Tuesday, Jan 23rd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - मार्च २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - मार्च २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३


नियंत्रण हवे
meshमेष ः

या महिन्यात संमिश्र स्वरुपाचे ग्रहमान असल्याने महत्वाचे बाबतीत नियंत्रण ठेवणे योग्य होईल. बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रत्येक महत्वाचे बाबतीत गुप्तता बाळगावी. बुध्दीकारक बुध उत्तम साथ देऊन आर्थिक आवक वाढवणारा आहे. घरच्या समस्या समंजसपणे सोडवाव्यात. तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. व्यापारी वर्गाला उत्तम अर्थप्राप्ती संभवते.

अपेक्षापूर्ती होईल
rishabhवृषभ ः

बहुतांशी बलाढ्य ग्रहांची आपणावर कृपादृष्टी असल्याने आपणाला अवघड कामांत यश लाभून व्यक्तिमत्व उजळणार आहे. जुनी येणी वसूल होतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद  लाभून स्वास्थ्य मिळेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन आर्थिक आवक वाढेल. व्यापारी, कारखानदारांना व्यवसायात  वाढ होऊन आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू खरेदी योग आहे. हा महिना भरभराटीचा व सुखात जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
mithunमिथुन ः

गुरुकृपा होऊन संपत्ती लाभ होईल. अनेक मनोकामना पूर्ण होतील. उत्तम कार्यासाठी प्रवास होईल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. घरातील वादविवाद वाढवू नयेत. मुलाबाळांशी मिळतजुळत घ्यावे. तब्येत सांभाळणे गरजेचे आहे. प्रवासात मौल्यवान वस्तू न नेणे योग्य होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाचे कामात गुप्तता ठेवणे योग्य होईल. नवीन वास्तूत प्रवेश होईल. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. विचारपूर्वक व थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घेणे योग्य होईल. काळ सुखात जाईल.

विचाराने वागावे
cancerकर्क ः

ग्रहमान प्रतिकूल असले की माघार घेऊनच पुढे जाणे योग्य होईल. घरातील वाद वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा वेळीच सावधानता बाळगावी. नातेवाईकांशी जपून व विचारपूर्वक वागणूक ठेवणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे हितावह होईल. तूर्तास विवाहइच्छुंनी विवाहाचा बेत थोडा पुढे ढकलावा. सामंजस्याची भूमिका घेतल्यास पदरी यश प्राप्त होईल. व्यापारी व कारखानदार यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. कोर्टकचेरीची कामे पुढे ढकलावीत.

शनिकृपा होईल
lionसिंह ः

अर्थदाता शनि व किर्तीदाता गुरु आपल्या अनेक मनोकामना पूर्ण करणारे आहेत. स्वतंत्र व्यवसायात यश लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा उंचावेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू व वाहन खरेदी योग आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक प्राप्ती वाढेल, मात्र अति उत्साह नको. धाडस योग्य ठिकाणीच करणे योग्य होईल. काळ सुखात व चैनीत जाईल.

विजय होईल
kanyaकन्या ः

बलाढ्य ग्रह जरी आपली परीक्षा घेणारे असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण बुध्दीकारक बुध हा आपला राशीस्वामी असल्याने आपणाला अवघड कार्यात यश मिळवून देईल. मात्र खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे योग्य होईल. अनाठायी आर्थिक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सामाजिक, राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी मोह टाळावा व वरिष्ठांची मर्जी संपादन करणेच योग्य. व्यापारी, उद्योगपतींनी विचारपूर्वक व्यापारात आर्थिक गुंतवणूक करावी. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. प्रत्येक महत्वाच्या व्यवहारात गुप्तता पाळावी हेच योग्य होईल.

शांत रहावे
tulतुळ ः

सध्या नवीन योजना व कोर्टकचेरीचे व्यवहार लांबणीवर टाकणेच योग्य होईल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. वाहन अत्यंत सावधानतेने चालवावे. धाडस उपयुक्त होणार नाही. सध्या शांत राहून गोडीगुलाबीने कठीण कार्यात यश संपादन करणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. दुरचे प्रवास टाळावेत. आर्थिक आवक अपेक्षित होईल. घरातील कलह वाढवु नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

सावध रहावे
ruchikवृश्‍चिक ः

संकट कधी सांगून येत नाही व त्याला सामोरे जाण्यास शक्ती, युक्ती, बुध्दी व मती पुरी पडतेच असे नाही. तेव्हा सध्याच्या काळात बलाढ्य ग्रह आपल्या नशिबाची परीक्षा घेणारे आहेत. अशा वेळी नम्रता, माघार व सौम्य धोरण वेळीच बाळगल्यास हानी होऊ शकणार नाही. प्रवासात व खेळात जपून रहावे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घेणे जरुरीचे आहे. शब्दांना गर्वाची झालर नसावी. या सर्वांवर मात करणेस केतु व बुध आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. काळ सुखात जाईल.

