Saturday, Jan 20th

Headlines:

नारळ समुह गटातील बागायतदारांना २४ लाखाचे अनुदान मंजूर

E-mail Print PDF
rajabhau-limayeरत्नागिरी (प्रतिनिधी) ः समुह गटांतर्गत गुहागर तालुक्यात नारळ बागायतदारांच्या नारळ समुह गटातील ५२४ लाभार्थींच्या २०,९०९ नारळ झाडांवरील प्रत्येकी १०० रुपयेप्रमाणे २४ लाख रुपयांचे अनुदान केंद्रीय नारळ विकास मंडळाने मंजूर केले आहे, असे मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी संागितले. खते व कीटकनाशकांच्या विविष्टा संचाच्या वितरणाचा शुभारंभ नुकताच देवघर येथे पार पडला, त्यावेळी राजाभाऊ बोलत होते.
नारळ विकास मंडळाने समुह गटाची सुरु केलेली योजना नारळ बागायतदारंाच्या फायद्याची आहे. नारळ बागायतदारांचे संघटन, नारळ झाडांची निगा राखणे, उत्पादनात वाढ करणे ही त्रिसूत्री वापरुन कष्ट केले तर आर्थिक विकास शक्य असल्याचे राजाभाऊ लिमये यांनी यावेळी सांगितले.

दापोलीतील पाणीटंचाई आणखी वाढली

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) ः तालुक्यातील ८ गावांच्या १६ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीला विनंती केली आहे. देवाच्या डोंगरावर यापूर्वीच पाण्याचा टँकर सुरु झाला आहे. तालुक्यातील उन्हवरे येथील गणेशवाडी, भोईवाडी, पाटीलवाडी, चर्मकारवाडी, फरारे येथील मोगरेवाडी, बनेकरवाडी, बौध्दवाडी, गुरववाडी, मुर्डी येथील चाचवळवाडी, आसुद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आतगाव येथील गावठण, उटंबर येथील कोळीवाडा आणि वाघिवणे या गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केला असल्याचे गटविकास अधिकारी डॉ.सौ. मनिषा देवगुणे यांनी सांगितले.

मेमध्ये भाट्यात आंबा पर्यटन महोत्सव

E-mail Print PDF
rajiv-jadhav_collector-ratnरत्नागिरी (प्रतिनिधी) ः येत्या मे महिन्यात आंबा पर्यटन महोत्सव घेण्याचा विचार सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून होणारा हा महोत्सव भाट्ये समुद्रकिनारी घेण्यात येणार आहे. या आंबा पर्यटन महोत्सवात आंबा स्टॉल तसेच स्थानिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः तालुक्यातील टेंब्ये येथे उतारावर एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील विद्यार्थ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहेत. काही विद्यार्थ्यांना किरकोळ खरचटले आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटून ही गाडी विरुध्द दिशेला गेली असती तर खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. हा अपघात झाल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

डोक्यावर प्रहार करुन भाच्याने केली चुलत मामाची हत्या

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः चुलत मामी जे दुकान चालवते, त्या दुकानात बसण्यास जाऊ नकोस, असे चुलत मामाने सांगितल्याने भाच्याने त्या चुलत मामाचाच खून केला. देवळातून बाहेर पडल्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकून मामाला लाकडी रिपीने डोक्यावर मारहाण केली. उल्हास लिंगायत असे मामाचे नाव असून, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुपेश बालाजी लिंगायत (वय २४) या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील वरची निवेंडी देवपाटवाडी येथे हा प्रकार घडला.
उल्हास दत्ताराम लिंगायत यांची पत्नी येथे दुकान चालवते. याठिकाणी भाचा रुपेश लिंगायत रोज येऊन बसायचा. याबाबत संशयात्मक चर्चा सुरु झाल्याने उल्हास लिंगायत याने भाच्याला दुकानात येऊन बसू नये, असेे सांगितले. याचा राग मनात असतानाच मामा येथील एका मंदिरातून येताना दिसल्यानंतर भाच्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि तेथीलच लाकडी रिप घेऊन त्यांच्या डोक्यात मारली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उल्हास लिंगायत यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती फारच नाजूक असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचार सुरु करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाला. आरोपी रुपेश लिंगायत याला अटक करण्यात आली आहे.

शाळकरी विद्यार्थिनीच्या खुन्याचे वकीलपत्र न घेण्याची मागणी

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) ः तालुक्यातील शेरवली गावातील जाधववाडी येथील १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी प्रणिता नायनाक हिचा निर्घृण खून करणार्‍या आरोपी मंगेश बाबू रेवाळे याचे वकीलपत्र जिल्ह्यातील कोणत्याच वकीलाने घेऊ नये, अशी विनंती येथील महिलांनी बार असोसिएशनकडे केली आहे. या खूनामुळे ग्रामीण भागातील महिला भेदरुन गेल्या असून, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. माणुसकीला कलंक लावणार्‍या या खुन्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असेही महिलावर्गाने म्हटले आहे.

Page 2707 of 2712