Monday, Jan 22nd

Headlines:

मुंबई

कोकण किनारपट्टीवर सीआरझेड मर्यादा आता ५० मी

E-mail Print PDF
मुंबई -कोकण किनारपट्टीच्या सीआरझेड निकषात बदल करण्याचे राज्यसरकारने ठरविले असून यामुळे कोकण किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असून या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायालाही चालना मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवर असणारी मर्यादा ५०० मीटरवरून ५० मीटपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव येत्या आठवडय़ात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास पाठविणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधानसभेत केली.केंद्र सरकारने २०११ मध्ये प्रसिद्ध केलेल्याअधिसूचनेनुसार  मालवण- रत्नागिरीची किनारपट्टी अतिसंवेदनशील जाहीर केली होती वसमुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटर अंतराच्या आत कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. यामुळे नव्या बांधकामांसोबत राहत्या घराची दुरुस्ती करणे देखील कठीण झाले होते. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे.

​अन्यथा मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग ठराव आणणार : खा. विनायक राऊत

E-mail Print PDF
मुंबई -​कोकणातील बहुचर्चित "नाणार" प्रकल्पाची जागा खासदार विनायक राउत यांनीच सुचविली असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला आणि कोकणातील वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत खासदार विनायक राउत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत खुलास मागवला आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प हा केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच येत असून आपले खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माझे आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे नाव घेतले आहे असे खा. विनायक राउत यांचे म्हणणे आहे.​ ​मी कोणत्या बैठकीत मागणी केली याबाबत सविस्तर पुरावा मला सादर करावा अन्यथा माझे चारित्र्य हनन केल्याबद्दल,​ ​मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव मांडावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.​

संजय सरफरे यांचे निधन

E-mail Print PDF
डोंबिवली : मुंबई, ठाणे आणि रायगड मधील सर्व वृत्तपत्र व मासिकांसाठी जाहिरात प्रतिनिधी म्हणून सक्रिय 00sanjayअसलेले संजय सरफरे यांचे बुधवारी पहाटे हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 50 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चयात पत्नी सुषमा आणि  मुलगा संदीप असा परिवार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदाना जवळील श्री तिरुपती बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीत राहात होते.  सरफरे हे  गेल्या २५ वर्षापासून जाहिरात क्षेत्राशी निगडीत होते.  सानिका मीडिया ही जाहिरात कंपनी त्यांनी सुरू केली. सर्वच क्षेत्रात त्याचा दांडगा जनसंपर्क होता. मनमिळावू असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. त्यांच्या अंत्यपविधीसाठी  वृत्तपत्र  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिवमंदिर येथील मोक्षधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले

विमान कंपन्या आणि हॉटेल्सप्रमाणेच मंदीच्या काळात तिकीट दरात सवलत देण्याचा विचार रेल्वेकडून सुरु

E-mail Print PDF
मुंबई :-विमान कंपन्या आणि हॉटेल्सप्रमाणेच मंदीच्या काळात तिकीट दरात सवलत देण्याचा विचार रेल्वेकडून सुरु आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. रेल्वे फुल्‍ल नसेल तर तिकीटदरात सवलत देण्याची शक्यता पडताळली जात आहे, असे गोयल म्हणाले. लवचिक भाडे योजनेमुळे रेल्वे तिकिटांचे दर वाढतील, असा समज का करुन घेतला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले

E-mail Print PDF
मुंबई :-बेपत्ता असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी जयकुमार बिंद्रे प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेऊन त्यांची काही तास चौकशी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय शामसुंदर कुरूंदकर, अश्‍विनी बिंद्रे आणि राजेश पाटील हे १५ एप्रिल २०१६ रोजी मीरा-भाईंदर येथे होते. मोबाईलच्या लोकेशनवरून ही बाब पुढे आली आहे. याच दिवशी अश्‍विनी बिंद्रे शेवटच्या दिसल्या होत्या. पाटील, कुरूंदकर यांच्यात अनेकवेळा मोबाईलवरून यादिवशी बोलणे झाले होते. कुरूंदकर यांच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या सर्वांची चौकशी होणार आहे.

चित्रपटगृहात खुशाल घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ

E-mail Print PDF
मुंबई-चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. ग्राहकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे, असे सांगत देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केल्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी; तसेच ग्राहकांची फसवणूक होत असल्यास, अतिरिक्त शुल्क, खराब दर्जाचा माल किंवा योग्य सेवा मिळत असल्यास त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणेला माहिती द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले. चित्रपटगृहात फलक लावणार चित्रपटगृहात प्रेक्षकांनी स्वतः जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास प्रतिबंध करता येणार नाही. यासंदर्भातील सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन

E-mail Print PDF

मुंबई,  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे.विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आमदार राज पुरोहित यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दिन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यत परिवर्तन करण्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ओखीमुळे मुसळधार पावसाचा इशारा

E-mail Print PDF

मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काल सायंकाळी मुंबईसह नजीकच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचा जोर आज (ता. 5) वाढून मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ओखी धडकत असताना त्याची तीव्रता कमी होत असली तरीही किनारपट्टी भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई किनारपट्टीवर ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पृष्ठभागांवरही ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. भरतीमुळे मंगळवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास चक्रीवादळामुळे सहा मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; तर दुपारी 12.45 वाजता पुन्हा भरती येणार असल्याने त्या वेळीही लाटांची उंची वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क, वरळी सी लिंक, वांद्रे, मरीन लाइन्ससह कोकणातील किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी शिरण्याची भीती आहे.

काही भागांत वाऱ्याच्या वाढलेल्या वेगामुळे झाडे मोडण्याची शक्‍यता आहे. या काळात हवेची गुणवत्ता खालावण्याची शक्‍यताही मुंबई सफर या प्रकल्पाचे अधिकारी डॉ. गुफ्रान बॅग यांनी व्यक्त केली.

मच्छीमारांना मनाई
केंद्रीय वेधशाळेच्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री ओखी वादळाचे सुरत किनारपट्टीनजीकच्या भागांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई  किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली. सतर्कतेचा इशारा म्हणून पालिका आपत्कालीन विभागासासह तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्तीकालीन निवारण दल सज्ज झाले आहे.

सावधान! मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळणार

E-mail Print PDF
मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ओखी चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली आहे. समुद्राला दुपारी भरती येणार आहे. मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समुद्रकिनारी जाऊ नका, अशा सावधानतेच्या सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.
ओखी चक्रीवादळ मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे ठिकाठिकाणी रस्तेवाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वाऱ्यामुळे माळशेज घाटात झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर उपनगरी लोकलही उशिराने धावत आहेत.

Page 2 of 168