अपेक्षापूति होईल
dhanuधनु ः

ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पहात आहात, तो क्षण दारात येऊन ठेपला आहे. शिजलाय पण निवेपर्यंत थांबाच. आर्थिक ताणतणाव दूर होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. नवीन वास्तू योग आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना दृष्टांताने अनेक गोष्टींचा उलगडा होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

धनलाभ होईल
makarमकर ः

या महात आपणाला अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. मात्र तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन वास्तूत प्रवेश होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हातून उत्तम सामाजिक कार्य होईल व यश, किर्ती लाभून व्यक्तिमत्व उजळेल. परदेशागमन योग येईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. भाषाशैली उत्तम असणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवून वेळ पुढे ढकलावी. काळ सुखात जाऊन व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

सौख्य लाभेल
kumbhकुंभ ः

परोपकारी वृत्ती, निर्मळ मन व उदारता तसेच अध्यात्मिक दृष्टीकोन या सद्गुणांमुळे आता आपणाला खरे सौख्य लाभणार आहे. आता त्यागी जीवन सुखकर होऊन अनेक प्रतिष्ठित व्यक्तींत आपणाला मानमुराद मिळणार आहे. आपणावर खर्‍या अर्थाने गुरुकृपा होणार असून, मनोकामना पूर्ण होणार आहेत. दैवी दृष्टांत खरे होतील. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम व सुखाचा काळ जाईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सरकारी कर्मचारी व व्यापारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी लाभेल. नोकरीची नवीन संधी प्राप्त होईल.

धनलाभ होईल
meenमीन ः

बहुतांशी ग्रह जरी आपल्या विरोधात उभे असले तरी कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला धनलाभ व वस्त्रलाभ करुन देणारा आहे. विवाहइच्छुचे विवाह जुळतील. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. गुप्तता राखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. अध्यात्मिक उपासनेवर भर देणे योग्य होईल. जनावरांपासून शेतकरीवर्गाने दूर रहावे. लवकरच आपला भाग्योदय होईल.

मासिक राशिभविष्य - फेब्रुवारी २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशिभविष्य - फेब्रुवारी २०१४
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३
कार्यसिध्दी होईल
meshमेष ः

ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र व धाडसी मंगळ आपणाला आपल्या अवघड कार्यात यश देणारे आहेत. तेव्हा बुध्दीमत्ता व कर्तृत्व उजळून निघणार आहे. नवीन दर्जा व संपत्ती लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील व सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. घरात नवीन चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात आनंद व उत्साह राहील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शत्रू मित्र बनतील. प्रवास योग येतील. घरगुती समस्या वेळीच मिटवणे योग्य होईल.

भरभराट होईल
rishabhवृषभ ः

गुरुकृपा व ग्रहांची अनुकूलता यामुळे देव व दैव आपल्यावर यश, किर्ती, प्रसिध्दी यांची बरसात करणार आहे. अनेक सुखे प्राप्त होतील. नवीन वास्तू खरेदी योग आहे. सहकार्य उत्तम लाभेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद संभवते. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी व सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी येईल. मानमुराद मिळेल. कष्टाचं व श्रध्देचं फळ मिळून स्वास्थ्य लाभेल. व्यापारी वर्गातील व्यक्तींना कामाची व्याप्ती वाढून आर्थिक लाभ होतील.

धनलाभ होईल
mithunमिथुन ः

या महात वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक प्रवास योग येईल. स्वतंत्र व्यवसायाचे नवीन दालन खुले होऊन अपेक्षित आर्थिक लाभ होतील. विवाहइच्छुंनी मात्र विचारपूर्वक विवाह करणे योग्य होईल. उष्णतेचे विकार व गृहकलह होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नये. सर्व प्रकारची सौख्य व एैश्‍वर्य लाभणार आहेत. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन कलेचं चीज होईल. मुलाबाळांच्या तब्बेतीची वेळीच काळजी घेणे इष्ट होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करावे.

दर्जा उंचावेल
cancerकर्क ः

कर्तृत्व, बुध्दिमत्ता व कष्ट याचं चीज होऊन उच्च दर्जा प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. घरगुती समस्या वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी. चांगले विचार चांगली निर्मिती करतात. खेळाडूंना खेळात प्रावीण्य मिळेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे, तेव्हा वेळीच काळजी घेणे. स्वप्नदृष्टांत खरे होतील. अध्यात्मिक व्यक्तींना उत्तम ईशसेवेचा काळ आहे. शुक्रमहाराज नवीन संकट आणण्याच्या विचारात आहेत, तेव्हा सावधान रहावे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. थोरामोठ्यांचा सल्ला उपयुक्त होईल.

पुढे चला
सिंह ः

माणसाने उत्कर्षाच्या लाटेबरोबर पुढे जाणेच योग्य होईल. सर्व तर्‍हेची सुखे, आर्थिक लाभ, मानमुराद, नोकरीत यश इ. बाबी आपल्यासमोर उभ्या आहेत. तरी यांचा वेळीच लाभ घेऊन उत्तरार्धाची तरतुद करुन ठेवणे योग्य होईल. देव आणि दैव आपल्या बाजुने आहेत. साक्षात गुरुकृपा आपणावर झाली आहे. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक प्राप्ती अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थी व खेळाडू यांना यश लाभेल. अचानक धनलाभ संभवतो.

