Monday, Jan 22nd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - जुलै २०१५

E-mail Print PDF
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धाडस करावे
meshमेष ः

बुध्दिमत्ता, कर्तृत्व व नेतृत्व धाडस असल्याशिवाय उपयुक्त होणार नाही. हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. तेव्हा यश देणारा काळ आहे. त्याचा लाभ घ्यावा हेच योग्य होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. घरात शांतता ठेवणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहेत. लवकरच भाग्योदय होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना प्रसिध्दी, उत्तर संधी लाभेल.

संयम राखावा
rishabhवृषभ ः

अखेर शब्द तोंडातून बाहेर पडला की दुसर्‍याचा होतो. तेव्हा विचारपूर्वक व सत्यदेखील प्रिय तेच बोलावे अन्यथा घोटाळे होतील. अवघड कार्यात विघ्ने आली तरी ती दूर होतील. घरगुती वाद वाढवू नयेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन संधी उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक योजना हाती घ्याव्यात. नम्रतेनेच पुढे जाणे योग्य होईल. हा महिना सुखात वाढ करणारा आहे.

व्यक्तिमत्व उजळेल
mithunमिथुन ः

हा महिना आपणाला सर्व प्रकारची सुख, आनंद व अपेक्षापूर्ति करणारा आहे. नवीन योजना फलद्रुप होऊन आर्थिक आवक वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. विवाहइच्छुंचे विवाह अपेक्षित जुळतील. यश व किर्ती लाभून काळ सुखात जाईल. संकटांवर मात करुन यश लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपले कौतुक होईल. दुरचे प्रवास यशस्वी होतील. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्योदय होईल
cancerकर्क ः

पहाट झाली की उजाडतेच हा निसर्ग नियम आहे, तेव्हा आपल्या आयुष्यात खर्‍या अर्थाने उजाडणार आहे.  आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. अडलेली कामे हातावेगळी होतील. जनमानसात आपल्या कर्तृत्वाचा गौरव होईल. नवीन योजना यशस्वी होतील व आर्थिक आवक अपेक्षित होईल. खर्‍या अर्थाने कष्टाचं चीज होऊन स्वास्थ्य लाभेल. शासकीय तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह व आनंद राहील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. हा महिना सुख, स्वास्थ्य व आनंद देणारा आहे.

दडपणं दूर होतील
lionसिंह ः

जबाबदार्‍या वाढल्याने दडपण ही येतातच. परंतु या महात आपली दडपणं दूर होणार आहेत. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सत्पुरुषाचा सहवास लाभेल. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होतील. घरातील थोरामोठ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. उद्योगधंद्यात वाढ होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मनोकामना पूर्ण होतील. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजुनेच लागतील. एकंदरीत हा महिना आशाआकांक्षा पूर्ण करणारा आहे. व्यापारीवर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

आवक वाढेल
kanyaकन्या ः

या महिन्यात आपली आर्थिक आवक वाढणार आहे. प्रतिष्ठित लोकांकडून कार्याचं चीज होईल. मात्र व्याप वाढल्याने शिथिलता येण्याची शक्यता आहे. दैवी उपासनेवर भर द्यावा. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरगुती वाद वाढवू नयेत. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना परदेशागमन संभवते. अचानक धनलाभाचा योग आहेत. महिलांना वस्त्रलाभ होईल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय  तेजीत येतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाचे व्यवसायात नवीन वाढ होऊन अपेक्षित पैसे मिळतील.

प्रतिष्ठा वाढेल
tulतुळ ः

या महिन्यात आपणावर गुरुकृपा होणार असून, आपल्याला यश व किर्ती मिळणार आहे. जमीन जुमल्याचे व्यवहारात लाभ होईल. नवीन योजना हाती घ्याल व त्या यशस्वी होतील. विवाहइच्छुंचे विवाह उत्तम जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी होतील. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

व्यवसायात वृध्दी होईल
ruchikवृश्‍चिक ः

आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होणार असून, अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. नवीन वास्तूत प्रवेश करण्याचा योग येईल. मात्र वाहनांपासून जपून रहाणे इष्ट होईल. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी मिळेल. भागीदारीत व्यवसाय करु नये. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. वडिलोपार्जित इस्टेट लाभ होईल. राजकीय व शासकीय सेवेतील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होईल. हा काळ मानसिक स्वास्थ्य देणारा आहे.

सुख लाभेल
dhanuधनु ः

शनिची साडेसाती चालु असली तरी गुरुकृपेने अनेक अवघड व महत्वाची कामे मार्गी लागतील. जमीन जुमल्याचे व्यवहार आपल्याच बाजुने होतील. अनेक उत्तम घटनांचा लाभदायक काळ आहे. यश व किर्ती लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय सेवेतील व्यक्तींना मनोकामना पूर्ण करणारा काळ आहे. नवीन योजना हाती घेऊन लाभ होईल. भाषाशैली उत्तम असावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखं देणारा आहे.

समृध्दी वाढेल
makarमकर ः

देव आणि दैव आपणावर खुष आहे. तेव्हा मनातील उत्तम मनसुबे यशस्वी होऊन आर्थिक आवक वाढेल व अनेक प्रकारची सुखं लाभतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व मानमुराद लाभेल. नवीन योजना लाभदायक होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू खरेदी योग आहे. अपेक्षापूर्ति करणारा काळ आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

चीज होईल
kumbhकुंभ ः

आपल्या कष्टाचं, कर्तृत्वाचं व निरपेक्ष बुध्दीच्या सेवेचं खर्‍या अर्थाने चीज होणार आहे. स्वप्न दृष्टांत खरे होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढून मानसिक स्वास्थ्य लाभेल. दिलेला शब्द खरा होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दिलेला शब्द खरा होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आवक- जावक समान राहील. घरात उत्तम घटना घडतील. प्रतिष्ठित व्यक्तींकडून गौरव होईल. नवीन योजना हाती घेऊन यशस्वी व्हाल. अघटीत व अनाकलनीय घटना घडतील. स्वास्थ्य लाभेल. घरात उत्तम घटना घडतील. शासकीय सेवेतील व्यक्तींना अपेक्षित ठिकाणी बदली मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

स्वास्थ्य सांभाळावे
meenमीन ः

ग्रहमान अनुकूल नसले तर नवीन जबाबदार्‍या घेणे टाळावे हे खरे आहे. तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. घरातील वाद वाढवू नयेत. अचानक धनलाभाचे योग आहेत. जमिनजुमला खरेदी होईल. कामातील अडथळे शांतपणे व विचारपूर्वक दुर करावेत. आत्मविश्‍वास व श्रध्दास्थान ढळु देऊ नये. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सच्चाई व कष्ट यांचं चीज होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. काळ जिद्दीचा व खडतर असला तरी यश देणारा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही.

मासिक राशिभविष्य - जून २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
meshमेष ः

बुध्दिकारक बुध आपले व्यक्तिमत्व उजळवून ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणार आहेत. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी लाभून आर्थिक आवक वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह वाढेल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक आवक वाढेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होईल. शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध रहावे. अध्यात्मिक उन्नती होईल. एकांतवास सुखावह होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल.

सौख्य लाभेल
rishabhवृषभ ः

या महात आपणाला अनेक प्रकारची सुखं लाभणार आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आनंददायक घटना घडतील. महत्वाचे व्यवहारात गुप्तता राखावी. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरगुती वाद वाढवू नयेत. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी लाभेल. कलाकारांना यश व किर्ती लाभून आर्थिक आवक वाढेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून नवीन लोकहितकारक योजना राबवल्या जाऊन प्रसिध्दी मिळेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना मानाचे स्थान लाभेल. अनेकांना परदेशागमनाचे योग येतील. काळ सुखात जाईल.

गुरुकृपा होईल
mithunमिथुन ः

गुरुकृपा झाल्यावर अशक्य ते शक्य होईल. मानमुराद, प्रतिष्ठा व अपेक्षित अर्थप्राप्ती होतेच. या सप्ताहात आपणाला याची प्रचिती येईल. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. उष्णतेच्या विकारांपासून सावधानता बाळगावी. भाऊबंदक्या वाढवू नयेत. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. घरात उत्तम घटना घडून काळ सुखात जाईल.

व्यक्तिमत्व उजळेल
cancerकर्क ः

या महिन्यात आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढून आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मान, अचानक धनलाभ व अनेक उत्तम घटना घडून मानसिक स्वास्थ्य लाभेल. कोर्टकचेरीचे निर्णय आपल्या बाजूने लागतील. नवीन वास्तू खरेदी योग येईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुख व समृध्दी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन मन प्रसन्न राहील. अनेकांना परदेशागमन योग संभवतो.

ताबा हवा
lionसिंह ः

आर्थिक बाबींवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अचानक खर्च उभे राहण्याची शक्यता आहे. दगदग करु नये. तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाह इच्छुकांनी विचारपूर्वक विवाहाचा निर्णय घेणे उचित होईल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. या सर्वांवर मात करण्यास ग्रहराज रवि व धाडसी मंगळ उत्तम सहकार्य करणार आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. बंधनात राहणे योग्य होईल. ग्रहमान मिश्र स्वरुपाचे आहे, तेव्हा घाई नको. सावधानता बाळगणे योग्य होईल.

झाले मोकळे आकाश
kanyaकन्या ः

आपण शनिमहाराजांच्या शनिच्या साडेसातीतून कष्टप्रद व धाडसाने मोकळे झाले आहात. प्रगतीपथाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात. मागील काही घटना हृदयपटलावरुन काढून टाका व नवीन योजना हाती घेऊन भरघोस यशस्वी होणार आहात. देव आणि दैव आपणावर खूष व वरदहस्त ठेवून आहे. तेव्हा यश व उत्कर्ष होणारच आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. नवीन वास्तूत प्रवेश होईल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात आनंद निर्माण होईल.

राखून ठेवावे
tulतुळ ः

मिळालेला पैसा, मान व किर्ती हे जतन करुन ठेवणे योग्य होईल. बलाढ्य ग्रह आपणासमोर अचानक नवे खर्च उभे करण्याची शक्यता आहे. बुध्दिकारक बुध अचानक धनलाभ करुन देणारा आहे. अनेक प्रकारची सुखं लाभतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन व्यवसायात विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. मंगळ महाराज कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील व मनोदौर्बल्य येण्याची शक्यता आहे. दुरचे प्रवासयोग येतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. काळजी वेळीच घेतली तर काळजी करावी लागत नाही.

सौख्य लाभेल
ruchikवृश्‍चिक ः
गुरुकृपेने जीवनात आनंद व उत्साह वाढून यश, किर्ती लाभेल. अनेक उत्तम व अपेक्षित घटनांचा काळ आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी मिळून अपेक्षित आर्थिक आवक होईल. मात्र पैसा टिकवणे कठीण होणार आहे तेव्हा वेळीच सावधानता बाळगावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरगुती कलह वाढवू नयेत. या महिन्यात अनेक प्रकारची सुखं लाभून काळ सुखात जाईल. वाहनांपासून सावध रहावे. दुरचे प्रवास तूर्तास लांबणीवर टाकावेत.

धीर धरा
dhanuधनु ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. त्यात शनिमहाराजांची अवकृपा तेव्हा जे काही आयुष्याचे महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, ते थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य व लाभदायक होईल. आर्थिक आवक घटेल. काटकसरीत रहावे. विवाहइच्छुंनी विवाह सावधानतेनेच व माहिती नीट खात्रीशीर असल्याशिवाय करु नयेत. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना गुप्तता व सावधानता बाळगणे योग्य होईल. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. शक्यतो सर्वांशी मिळतजुळत घेऊन रहावे हेच योग्य. तूर्तास घाई नको.

यश, किर्ती मिळेल
makarमकर ः

आपला राशिस्वामी अर्थदाता शनि आहे. आपणावर गुरु, शनि व राहू- केतू यांची मेहरनजर आहे. तेव्हा आपण आपल्या प्रगतीचा वेग वाढवणार आहात. अनेक कठीण कार्यात यश संपादन करुन आपला सामाजिक दर्जा उंचावणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे भाग्य उजळणार आहे. अचानक नवीन वास्तू खरेदी योग येईल. आर्थिक आवक वाढेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अर्थप्राप्ती अपेक्षित होईल. काळ सुखात जाईल.

बदल नक्की होईल
kumbhकुंभ ः

आपणावर देवाने अन्याय केला असे वाटते आहे, पण ते चुकीचे आहे. लवकरच देव आपणाला भरघोस न्याय देणार आहे. मानसिक तणाव उगाच वाढवू देऊ नये. जे दिसत नाही, पण भासमान्त असल्याने आहे असे जाणवते तसंच आपलं आहे. आपल्या शब्दाला वजन आहे. सच्चाई व दैवी उपासना आपणाला यश दिल्याखेरीज राहणार नाही. गुरुकृपा सर्व ठीक करणार आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मित्रांचे सहकार्य उत्तम लाभेल. शांत राहूनच यश पदरी पडणार आहे याची खात्री बाळगा. सर्व ठीक होईल.

ताण दूर करावा
meenमीन ः

ताणतणावामुळेच अनेक समस्या व आजार निर्माण होत असतात. तरी तो दूर करावा. समस्या या कायम राहण्यासाठी येत नाहीत, प्रत्येक कोड्याला व आजाराला उत्तर आहेच, मग काळजी कां करायची. ती घ्यायची म्हणजे काम होत नाही. आपणावर गुरुकृपा झाली आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडून आनंदीआनंद राहील.

मासिक राशिभविष्य - मे २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
meshमेष ः

हा महिना आपली आर्थिक भरभराट करणारा आहे. गुरुकृपा व आपले कष्ट यांचं चीज होऊन अनेक उत्तम घटना घडतील. मात्र शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरणे योग्य होईल अन्यथा तापदायक होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरु करु नये. मित्र व नातेवाईक यांच्याशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेच योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मनोदौर्बल्य झटकून आत्मविश्‍वास  बाळगावा. सर्व बाबतीत यशी व्हाल.

जिद्द बाळगा
rishabhवृषभ ः

अवघड कार्यात यश संपादन करायचे असेल तर जिद्द व आत्मविश्‍वास असणे आवश्यक आहे. धाडसी मंगळ व ग्रहराज रवि आपली प्रतिष्ठा वाढविणारे आहेत. अचानक धनलाभ संभवतो. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या जबाबदार्‍या वाढतील. नवीन योजना यशस्वी होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. नवीन वास्तू खरेदी योग येईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मानमुराद वाढून प्रतिष्ठा मिळेल.

उत्तम काळ
mithunमिथुन ः

अखेर बुध्दिमत्ता, कर्तृत्व हे कुठे लपून बसू शकत नाही. त्यांचे चीज होणारच, याची प्रचिती आपणाला या महात येईल. दैव व देव आपणावर खुष आहेत, तेव्हा पैसा व प्रसिध्दी, मानमुराद या गोष्टी लाभतीलच. नवीन योजना हाती घेऊन यश संपादन कराल. मात्र स्वाभिमान असावा पण गर्व नसावा हे महत्वाचे आहे. नवीन वास्तू खरेदी योग येईल. राजकीय, शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. कलाकारांना व सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी लाभेल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन काळ सुखात जाईल.

कर्तृत्व उजळेल
cancerकर्क ः

कुशाग्र बुध्दिमत्तेला कर्तृत्वाची जोड असली की अवघड कार्यात यश मिळतेच. आपल्या कष्टाचं चीज होऊन आपली मनोकामना पूर्ण होणार आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व आर्थिक आवक अपेक्षित होईल. सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय करणार्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तु खरेदी योग आहे. अचानक प्रवास योग येतील. अनेक प्रकारचे लाभ होतील. आनंद संयमानेच द्विगुणित करावा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. काळ सुखात जाईल.

संयम ठेवावा
lionसिंह ः

यश नजरेच्या टप्प्यात असले तरी ते केव्हा दूर जाईल, अशी आपली अवस्था आहे. आवकपेक्षा जावक जास्त होईल. अचानक खर्च उभे राहतील. घरगुती समस्या वाढवू देऊ नका. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाबाळांकडे नीट लक्ष पुरवणे गरजेचे आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी ग्रहराज रवि, धाडसी मंगळ व बुध्दीकारक बुध आपल्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. केतु महाराज तब्येतीला सांभाळण्याची सूचना देत आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. संत मंडळींचा सहवास लाभेल. शब्द जपून वापरणे योग्य होईल. काळ चढउताराचा राहील. व्यापारी वर्गाला अपेक्षित आर्थिक आवक होईल.

झाले मोकळे आकाश
kanyaकन्या ः

आपणाला शनि महाराजांच्या साडेसातीतून मोकळीक मिळाली आहे. तेव्हा आता मोकळा श्‍वास घ्यायला व प्रगतीच्या दिशेने जायला हरकत नाही. शनि व गुरु महाराज आपणावर खुश आहेत. तेव्हा येणार्‍या नवीन संधीचा लाभ घेणे उचित होईल. गुरुकृपेने नवीन योजना हाती घ्याल व यशस्वी व्हाल. मानसिक दौर्बल्य झटकून टाका. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नातेवाईक व मित्र यांचे सहकार्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. काळ सुखात जाईल.

सौख्य लाभेल
tulतुळ ः

या महात आपणावर राहू- केतूची कृपा झाल्याने आपणाला अनेक प्रकारची सुखे लाभून ऐश्‍वर्य प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दीच्या झोतात येतील. गुरुकृपेमुळे अवघड कार्यात यश प्राप्त होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. भागीदारीत व्यवसाय करु नये. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

धनलाभ होईल
ruchikवृश्‍चिक ः

या महात आपणाला अचानक धनलाभ संभवतो. गुरुकृपेमुळे सौभाग्य सिध्दी प्राप्त होईल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपल्या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नवीन योजना फायदेशीर होतील. सामाजिक दर्जा उंचावेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मानसिक दडपण दूर करावे व पूर्ण आत्मविश्‍वासाने अवघड कार्यात यश संपादन करुन घ्यावे. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी लाभेल. घरगुती वादविवाद टाळावेत. गैरसमज दूर होऊन शत्रू मित्र बनतील. नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल.

दक्षता बाळगावी
dhanuधनु ः

आपण शनि महाराजांच्या अवकृपेच्या छायेत वावरत असल्याने प्रत्येक महत्वाच्या कामात अत्यंत गुप्तता राखावी. धाडसी मंगळ व ग्रहराज रवि आपणाला यश संपादन करुन देण्यास आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तूर्तास यश जवळ आलेले दिसले तरी घाई करु नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. कोर्ट- कचेरीची कामे तूर्तास लांबणीवर टाकावीत. घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. घरातील भाऊबंदक्या वाढवू नयेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. उपासनेवर भर देणे फार आवश्यक आहे.

सुख लाभतील
makarमकर ः

या महिन्यात आपल्या आर्थिक समस्या संपुष्टात येऊन आपण प्रगतीच्या लाटेवर आरुढ होणार आहात. नवीन वास्तू खरेदी योग येईल. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. घरात उत्तम घटना घडतील. अचानक प्रवास योग येतील. मुलाबाळांशी जास्त वादविवाद घालू नयेत. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. स्वप्न दृष्टांत खरे होतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभून प्रसिध्दी मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यापारात वृध्दी होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

उत्तम काळ
kumbhकुंभ ः

आपली आचार, विचार व वृत्ती चांगली असल्याने आपल्याला अनेक बाबतीत यश संपादन करता येते. परोपकारी वृत्ती व दानी स्वभाव यामुळे समाजात आपण वर्चस्व राखून आहात. या महात खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक वाढेल. स्वप्नदृष्टांत खरे होतील. सच्चाई व सबुरी यामुळे आपला प्रतिष्ठितांकडून गौरव होईल. मनोदौर्बल्य झटकून टाकून जबाबदारी स्वीकारावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

धनलाभ होईल
meenमीन ः

अखेर जिद्द, कष्ट व चिकाटी यांना यश लाभतेच. आपले कर्तृत्व व धाडस यामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सुखात वाढ होणार आहे. धाडसाने पुढे जावे. नवीन आलेली संधी सोडू नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. काळ सुखात जाईल. शब्द जपून वापरावेत. आनंद संयमाने द्विगुणित करावा हेच योग्य होईल.

मासिक राशिभविष्य - एप्रिल २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

इस्टेट लाभ होईल
meshमेष ः

या सप्ताहात काही अनुकूल व प्रतिकुल ग्रहमान असल्याने महत्वाच्या कार्यात विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य होईल. धाडसी व पराक्रमी मंगळ आणि ग्रहराज रवि हे आपणाला तब्बेतीची काळी घेण्याची सूचना देत आहेत. राहू कृपेमुळे आपणाला अचानक धनलाभ व वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ दर्शवितात. या महिन्यात बंधनात राहणे जास्त लाभदायक होईल. शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. दुरचे प्रवास योग येतील. गुरु उच्चेचा असल्याने घरात उत्तम घटना घडतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शक्यतो माघार घेऊन पुढे जाणे योग्य होईल. विद्यार्थ्याने अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना सावधानतेने व दक्षतापूर्वक निर्णय घेतल्यास सुखावह जाईल.

तब्बेत सांभाळावी
rishabhवृषभ ः

कलागुणांचा विकास करणारा शुक्र कवि, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त करुन देणारा आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. शत्रू मित्र बनतील. तब्बेतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहावे. घरातील वडीलधार्‍या माणसांच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. दुरचे प्रवास योग येतील. जबाबदार्‍या वाढल्याने मानसिक दौबर्ल्य येण्याची शक्यता आहे. तरी मन शांत ठेवून काळजीपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. केतू महाराजांच्या कृपेने जुनी येणी वसुल होऊन अनेक अवघड कार्ये मार्गी लागतील व आर्थिक आवक वाढेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भरभराट होईल
mithunमिथुन ः

हा महिना आपणाला आर्थिक, मानसिक, शारीरिक व कौटुंबिक समाधान प्राप्त करुन देणारा असून, आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करणारा आहे. अवघड कार्यात यश प्राप्त होऊन आर्थिक भरभराट होईल. व्यापारी, कारखानदार, उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुकांचे विवाह उत्तम प्रकारे जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. कवि, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन ते उत्कर्षाच्या झोतात येतील. जुनी येणी वसुल होऊन मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. मित्र व नातेवाईक यांच्यात वादविवाद न घालता समंजसपणाची भूमिका घेणे उचित होईल. एकंदरीत हा महिना आपल्या मनोकामना पूर्ण करुन मानसिक स्वास्थ्य देणारा आहे.

परदेशागमन होईल
cancerकर्क ः

गुरुकृपा झाल्याने आपल्या नवीन योजना कार्यान्वीत होणार असून, आपले परदेशागमन होणार आहे. आपल्या कष्टाचं, बुध्दीमत्तेचं समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून कौतुक होऊन आपला मानसन्मान होईल. आपले कर्तृत्व, वक्तृत्व, दातृत्व यांना योग्य रितीने वाव मिळून आपला सामाजिक दर्जा वाढणार आहे. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. विद्यार्थ्याने अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. जुनी येणी वसूल होतील. बुध कृपेने अनेक प्रकारची सौख्य लाभून मानसिक स्वास्थ्य मिळेल.

सावधानता बाळगावी
lionसिंह ः

या महिन्यात बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात व कार्यात अडथळे आणणारे आहेत. तेव्हा सावधानता बाळगणेच योग्य होईल. आर्थिक चणचण भासेल. नवीन व्यवहारात जास्त पैसे गुंतवू नयेत. अगोदरचे आर्थिक व्यवहार अडचणीत आणण्याची शक्यता आहे. विवाहइच्छुंनी विवाह जमवताना काळजी घेणे जरुर आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. शासकीय वा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. मनावर दडपण येईल तेव्हा ताबा ठेवणे योग्य होइंल. ईश्‍वरी उपासनेवर भर द्यावा म्हणजे सर्व ठीक होईल.

उत्कर्ष होईल
kanyaकन्या ः

आपणावर शनि महाराजांची कृपा झाली असल्याने आर्थिक भरभराट होईल. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. नवीन वास्तूत प्रवेश करण्याचा योग येईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होतील. सुशिक्षित बेकारांना नवीन रोजगार उपलब्ध होईल. अनेक अडचणी दूर होऊन मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक भरभराट होईल. काळ सुखात जाईल.

लाभ होतील
tulतुळ ः

या महात अपेक्षित आर्थिक लाभ होऊन नवीन व्यवसायात वाढ होईल. अचानक प्रवास योग येतील. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. अचानक खर्च उभे राहतील. अनेक प्रकारची सुखं लाभतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अनेकांना परदेशागमन योग येईल. मुलाबाळांचे बाबतीत वेळीच काळजी घ्यावी.

स्वास्थ्य लाभेल
ruchikवृश्‍चिक ः

आपण शनिमहाराजांचे अवकृपेच्या छायेत उभे आहात. तेव्हा मोठ्या लाभासाठी विपरीत काही घडणार नाही याची काळजी घ्यावी. जुने आजार पुढे येण्याची शक्यता दर्शविते. तेव्हा मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. तथापि धाडसी मंगळ आपणाला सर्वतोपरी साथ देऊन यशस्वी करणारा आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. विवाहइच्छुंचे विवाह जुळवताना काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. मनावर ताबा ठेवूनच कार्य करणे गरजेचे आहे.

शांत रहावे
dhanuधनु ः

जबाबदार्‍या वाढुन मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता आहे. तरी मन शांत ठेवावे. आवकपेक्षा जावक जास्त होईल. बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा नवीन गुंतवणुक व नवीन योजना तूर्तास लांबणीवर टाकाव्यात. जुनी येणी पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घेऊन महत्वाचे बाबतीत गुप्तता पाळावी. माघार घेऊन पुढे जाणे ठीक होईल. काळ मध्यम आहे. व्यापारी वर्गाने जास्त गुंतवणूक करुन व्यवहार न करणे उचित होईल.

उत्कर्ष होईल
makarमकर ः

शनि आपणाला आर्थिक लाभ करुन देण्यास आला आहे. अनेक प्रकारची सुखं लाभून मन प्रसन्न राहील. विवाहइच्छुंचे विवाह अपेक्षेप्रमाणे होतील. कवि, लेखक, कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढून आर्थिक आवक अपेक्षित होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

अपेक्षापूर्ती होईल
kumbhकुंभ ः

स्वत:चा पदरमोड  करुन दुसर्‍यावर उपकार करणारी आपली रास आहे. कष्ट जास्त व फळ कमी तरीही आपण खूप समाधानी असता, तथापि या महात धाडसी व पराक्रमी मंगळ आपणाला अवघड कार्यात यश देणारा असून, आपली प्रतिष्ठा वाढवणार आहे. अनाठायी आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. आर्थिक आवक अपेक्षित होऊन मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. खाण्यापिण्यात बंधन बाळगून तब्बेत नीट राहील याची काळजी घ्यावी. नवीन योजना यशस्वी होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

चीज होईल
meenमीन ः

आपलं कर्तृत्व, बुध्दीमत्ता व दातृत्व याचं चीज होऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. अनेक प्रकारची सुखं लाभून आपल्या मनोकामना पूर्ण होणार अहेत. आपणाला अचानक धनलाभ संभवतो. सरकारी क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. मानसिक ताणतणाव वाढू न देता शांत राहून कार्यात यश पदरी पाडून घ्यावे. विवाहइच्छुंचे विवाह होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

मासिक राशिभविष्य - मार्च २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

लाभ होतील
meshमेष ः

धाडसी व पराक्रमी मंगळ आपल्याला अवघड कार्यातही यश निर्माण करुन देणार आहे तेव्हा आत्मविश्‍वासाने पुढे जाणेच योग्य होईल. विवाह इच्छुकांनी सावधानतेनेच विवाह जुळवावेत. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. पैसा, येणं येणार असला तरी खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. दुरचे प्रवास टाळावेत. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी अतिआत्मविश्‍वास दाखवू नये. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. नातेवाईक व मित्र यांच्याशी मिळतजुळत घेेणे जरुर आहे.

दर्जा वाढेल
rishabhवृषभ ः

या मासात बहुतांशी बलाढ्य ग्रह आपणावर कृपा करणार असून, आपल्या कष्टाचे, कर्तृत्वाचे चीज होऊन आपणाला उच्च पद प्राप्त होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा लाभून गौरव होईल. शनि महाराज आपल्याला तब्येतीची काळजी घेण्यास सांगत आहेत. अचानक प्रवासाचे योग संभवतात. घरगुती वादविवाद टाळावेत. कारखानदार, उद्योगपती व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. अवघड कार्यात विघ्ने येणार असली तरी धाडसी व पराक्रमी मंगळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने यश देईल. काळजीचे कारण नाही. हा महिना सुख, शांती देणारा आहे.

व्यक्तिमत्व उजळेल
mithunमिथुन ः

आपल्या बुध्दिमत्तेचे, निरपेक्ष बुध्दीच्या सेवेचे, कष्टाचे खर्‍या अर्थाने चीज होणार असून, आपणाला सामाजिक प्रतिष्ठा व किर्ती लाभणार आहे. आर्थिक आवक अपेक्षित होऊन स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद लाभेल. तथापि शासकीय सेवेतील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे हितावह होईल. घरात उत्तम घटना घडून आनंदीआनंद होईल. विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घ्यावेत. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळून येतील.

परदेशगमन होईल
cancerकर्क ः

सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन काहींना परदेशगमन योग येईल. अनेक प्रकारची सुखं प्राप्त होऊन नवीन वास्तू खरेदी योग संभवतो. विवाह होतील. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. मुलाबाळांशी मिळतजुळत घ्यावे. तब्येतीची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसुल होतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रियांना पुत्रलाभ संभवतो. व्यापारी, कारखानदार, उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित धनलाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या जनहिताच्या योजना सफल होतील.

तब्येत सांभाळावी
lionसिंह ः

या मासात बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे असून, आपले कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांची परीक्षा घेणारे आहेत. महत्वाचे बाबतीत अत्यंत गुप्तता पाळणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार थोरामोठ्यांच्या सल्ल्याने करणे योग्य होईल. कलाकारांना नवीन संधी प्राप्त होऊन यश, किर्तीही मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह होतील. उष्णतेच्या विकारापासून वेळीच सावध रहावे. शक्यतो दुरचे प्रवास टाळावेत. वाहन, पाणी, गुप्त शत्रू यापासून सावधानता बाळगावी. व्यापारी वर्गाने विचारपुर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. प्रत्येक गोष्ट समंजसपणाने निर्णायक करावी. हा महिना आपली परीक्षा घेणारा आहे.

भाग्य उजळेल
kanyaकन्या ः

देव आणि दैव आपणावर खुश आहेत. आपली अनेक क्षेत्रांत प्रगती होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. अनेक मनोकामना पूर्ण होतील. एखादे लॉटरी तिकीट घेऊन नशीब आजमावण्यास हरकत नाही. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. शासकीय, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. आपल्या कार्याचा व बुध्दीमत्तेचा गौरव होऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरगुती वाद वेळीच टाळावेत. विद्यार्थ्यांची व खेळाडूंची प्रगती होईल. हा महिना सुखशांती देणारा आहे. घरात उत्तम घटना घडतील.

धाडस करा
tulतुळ ः

बलाढ्य ग्रह जरी आपल्या विरोधात असले तरी ग्रहराज रवि आपणाला अवघड कार्यात यश देणारा आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. तब्बेत उत्तम राहील. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उत्तम. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. नवीन वास्तू खरेदी योग येईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ संभवतो. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना यश व किर्ती मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जमवताना विचार करावा. नातेवाईक व मित्र यांचे उत्तम सहकार्य मिळेल.

सिध्दी प्राप्त होईल
ruchikवृश्‍चिक ः

गुरुकृपा होणे म्हणजे जन्मोजन्मीचे भाग्य उजळणे. या महिन्यात आपणावर गुरुकृपा झाल्याने आपले कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. सर्व प्रकारची सुखे व ऐश्‍वर्य प्राप्त होतील. नवीन वास्तूत प्रवेश कराल. घरगुती वादविवाद न वाढविता घरात शांतता प्रस्थापित करावी हेच योग्य होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे त्यांचा गौरव केला जाईल. विवाहइच्छुकांचे विवाह होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. एकंदरीत हा महिना आपल्या मनोकामना पूर्ण करणारा आहे. व्यापारी, उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

आधार घेऊन पुढे जावे
dhanuधनु ः

या मासात देव व दैव आपल्यावर नाराज असल्याने आपण नवीन जबाबदार्‍या न स्वीकारता माघार घेऊनच पुढे जाणे योग्य होईल. शब्द जपून वापरावेत. शत्रू निर्माण होणार नाहीत याची जबाबदारी घ्यावी. डोळे मिटून संकटे दूर होणार नाहीत. संकटे आली की डोळे उघडतातचव शहाणपणा समजतो. काळोखातून जाताना धावत जाऊ नये. सध्या आपण ग्रहमानाच्या दुष्टचक्रातून जात असल्याकारणाने प्रत्येक महत्वाच्या बाबतीत गुप्तता राखावी. बंधनात राहून तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी.

भरभराट होईल
makarमकर ः

पहाट झाली की उजाडतंच हा निसर्ग नियम आहे. तेव्हा दु:खानंतर सुख हे येईल याची प्रचिती आपणाला येईल. आपला राशी स्वामी शनि आहे. या महात आपली आर्थिक भरभराट होऊन उद्योगधंद्याचे नवीन दालन आपण सुरु करणार असुन, त्यात भरघोस यशप्राप्ती मिळवणारा ग्रहराज रवि शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दर्जा प्राप्त करुन देणारा आहे. अनेक प्रकारची सुखे आपणाला लाभून खर्‍या अर्थाने स्वास्थ्य लाभणार आहे. या काळात आलेली संधी सोडू नये. वेळ आणि भरती कोणासाठी थांबत नाही. तेव्हा वेळेचा वेळीच फायदा घेऊन आपला उत्कर्ष करुन घ्यावा. शनि कृपेने आपली आर्थिक भरभराट होऊन अनेक अवघड समस्या दूर होणार आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. अचानक धनलाभ होईल. काळ सुखाचा जाईल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

जिद्द बाळगा
kumbhकुंभ ः

राशीस्वामी अर्थदाता शनि असून, या मासात आपणाला अपेक्षित अर्थप्राप्ती होणार आहे. आपली जिद्द, कष्ट, चिकाटी तसेच आपले कार्य व निरपेक्ष बुध्दीने केलेली गरिबांची सेवा यामुळे आपणाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मान मिळेल. आपल्याला वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनाठायी आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. अध्यात्मिक उपासनेवर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या कष्टाचे चीज होऊन आपणाला यश व किर्ती मिळणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह विचारपूर्वक करावेत. तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे गरजेचे आहे. बंधनात राहून सुख व स्वास्थ्य निर्माण करावे. व्यापारी, कारखानदार वर्गाला अपेक्षित फायदा होईल.

अपेक्षापूर्ती होईल
meenमीन ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात असले तरी किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याने कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. धाडसाने अवघड कामात यश प्राप्त करुन घ्यावे. शुक्र महाराज आपणाला अचानक धनलाभ करुन देणार आहेत. आपल्या कर्तृत्व, बुध्दीमत्तेचे चीज होऊन आपणाला यश व किर्ती मिळणार आहे. मन शांत ठेवणे गरजेचे आहे. वादविवाद वाढवू नयेत. वाहन, वीज व पाणी यापासून सावधानता बाळगावी. छोट्याशा यशामुळे अति आत्मविश्‍वास बाळगू नये. गुरुकृपेमुळे घरात उत्तम घटना घडतील. आनंदीआनंद होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय सेवेतील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल.

Page 2 of 7