Tuesday, Jan 23rd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - सप्टेंबर २०१३

E-mail Print PDF
मासिक राशिभविष्य - सप्टेंबर २०१३
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य,
रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३


विजयी व्हाल
meshमेष ः ग्रहराज रवि व बुध्दीकारक बुध यामुळे संकटावर मात करता येईल. शत्रु मित्र बनतील. अनेक लाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. मन खंबीर ठेवणे योग्य होईल. किर्तीदाता गुरु प्रतिष्ठा वाढवून व्यक्तिमत्व उजळेल. खात्री करुनच विवाहइच्छुंनी विवाह करणे योग्य होईल. अकारण प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक आवक अपेक्षित होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल.

अपेक्षापूर्ति होईल
rishabhवृषभ ः आपले कष्ट, जिद्द व सद्सद्विवेक बुध्दी यामुळे लाभलेली बलाढ्य ग्रहांची साथ आपली अपेक्षापूर्ति करणारी आहे. आर्थिक आवक वाढेल. जुनी येणी वसुल होतील. नवीन योजना सफल होऊन स्वास्थ्य लाभेल. यश व किर्ती आपणाला लाभेल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वस्त्रलाभ होईल. घरात आनंदीआनंद होईल. काळ सुखात जाईल.

व्यवसायात यश लाभेल
mithunमिथुन ः
हा महिना आपणाला यश, किर्ती व प्रतिष्ठा वाढवणारा आहे. स्वतंत्र व्यवसायात भरभराट होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागून, परदेशागमन योग होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अचानक धनलाभ संभवतो. अवघड कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. काळ उत्तम जाईल.

जपणूक करणे योग्य
cancerकर्क ः
जीवनात कितीही मिळाले असले तरी ते जपून ठेवणे महत्वाचे आहे. वडिलोपार्जित इस्टेट नीट सांभाळणे योग्य होईल. घरगुती वाद वाढवू नयेत. मौन पाळणेच योग्य होईल. पित्ताचे विकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाहन जपून चालवणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अचानक धनलाभ व वस्त्रलाभ संभवतो. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठाधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. धाडसानेच यश संपादन कराल. उपासनेवर भर द्यावा.

भरभराट होईल
lionसिंह ः
यश, किर्ती व भरभराट करुन देणारे ग्रहमान आहे. मात्र मंगळ महाराज सावधानतेचा इशारा देत आहेत. वाहन, पाणी, आर्थिक व्यवहार यापासून सावधानता बाळगावी. कोर्टकचेरीचे व्यवहार शक्यतो लांबणीवर टाकावेत. आर्थिक भरभराट होईल. नवीन स्वतंत्र व्यवसाय सुरु होईल. जबाबदार्‍या वाढतील. या महिन्यात गुरुकृपेने अनेक उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना बढती मिळेल. मोठ्या अवघड कामांत मोठ्यांचा सल्ला उपयुक्त होईल.

गुरुकृपा होईल
kanyaकन्या ः
शनि, राहू व केतुसारखे बलाढ्य गृह आपल्या विरोधात उभे असले तरी किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. आर्थिक अडचणींवर मात करुन प्रगतीपथावर जाल. व्यक्तिमत्व उजळेल. इस्टेटीचे व्यवहार आपल्या बाजुने होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ होईल. घरगुती अडचणींना सामोरे जावे लागेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. काळ आपल्या बाजुने आहे. खाण्यावर बंधन ठेवणे योग्य. आवक उत्तम होईल.

अपेक्षापूर्ति होईल
tulतुळ ः
बलाढ्य ग्रह आपल्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. तेव्हा आपल्या प्रगतीचा वेग वाढेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मात्र मन खंबीर ठेवणे योग्य. सच्चाईच्या बाजूने उभे राहिलेत तर यशस्वी व्हालच. व्यक्तिमत्व उजळेल. गृहसौख्य उत्तम लाभेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरु होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष जास्त केंद्रीत करणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

माघार घेणे
ruchikवृश्‍चिक ः
ग्रहांची अवकृपा असली की माघार घेऊनच पुढे जाणे योग्य होते. घाईघाईने घेतलेले महत्वाचे निर्णय उत्तरार्धात त्रासाचे होतात. थोरामोठ्यांच्या सल्ल्याने वागणे उत्तम. खर्चावर खूप नियंत्रण ठेवणे. ग्रहराज रवि व बुध्दीकारक बुध आपली बाजू सावरुन धरणारे आहेत. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सौंदर्य प्रसाधनाचे व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होईल. बंधनात राहणे योग्य होईल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत.

आनंदी आनंद होईल
dhanuधनु ः
ग्रहांची कृपादृष्टी आणि देव व दैव यांची साथ असल्याने आनंदीआनंद होणार आहे. नवीन योजना सफल होतील. नवीन वास्तूत प्रवेश होईल. आर्थिक समस्या दूर होऊन स्वास्थ्य लाभेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होईल. घरात मंगलकार्य होऊन प्रसन्न वातावरण राहील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल व काहींना परदेशागमन योग येईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. प्रगतीत वाढ होईल.

मुक्त व्हाल
makarमकर ः
भरपूर जबाबदार्‍या, दगदग यामुळे हैराण झाले असाल तर आता मात्र आपण सर्व जबाबदारीतुन मुक्त होणार आहात तेव्हा स्वास्थ्य लाभेल. तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. दूरचे प्रवास योग येतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरुर आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. ग्रहराज रवि आपलं व्यक्तिमत्व उजळवणार आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरातील व्यक्तींशी मिळतजुळत घेणे जरुर आहे. इस्टेटीचे व्यवहार तूर्तास दूर ठेवणे योग्य होईल.

फळ मिळेल
kumbhकुंभ ः
अमाप कष्ट, निरपेक्ष बुध्दी आणि परोपकारी वृत्ती या सर्वांचं फळ आपणाला या महात मिळणार आहे. मन खंबीर करुन महत्वाचे निर्णय घेणे तरच यश लाभेल. धाडस आणि कर्तृत्व यांची सांगड घालून प्रगतीपथावर जाणेच योग्य. इस्टेटीचे व्यवहार आपल्या बाजूने होतील. देव आणि दैव आपणावर खुश आहेत, तेव्हा बिनधास्त पुढे चला. अपेक्षित अर्थप्राप्ती, मानसन्मान, नवीन योजना सफल होऊन स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

संयम राखा
meenमीन ः
काळ, वेळ आणि ग्रहमान अनुकूल नसले की विचारानेच निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा महत्वाचे निर्णय तूर्तास दूर ठेवणे योग्य. तब्येतीची काळजी जरुर आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. वाहन जपून चालवा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. श्रध्दा व सबुरी तसेच संयम राखणे जरुर आहे. नवीन व्यवसायात जपून राहणे.

मासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१३

E-mail Print PDF

मासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१३

ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८८९९३

 

 

 

गमन होईल

meshमेष ः या महात आपला दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मानसिक स्वास्थ्य मात्र बिघडू देऊ नये. मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता आहे. जनमानसात व्यक्तिमत्व उजळून निघेल. गुरुकृपा झाल्याने यश, किर्ती व उच्चपद लाभेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षापूर्ती होईल. विवाहइच्छुंनी माहितीची पूर्तता केल्यावरच विवाह करावा. कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. एकंदरीत हा महिना स्वास्थ्य व अपेक्षापूर्ती करणारा आहे.

यशोदायी काळ

rishabhवृषभ ः या महात आपल्या प्रगतीची घोडदौड उत्साहाने व जोमाने सुरु राहणार आहे. पैसा, यश, किर्ती आपणाला लाभून मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. घरात मंगलकार्य होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. धाडस व कर्तृत्व यांच्या जोरावर यश संपादन करता येईल. कोर्ट- कचेरीचे निकाल आपल्या बाजूनेच लागतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. महिलांना वस्त्रलाभ होईल व चैनीच्या वस्तू खरेदी करतील.

यश लाभेल

mithunमिथुन ःगुरुकृपेेने असाध्य व अशक्य कामे शक्य होतात, याची प्रचिती आपणाला या महिन्यात येणार आहे. आर्थिक आवक अपेक्षेबाहेर होईल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या कार्यात नातेवाईक व मित्र यांची उत्तम साथ लाभेल. मुलाबाळांशी मिळते-जुळते घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. भाषाशैली उत्तम वापरणे जरुरीचे आहे. परदेशगमन योग उपलब्ध होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. हा महिना सुख, शांती व आनंद देणारा आहे.