सावधानता बाळगावी
kanyaकन्या ः

शनि, मंगळ, राहू व केतू हे बलाढ्य ग्रह आपली परीक्षाच घेत आहेत. तेव्हा सावधानता बाळगणे इष्ट. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. वाहनांपासून सावध रहावे. मुलाबाळांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष पुरवावे. आर्थिक व्यवहार, कोर्टकचेरीची कामे शक्यतो पुढे ढकलणे योग्य होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे व माहे टाळणे आवश्यक आहे. घरातील कलह वेळीच थांबवावेत. फक्त शुक्र या सर्वांतून सुखरुप ठेवण्यास समर्थपणे आपल्या पाठीशी उभा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही.

सौख्य लाभेल
tulतुळ ः

शनि तुळेत उच्चीचा मानला जातो तेव्हा आपली आर्थिक बाजु भक्कम राहणार आहे. कलागुणांचा विकास करणारा शुक्र ऐश्‍वर्य व सौख्य प्राप्त करुन देणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय व शासकीय सेवेतील व्यक्तींना मानमुराद मिळेल. व्यापारी, कारखानदार  व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात आनंद वाढेल.  प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे योग्य होईल.

धनलाभ होईल
ruchikवृश्‍चिक ः

या महात आपणाला अचानक धनलाभ होऊन आर्थिक समस्या सुटणार आहेत. ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणार आहेत. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. सुख प्राप्त होऊन स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींना अपेक्षित स्थळी बदली मिळेल. जास्त दगदग व नवीन जबाबदार्‍या स्विकारणेचे टाळावे. अवघड कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच सावध रहावे. तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काळ ठीक जाईल.

ऐश्‍वर्य लाभेल
dhanuधनु ः

हा महिना आपणाला आर्थिक लाभ व ऐश्‍वर्य प्राप्त करुन देणारा आहे. आपला राशिस्वामी गुरु आहे. तेव्हा मंगलकार्यासाठी प्रवास, आर्थिक लाभ, नवीन वास्तूत प्रवेश व विवाहइच्छुंचे विवाह जुळून येतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. कवि, लेखक, कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होऊन प्रसिध्दी लाभेल. कारखानदार, व्यापारी यांच्या धंद्यात वाढ होऊन आर्थिक आवक अपेक्षित होईल. कलाकारांना प्रसिध्दी लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. जमीनजुमला खरेदी योग आहेत. परदेशागमन योग येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल.

नियंत्रण हवे
makarमकर ः

अनाठायी खर्चावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. पाहुणे मंडळी घरी येतील. आनंद द्विगुणित होईल. काळ सुखात जाईल. घरगुती समस्या व वादविवाद वेळीच मिटवणे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तसेच स्त्रियांना वस्त्रलाभ होईल. शत्रूपासून सावध रहावे तसेच तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. कवि, लेखक, कलाकार यांना उत्तम संी मिळून प्रसिध्दी मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. भाषाशैली उत्तम व गोड ठेवणे योग्य होईल. व्यापार्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

गुरुकृपा होईल
kumbhकुंभ ः

आपल्या राशीस्वामी शनि हा अर्थदाता आहे. तेव्हा आर्थिक समस्या दूर होणार आहेत. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. आपली ईश्‍वर भक्ती व लोकसेवा फळाला येईल. प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपला गौरव होईल. मात्र वाहनापासून सावध रहावे. व्यापारी, उद्योगपतीचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह उत्तमप्रकारे जुळतील. हा महिना अपेक्षापूर्ती करणारा जाईल.

मान मिळेल
meenमीन ः

ग्रहराज रवि आपणाला सामाजिक प्रतिष्ठा व मानमुराद मिळवून देणारा आहे. राजकीय व शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उष्णतेचे विकार व गुरांपासुन सावधानता बाळगावी. मंगळ घरात कटकटी निर्माण करणारा आहे. तसेच डोळ्यांना जपावे. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. विवाहइच्छुंनी विचारपूर्वक व सखोल माहितीशिवाय विवाह करु नये. शांत डोकं ठेवून विचारपूर्वक व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने महत्वाचे निर्णय घ्यावेत.

मासिक राशिभविष्य - डिसेंबर २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर
                       ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३
आर्थिक लाभ होतील
meshमेष ः

या महात धाडसी व पराक्रमी मंगळ आपणाला अनेक अवघड कार्यात यश देणार असून, तब्येत उत्तम राहणार आहे. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होऊन स्वास्थ्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. विवाहइच्छुंनी विचारपूर्वक विवाहाचा निर्णय घेणे उचित होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश, किर्ती व धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

सौख्य लाभेल
rishabhवृषभ ः

अत्यंत सुखी व समाधानी करणारे ग्रहमान आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण दशर्वते. कलागुणांचा विकास करणारा शुक्र अनेक प्रकारची सुखे व स्वास्थ्य लाभून देणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. वस्त्रलाभ व अर्थलाभ संभवतो. आर्थिक आवक अपेक्षित होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन किर्ती व प्रसिध्दी लाभेल. तूर्तास कोर्टकचेरीची कामे लांबणीवर टाकणे योग्य होईल. घरात उत्तम घटना घडतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद व किर्ती संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अपेक्षापूर्ती करणारा काळ आहे.

प्रवास योग येतील
mithunमिथुन ः

या सप्ताहात आपणाला अचानक दुरचे प्रवास योग येतील. संपत्तीलाभ व अनेक प्रकारची सुख प्राप्त होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळून येतील. सुखात व आनंदात दिवस जातील. खर्चावर नियंत्रण हवे. बुध्दीकारक बुध प्रतिष्ठित व्यक्तींकडून मानसन्मान मिळवून देईल. इस्टेटीचे व्यवहार तूर्तास दूर ठेवणे योग्य होईल. तब्येत सांभाळणे गरजेचे आहे. वेळीच दक्षता घ्यावी. सर्व प्रकारचे ऐश्‍वर्य प्राप्त होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

विजय प्राप्त होईल
cancerकर्क ः

कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांना धाडसाची झालर असेल तर विजय प्राप्त होतोच. अनेक प्रकारचे लाभ संभवतात. विवाहइच्छुंनी विचारपूर्वक व नीट माहिती काढूनच विवाह करणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. अतिआत्मविश्‍वासाने वाहन चालवू नये. घरातील व्यक्तींशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. सुशिक्षित बेकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुखावह काळ जाईल. लाभ होऊन स्वास्थ्य लाभेल.

गुरुकृपा होईल
lionसिंह ः

गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. त्याची कृपा होणे म्हणजे पूर्वपुण्याई फळाला येणे. जे जे मागाल ते ते मिळेल. यश, किर्ती, समृध्दी, मान व निरोगी आयुष्य आपणाला लाभणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह उत्तम प्रकारे जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवसायात भरघोस यश लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी व उद्योगपती यांनी आर्थिक गुंतवणूक करण्यास हरकत नाही. अपेक्षित यश लाभेल. सुखे प्राप्त होतील. उत्तम परिस्थितीचा चांगला उपयोग करणे आवश्यक आहे. काळ सुखात जाईल.

विचारपूर्वक वागावे
kanyaकन्या ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा अतिउत्साह न बाळगता विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य होईल. उष्णतेच्या विकारापासून सावध रहावे. तूर्तास कोर्टकचेरीची कामे व आर्थिक कामे दूर ठेवावीत. अति धाडस अंगलट येण्याची शक्यता आहे. मुलाबाळांशी मिळतजुळत घ्यावे. आर्थिक आवक अपेक्षित राहील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. थोरामोठ्यांचा सल्ला उपयुक्त होऊन काळ सुखात जाईल.

शांत रहावे
tulतुळ ः

ग्रहांची प्रतिकूलता असली म्हणजे नवीन कामे हातात घेणेच अयोग्य होईल. अनेक समस्या डोक्यात असल्या म्हणजे शांत राहणे व महत्वाचे निर्णय पुढे ढकलणे योग्य होईल. मात्र शुक्रमहाराज आपणाला अचानक धनलाभ व नवीन मित्र लाभून देणार आहेत. तसेच गुरुचीही कृपा आपणावर झाली असल्याने सर्व काही मनासारखे होऊन स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. वाहन जपून चालवावे. शक्यतो दूरचे प्रवास टाळावेत.

सौख्य लाभेल
ruchikवृश्‍चिक ः

शनिच्या साडेसातीची धास्ती घेण्याचे कारण नाही. कारण शनि तूळ या उच्च राशीत असून, तो आर्थिक लाभ देणारा आहे. अनेक प्रकारची सुखं देण्यास शुक्र तयार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तसेच केतू अचानक धनलाभ करुन देईल. इस्टेटीबाबतचे व्यवहार सफल होतील. मानसिक स्वास्थ्यही लाभणार आहे. तब्बेत उत्तम राहील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. एकंदरीत हा महिना स्वास्थ्य व लाभ देणारा जाईल.

क्षण आला भाग्याचा
dhanuधनु ः

कष्ट, दु:ख व आर्थिक समस्या यामुळे आपण बेजार झाला होतात, पण आताचा क्षण भाग्याचा व आर्थिक उत्कर्षाचा आहे. आपल्याला अनेक स्वास्थ्य देणार्‍या व आर्थिक प्रगती करणार्‍या अशा उत्तम घटना घडणार आहेत. तथापि, वेळेचा लाभ घेणे जरुर आहे. नवीन घरात प्रवेश होईल. आर्थिक उन्नती होऊन मनोकामना पूर्ण होतीलच. एखादे लॉटरी तिकीट घेऊन नशीब आजमावण्यास हरकत नाही. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेल. परदेशागमन योग आहे. हा महिना सुख, शांती व समृध्दी देणारा जाईल.

मात कराल
makarमकर ः

कर्तृत्व, बुध्दिमत्ता आणि सर्वांचे सहकार्य यामुळे अनेक अवघड परिस्थितींवर मात कराल. सर्व तर्‍हेची सुखे प्राप्त होतील. आनंद द्विगुणित होईल. परदेशागमन होईल. आर्थिक भरभराट होऊन नवीन योजना सफल होतील. मात्र तब्बेतीची वेळीच काळजी घेणे जरुर आहे. मित्रमंडळींशी मिळतजुळत घेणे आवश्यक. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

इच्छापूर्ति होईल
kumbhकुंभ ः

अनेक वर्षे हृदयात घर करुन राहिलेली मनोकामना या महात पूर्ण होऊन अपेक्षित सुख, शांती  लाभणार आहे. निर्मळ मन, निरपेक्ष बुध्दी व लोकसेवा या सद्गुणांचे चिज होणार आहे. अनेक सत्पुरुषांचे आशिर्वाद, ईश्‍वरी सेवा आणि उदार अंत:करण यामुळे आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होऊन मानसिक स्वास्थ्य लाभेल. स्वप्नदृष्टांत खरे होऊन सुख लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. हा महिना आपली इच्छापूर्ति करणारा आहे. आर्थिक उन्नती होईल. व्यापाराची वृध्दी होऊन अर्थप्राप्ती अपेक्षित होईल.

सल्ला घ्यावा
meenमीन ः

प्रतिकूल ग्रहमानात हातून अनेक चुका घडतात व त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी थोरामोठ्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणे योग्य होईल. सत्य असले तरी प्रिय असणे आवश्यक आहे. तेव्हा भाषाशैली मृदु ठेवणे आवश्यक आहे. विचाराने निर्णय घेणे उचित होईल. मुलाबाळांशी मिळतजुळत घ्यावे. या सर्वांवर मात करण्यास ग्रहराज रवि आपणाला उत्तम साथ देणारा आहे. तेव्हा काळजी नको. व्यक्तिमत्व व दर्जा उंचावेल.

वार्षिक राशिभविष्य- नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarवार्षिक राशिभविष्य- नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१४
रमेश बा. मावळंकर- ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

मेष
meshभरभराट होईल
     ही दीपावली व हे नुतन वर्ष आपणाला यश, किर्ती, भरभराट व अपेक्षित अर्थप्राप्ती करून देणेसाठी आपल्या दारात उभे आहे. त्याचे आनंदाने व हर्षभराने स्वागत करावे. धाडसी व पराक्रमी मंगळ आपले व्यक्तीमत्व उजळून अनेक अवघड प्रसंगात यश प्राप्त कराल. तब्येत उत्तम राहील. शत्रू मित्र बनतील. आर्थिक लाभ होतील. महिला वर्गात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने आनंदी वातावरण राहिल. शनि, राहुमुळे मानसिक दुर्बलता येण्याचे कारण नाही. उत्साही व कलागुणांचा विकास करणारा शुक्र अनेक प्रकारचे लाभ करून देईल. ग्रहराज रवि व किर्तीदाता गुरू आपले व्यक्तीमत्व उजळणार आहे. राजकीय, शासकीय व सामाजिक कार्य करणार्‍यांना उच्चपद मिळेल. घरगुती वाद वाढवू नयेत. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. मार्च १४ नंतर मंगळाची उत्तम साथ लाभून विजयी व्हाल. अनेक प्रकारचे आर्थिक लाभ होतील. ४ फेब्रुवारी १४ ते २९ मार्च १४ या काळात घरगुती वाद व समस्या यापासून सावध रहावे. बुद्धीकारणा बुधाची साथ उत्तम लाभेल. परदेशागमन योग येईल. दृष्टांत खरे होतील. उपासनेवर भर देणे योग्य होईल. खर्चावर नियंत्रण हवे. एकंदरीत हे नुतन वर्ष आनंद व उत्साह देणारे जाईल.

वृषभ
rishabhइच्छापूर्ती होईल

आपल्या राशीचा राशिस्वामी शुक्र आहे. हा कलागुणांचा विकास करणारा असून उत्साह वाढविणारा आहे. नुतन वर्षी शनि महाराज व किर्तीदाता गुरू हे बलाढ्य ग्रह आपणाला उत्तम साथ देणारे असून अपेक्षित अर्थप्राप्ती, अवघड कामात यश, प्रतिष्ठा, मानमुराद व अनेक क्षेत्रातील इच्छापूर्ती करणारे आहेत. नवीन वास्तू खरेदी योग आहे. अचानक संपत्ती लाभ संभवतो. विवाह इच्छुकांचे विवाह योग उत्तम प्रकारे जुळून येतील. कवि, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिद्धीचे झोतात येतील. नूतन वर्षी सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल व अनेकांना परदेशागमनाचा योग येईल. मार्च २०१४ मध्ये अनचाक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकिट घेऊन पाहणेस हरकत नाही. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. ग्रहराज रवि सरकारी क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व प्रसिद्धी देणारा आहे. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिला वर्गात उत्साही वातावरण राहिल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचे दृष्टांत खरे होतील. या नुतन वर्षी ‘अनंत हस्ते कमलावशने’ देण्यास देव व दैव तयार आहे. या उत्कर्षाच्या लाटेवरून पुढे जाणे योग्य होईल.

मिथुन
mithunव्यवसायात यश

आपला राशीस्वामी बुध हा आहे. तो बुद्धीचा कारक आहे. शनि, राहू, मंगळ हे ग्रह आपल्या विरोधात उभे असले तरी ग्रहराज रवि व केतू हे ग्रह आपले व्यक्तीमत्व उजळवण्यास आपल्या पाठिशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. या नुतन वर्षी आर्थिक व्यवहार जपून करावेत. भागिदारीत व्यवसाय न करणे उत्तम होईल. केतू मात्र अनेक प्रकारचे सौख्य व ऐश्‍वर्य प्राप्त करून देणारा आहे. जानेवारी २०१४ ला शुक्र संपत्तीलाभ व अनेक प्रकारची सुख देणारा आहे. ग्रहराज रवि नुतन वर्षी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तेव्हा तब्येत उत्तम राहिल. आर्थिक लाभ होऊन स्वास्थ लाभेल. नवीन दर्जा प्राप्त होणार असून अर्थप्राप्तीही होईल. लेखक व कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मुलाबाळांच्या तब्येतीची वेळीच काळजी घेणे. पत्नीशी मिळतं जुळतं घेणे आवश्यक आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होऊन स्वास्थ लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी येईल.

कर्क
cancerधनलाभ होईल

मन उद्दीपित व शांत ठेवणारा चंद्र आपला राशीस्वामी आहे. आपले अमोल कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व आपल्या यशाला कारणीभूत होईल. अध्यात्मिक उपासनेत वाढ होऊन आवश्यक असणारे दृष्टांत होतील. मात्र आर्थिक व्यवहार जपून व थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच करणे योग्य होईल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीकडे वेळीच लक्ष पुरवावे. भाऊबंदकीच्या वादापासून दूर राहणे योग्य. अचानक धनलाभ संभवतो. वडिलोपार्जित इस्टेट लाभ होईल. अनाठाई खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य. मार्च २०१४ ला घरातील मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी. या नुतनवर्षी अचानक धनलाभ होणार आहेत. गुरू नेहमी चांगले करतो. त्याची धास्ती घेण्याचे कारण नाही. मे-जून २०१४ ला विवाह इच्छूंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिद्धी व पैसा मिळेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. शनिमुळे पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वेळीच सावधानता बाळगावी. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घेणे उचित ठरेल. महिलावर्गात आनंदी वातावरण राहिल.

सिंह
lionसमृद्ध व्हाल

ग्रहराज रवि आपला राशिस्वामी आहे, तो रोगप्रतिकार शक्ती, उच्चपद, मानमुराद व व्यक्तीमत्व विकास करणारा आहे. हे नुतन वर्ष खर्‍या अर्थाने सुख-समृद्धी आर्थिक लाभ व मनोकामना पूर्ण करणारे आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अनेक उत्तम घटना घडून आयुष्याची घडी व्यवस्थित बसणार आहे. धाडस, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व ह्या सार्‍यांचं चीज होऊन जनमानसात व्यक्तीमत्व उजळून निघेल. आपणावर गुरूकृपा झाली असल्याने यश, किर्ती व समृद्धी आपणालाच यशोमाळ घालणार आहे. तेव्हा शांतपणे सुख घेणे महत्वाचे आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरात शुभकार्य होवून नवीन वास्तू खरेदी योग येतील. मे २०१४ नंतर अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. दैवी उपासकांची तीव्र इच्छा पूर्ण होईल. कवि, लेखक, कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिद्धी व पैसा मिळेल. शासकीय, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना बढती लाभेल. शेतकरी वर्गात आनंद, उत्साह वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह वाढेल. हे नुतन वर्ष आपली भरभराट व इच्छापूर्ती करणारे आहे.

कन्या
kanyaसंयम राखा

    आपला राशिस्वामी बुद्धीचा कारक बुध आहे. उत्तम वाचासिद्धी, धाडस, कलेची आवड व कर्तृत्व यामुळे आपण नेहमी यज्ञी होता. या नुतनवर्षी आपणाला वडिलोपार्जित इस्टेट लाभ होणार आहे. आर्थिक समस्या सुटून आपण नवीन व्यवसायात पदार्पण करणार आहात. आपले कर्तृत्व व नेतृत्व सामाजिक प्रतिष्ठा वाढवणार आहे. मात्र अनचाक खर्च उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वेळीच काळजी घेवून दक्षता बाळगावी. घशाचे विकार मार्च-एप्रिल २०१४ मध्ये होणार नाहीत याची काळजी खाण्या-पिण्यावर बंधन ठेवून बाळगावी. या नुतन वर्षी घरात उत्तम घटना घडून स्वास्थ्य व आनंद मिळेल. ग्रहराज रविमुळे मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. मुलाबाळांशी मिळतं जुळतं घेणे आवश्यक आहे. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक व मोठ्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घेणे जरूर आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवि, लेखक, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. शेतकरी वर्गात उत्साह राहिल. सावधानता बाळगून थोरांचा सल्ला घेऊन कठीण काम केल्यास यश आपल्या पुढ्यात येईल.

तुळ
tulसिद्धी प्राप्त होईल

तुळ ः आपला राशिस्वामी आनंद व उत्साह वाढविणारा शुक्र आहे. आयुष्यात पूर्व पुण्याईने व या जन्मीच्या पुण्याईने गुरू प्राप्त होतो. या नुतनवर्षी आपणावर गुरूकृपा होणार असून आपणाला अनेक प्रकारची सुख व ऐश्‍वर्य प्राप्त होणार आहे. शनिच्या साडेसातीची भीती बाळगण्याचे कारण नाही. सध्या शनि तुळेत म्हणजे उच्च राशित असल्याने आर्थिक समस्या दूर होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीचा व काहींना परदेशागमन योग संभवतो. अपेक्षित अर्थप्राप्ती व उत्तम मित्र मिळतील. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडून येतील. कलाकारांना उत्तम संधी मिळून प्रकाशझोतात येतील. शासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांचे व्यक्तीमत्व उजळेल. मात्र संयमाने व विचारपूर्वक कामांची आखणी करणे व कामात गुप्तता राखणे जरूर आहे. वाहनापासून व दूरच्या प्रवासापासून शक्यतो सावधान रहावे. एप्रिल २०१४ नंतर तब्येतीची काळजी घेणे व वाहनापासून सावध रहावे. कोर्टकचेरीचे निकाल लांबणीवर टाकावेत. गुरूकृपेने सारं काही ठीक होईलच. काळजीच कारण नाही. हे नुतन वर्ष मनोकामना पूर्ण करणारे जाईल.

वृश्‍चिक
ruchikविचारपूर्वक निर्णय घेणे

 आपला राशीस्वामी धाडसी व पराक्रमी मंगळ हा आहे. या नुतन वर्षी शनि, राहू गुरू हे बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात असले तरी काहीही काळजी करण्याचे कारण नाही. धाडसी मंगळ, उत्साह देणारा शुक्र आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. ते आपलं व्यक्तीमत्व उजणवणारच. अचानक धनलाभ व वस्त्रलाभ संभवतो. अखेर कर्तृत्व व बुद्धीमत्ता, संयम, चिकाटी यांना न्याय मिळतोच. ग्रहराज रवि एप्रिल २०१४ ला आपल्याला न्याय देणार आहेतच. तब्येत उत्तम राहिल. शत्रू मित्र बनतील. सुख व स्वास्थ्य लाभेल. मनोकामना पूर्ण होतील. दैवी दृष्टांत खरे होतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे आवश्यक आहे. दैवी उपासनेवर भर देणे आवश्यक आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कोर्टकचेरीचे निर्णय तूर्तास लांबणीवर ठेवणे योग्य होईल. विवाह इच्छुंनी माहिती घेऊन पत्रिका जुळल्यास विवाह करणे ठीक होईल. हे नुतन वर्ष थोडी खबरदारी घेऊन रहाणेची सूचना देणारे आहे.

धनु
dhanuराजमान्यता लाभेल

आपला राशिस्वामी गुरू असून नूतनवर्षी आपणावर गुरूकृपा होणार आहे. शनि, मंगळ, राहू व गुरूसारखे बलाढ्य ग्रह आपल्या पाठिशी आपल्या मनोकामना व आर्थिक समस्या दूर करणार आहेत. गत आयुष्यात घडलेल्या दुःखद प्रसंगाची स्मृति हृदयपटलावरून काढून टाकणे जरूर आहे. गुरू काय करीत नाही? अशक्य गोष्टीही शक्य करतो. सामाजिक प्रतिष्ठा, मानमुराद व आर्थिक उन्नती गुरू व शनिमहाराज करणार आहेत. तेव्हा आनंदी व उत्साही राहून पदरी यश पाडून घ्यावे हेच योग्य होेईल. सुशिक्षित बेकारांना नोकरी लाभेल. सरकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. अनेकांना परदेशागमन योग येईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. दूरचे प्रवास योग सफल होतील. कवि, लेखक, कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिद्धी व पैसा मिळेल. घरात मंगलकार्य झाल्याने महिलावर्गात उत्साह निर्माण होईल. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक उत्तम राहिल. एकंदरीत हे नुतन वर्श खर्‍या अर्थाने सुख समृद्धीचे जाईल.

