Saturday, Jan 20th

Headlines:

१२ हजाराची लाच घेताना हवालदार सापडला रंगेहाथ

E-mail Print PDF
रत्नागिरी ः वाळूचे ट्रक सोडविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार गणेश भागवत नाळे (४७) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे तीन ट्रक पकडण्यात आले होते. ट्रक सोडविण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच त्याने मागितल्याचा आरोप करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव यांनी सहकार्‍यांसोबत सापळा लावला होता. गणश नाळे याला १२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

शंकर घाणेकर स्मृती स्पर्धा १७ पासून

E-mail Print PDF
रत्नागिरी ः नगर परिषद आयोजित व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेली नटवर्य कै. शंकर घाणेकर स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला १७ जानेवारीपासुन प्रारंभ होणार आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात ३ दिवस चालणार्‍या या स्पर्धेत २५ एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यात मुंबई, ठघणे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कलाकृतींचा समावेश आहे.

कोकण रेल्वेत प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती सुरू

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची तड लावण्यासाठी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या कर्मचारी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना प्रकल्पविरहित कर्मचारी भरती सुरू असल्याबद्दल चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

प्रजासत्ताक दिनी मच्छिमारांचे उपोषण

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून रत्नागिरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीविरोधात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा अखिल भारतीय महाराष्ट्र कृती समितीच्यावतीने पारंपारिक मच्छिमारांनी दिला आहे. याबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन नेटने मच्छिमारीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा मासेमारी सुरू असल्याचे आरोप कृती समितीने केले आहेत. परवाने असलेले २७४ पर्ससीनधारक आहेत. मात्र परवाना नसणारे १५० पर्ससीन व २५० मिनी पर्ससीन नौकांपैकी अनेकजण बेकायदा पर्ससीन मासेमारी करत आहेत. संबंधित अधिकार्‍यांशी त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार आहेत असे आरोप कृती समितीने केले आहेत.

ईडू विरोधात १४ जणांची पोलिसांकडे धाव

E-mail Print PDF
चिपळूण ः ईडूमधील विविध स्किममध्ये भरलेले पैसे मिळणार नाहीत याची कल्पना आल्यानंतर आता गुंतवणूकदारांनी पोलीस स्थानकात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी धाव घेतली असून त्यांनी १५ लाख १३ हजार ५३२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आठ बँक खाती गोठविली आहेत. चौकशीमध्ये रवी किरण याचे एक पॅनकार्ड बनावट असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान चिपळुणकरांना ऑनलाईन गंडा घालणार्‍या ईडूअर्नच्या प्रकरणात काही राजकीय पुढार्‍यांचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून या सर्वांची यादी देखील ईडूच्या हार्डडिस्कमध्ये सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणत्या पक्षाचे कोण कोण आहेत, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. त्या पुढार्‍यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची तयारी देखील पोलिसांनी केली आहे.

प्लास्टीक पिशवी द्या, कापडी पिशवी घ्या

E-mail Print PDF
रत्नागिरी ः साफसफाई करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दि गिफ्ट ट्रीने राबविलेला कार्यक्रम चांगला आहे. प्रत्येक शहरात प्लास्टीक  पिशवी द्या, कापडी पिशवी घ्या हा उपक्रम प्लास्टीक कचरा उचलण्यासाठी महत्वाचे पाउल असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दि गिफ्ट ट्रीच्या आयोजित कार्यक्रमात केले. रत्नागिरी शहरात मारुती मंदिर सर्कल येथे दि गिफ्ट ट्री कडून प्लास्टीक पिशवी द्या कापडी पिशवी घ्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष राहुल पंडित बोलत होते.

Page 4 of 2712