक्यातील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व तालुका विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही 26 जानेवारी 2018 रोजी होणाऱया वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी स्पर्धेसाठी ग्रामस्थ क्रीडा मंडळांना आवाहन करण्यात येते की आपल्या संघाची व गावाची नोंद 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधी संस्थेचे कार्यालय 10/ए4, दुर्वांकूर, सरोवरदर्शन सोसायटी, रायगड लेन, चंदनवाडी, ठाणे येथे सायं. 7.30 ते 9 या कालावधीत क्रीडासमितीप्रमुख हनुमंत थोरवे यांच्याकडे करावी. सर्व संघाचे अर्ज जमा झाल्यानंतर सर्व संघनायक, व्यवस्थापक यांची संस्थेच्या कार्यालयात सभा घेऊन जमा अर्जातून चिठ्ठी काढून संघ निवड केली जाईल, याची संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे(9820775080) यांनी केले आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात

E-mail Print PDF
रायगड -केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला. या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून पालीमध्ये उपचार सुरू आहेत. गिते सुखरुप आहेत.गिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला.

“रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे छत्रपती यांची निवड”

E-mail Print PDF
नागपुर : नागपुर येथे किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा आज करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाचे संवर्धन करण्यासाठी आता शासनाच्यावतीने रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.  रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  खा. संभाजीराजे छत्रपती यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  खा. संभाजीराजे यांनीच 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा  शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यास सुरूवात केली.  या सोहळयाची मुहुर्तमेढ रोवल्यानंतरच काही वर्षात हा सोहळा लोकोत्सव बनला आणि पुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे ‘राष्ट्रीय सणा’कडे मजल मारू लागला.  2005 पासून हा सोहळा मोठया भव्य प्रमाणात साजरा होत असून या माध्यमातूनच खा. संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती.  याच पाश्र्वभूमीवर रायगडावर 2016 च्या शिवराज्याभिषेक सोहळयास मा. मुख्यमंत्री उपस्थित असता त्यांनी रायगड व परिसर  संवर्धनासाठी  600 कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली होती.
शिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार असलेल्या खा.संभाजीराजे छत्रपती यांचा दुर्गराज रायगड व शिवराज्याभिषेक सोहळा हा अत्यंत जवळचा विषय.  त्यांनी आजवर गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी सर्वसमावेषक गोष्टींचा विचार करून रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी 10 कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला व त्याचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे.  गड किल्ले जतन, संवर्धन व संरक्षण ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या विचाराने पुढाकार घेऊन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झाल्यानंतर  त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवरायांच्या 103 गडकोटांवर एकाच दिवशी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
आजवर रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, रिकाम्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची शिवभक्तांच्या पाठिंब्यावर बसवलेली शिवमूर्ती तसेच युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिका- यांना कोल्हापूरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.  राज्यसभेतही त्यांनी शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी आवाज उठविला आहे.  
पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे आग्रही आहेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.  पाच किल्ल्यांचे संवर्धन करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.  रायगडाचे जतन व संवर्धन योग्य प्रकारे कसे व्हावे यासाठी 6 जून 2017 च्या शिवराज्याभिषेक सोहळयाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 जून रोजी त्यांनी संवर्धनाबाबत देशातील तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत तसेच शिवभक्तांचे विचार व सुचनांच्या आधारे ‘संवर्धन रायगडाचे,मत शिवभक्तांचे’ हा परिसंवाद आयोजित केला होता.  महाराष्ट्रात 350 हून अधिक गड, सागरी किल्ले आहेत त्यात विशेष महत्व सिंधूदुर्ग किल्ल्याला आहे.  हा किल्ला स्वत: शिवरायांनी बांधला असून त्यानंतर त्या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवरायांचे मंदिर, त्या मंदिरा समोरील राजर्षि शाहु महाराज यांनी बांधलेला सभा मंडप, किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायांच्या पायाचा व हाताचा ठसा अशा अनेक गोष्टींमुळे या किल्ल्याला विशेष महत्व आहे.  या किल्ल्याचे व शिवराजेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन होण्यासठी हा सिंधूदुर्ग किल्ला ही संभाजीराजेंनी विशेष प्रयत्न करून रायगड प्राधिकरणात सामाविष्ट करून घेतला आहे.  
या सोहळयासाठी देशभरातून येणा-या शिवभक्तांसह इतिहास अभ्यासक,संशोधकांची संख्या पाहून गतवर्षी रायगडाच्या संवर्धनासाठी हा निधी जाहीर झाला.  रायगडाच्या संवर्धनाचे काम व्हावे ही सर्व शिवभक्तांची तीव्र इच्छा होती.  शिवभक्तांच्या इच्छेनुसार केंद्राच्या पुरातत्व विभागाने नियम शिथिल करून या निधीस परवानगी दिली. रायगडाचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दॄष्टीने जगाच्या नकाशावर रायगड येण्यासाठी शासनाच्या वतीने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
भारताचा मानबिंदू व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगडाचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे व या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असून सर्व शिवभक्तांच्या वतीने मी ही जबाबदारी स्विकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून रायगडाच्या संवर्धन कार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान मह्त्वाचे आहे अशी प्रतिक्रीया खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

