Wednesday, Feb 21st

Headlines:

रत्नागिरी न.प.चा आजपासून सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरी नगर परिषद व नगर परिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वा. आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आजपासून २४ फेब्रुवारीपर्यंत छ. शिवाजी स्टेडियम आणि स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
यामध्ये आज रोजी स. १० वा. सांस्कृतिक स्पर्धेेचे स्वा. सावरकर नाट्यगृहात उदघाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ. श्रद्धा हळदणकर, बांधकाम सभापती सौ. रशिदा गोदड, पाणी पुरवठा सभापती राकेश नागवेकर, नियोजन व विकास सभापती सुहेल मुकादम, स्वच्छता, वैद्यकीय, आरोग्य समिती सभापती सौ. दिशा साळवी, गटनेते प्रदीप साळवी, सुदेश मयेकर, समीर तिवरेकर, जि.प. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित राहणार आहेत.

विना अनुदानित शिक्षकांचे उद्या रत्नागिरीत आंदोलन

E-mail Print PDF
रत्नागिरी ः विनाअनुदानित शिक्षकांनी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या, वर्ग यांची अनुदानपात्र यादी, त्यासंबंधी अनुदानाची १०० टक्के आर्थिक तरतूद करून जाहीर करावी व तात्काळ १०० टक्के पगार सुरू करावा या मागणीसाठी इ. बारावी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीने व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. यासाठी २२ रोजी दुपारी ३.३० वा. कोकण विभागीय शिक्षण मंडळ, रत्नागिरी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून यावेळी उत्तरपत्रिकेची प्रतिकात्मक होळी करण्यात येणार आहे.

गणपतीपुळे विकास आराखड्याची आमदारांनी केली पोलखोल

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शासनाची अरेरावी म्हणून मनमानी कारभार करू देणार नाही. अधिकार्‍यांच्या चुका या अधिकार्‍यांनीच निस्तारायच्या आहेत. ऐसा वैसा आणि जॅकेट घालून काही होत नाही, जे तीन वर्षात झाले नाही ते मी दहा दिवसात करून दाखवणार, असे सांगून आ. उदय सामंत यांनी गणपतीपुळे विकास आराखड्याच्या सभेत अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. या सभेत आराखड्याचे पोस्टमार्टेमच आ. सामंत यांनी केले.

आजपासून बारावीची परीक्षा

E-mail Print PDF
रत्नागिरी ः राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणा-या बारावी परीक्षेसाठी १४ लाख ८५ हजार विद्यार्थी बसले आहेत. बुधवारपासून (दि. २१) बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. राज्यात २ हजार ८२२ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. राज्य मंडळाकडे ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी दिली.
विद्यार्थ्यांंनी वेळेवर परीक्षेला यावे असे आवाहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. वेळेत न येणार्‍या विद्यार्थ्यांंना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्यांने खबरदारी घ्यावी असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षा सकाळी ११ वाजता आणि दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रावर यावे. उशीर झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. अशी माहिती मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांनी दिली.
व्हॉट्सऍपवरून पेपर फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतरच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍप पेपरफुटीला आळा घालण्यासाठी पेपरला उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर प्रथमच बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

सावर्डे बाजारपेठे मोबाईल शॉपी फोडली, हजारोंचा माल लंपास

E-mail Print PDF
सावर्डे ः फाकपंचमीच्या पूर्वरात्रीच सावर्डे बाजारपेठेतील एस.टी. स्टँडनजिक असलेल्या एका मोबाईल शॉपीवर चोरट्यांनी थंडी व धुक्याचा फायदा उठवत डल्ला मारला. या मोबाईल शॉपीतील तब्बल ६८ हजार ५१७ रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे ७ मोबाईल हॅण्डसेट लंपास करण्यात आले. यामुळे सावर्डे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

पालीत भीषण आगीत गॅरेजसह हार्डवेअरचे गोडावून खाक

E-mail Print PDF
पाली ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पाली तिठ्यानजिक असलेल्या एका मोटार गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत या मोटार गॅरेजसह हार्डवेअरचे गोडावून जळून खाक झाले असून, या दोन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग सोमवारी रात्री १२ वा. च्या सुमारास लागली. मात्र पालीतील शेकडो तरूणांनी प्रसंगावधान राखून या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अथर्न टळला.

Page 1 of 2732

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »