Monday, Jan 22nd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य -एप्रिल २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य -एप्रिल २०१३
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य,
रत्नागिरी, मोबा. ९८६०८८८९९३

meshमेष ः
धाडस यश देईल
गृहराज रवि, धाडसी मंगळ आणि कलागुणांचा विकास करणारा शुक्र आणि किर्तीदाता गुरु यामुळे आपलं व्यक्तिमत्व उजळणार असून, प्रतिष्ठित लोकांत गौरव होईल. मनाविरुध्द प्रवास संभवतो. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल व काहींचे परदेशागमन योग येतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. घरगुती अडचणींवर मात कराल. पाण्यापासून सावध रहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपला गौरव होईल. महिलांना वस्त्रलाभ होईल.

rishabhवृषभ ः अर्थप्राप्ती होईल

ग्रह, देव आणि दैव यांची अनुकूलता असली की यशोदेवता आपल्यालाच माळ घालते. अशी स्थिती या महिन्यात आपली होणार आहे. नवीन व्यवसायात अनेक उलाढाली होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात आनंददायक घटना घडतील. घाईगडबडीत कोणतेही महत्वाचे निर्णय न घेणे इष्ट ठरेल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींच्या योजना सफल होतील. परदेशगमनाचा योग येईल. व्यापारी व कारखानदार यांच्या स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह जुळवण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य.

mithunमिथुन ः यश लाभेल

अखेर ज्याच्यात हिंमत आहे, त्यालाच किंमत आहे. आपलं धाडस आणि कर्तृत्व प्रतिष्ठित व्यक्तींना पटेल व आपले व्यक्तिमत्व उजळेल. मुलाबाळांशी मिळतं-जुळतं घ्यावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती मिळेल. स्वप्न- दृष्टांत खरे होतील. वडीलधारी मंडळींच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल. आपले म्हणणे दुसर्‍यावर न लादणे योग्य होईल. शासकीय कर्मचार्‍यांची बदली अपेक्षित ठिकाणी होईल. अध्यात्मिक उपासनेकरीता हा महिना जास्त चांगला आहे. जुन्या व नव्या पिढीतील व्यक्तींशी वाद वाढवू नयेत. हातून उत्कृष्ट लिखाण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे.


cancerकर्क ः व्यक्तिमत्व उजळेल

आपली सच्चाई व कष्ट यांचे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून कौतुक होईल. तसेच राजकीय व शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्च पद लाभण्याची शक्यता आहे. नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी संयमाने वागावे. तसेच अनाठायी आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गैरसमज हे गैर असतात, ते वाढवू नयेत. या काळात माघार घेऊन पुढे जाणे योग्य ठरेल. मुलाबाळांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. या सर्वांतून अपेक्षित यशप्राप्ती करण्याकरीता किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

lionसिंह ः ऐश्‍वर्य लाभेल
अनंत हस्ते कमलावराने... अशी आपली स्थिती होणार असून, आपण आपला आनंद संयमाने द्विगुणीत करावा हे योग्य होईल. आपले नशीब आजमावण्यासाठी एखादे लॉटरी तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. आपल्या स्वतंत्र व्यवसायात वाढ होणार असून, नवीन व्यवसायही सुरु होईल. जुनी येणी वसूल होतील. विवाहइच्छुंचे विवाह उत्तम प्रकारे जुळून येतील. राजकीय, सामाजिक व शासकीय सेवेतील व्यक्तींच्या कार्याचा समाजाकडून गौरव होऊन आपण प्रसिध्दीच्या झोतात याल. माणसाने भरतीच्या लाटेबरोबर पुढे जाणे हेच योग्य होईल. जमीनजुमल्याचे व्यवहार पूर्ण होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

kanyaकन्या ः सावधानता बाळगावी
काळोखातून जाणार्‍या माणसाने भरधाव धावत जाऊ नये, तर संयमाने पुढे जावे, हेच योग्य होईल. या महिन्यामध्ये अनाठायी खर्च होणार असून, विचारपूर्वक खर्च करावा हे योग्य होईल. खाण्यापिण्यावर बंधने ठेवावीत. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. मानसिक दौबर्ल्य येण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपला व परका याची जाणीव ठेवून व्यावहारीक मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांनी विचारपूर्वक व्यवहारांत आर्थिक गुंतवणूक करावी.

tulतुळ ः दौर्बल्य येईल
या मासात बहुतांशी बलाढ्य ग्रह आपलं कर्तृत्व, बुध्दीमत्ता व किर्ती यांना आव्हान देणारे आहेत. तरी अत्यंत संयमाने, विचारपूर्वक थोरामोठ्यांचा सल्ला घेणे उपयुक्त होईल. शक्यतो दूरचे प्रवास टाळावेत. प्रवासात मौल्यवान वस्तू नेऊ नयेत. वाहन, वीज व पाणी यापासून सावध रहावे. उपासनेवर भर देणे योग्य होईल. गुरुकृपेने या सर्वांवर मात केली जाईल. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गर्भवतींना पुत्रलाभ संभवतो. नवीन जबाबदार्‍या तूर्तास घेणे टाळाव्यात. विवाहइच्छुंचे विवाह जुळून येतील. यशस्वीरित्या माघार घेऊन यश संपादन करणे हितावह होईल.

ruchikवृश्‍चिक ः मालमत्ता लाभ होईल

या महिन्यात आपणाला वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होऊन आर्थिक व घरगुती समस्या सुटतील. मात्र त्रासदायक कोणतेही काम टाळावे. घरातील मंडळींशी मिळतं-जुळतं घेणं अत्यंत आवश्यक आहे. नवीन जबाबदार्‍या न स्वीकारणे योग्य होईल. घाई- गडबडीत महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. शासकीय सेवेतील व्यक्तींनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे हितावह होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाच्या बाबी गुप्त ठेवाव्यात. घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहइच्छुकांनी विवाह जुळवताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.


dhanuधनु ः भरभराट होईल

या महिन्यात शनि महाराजांच्या कृपेने आपली आर्थिक स्थिती अपेक्षेबाहेर सुधारणार असून, आपण आखलेल्या नवीन योजनांना मित्र, नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. हातात अपेक्षेबाहेर अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तूयोग येईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन  अपेक्षित अर्थप्राप्ती लाभेल. विवाहइच्छुंचे अपेक्षित विवाह जुळतील. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागून मानसिक स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी आपल्या कार्यक्षेत्रात जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे.

makarमकर ः पत वाढेल
या मासात आपणावर गुरुकृपा झाली असून, आपण अनेक क्षेत्रात भरघोस यश संपादन करणार असून, आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होऊन अनेकांचे परदेशागमन होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन योजना सफल होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. शनि तुळेत उच्च असल्याने अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी लाभून प्रकाशझोतात येतील.

kumbhकुंभ ः स्वास्थ्य लाभेल

कष्ट, जिद्द आणि चिकाटी या सद्गुणांमुळे आपणाला अवघड कार्यात यश प्राप्त होऊन मानसिक समाधान लाभेल. दुसर्‍यावर केलेले उपकार वाया जाणार नाहीत. ईश्‍वरी उपासना व थोरामोठ्यांचे आशिर्वाद आपणाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकरी वर्गाला जनावरांपासून भय संभवते. कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला प्रसिध्दी मिळवून देईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरगुती वादविवाद वेळीच मिटवावेत, वाढवू नयेत. घरच्या व्यक्तींशी मिळतं-जुळतं घेणं आवश्यक आहे. आपल्या आर्थिक समस्या दूर होऊन नवीन व्यवसायात पदार्पण कराल. व्यावसायिकांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

meenमीन ः प्रगती होईल
अखेर आपले धाडस, बुध्दीमत्ता व कर्तृत्व यांचे चीज होईल. आपणाला अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन नवीन योजना हाती घ्याल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तीर्थक्षेत्रांचा प्रवास लाभदायक ठरेल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महत्वाच्या योजना अत्यंत गुप्तपणे पार पाडाव्यात. शब्द हे शस्त्र आहे याची जाणीव ठेवून निर्णय घेणे उचित ठरेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. समाजात नवीन दर्जा प्राप्त होईल. सोने खरेदीस काळ उत्तम. अनेक क्षेत्रांत आघाडीवर रहाल.

Page 7 of 7