सुधागड तालुका रहिवासी सेवासंघ, आयोजित कबड्डी स्पर्धेसाठी तालुका संघांना आवाहन

E-mail Print PDF
ठाणे, दि. 20 : सालाबादपमाणे यंदाही शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्यातर्फे मावळी मंडळ मैदान, चरई, ठाणे येथे वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील ग्रामस्थ कीडा मंडळांनी आपल्या संघाची नोंद करून अर्ज  25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत संस्थेच्या कार्यालयात क्रीडासमितीप्रमुख प्रकाश शिलकर (मो. : 9224932857), व सरचिटणीस राजू पातेरे(8424855284) यांच्याकडे जमा करावे.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे दरवर्षी तालुक्यातील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व तालुका विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही 26 जानेवारी 2018 रोजी होणाऱया वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी स्पर्धेसाठी ग्रामस्थ क्रीडा मंडळांना आवाहन करण्यात येते की आपल्या संघाची व गावाची नोंद 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधी संस्थेचे कार्यालय 10/ए4, दुर्वांकूर, सरोवरदर्शन सोसायटी, रायगड लेन, चंदनवाडी, ठाणे येथे सायं. 7.30 ते 9 या कालावधीत क्रीडासमितीप्रमुख हनुमंत थोरवे यांच्याकडे करावी. सर्व संघाचे अर्ज जमा झाल्यानंतर सर्व संघनायक, व्यवस्थापक यांची संस्थेच्या कार्यालयात सभा घेऊन जमा अर्जातून चिठ्ठी काढून संघ निवड केली जाईल, याची संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे(9820775080) यांनी केले आहे.

​​​भारतरत्न लता मंगेशकर खारघरच्या प्रेमात!

E-mail Print PDF
खारघर /प्रतिनिधी-खारघर शहर खूप चांगले आहे. आल्हादायक वातावरण आहे. तेथील माणसंही चांगलीच असतील, असा आशावाद भारतरत्न, गानसरस्वती लता मंगेशकर यांनी व्यक्त केला.
सिडकोच्या सेंट्रल पार्कमधील ऍम्पी थिअटरमध्ये कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम सांगितिक मैफिलीचे शानदार आयोजन केले होते. रसिक, कानसेनांनी खुले रंगमंच खचाखच भरले होते. संगीताची जाण असलेले रसिक आणि त्यांनी फर्माईश केलेली गाणी पेश करून पं. हृदयनाथ आणि कन्या राधा मंगेशकर यांनी रसिकांचे हृदय जिंकले. टाळ्या, शिट्या आणि काहींनी फेर धरल्याने खारघर मंत्रमुग्ध झाले होते.
बाळ, हृदयनाथ खूप चांगले गातो. राधा त्याला साथ देते. रसिक मायबाप तृप्तीचे ढेकर देईपर्यंत ते दोघे गातील, असा विश्‍वास लता दीदींनी संवादातून पेरला. कांतीलाल कडू यांचे आयोजन आणि त्यांचे  सांस्कृतिक चळवळीतील योगदान वाखाण्याजोगी असल्याचे सांगत कांतीलाल कडू यांचे दीदींनी तोंडभरून कौतुक केले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांच्या फटक्यांनी आसमंतात उजळून निघाले होते.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रारंभी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राधा पुण्यातून इथे पोहचली पण मी मुंबईतून इथे त्यावेळात पोहचू शकलो नाही. इथले वातावरण आणि शहरीकरण तसेच माणसं फणसासारखी गोड आहेत. आगरी-कोळी आणि इतर समाजाचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे यांना ‘तरुणोत्तम’, डॉ. प्रकाश पाटील यांना ‘विज्ञानेश्‍वर’, ज्येष्ठ गायक निवृत्तीबुवा चौधरी यांना ’पुण्यभूषण’, रायगड जिल्हा महिला आयोगचे सदस्य संजय जाधव यांना ‘धुरंधर’ तर उद्योजक सूरदास गोवारी यांना ‘फिनिक्स पुरस्कार’ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच 81 व्या वर्षात पदार्पण आणि भावसरगमचे 51 वर्षाचे यश अधोरेखित करत मंगेशकरांचा, मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रतिष्ठानच्या ‘निर्भीड दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले.
प्रस्तावित करताना अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. पनवेल संघर्ष समितीच्या कामाचीही माहिती त्यांनी दिली.
संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या ‘अविचित परिमळू’ या अभंगवाणीने भावसरगमची सुरुवात तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यांनी सादर केलेली कोळी गीते, वर्सोवा येथील भेटीतील त्यांचे काही अनुभव, कोळी समाजाची जीवनशैली यावर त्यांनी भाष्य करत गाण्यांची रंगत वाढवली. भावगीते, मराठी गज़ल आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या बंदिश त्यांनी सादर केल्या. गोमू संगतीनें माझ्या तू येशील का ...?, वादळ वारं सुटलं रे.... राजा सारंगा.... वल्हव रे नाखवा... जांभूळ पिकल्या झाडाखाली या गाण्यांची रसिकांनी मजा लुटली. अक्षरशः त्यांनी फेर धरला होता. म्पी थिअटर आणि आकाशाच्या पोकळीत फक्त ‘भावसरगम’च्या मैफिलीचीच जणू सुरावट भरून राहिली होती, असे अविस्मरणीय क्षण लुटले जात होते.
खारघरच्या इतिहासात आतपर्यंत झालेल्या गर्दीचा उच्चांक मोडणारा कार्यक्रम ठरल्याने प्रेषकांनी कांतीलाल कडू यांना भेटून समाधान व्यक्त केले.
माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा प्रमुख व नगरसेवक सतीश पाटील, डॉ. अशोक पाटील, सिडकोचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप माने, शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील, शिरीष घेत, रमेश गुडेकर, कॉँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे, शशिकांत बांदोडकर, डॉ. जयश्री पाटील, डॉ. चंदन ठाकूर, वैभव गायकर, भाजपा नेत्या रूपा सिन्हा, माजी नगरसेविका शशिकला सिंह, संध्या दांडेकर, श्‍वेता गायकर  डॉ. वैभव दाभणे, जनार्दन ठाकूर, ज्ञानदेव म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत आनंद पाटील, प्रशांत गाला, दया पाटील, नारायण म्हात्रे, सुरज म्हात्रे, मंगल भारवाड, रमेश फुलोरे यांनी केले.

संघर्ष समितीने फोडली पोषण आहाराची कोंडीसात कोटीच्या निधीचा केला अनियमितपणा उघड

E-mail Print PDF
पनवेलः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये देण्यात येणार्‍या पोषण व मध्यान्ह आहाराची रक्कम शिक्षकांपर्यंत पोहचत नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासूनची जिल्हा फंडात जमा झालेली रक्कम गेली कुठे? असा प्रश्‍न शिक्षणाधिकार्‍यांना विचारत पाठविलेल्या पत्रामुळे सात कोटी रूपयांच्या अनियमित व्यवहाराचा भांडाफाोड करण्यात पनवेल संघर्ष समितीला यश आले आहे.
त्यानंतर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी पाठविलेल्या लेखी स्पष्टीकरणात, शिक्षकांनी देयके जमा केली गेली नसल्याचे सांगितल्याने शिक्षण विभागाचा भोंेगळ कारभारही समारे आला असून विद्यार्थ्यांच्या शालेय आहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मदतनीस, स्वयंपाकी, भाजीपाल्याच्या रक्कमेचाही अपहार झाल्याचा संशय कडू यांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या तीन हजाराहून अधिक प्राथमिक शाळांचे जाळे पसरले आहे. दोन लाखाहून अधिक विद्यार्थी राज्य व केंद्र शासनाच्या शालेय पोषण व मध्यान्ह आहाराचा लाभ घेत आहेत. सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रतिदिनी दोन रूपये पासष्ट पैस पुरविले जात आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला दर दिवसाप्रमाणे पंधरवड्यात कोट्यवधीचा निधी जिल्हा फंडात नियमित जमा केला जात आहे.
परंतु, जुलै महिन्यापासून शाळांमध्ये फक्त तांदळाची पोती पाठविली जात आहेत. त्यासाठी लागणारे इतर सामुग्री आणि निधी गेल्या पाच महिन्यापासून दिला गेला नाही. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी गेल्या पाच महिन्यात वर्गणी काढून पोषण आहार आणि मध्यान्ह भोजन पुरवण्याची व्यवस्था त्यांच्यापरीने केली. ती अपुर्णच आहे. शिक्षकांनी त्यांच्या खिशाला कात्री अथवा सामाजिक कार्यकर्त्यांकडे हात पसरत जमेल तसे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांचा कमी पट असलेल्या शाळांवरील शिक्षकांना फार अडचणी आल्या नाही. त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे मध्यान्ह व पोषण आहाराची शेगडी पेटवली. परंतु, मोठ्या पटाच्या शाळांमध्ये शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. त्यामुळे काही शाळांची शेगडी विझल्याने विद्यार्थ्यांच्या पोटाची खळगी भरली जात नाही.
याबाबत जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे यांच्याशी पनवेल संघर्ष समितीने पत्रव्यवहार करून जिल्हा निधीची हंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बढे यांना पाठविलेल्या खरमरीत पत्राने जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहे. जिल्हा फंडात शालेय पोषण आहाराचे सात कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार जमा असल्याचा खुलासा बढे यांनी संघर्ष समितीला लेखी पाठविला आहे.
त्यांनी दिलेल्या हास्यास्पद स्पष्टीकरणात, शिक्षकांनी देयके जमा केली नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक पंधरा दिवसात देयके शिक्षणाधिकार्‍यांना केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकार्‍यांच्या मार्फत दिली जातात. असे असताना बढे यांनी अंगावरील झुरळ झटकावे, तसे अंग झटकत हे लेखी स्पष्टीकरण केले आहे. जुनमध्ये ठेकेदार बदलल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी खुलाशात म्हटले आहे. त्यांचा तो दावा फोल आहे. प्रत्येक शाळेत तांदूळ पोेहचत आहेत. पण इतर सामुग्री नाही, आणि बढे म्हणतात तांदुळ पुरविण्याचा ठेका संपुष्टात आला आहे.
शिक्षकांनी स्वखर्चातून तुटपुंज शालेय पोषण आहार पुरविले आहे. पण त्याचा निधी मध्येच कुणी तरी लाटण्याचा प्रयत्न केला आहे, तो संघर्ष समितीच्या पत्राद्वारे उघड झाला आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराला लागलेले उंदिर आता धावू लागले असून शिक्षकांची थकित देयके मागविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रूपयांची आर्थिक गडबड झाली आहे, असे प्राथमिक स्तरावर दिसून येत आहे. तीन हजार शिक्षकांना त्यांच्या खिशातून विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा लागत आहे. त्या सर्व शिक्षकांनी ताबडतोब देयके शिक्षणाधिकार्‍यांकडे जमा करून मागील पाच महिन्यांची थकबाकी घ्यावी, याबाबतीत काही अडचणी आल्यास संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, कार्यालयः ३, यशोवर्धन अपार्टमेंट, श्री राम गणेश गडकरी, गावदेवी मंदिराशेजारी, पनवेल)ः ४१०२०६, संपर्कः ८०८० ३१८३३८ वर संपर्क साधावा, तसेच ती थकीत देयकांची एक प्रत वरील पत्यावर पाठवावी, जेणेंकरून ती शिक्षणाधिकार्‍यांना पाठवून ती रक्कम परस्पर संबंधित शाळेच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रयास करण्यात येतील, असे आवाहन कडू यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना केले आहे.

Page 1 of 266

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »