Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

टेम्पो चालकाची कळंबोलीत हत्या

E-mail Print PDF
नागोठणे - मागील आठवडयात कळंबोलीमध्ये किरकोळ कारणावरून एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना रोडपाली परिसरात पुन्हा अशाच वादातून एका टेम्पो चालकाची हत्या झाली आहे. या घटनेत संशयित म्हणून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
रोडपाली येथील अवजड वाहने उभी करून तेथेच चालक मद्यपान करतात. त्यामुळे अशा मद्यधुंद अवस्थेत आपसात होणार्‍या वादांचे पर्यवसन हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येदेखील होत आहेत. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील बाळू पुरुषोत्तम थोरात याचीदेखील अशाच किरकोळ वादातून हत्या झाली आहे. बाळू यांच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करण्यात आला असून नंतर त्याचा गळा दाबल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संतोष विनोदकुमार तिवारी (२४) व हदयप्रसाद मिन्टूराम (३२) या दोघांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
रोडपाली परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उभ्या असणार्‍या वाहनांना बंदी असावी यासाठी अनेक वेळा प्रशासनांकडे लेखी पत्रव्यवहार केला असला तरी येथील बेकायदा पार्किंग बंद झालेले नाही. सेक्टर १४ ते २० या परिसरातील रहिवाशी या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे हैराण आहेत. सिडको प्रशासनाच्या मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्यालगत घातक रसायनांनी भरलेली अवजड वाहने येथे उभी असतात. चालक रस्त्यालगतच आपला प्रात:र्विधी आटोपतात. तेथेच मद्यप्राशन व चालकांचे तंटे पाहायला मिळतात. पोलीस दिखाव्यापुरती तात्पुरती कारवाई करतात. मात्र येथे कायमस्वरूपी तोडगा प्रशासन काढू शकलेली नाही. त्यामुळे कोटयवधींच्या सदनिका खरेदी करून येथील रहिवाशांना खिडकीबाहेर चालकांचे उघडयावरील आंघोळ व प्रात:र्विधी पाहण्याची वेळ येते. तसेच मद्यधुंद चालकांमुळे रस्त्यांवरून चालणार्‍या महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.

एसटीच्या धडकेने पादचार्‍याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

E-mail Print PDF
नागोठणे - भरधाव वेगात जाणा-या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास नागोठणे - पोयनाड मार्गावर चोळे गावाचे हद्दीत घडला.
रोहे आगाराचे चालक भरत कोळेकर ( रा. खारी, रोहे, मूळ रा. कोंडगाव घोडा, जिल्हा बीड) हे एमएच १४ बीटी १४१३ या क्र मांकाची नागोठणे - पोयनाड बस घेऊन सकाळी साडेनऊ वाजता नागोठणे बसस्थानकातून मार्गस्थ झाले होते. ही बस १० वाजून ५ मिनिटांनी या मार्गावरील चोळे गावाचे हद्दीत आली असता भरधाव बसने महादेव नाईक या पादचाजयाला जोरदार धडक दिल्याने नाईक जागीच ठार झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुपारच्या दरम्यान चालक कोळेकर याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पो. उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहेत.

रस्त्यातील खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी

E-mail Print PDF
पनवेल - मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे वारंवार अपघात होण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालविणारी एक तरुणी ठार झाली आहे. घणसोली येथे राहणारी भाग्यश्री शिंदे असे या मृत तरुणीचे नाव आहे. कंटेनरचालकास अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बांधणवाडी गावानजीक ही घटना घडली. पेण येथे आपल्या मैत्रिणीकडे मुक्कामी गेलेली भाग्यश्री घरी परतत असताना हा अपघात झाला. पेणहून पनेवलच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला ओव्हरटेक करताना महामार्गावरील खडीमध्ये भाग्यश्रीची दुचाकी घसरली.  कंटेनर भाग्यश्रीच्या डोक्यावरून गेला. यामध्येच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली. अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे वाहतूक दीड तास ठप्प झाली होती.

मुंबई-रेवस लॉंच सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा

E-mail Print PDF
अलिबाग - पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लॉंच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर मुंबईस जाणा-या प्रवाशांनी या लॉन्च सेवेचा लाभ घेतला.
मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था मुंबई यांच्या माध्यमातून ही लॉन्च सेवा मुंबई भाऊचा धक्का ते रेवस या जलमार्गावर चालविण्यात येते. सध्या भाऊचा धक्का येथून सकाळी ६ ते दुपारी २.३० च्या दरम्यान या लॉन्चेस रेवसकरिता सुटतात व परत भाऊच्या धक्क्‌यास जातात. हवामान पाहून लॉंच सेवा संध्याकाळी वाढविण्यात येणार आहे. पावसाळ्यात लॉंच सेवा बंद ठेवण्यात येते, तेव्हा प्रवाशांना एसटीने पनवेल मार्गे मुंबई असा प्रवास अनेक समस्यांना सामोरे जावून करावा लागत असे. मात्र मुंबई रेवस लॉंच सेवा सुरू झाल्याने अवघ्या एक ते दीड तासात मुंबई प्रवास शक्य होत असल्याने प्रवासीर्वर्ग समाधानी आहे.

फेसबुकद्वारे मैत्री करत विवाहितेवर अत्याचार तसेच लुबाडणूक

E-mail Print PDF
पनवेल - पनवेलमध्ये राहणार्‍या ३२ वर्षांच्या विवाहित महिलेशी फेसबुकद्वारे मैत्री करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीपचंद्र ऊर्फ कुणाल खन्ना असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडे वर्ग करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले आहे.
पीडित महिला उत्तर प्रदेशात राहायला जाणार होती. २००३ मध्ये तिचे लग्न झाले असून, तिला एक मुलगा आहे. पतीसोबत काही कारणास्तव वाद झाल्याने काही वर्षांपासून ती नोकरीनिमित्त पनवेलमध्ये वेगळी राहत होती. वर्षभरापूर्वी फेसबुकद्वारे तिची संदीपचंद्र खन्नाशी ओळख झाली. संदीपचंद्रने तो कानपूरच्या बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक असल्याचे तिला सांगितले. लग्नाच्या भूलथापा देत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. तिच्या मुलाला सांभाळण्याचेही आश्‍वासन दिले. नोकरी लावण्यासाठी तिच्याकडून वारंवार पैसे उकळले. अशाप्रकारे सुमारे १० लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

एसटीच्या धडकेने पादचार्‍याचा मृत्यू, चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

E-mail Print PDF
नागोठणे - भरधाव वेगात जाणार्‍या एसटीने आवेटी, आदिवासीवाडीत राहणारे महादेव बाळाराम नाईक (३८) यांना धडक दिल्याने ते बसच्या मागच्या टायरखाली आले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास नागोठणे - पोयनाड मार्गावर चोळे गावाचे हद्दीत घडला.
रोहे आगाराचे चालक भरत कोळेकर ( रा. खारी, रोहे, मूळ रा. कोंडगाव घोडा, जिल्हा बीड) हे एमएच १४ बीटी १४१३ या क्र मांकाची नागोठणे - पोयनाड बस घेऊन सकाळी साडेनऊ वाजता नागोठणे बसस्थानकातून मार्गस्थ झाले होते. ही बस १० वाजून ५ मिनिटांनी या मार्गावरील चोळे गावाचे हद्दीत आली असता भरधाव बसने महादेव नाईक या पादचाजयाला जोरदार धडक दिल्याने नाईक जागीच ठार झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुपारच्या दरम्यान चालक कोळेकर याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पो. उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहेत.

पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका

E-mail Print PDF
पनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे. जोपर्यंतच्या शेवटच्या घराचे पुनर्वसन होत नाही, तसेच येथील स्थानिक दहा गावांच्या प्रकल्पग्रस्तांच्या १७ मागण्या सिडको प्रशासन मान्य करीत नाहीत तोपर्यंत आमचे गाव खाली करणार नसल्याने सिडको प्रशासनासमोर या गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आव्हान असणार आहे.
शिवक्रांती मावळा प्रकल्पग्रस्त संघटनेचे खजिनदार रूपेश धुमाळ म्हणाले, आम्ही ही दहा गावे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित होऊ देणार नाहीत. या गावांच्या विविध मागण्यांसाठी तरु ण अनेक वर्षे लढा देत आहेत. पत्रव्यवहार करून कोकण आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये व्यावसायिक पुनर्वसन, मासेमारी, कुक्कुटपालन, पशुपालन, रेती व्यवसाय, खडी या सर्व व्यवसायांचे जिल्हाधिकाजयांनी सर्व्हे करून संबंधितांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे, तसेच सिडकोमार्फत त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. विमानतळ क्षेत्रात सिडको खासगी एजन्सीमार्फत काम करते ते बेकायदेशीर असून ग्रामसेवक, तलाठी या सरकारी यंत्रणांमार्फत ही कामे होणे गरजेचे आहे. तसेच २०१३ च्या नव्या कायद्यानुसार हे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सेवाकर, प्रॉपर्टी टॅक्स, मुद्रांक शुल्क व इतर फीमधून सूट देण्यात यावी, सिडकोने इमारतीच्या बांधकामासाठी ५००९ चौ. फूट एवढा दर द्यावा, दहा गावांचे शासनाने कोणत्याही प्रकारे लीज स्वरूपात भाड्याने न देता कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, बारा बलुतेदार, दगडखाण कामगार, आदिवासी, अनुसूचित जाती, तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले देऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे आदी १७ मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प

E-mail Print PDF
लोणावळा - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक कंटेनर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तासभर पुर्णतः ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर खोपोली फुडमॉलजवळ उलटला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्येच कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणा-या तिन्ही मार्गाच्या लेन बंद झाल्या होत्या. या घटनेमुळे महामार्गावरील मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती समजल्यानंतर महामार्ग पोलीस व आयआरबीच्यावतीने सदर कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा कंटेनर बाजूला करण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक सुरु झाली.  दरम्यान, तासवर वाहतूक बंद राहिल्याने महामार्गावर दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नदीत पडून एकाचा मृत्यू

E-mail Print PDF
अलिबाग - श्रीवर्धन तालुक्यातील निगडीकाठी नदीवरील पुलावरून पाण्यात पडून पांडुरंग शांताराम करंदेकर (वय ६५) यांचा शनिवारी (ता. ३) रात्री मृत्यू झाला.
करंदेकर हे आडी गावचे रहिवासी असून, कामावरून परत येत असताना ते पुरातील पाण्यात पडले. नदीला पाणी जास्त असल्याने त्यांचा शनिवारी शोध लागला नव्हता. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. करंदेकर हे पाय घसरून पडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Page 8 of 266