ऐश्‍वर्य लाभेल

cancerकर्क ः या महिन्यात आपलं कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांना समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून मानसन्मान मिळेल. धाडस व स्वकर्तृत्वाने आपण अवघड कार्यात यश संपादन करणार आहात. वडिलोपार्जित इस्टेटीबाबतचे निर्णय तूर्तास दूर ढकलणे योग्य होईल. घरातील मोठ्या व्यक्तीची वेळीच काळजी घेणे योग्य होईल. परदेशागमनाचा योग्य येईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन ते प्रकाशझोतात येतील. घरामध्ये चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. कौटुंबिक सौख्य उत्तम प्रकारे लाभेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. एकंदरीत हा महिना मानसिक स्वास्थ्य देणारा आहे.

भाग्योदय होईल

lionसिंह ःआपल्या अनेक वर्षांच्या कटकटी व त्रास दूर होऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुनी येणी वसूल होतील. नवीन योजना सफल होतील. मात्र आनंद संयमाने द्विगुणित करावा. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. घरगुती वादविवाद शक्यतो वाढवू नयेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन ते प्रकाशझोतात येतील. नवीन वास्तू खरेदी योग आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे दृष्टांत खरे होतील. काळ सुखात जाईल.

सावधानता बाळगावी

kanyaकन्या ः ग्रहांची प्रतिकुलता पाहता आपण महत्वाच्या बाबतीत सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे आवश्यक आहे. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. शत्रुवर मात कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम प्रकारे लाभेल. पत्नीची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही जबाबदार्‍या स्विकारु नयेत. मानसिक ताण- तणावापासून दूर रहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. कवी, लेखक व कलाकार यांना प्रसिध्दी मिळेल. सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करणार्‍यांना अर्थलाभ होईल. काळ सुखाचा जाईल.

जबाबदार्‍या वाढतील

tulतुळ ः या महिन्यात जबाबदार्‍या वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा जास्त ताण-तणाव होण्याची शक्यता आहे. तरी मन शांत ठेवून व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने महत्वाची कामे करणे योग्य होईल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घेणे. ग्रहराज रवि या सर्वांतून व्यवस्थितपणे मार्ग काढेलच. घरगुती वाद वाढवू नयेत. आर्थिक आवक अपेक्षित होईल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढवून मान मिळेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

घाई नको

ruchikवृश्‍चिक ः कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय व नशिबात असल्याशिवाय मिळत नाही. वेळेचे आधी घाई करणे त्रासाचे होईल. ग्रहांची प्रतिकूलता याचा विचार करणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. गुरुकृपेने सर्वकाही ठीक होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळणेचा योग येईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. प्रवास योग येतील. इस्टेटीचे प्रश्‍न तूर्तास दूर ठेवणे योग्य होईल.

आवक वाढेल

dhanuधनु ःआर्थिक चणचण दूर होऊन आर्थिक आवक वाढणार आहे. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. जमीन- जुमल्याच्या व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. आनंद हा संयमाने द्विगुणित करणे योग्य होईल. थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. खर्च अनाठायी होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी चंचल आहे हे लक्षात ठेवणे योग्य होईल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. काळ सुखात जाईल. वाहनापासून जपावे.सुख

प्राप्ती होईल

makarमकर ः आपली निरपेक्ष लोकसेवा व अविरत श्रम यांचे चीज होऊन आपणाला सुखप्राप्ती होणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्‍न मार्गी लागतील. सौम्य भाषा वापरणे हितावह होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. शुक्र महाराजांच्या कृपेने उत्तम संसार सौख्य लाभेल. मात्र तब्ब्येतीची वेळीच काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी मिळेल.

यश लाभेल

kumbhकुंभ ः पदरमोड करुन दुसर्‍यावर उपकार करणारे आपण आहात. केलेलं कार्य खूप आहे, पण अपेक्षा जास्त नाही अशा प्रवृत्तीचे आपण आहात. या महात गुरुकृपेने आपणाला प्रसिध्दी, किर्ती व यश लाभणार आहे. मुलाबाळांचे बाबतीत उत्तम घटना घडतील. तीर्थयात्रा होतील. दैवी दृष्टांत खरे होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून आर्थिक लाभ होईल. अवघड कार्यात यश संपादन कराल. व्यक्तिमत्व उजळेल व प्रतिष्ठितांकडून चीज होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो.

व्यक्तिमत्व उजळेल

meenमीन ः ग्रहराज रवि आपले व्यक्तिमत्व उजळवण्यास समर्थपणे आपल्या पाठीशी उभा आहे. तेव्हा शनि, राहू व केतू याची भीती बाळगण्याचे कारण नाही. तुळेच्या शनिमुळे आर्थिक आवक अपेक्षित होईल. कठोर शनि आपणाला तब्बेतीची काळजी घेणेस सांगत आहेत. अनाठायी खर्च होण्याची संभावना आहे. तरी वेळीच काळजी घेणे जरुरीचे आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मुलाबाळांशी जमवून घेणे गरजेचे आहे. घरात शुभकार्य होईल.

मासिक राशिभविष्य - जुलै २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - जुलै २०१३
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य,
रत्नागिरी, मोबा. ९८६०८८८९९३

meshमानमुराद आनंद मिळेल
मेष ः

आपल्या कर्तृत्वाचं, बुध्दीमत्तेचं चीज होऊन आपणाला सामाजिक प्रतिष्ठा व मानमुराद मिळणार आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभून स्वास्थ्य लाभणार आहे. यातच भर म्हणून आपण हाती घेतलेल्या योजना पूर्णत्वाला जाऊन आर्थिक भरभराट होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना नवीन संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक वाढेल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. कोर्टकचेरीची कामे आपल्या बाजूने निकाल देतील. आनंद संयमाने द्विगुणित करावा.

rishabhव्यक्तिमत्व उजळेल
वृषभ ः

हा महिना आपले व्यक्तिमत्व उजळवणारा असून, आपल्याला अवघड कार्यातही यश संपादन करुन देणारा आहे. घरात मंगलकार्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन योजनेमध्ये भरघोस अर्थप्राप्ती होऊन समाधान लाभेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. कवी, लेखक, कलाकार यांना नवीन संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना सफल होतील. शब्द हे शस्त्र आहे, तरी जपून वापरणे गरजेचे अन्यथा शत्रू निर्माण होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. महिलांना वस्त्रलाभ होईल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. काळ सुखाचा जाईल.

धाडसी व्हावे
मिथुन ः

अखेर धाडस, बुध्दीमत्ता व श्रध्दा या गोष्टी अवघड कार्यात यश निर्माण करुन देणार्‍या आहेत. आपणावर गुरुकृपा झाली आहे. तेव्हा यश व कीर्ती प्राप्त होणारच आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभण्याची शक्यता आहे. शत्रूवर मात कराल. मुलाबाळांशी मिळत-जुळत घेणे आवश्यक आहे. सुशिक्षित बेकारांना रोजगार उपलब्ध होईल. अचानक धनलाभ संभवतो. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

सतर्क राहणे योग्य
कर्क ः

अति संपत्ती, प्रसिध्दी व उत्कर्ष झाला की दु:ख, संकट व कटकटी मागे लागतात. अशा वेळी सतर्क राहणे योग्य होईल. जुने इस्टेटीचे व्यवहार वैर निर्माण करण्याची शक्यता आहे. तेव्हा विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. या सर्वांतून माग काढल्यास श्रध्दा, सबुरी व उपासना उपयुक्त होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारीवर्गाने विचारपूर्वक गुंतवणूक करावी हेच योग्य होईल.

अपेक्षापूर्ति होईल
सिंह ः

गुरुकृपेने अवघड व अशक्य कामात सहज यश मिळतेच याची प्रचिती आपणास या महात येईल. अपेक्षित अर्थप्राप्ती, यश, कीर्ती इ. गोष्टी आपणाला आपल्या कर्तव्यपूर्तीमुळे मिळणार आहेत. मात्र आपल्या स्वत:च्या मताशी ठाम रहावे. कर्तृत्वाचं चीज होऊन सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित ठिकाणी बदली व उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित नफा होईल.

नियंत्रण हवे
कन्या ः

या महातील ग्रहस्थिती पाहता अनेक महत्वाच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. पूर्वी घेतलेले निर्णय त्रासदायक व आर्थिक नुकसानीत नेण्याची शक्यता आहे. अनेक खर्च आ वासून उभे राहतील. खर्चाची जुळवणी करताना त्रासदायक होण्याची शक्यता आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. या सर्वांवर मात करणेस धाडसी मंगळ, ग्रहराज रवि व गुरु हे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित धनलाभ होईल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल.

भाग्य उजळेल
तुळ ः

या महात आपणाला हव्या असलेल्या अपेक्षित घटना घडणार असून, आपले भाग्य उजळणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. साडेसाती असल्याने तब्बेतीची काळजी घ्यावी. शनि तुळेत असल्याने अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नवीन योेजना फलद्रुप होतील व त्यांना उच्चपद लाभेल. अति विचार करणे त्रासाचे होईल. व्यापारी वर्गाला उत्तम लाभ होतील. काळ सुखात जाईल.

सावधानता बाळगणे योग्य
वृश्‍चिक ः

ग्रहांची प्रतिकूलता व दैवाची साथ योग्य प्रकारे नसल्याने आपल्या प्रगतीच्या गाडीचा वेग मंद करणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कौटुंबिय सौख्य लाभेल. विचारपूर्वक निर्णय घेणे लाभाचे होईल. खर्चावर नियंत्रण हवे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे योग्य. वाहनापासून व आर्थिक व्यवहारापासून सावध रहावे. दैवी उपासनेवर भर द्यावा. शुक्र सर्व ठीक करणार आहे, तेव्हा काळजी नको.

अनंत हस्ते लाभ होतील
धनु ः

देणारा दाता भेटला तरी आपली झोळी नीट असावी. आपण बावनकशी सोने झाला आहात. सर्व कठोर परिक्षेतून व्यवस्थित पास झाले आहात. आता आपल्याला या सर्व मेहनतीची फळं घ्यायची आहेत. खरा व योग्य मार्ग सापडून आपण इच्छीत कार्यात यश मिळवाल. स्वास्थ्य लाभेल. सर्व सुख, यश, ऐश्‍वर्य इ. प्राप्त होऊन आपल्या जीवनात खर्‍या अर्थाने यश व भाग्याचा शिडकावा होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. व्यापारी  वर्गाला अपेक्षित फायदा होईल. जुने तंटे मिटतील. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. बेकारांना नोकरी प्राप्त होईल.

मात कराल
मकर ः

कष्ट, जिद्द व चिकाटी आणि बुध्दीमत्ता यांच्या जोरावर अवघड कार्यात यश लाभेल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. शत्रू मित्र बनतील. अनेक बाबतीत आपण आघाडीवर राहणार आहात. व्यक्तिमत्व उजळेल. सर्व कामे तब्ब्येत सांभाळुन करावीत. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. परदेशागमन योग येईल. व्यापार्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कौटुंबिक सौख्य लाभून काळ सुखात जाईल.

कष्ट संपतील
कुंभ ः

नि:स्वार्थ, निरपेक्षबुध्दी व निर्मळ मन हेच यशाच्या उच्च शिखरावर नेऊन बसवते याची प्रचिती आपणाला येईल. आता कष्ट संपले, सुखं घ्यावीत असा काळ आहे. आर्थिक समस्या सुटतील. आपली खरी किंमत कळेल. अन्यायाला वाचा फोडाल. अनेक वर्षांची इच्छापूर्ति होईल. दुरचे प्रवास योग आहेत. बेकारांना नोकरी लागेल. घरात उत्तम कार्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सामाजिक दर्जा वाढेल.

धाडसाने पुढे जावे
मीन ः

आपले कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांना योग्य तो वाव मिळेल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दीचे झोतात येतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. वाहनापासून सावध रहावे. शेतकरी वर्गाने जनावरांपासून काटेकोरपणे काळजी घ्यावी. शब्द कोमल वापरावेत. आपलं कर्तृत्व उजळून स्वास्थ्य लाभेल. घरगुती वाद वाढवू नयेत हेच इष्ट होईल. यश देणारा काळ आहे.

मासिक राशिभविष्य -जून २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य -जून २०१३
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी,
मोबा. ९८६०८८६९९३
 
व्यक्तिमत्व उजळेल
meshमेष ः

अखेर सच्चाईला न्याय मिळतोच. आपले कष्ट, जिद्द व चिकाटी कारणीभूत लागणारच व यशोदेवता आपल्याला माळ घालणारच हे निश्‍चित. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल. सामाजिक, राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

इच्छापूर्ति होईल
rishabhवृषभ ः

सच्चाई व सद्सद्विवेकबुध्दी यांना न्याय मिळून आपल्या पदरी यश पडेलच. अन्न शिजलं असलं तरी निवेपर्यंत थांबावेच लागते. काळजी करु नका. सर्व ठीक होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू खरेदी योग येईल. जुनी येणी वसुल होतील. सहकार्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात वाढ होऊन आवक वाढेल. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. सध्या विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. काळ सुखात जाईल.

इस्टेट लाभ होईल
mithunमिथुन ः

वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ आपणाला होणार आहे. दूरचे प्रवास संभवतात. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. गैरसमज दूर होऊन रेंगाळलेली कामे हातावेगळी होऊन स्वास्थ्य लाभेल. ताणतणाव दूर होऊन कौटुंबिक सुख लाभेल. स्वतंत्र व्यवसायात यश लाभून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यक्तिमत्व उजळेल. व्यापारी, कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल. मात्र वाहनापासून सावध रहावे.

उत्साह वाढेल
कर्क ः

cancerबर्‍याच काळातील आंतरिक इच्छा पूर्ण झाली की उत्साह वाढतो व ईश्‍वर जागा आहे याची जाणीव होते. सत्यता पूर्णपणे पटल्याशिवाय आपण खरं न मानणारे आहात. खर्च खुप वाढेल, परंतु योग्य कारणासाठी, तेव्हा काळजी नसावी. स्पष्टवक्तेपणा, ताठर भूमिका आणि सत्यप्रिय आपला स्वभाव आहे. त्याला थोडी मुरड घातल्यास सहज यश मिळेल. घरगुती वाद सध्या तरी दूर ठेवावेत. इस्टेटीचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल.

गर्व करु नका
lionसिंह ः

जग खूप मोठं आहे. तेव्हा थोड्याशा यशाने गर्व करणे उचित होणार नाही. पैशापेक्षा इतरही काही मोठं आहे याची जाणीव ठेवणे योग्य होईल. पैसा टिकवणे व योग्य मार्गी लावणे हितावह होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभणेचा योग आहे. दुसर्‍याला मोठेपणा देतो, तो मोठा होय. नवीन योजना सफल होतील. स्वत:च्या मनास पटेल तेच करावे हे योग्य होईल.

सावधानता बाळगा
kanyaकन्या ः

भरघोस यश व अतिउत्साह या दोन गोष्टी नाशालाही कारणीभूत होतात याची जाणीव ठेवा. परव्यक्तीच्या सहाय्याने मिळालेले यश चिरकाल टिकू शकत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. कलागुणांचा विकास होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारीवर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

आवक वाढेल
tulतुळ ः

या महात आपणाकडे अपेक्षित आवक होणार आहे. नवीन योजना फलद्रुप होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना रोजगार उपलब्ध होईल. कोणत्याही गतघटनेचा अतिविचार करु नये. परदेशागमन योग संभवतो. या महिन्याच्या उत्तरार्धात वाहनापासून सावध रहावे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित आर्थिक आवक लाभेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल.

आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करणे
ruchikवृश्‍चिक ः

या महात ग्रहांची अनुकूलता नसल्याने सावधानतेनेच वागणे इष्ट होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरुर आहे. नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. प्रत्येक बाबतीत गुप्तता राखणे जरुर आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. घरातील मोठ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देऊन त्यांची तब्येत सांभाळावी. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करणे इष्ट होईल.

मार्ग सापडेल
dhanuधनु ः

गेले अनेक महिने आपण ज्या समस्येचा विचार करीत आहात, ती समस्या लवकरच सुटणार आहे. भाग्य उदय अगदी जवळच आहे. तेव्हा अनेक बाबतीत आपण आघाडीवर राहून जटील समस्या दूर होणार आहेत. आर्थिक आवक अपेक्षित होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी लाभेल. परदेशागमन योग्य होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. विवाहइच्छंुंंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

खर्चावर नियंत्रण ठेवणे
मकर ः

अनेक प्रकारचे खर्च आपणासमोर उभे राहतील. तथापि वेळीच खर्चात काटकसर करणे योग्य होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. प्रतिष्ठित लोकांकडून मानमुराद मिळेल. कामाचं चीज होईल. तब्ब्येतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

प्रवास खूप होतील
कुंभ ः

हा महिना म्हणजे धार्मिक कार्यासाठी प्रवासाचा जाईल. अवघड कार्यात यश लाभेल. नातेवाईक व मित्रांचे सहकार्य उत्तम लाभेल. किर्ती व प्रसिध्दी लाभेल. आपलं कार्य, कर्तृत्व व दातृत्व यांचे चीज होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन योजना हाती घेऊन त्या फलद्रुप होतील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरी  लागेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली संभवते.

खर्चात कपात असावी
मीन ः

ग्रहांची प्रतिकूलता असली म्हणजे धाडसाने पुढे जाऊनही उपयोग होत नाही. अचानक खर्च उभा राहील, मात्र कलागुणांचा विकास होईल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. स्वतंत्र व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. तब्येतीची काळजी घेणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. बेकारांना नोकरीची सुवर्णसंधी येईल. घरात मंगलकार्य होऊन गृहिणींना वस्त्रलाभ होईल. काळ सुखात जाईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.

मासिक राशिभविष्य -मे २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य -मे २०१३
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८८९९३

meshयश लाभेल
मेष ः

आपला राशिस्वामी मंगळ हा ग्रह असून, आपण धाडसाने व कर्तृत्वाने अवघड कार्यात यश संपादन करणार आहात. आपले कर्तृत्व व नेतृत्व यशदायी होणार आहे. परदेशागमन योग संभवतो. विचारपूर्ण व अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयुक्त होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरगुती समस्या वाढविणारे ग्रहमान आहेत, तरी शांत राहून योग्य निर्णय घेणे उचित होईल. व्यापारी वर्गाला योग्य निर्णय घेणे उचित होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. प्रतिष्ठितांकडून आपल्या कार्याचा गौरव होईल.

rishabhनवीन वास्तु होईल
वृषभ ः

देव आणि दैव आपल्या बाजूचे असले म्हणजे भरभराट होतेच याची प्रचिती आपणास येईल. घरात मंगलकार्य होईल. कष्ट, बुध्दिमत्ता व कर्तृत्व यांचं चीज होऊन मनोकामना पूर्ण होतील. वाहनापासून मात्र सावध रहाणे गरजेचे आहे. वादविवाद टाळावेत. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. महिन्याच्या शेवटी विवाह जुळण्यास हरकत नाही. व्यापारी, कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

mithunकिर्ती लाभेल
मिथुन ः

बुध्दिमत्तेला धाडसाची साथ मिळाली की यश येतेच, हेच आपणाला या महिन्यात अनुभवास येणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभून हातून उत्तम कार्य होईल. दैवी उपासनेचे फळ मिळेल. घरगुती वाद वाढवू नयेत. नवीन योजना सफल होतील. सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय तेजीत चालेल. कलागुणांचा विकास होऊन किर्ती लाभेल.

cancerव्यक्तिमत्व उजळेल
कर्क ः

अखेर सच्चाई व बुध्दीमत्ता यांना न्याय मिळतोच याची प्रचिती आपल्या अनुभवास येईल. दैवी दृष्टांत खरे होतील. आपल्या हातून अनेक अवघड कामे सहजगत्या पार पडतील व आपले व्यक्तिमत्व उजळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. दूरचे प्रवास संभवतात. यश, किर्ती व प्रसिध्दी गुरुकृपेने लाभेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना गौरवाचे योग येतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. काळ सुखात जाईल.

lionअपेक्षापूर्ति होईल
सिंह ः

आपण शनिच्या साडेसातीतून पूर्ण मोकळे झाले आहात. तेव्हा आपण उत्कर्षाच्या लाटेवर विराजमान झालेले असून, अनेक क्षेत्रातील दैदिप्यमान यश आपणाला सुखावह होणार आहे. पैसा, किर्ती व प्रसिध्दी आली तरी संयमानेच वागणे उचित होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. जमीनजुमला खरेदी योग येईल. पैसा जपून वापरणे योग्य होईल. कलाकारांना उत्तम संधी लाभून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

kanyaसावधानता बाळगावी
कन्या ः

काळोखातून जाताना पावले उचलून टाकावीत. तसेच प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगावी. वाहनापासून सावधानता बाळगावी. आपण शनिच्या साडेसातीत आहात तरी शब्दावर सौम्यतेची झालर घ्यावी हेच योग्य होईल. दुरचे प्रवास टाळा व मौल्यवान वस्तू वेळीच सुरक्षित ठिकाणी ठेवा. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्वांवर मात करण्यास गुरुमहाराज समर्थपणे आपल्या पाठीशी उभे आहेत तेव्हा काळजीचे कारण नाही. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. थोरामोठ्यांचा सल्ला यश देण्यास उपयुक्त होईल.

tulप्रवाहाबरोबर जाणे
तुळ ः

प्रवाहाच्या विरुध्द दिशेला जाऊन आपले कर्तृत्व व दातृत्व उजळवता येत नाही. प्रतिकूल ग्रहमान माघार घेऊन पुढे जाण्यास सांगत आहे. सत्ता व पैसा विचारपूर्वक वापरणे योग्य होईल. शांत डोक्याने थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घेणे फायदेशीर होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. घरगुती समस्या वाढवू नयेत. लवकरच आपला भाग्योदय होणार आहे हे निश्‍चितच. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य.

ruchikस्तु खरेदी होईल
वृश्‍चिक ः

आपली पुण्याई व कष्ट फळाला येतील. नवीन वास्तु खरेदी योग संभवतो. घरात मंगलकार्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. भरघोस यश व किर्ती लाभेल. मनोकामना पूर्ण होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम अनुभव येईल.

dhanuतणाव दुर होईल
धनु ः

यश, किर्ती आणि अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन स्वास्थ्य लाभेल. ताणतणाव दुर होईल. नवीन वास्तू खरेदी होण्याचे योग आहेत. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल व अनेकांचे परदेशागमन होईल. हा महिना आर्थिक लाभ करुन देणारा आहे. एखादे लॉटरी तिकीट खरेदी करुन नशीब आजमावण्यास हरकत नाही. व्यवसायात वाढ होईल. अन्न शिजलेले आहे, फक्त निवेपर्यंत वाट पहावीच लागेल. उज्ज्वल भवितव्य लाभणारच याची खात्री बाळगा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

लौकिक वाढेल
मकर ः

अनेक प्रतिष्ठित व अनुभवी व्यक्तींकडून आपले कार्य व बुध्दीमत्ता यांचे कौतुक होऊन आपले नावलौकिक होणार आहे. मुलाबाळांच्या बाबतीत उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. कवी, लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. दूरचे प्रवास संभवतात. काळ सुखात जाईल.

kumbhप्रतिष्ठा वाढेल
कुंभ ः

आपल्या हातून झालेल्या सेवेचे फळ आपणाला मिळणार आहे. आपण दिलेला मदतीचा हात यशस्वी होईल. अनेकांची अडलेली कामे आपल्या शब्दाने मार्गी लागली आहेत. तपश्‍चर्येचं श्रेय व कष्टाला मिळालेली प्रतिष्ठितांकडून दाद आपणाला स्वास्थ्य मिळवून देईल. धाडसाला योग्य मार्ग मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक समस्या दूर होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. प्रतिष्ठा वाढेल व स्वास्थ्य लाभेल.

meenदृष्टांत खरे होतील
मीन ः

आपला राशिस्वामी गुरु आहे. तो यश व किर्ती देईलच. आपले स्वप्न, दृष्टांत खरे होऊन मन आनंदीत राहील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्येतीची वेळीच काळजी घेणे इष्ट होईल. गुरुकृपेने अवघड कार्यात यश संपादन कराल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. नवीन योजना सफल होतील. कलागुणांचा विकास होईल. काळ सुखात जाईल.

Page 6 of 7