Tuesday, Jan 23rd

Headlines:

भीमा-कोरेगाव प्रकरणी रत्नागिरीत बहुजन क्रांती मोर्चाचे आंदोलन

E-mail Print PDF
रत्नागिरी ः द्विशताब्दी वर्षानिमित्त भिमा कोरेगाव रणसंग्रामातील शहिदांना सलामी देण्यासाठी जमलेल्या लोकांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यातील दोषींना पाठीशी घातण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ बहुजत क्रांती मोर्चा रत्नागिरीच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बाळा कचरे यांनी माहिती दिली. १ जानेवारीला भीमा कोरेगांव येथे दरवर्षी क्रांतीस्तंभाला तसेच वढू येथील संभाजी राजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येन समाजबांधव येत असतात. २०० वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरातून लोकांचा महासागर लोटला होता. अशा वेळी शासनाने कायदा व सुव्यवस्था चोख ठेवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. असा आरोप बहुजन क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळेच विध्वंसक जातीयवादी शक्तींना दगडफेक व जाळपोळ करण्याची संधी मिळाली अशी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या पाठिमागचे मुख्य सुत्रधार असणारे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे सोडून पोलीस संरक्षणात त्यांचे नित्यक्रम सुरू आहेत असे भारत मुक्ती मोर्चाचे कोकण विभागीय अध्यक्ष आप्पासाहेब सोनावणे यांनी सांगितले.

राजेश सावंत आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक भैय्या मलुष्टे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य नदीम सोलकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात नव्या समीकरणांची मांडणी केली जाऊ लागली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉ. अभय धुळप, राजा हेगिष्टे, सुनील गझने, रामदास शेलटकर, दीपक मोरे, शरद पाटील, पिंट्या साळवी यांनी देखील भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे एकेकाळचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजेश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजेश सावंत कोणत्या पक्षात जातात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर राजेश सावंत भाजपात दाखल झाले असून त्यांच्यासोबत माजी नगरसेवक भैय्या मलुष्टे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी मँगो सिटी पर्यटन भरारी

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरीत विकएंडला येणार्‍या पर्यटकांना पर्यटनाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीसह गणपतीपुळे येथे रत्नागिरी मँगो सिटी पर्यटन भरारी या नावाने पर्यटन क्षेत्रात काम करणारी मंडळी एकत्रितरित्या काम करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली.

मित्रानेच मित्राचा काढला काटा, आणखी एका संशयितास अटक

E-mail Print PDF
राजापूर ः तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील तरूणाच्या खूनप्रकरणी आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रमोद आत्माराम दळवी या २२ वर्षीय तरूणाच्या खुनाला चार वर्षानंतर वाचा फुटली. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली राजापूर पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली आहे. विकास धुरी याच्यावर राजापूर पोलीस स्थानकात प्रमोद दळवी खून प्रकरणी भादंविक ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी सहा. पो. नि. रायसिंग पाटील व पो. नाईक अतुल ठाकूर यांनी मोठ्या कौशल्याने आपल्या सहकार्‍यांसह तपास केला.

भर समुद्रात खलाशांना विषबाधा, एकाचा मृत्यू

E-mail Print PDF
रत्नागिरी ः केरळ येथून मासेमारीकरिता आलेल्या अब्राहम-१ या मासेमारी नौकेतील खलाशांना खोल समुद्रात अन्नातून विषबाधा होवून एकाचा मृत्यू ओढवला. दरम्यान खोल समुद्रात असलेल्या या खलाशांना वाचविण्याकरिता तटरक्षक दलासह रत्नागिरी पोलिसांनी धाव घेतल्याने आठजणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांच्या कौशल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद

E-mail Print PDF
रत्नागिरी ःअनेक वृत्तपत्रांतून सातत्याने शब्दकोडी सादर करणारे रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांच्या कौशल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेतली आहे. दहा हजार चौकोनांचे भलेमोठे शब्दकोडे तयार केल्याबद्दल श्री. कांबळी यांना या पुस्तकाच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले असून २०१८ मध्ये प्रकाशित होणार्‍या विक्रमविषयक आवृत्तीत त्यांच्या कर्तृत्वाची रीतसर नोंद करण्यात येईल. यापूर्वी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
१६३९ आडवे, १५८६ उभे असे एकूण ३२२५ शब्द असणारे दहा हजार शब्दांचे भलेमोठै कोडे प्रसन्न कांबळी यांनी २०११ साली बनविले होते. हे कोडे तयार करण्यासाठी त्यांनी ४४ दिवस अहोरात्र कष्ट केले. इतक्या मराठी शब्दांचे कोडे आजवर कोणीही बनविले नाही. याची शहानिशा करून लिम्बा ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकात त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या विक्रमांची नोंद करण्याचा उपक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाच्या रूपाने सुरू झाला. फरिदाबाद येथे कार्यालय असणारे हे पुस्तक नवी दिल्लीमधील डायमंड पॉकेट बुक प्रा. लि. या कंपनीतर्फे प्रकाशित होते. आतापर्यंत या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून २०१८ मध्ये प्रकाशित होणार्‍या आवृत्तीत श्री. कांबळी यांच्या विक्रमाची नोंद होईल. त्यांच्या विक्रमाला मान्यता देणारे प्रमाणपत्र, विक्रमवीर म्हणून ओळखपत्र, स्मृतिचिन्ह आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाची प्रत देवून डायमंड पॉकेट बुक्सतर्फे श्री. कांबळी यांना गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग या शासनाच्या उपक्रमाच्या रत्नागिरी सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत असणारे प्रसन्न कांबळी हे परोपकारी व्यक्तीमत्व असून रांगोळी कलावंत तसेच उकडीचे मोदक करण्यात कुशल म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मोदक कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले आहे. हसतमुख आणि दुसर्‍यास मदत करण्यास सदैव तत्पर असणारे कांबळी गेली अनेक वर्षे वधुवर मेळावेही भरवितात. त्यांच्या बहुपेडी कार्याबद्दल त्यांचा विविध संस्थांनी गौरव केला आहे.

Page 1 of 2713

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »