Saturday, Jan 20th

Headlines:

एस.टी.कर्मचारी नवीन गणवेश अंमलबजावणी आजपासून

E-mail Print PDF
रत्नागिरी ः या नवीन वर्षात एस.टी.च्या कर्मचार्‍यांचा गणवेश बदल होत असून त्याची अंमलबजावणी येत्या ६ जानेवारीपासून होत आहे. रत्नागिरी विभागात या गणवेश वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. प्रातिनिधीक स्वरूपात ९० कर्मचार्‍यांना गणवेश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या ७० वर्षात एस.टीच्या गणवेशाबाबत अनेकवेळा निर्णय झाला मात्र अंमलबजावणी काही झाली नव्हती. या नवीन वर्षात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गणवेश बदलाबाबत जाहीर केले. आणि याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. एस.टी.महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात असे ते कापड पसंत न पडल्याने आपल्या सोईने कर्मचारी गणवेशाचे कापड खरेदी करीत व गणवेश स्वतः शिवून घेत होते हे सर्व कर्मचारी एका रांगेत कोणता? हे ओळखणे अवघड होत असे यामध्ये एकसंधता दिसून येत नव्हती त्यामुळे या गणवेशात सुरळीतपणा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारित येणाऱया राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थान या संस्थेला एसटी कर्मचार्‍यांचे नवीन गणवेश डिझाईन तयार करण्याकरिता पाचारण केले या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टीच्या कर्मचार्‍यांशी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधून त्यांचे कामाचे स्वरूप, त्याच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले या पारूपाचे सादरीकरण सर्व कामगार व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींपुढे करण्यात आले यांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार त्यात आवश्यक ते बदल करण्यात येवून सुधारीत गणवेश डिझाईन तयार करण्यात आले त्यानुसार प्रत्येक कर्मचार्‍याला वर्षातून दोन तयार गणवेश देण्यात येणार असून आजपासून महाराष्ट्रातील सर्वच विभागीय कार्यालयात दुपारी ३ वाजता गणवेश वाटप शुभारंभ करण्यात येणार आहे.

चिपळुणातील जलतरण तलाव अखेर खुला

E-mail Print PDF
चिपळूण ः काही दिवसांपासून बंद असलेला येथील जलतरण तलाव पुन्हा खुला झाला असून शुक्रवारी भाजपा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याहस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले. हा तलाव खुला होताच हौशी जलतरणपटूंमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे एक कोटी रूपये खर्चातून हा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. त्यानंतर २००५च्या महापुरात हा जलतरण तलाव एका बाजूने खचल्याचा प्रकार घडल्यानंतर त्यावर पुन्हा सुमारे ५० लाख रूपये खर्च करून हा तलाव सुस्थितीत आणण्यात आला. यातून तलावाची गळती व अन्य दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. या तलावाचे ना नफा, ना तोटा या पध्दतीने काम सुरू होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच जलतरण तलाव नगर परिषदेच्या ताब्यात दिल्यानंतर तो बंद स्थितीत होता. असे असताना नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी जलतरण तलाव जनतेसाठी खुला करून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले. येथील हेमंत घोसाळकर यांनी हा जलतरण तलाव चालवण्यास घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बंद असणार्‍या या जलतरण तलावाचे पुन्हा भाजपा जिल्हाध्यक्षा बाळ माने यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, गटनेते शशिकांत मोदी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. .

नाट्यरसिक अविनाश काळे यांना रंगकर्मींचा पाठिंबा

E-mail Print PDF
रत्नागिरी ः संगीत राज्य नाटय केंद्र रत्नागिरी येथेच रहावे, यासाठी पावसचे संगीत नाटयरसिक अविनाश काळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. काळे यांच्या उपोषणाला रत्नागिरीतील रंगकर्मींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही अधिकार्‍याने या ठिकाणी उपस्थित राहण्याचे औदार्य दाखवले नसल्याने रंगकर्मींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संगीत नाटकांच्या स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलवण्यात येत असल्याबद्दल रत्नागिरीकर संगीत नाटय रसिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रंगकर्मी, नाटयसंस्था, तसेच नाटयरसिकही गतवर्षी रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने खेचून आणलेल्या रत्नागिरी केंद्रावर स्पर्धा व्हावी, यासाठी आग्रही आहेत. संचालनालयाने पुढील वर्षी ही स्पर्धा स्पर्धेचे अर्ज भरण्याआधी जाहीर करून राज्यात इतरत्र हलवावी. मात्र यंदा मात्र रत्नागिरीतच व्हावी, अशी आग्रही मागणी रत्नागिरीतील नाटय रसिकांची आहे. या नाटय रसिकांचे प्रतिनिधीत्व करत पावस येथील अविनाश काळे यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणस्थळी गुरूवारी रत्नागिरीतील विविध नाटयसंस्थांचे ६० हून अधिक प्रतिनिधी, रंगकर्मीनी भेट देऊन काळे यांना पाठिंबा दर्शवला. यामध्ये राधाकृष्ण कलामंचचे सुनील तथा दादा वणजू, खल्वायनचे श्रीनिवास जोशी, नाटय परिषदेच्या आसावरी शेटये, सतीश दळी, गायिका संध्या सुर्वे, उषा काळे, आनंद पाटणकर, संजना पांचाळ, विनीत भट, माधवी लेले, सनातन रेडिज, सुहास साळवी आदींचा समावेश आहे.

‘दुर्गम’ शिक्षक यादीची होणार पुनःपडताळणी

E-mail Print PDF
रत्नागिरी ः प्राथमिक शिक्षकांच्या अवघड व सर्वसाधारण क्षेत्र बदल्यांचा विषय अजूनही सुटलेला नाही. ‘दुर्गम’ क्षेत्रमधील ३०० शिक्षकांची यादी प्रशासनाने पुनःपडताळणीसाठी गटविकास अधिकार्‍यांकडे पाठवली असल्याचे शिक्षण व अर्थ सभापती दिपक नागले यांनी सांगितले.
अवघड व सर्वसाधारण बदल्याच्या यादीला जि.प.सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर बदल्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ बदलण्यात आली. अवघड क्षेत्र ठरवताना तालुक्यापासूनचे अंतर हा निकष धरला नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यापूर्वी अवघड बदल्यांसाठी ७१९ शाळांची यादी तयार करण्यात आली होती. ती संख्या नव्या यादीनुसार ९२३ इतकी झाली आहे. अवघड व सर्वसाधारण क्षेत्र बदलल्यास पात्र शिक्षकांची यादी तयार करण्याची कार्यवाही झाली.
जि.प. शिक्षण समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती दिपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अवघड व सर्वसाधारण बदल्यांबाबत जि.प.सदस्यांनी सुचवलेल्या यादीवर चर्चा झाली. त्यावेळी दुर्गममधील ३०० शिक्षकांची नावे पुर्नपडताळणीसाठी प्रशासनाने तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱयांकडे पाठवल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभागामार्फत शिक्षणाची वारी’ हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील ३०० प्राथमिक शाळांची निवड केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त अन्य शाळाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे सभापती नागले यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे मंगळवारी खेडमध्ये

E-mail Print PDF
खेड ः युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ९ जानेवारी रोजी खेड दौ़र्‍यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येथील योगीता दंत महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता ‘टॉप स्कॉलर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर पाटीदार भवनात युवासेनेची सभा होणार असल्याची माहिती युवा सेनेचे तालुकाधिकारी अजिंक्य मोरे यांनी दिली.
युवासेना कोअर कमिटीचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, सिद्धेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दौऱयाचे नियोजन केले आहे. या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर तालुका युवासेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठकही पार पडली. आदित्य ठाकरे यांच्या दौ़र्‍यादरम्यान शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून तशी तयारीही सुरू आहे. महाडनाका येथील गोळीबार मैदानात त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्यासमवेत संपूर्ण बाजारपेठेतून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

चिपळुणात ४०० आंदोलनकर्त्यानवर गुन्हा दाखल

E-mail Print PDF
चिपळूण 5 जानेवारी : राज्यात बुधवारी पुकारलेल्या आंबेडकरी जनतेच्या बंदला राज्यात हिंसक वळण लागल्याने येथील ४०० आंदोलनकर्त्यानवर गुन्हा दाखल करण्यात आला. भिमाककोरेगाव येथील दगडफेक प्रकरणाचे संतप्त पडसाद राज्यभर उमटले असून बुधवारी आंबेडकरी जनतेने राज्यभर बंदचे आवाहन केले आंबेडकरी जनतेच्या आवाहनाला सर्वानीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मात्र बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. येथील बंदलाही काहीसे हिंसक वळण लागले होते शहरातील एका दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी व सावर्डे येथे जाळपोळ केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात २०० व सावर्डे पोलीस स्थानकात २०० आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

Page 10 of 2712