Saturday, Jan 20th

Headlines:

मुंबई

उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी

E-mail Print PDF
मुंबई -अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगर क्षेत्रासह सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या ५ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून सरकारी कार्यालये मात्र नेहमीप्रमाणे सुरु असणार आहेत ओखी चक्रीवादळामुळे बदललेली हवामानाची स्थिती आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे.

स्टार किड्स किंग्डमचा वार्षिक क्रीडामहोत्सव संपन्न

E-mail Print PDF
ठाणे :पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या "स्टार किड्स किंग्डम फाऊंडेशन" या संस्थेच्या विटावा या शाळेच्या वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी विटावा गावातील स्थानिक नगरसेविका कु.प्रियांका अविनाश पाटील, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश पाटील, ठाणे ऍथलेटिक संघटना सहसचिव राष्ट्रीय राजेंद्र मयेकर, इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर तसेच संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवळे व चेअरमन डॉ. गणेश जनार्दन घुगरे यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करून कार्यक्रम सुरु झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  हॉलीबॉल पटू  छत्रपती पुरस्कार विजेते अशोक म्हापुस्कर सर उपस्थित होते. या क्रीडामहोत्सवाच्या वेळी त्यांनी विटावा गावात “स्टार किड्स किंग्डम” या शाळेने अल्प कालावधीत चांगले नाव कमवले आहे व क्रीडा क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नक्कीच ही मुले - मुली पुढे येतील आणि विटाव्याचे नाव नक्कीच पुढे करतील असे मनोगत व्यक्त केले. मुलांच्या क्रीडागुणांना नाविन्यपूर्ण रितीने वाव देण्याचे काम संस्था वेळोवेळी करत आली आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या खेळांचे, प्रात्यक्षिकांचे तसेच पाश्चात्य क्रीडा नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पालकांनी आणि इतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध स्तरांवरील मान्यवर, राजकीय व्यक्ती, याशिवाय शिक्षक आणि क्रीडा तज्ज्ञांनी या क्रीडा समारंभाला आवर्जून उपस्थिती दाखवली. सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतीक्षा पाटील, सौ. दीपाली डेरे, सौ. ज्योती हिरे, सौ. अर्चना धुले व संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी व मुलांनी हा महोत्सव दिमाखदार पद्धतीने संपन्न केला. शाळेच्या वाढत्या व्यापाचे व कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. संपर्क : ९८२१७८६५४३

रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग जिल्ह्यात २४ तास आपतकालीन कक्ष

E-mail Print PDF
मुंबई -अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामध्ये मच्छीमारांच्या सहायतेसाठी मुंबई शहर व अन्य जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय कार्यालयात २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. सहायतेसाठी संपर्क क्रमांक ९८९६८२९७५९ *सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई* तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा अश्या प्रकारचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्यासाठी संपर्क मालवण -श्री केळुस्कर-०२३६५५२००७ रत्नागिरी श्री रघुवंशी-०२३५२२३३७२६ रायगड - कु पूजा भालेकर-९६६५६३२७९३

कॉंग्रेसच्या मुख्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

E-mail Print PDF
मुंबई :-प्रदेश कॉंग्रेसच्या मुख्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना जिल्हा न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे , संतोष धुरी , संतोष सरोदे , अभय मालप , योगेश छिल्ले , विशाल कोकणे , हरिश सोळुंकी , दिवाकर पडवळ यांचा समावेश आहे .

येत्या सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्ण बंदी

E-mail Print PDF
मुंबई :-येत्या सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागाच्या वतीने एनसीपीएमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या  उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. 

कोकणात पाचशे शाळा होणार बंद

E-mail Print PDF
मुंबई -ज्या शाळांची कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या घटली आहे, अशा जवळपास १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी तसा पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, ज्या शाळातील पटसंख्या कमी आहे अशा विद्यार्थ्यांना जवळच्याच म्हणजेच सध्याच्या शाळेपासून 3 किमी असलेल्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. १० पेक्षा कमी अशी पटसंख्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची असून शिक्षकही अशा शाळांमध्ये शिकविण्यासाठी येत नसल्याचे समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी या डिसेंबर महिन्यापासूनच करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. यामध्ये कोकण विभागातील शाळांची संख्या जास्त असून, पहिल्या टप्प्यात कोकणातील ५०० शाळा बंद करण्यात येणार आहेत. पण हा निर्णय शिक्षण कायद्याचा भंग करणारा असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे

ओखी चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीजवळ असणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

E-mail Print PDF

मुंबई, : भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार दि. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत अरबी समुद्रातील ओखी चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीजवळ असणाऱ्या सर्व जिल्ह्यांना राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत आर.एस.एम.सी (रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर) अहवालानुसार या ठिकाणी पुढील 48 तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. या कालावधीत सतर्कतेचा उपाय म्हणून लोकांनी वादळी वारे सुरु असताना घराबाहेर पडू नये. दूभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तुटलेल्या विजेच्या तारांपासून दूर राहावे, असे महसूल व वन विभाग यांनी कळविले आहे.

याबाबत कोकण विभागीय आयुक्त, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका,मत्स्यव्यवसाय आयुक्त, मेरिटाईम बोर्ड यांनी दि. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत सतर्क राहून भारतीय हवामान खाते (आयएमडी) ची ऑफिशियल वेबसाईट (www.imd.gov.in) सतत तपासावी.सर्व यंत्रणांना (मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग आदी) सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, असे महसूल व वन विभागाने कळविले आहे.

सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

E-mail Print PDF

मुंबई,  : येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सहभाग फार महत्वाचा आहे. समुद्रातील प्रदुषित पाण्यामुळे अरबी समुद्र किनारा प्रदुषित होत आहे. यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. तीन-चार वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल. प्रदुषित पाणी समुद्रात सोडेलेले आढळणार नाही.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. परंतु काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करु नये, धुळीचा त्रास होतो, इमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. काम रखडत गेले तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. एकीकडे देशातील अनेक नद्या प्रदुषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहेत. दुष्काळावर त्यांनी मात केली आहे. यामध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा होता.

लोककला आणि लोककलावंतामुळेचं कोकण समृध्द आहे.- दीपक केसरकर

E-mail Print PDF
मुंबई-(प्रतिनिधी) कोकण म्हटलं की ते विविधांगी नैसर्गिक साधन-संपत्तीने आणि लोकसंस्कृतिने सदाबहार नटलेलं आहे म्हणुनच आपल्या कोकणाचं आणि कोकणातल्या लोककलांचं जगाला खास आकर्षण लागुन राहिलेलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताजी असुनसुध्दा आपल्या देवदेवता आणि परंपरागत लोककलांवरती प्रचंड निष्ठा असलेल्या कोकणच्या नमन, भजन, शक्ती-तुरा(जाखडी) शाहिरी, तमाशा, धनगरी गजानृत्य, भारूड, कोळीनृत्य आणि दशावतार सारख्या पौराणिक लोककलांच्या लोक-कलाकारांनी तर कोकणाला आणखिनचं समृध्द केलेलं आहे. वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सुध्दा आपल्या कोकणावर विशेष लोभ होता. आज आधुनिक करमणुकिच्या आणि आर्थिक टंचाईच्या काळात सुध्दा हे कोकणी कलावंत आपल्या विविध लोककला टिकवुन आहेत याचं सदैव अप्रुप वाटतं 'रात्रिचा राजा आणि दिवसा पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर बोजा' वाहणाऱ्या या गरीब कलाकाराना मी निश्चितच सरकार दरबारातुन त्यांचे न्याय व हक्क मिळवुन देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठिशी असेन असे गृह व अर्थ राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री ना.दीपक केसरकर मास्टर दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले मुंबई येथे "कोकण मराठी शाहीर परिषदेने" आयोजित केलेल्या 'कोकणचे बहुरंगी नमन (खेळे)' या कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमाला अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, सिध्दिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री सुभाष मयेकर, कोकण मित्र मंचचे श्री सतिश पाठक, वास्तुविशारद श्री विठ्ठलराव धुरी, केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड सदस्य श्री संदेश मयेकर,राज्य कर्मचारी संघाचे नेते श्री तळवडेकर, कोकण मराठी शाहीर परिषदेचे मानद् सल्लागार श्री हरिष प्रभू, अध्यक्ष शाहीर प्र.ह.धनावडे, जय गणेश नाच मंडळाचे अद्यक्ष श्री महेंद्र भुवड आदी मान्यवर हजर होते.

Page 3 of 168