मकर
makarविकास होईल

आपला राशिस्वामी शनिसारखा बलाढ्य अर्थदाता आहे. जेव्हा नुतनवर्षी आपणाला आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत. १४ मार्च २०१४ नंतर आपणाला महत्वाच्या पदावर काम करायचे आहे. नवीन जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतील. व त्यात यशस्वी व्हाल. मंगळ महाराज आपले व्यक्तीमत्व उजळणारे आहेत. गुरू महाराज आपणाला तब्येतीची काळजी घेणेची सूचना देत आहेत. विवाह इच्छुंचे विवाह उत्तम जुळतील. गृहसौख्य उत्तम लाभेल. नुतन वर्शी उत्तम आर्थिक लाभ होतील. तथापि अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कलाकारांना प्रसिद्धी व पैसा मिळेल. व्यापारी व कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. भाऊबंदकीपासून दूर रहाणे योग्य होईल. अनेक सामाजिक जबाबदार्‍या व नातेवाईक यांना सांभाळून घ्यावे लागेल. वादविवाद टाळावेत. हे नुतन वर्ष अनेक अपेक्षा पूर्ण करून स्वास्थ्य देणारे जाईल.

कुंभ
kumbhस्वास्थ्य लाभेल

आपला राशिस्वामी शनि हा बलाढ्य ग्रह आहे. या नुतन वर्षी आपल्याला अनेक प्रकारे आर्थिक लाभ होतील. स्वतःची पदरमोड करून निरपेक्ष बुद्धीने दुसर्‍यांना सुखी करणारे आपण आहात. आपले कष्ट, सौम्य धोरण व ईश्‍वरी उपासना खर्‍या अर्थाने फळाला येईल. गृहसौख्य उत्तम लाखेल. आपणावर गुरूकृपा झाल्याने यश, किर्ती, मानसन्मान व आर्थिक प्राप्ती होऊन स्वास्थ्य लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. आपण उत्कर्षाच्या लाटेबरोबर पुढे जाणेच योग्य होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. घरात उत्तम घटना घडतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांची व्यवसायात भरभराट होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. लेखक, कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन आर्थिक आवक वाढेल. अनेक इच्छा पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. हे नुतन वर्ष आपली भरभराट करणारे आहे.

मीन
meenप्रसिद्धी लाभेल

मीन ः आपला राशिस्वामी कीर्तिदाता गुरू आहे. बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे असले तरी काळजीचे कारण नाही. बुद्धीकारक बुध, उत्साही शुक्र, ग्रहराज रवि हे ग्रह आपणाला यश देणेस समर्थपणे पाठिशी आहेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. तुळेचा शनि असल्याने आर्थिक आवक वाढेल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच तब्येतीची काटेकोरपणे काळजी घ्यावी असे शनि, राहू, मंगळ सुचवतात. जून, जुलै २०१४ नंतर धाडसी मंगळ आपले कर्तृत्व उजळवणार आहेत. थोड्याशा अपयशाने नाराज होऊ नये हेच योग्य. यशस्वी आपणच होणार आहात याची खात्री बाळगावी. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिद्धी मिळून आर्थिक आवक वाढेल. शेतकरी वर्गाने मात्र जनावरांपासून सावध रहावे. कारखानदार, उद्योगपती व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशागमन योगही येईल. आपली इच्छापूर्ती करणारे नुतन वर्ष आहे.

मासिक राशीभविष्य- ऑक्टोबर २०१३

E-mail Print PDF
ramesh-mavalankarमासिक राशीभविष्य - ऑक्टोबर २०१३
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य,
                     रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

meshमेश ः सुखप्राप्त होतील
संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान असेल तरी या महात कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला संपत्तीलाभ व अनेक प्रकारची सुख प्राप्ती करून देणारा आहे. भाषा शैलीवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक आवक अपेक्षित राहील. कवि, लेखक, कलाकार यांच्या कलागुणांना वाव मिळून प्रसिद्धी व पैसा मिळेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. तब्येतीची काळजी घेणे जरूर आहे. नवीन जमीनजुमला खरेदी करणेचे योग आहेत. नव्या-जुन्या पिढीतील वाद वाढवू नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

rishabhवृषभ ः आर्थिक आवक वाढेल

हा महिना अनेक उत्तम घटना घडविणारा असून आपणाला अनेक प्रकारची सुख, संपत्तीलाभ, व्यवसायात वाढ इ. करून देणारा आहे. नवीन वास्तू व वाहन खरेदी योग येईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व प्रसिद्धी लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकिट घेऊन नशिब अजमावणेस हरकत नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महिलांनी तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

mithunमिथुन ः परदेशागमन होईल
या महिन्यात आपणाला दूरचे प्रवास संभवतात. आनंद संयमाने द्विगुणित करणे योग्य होईल. विवाह इच्छुकांनी नीट माहिती ज्ञात झाल्याशिवाय विवाह करू नयेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरणे योग्य होईल. घरात अनाठायी खर्च वाढेल तेव्हा वेळीच दक्षता घेणे उचित होईल. मुलाबाळांशी मतभेद वाढवू नयेत. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांशी मिळतं जुळतं घेणे लाभदायक होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. सर्व प्रकारची सुख व ऐश्‍वर्य प्राप्त होऊन काळ सुखात जाईल.

cancerकर्क ः विचाराने वागावे
रोम शहर एका रात्रीत उभारले गेले नाही तेव्हा एकदम मोठे व्हायची स्वप्न पाहू नयेत. राहू, शनि व गुरूसारखे बलाढ्य ग्रहांची आपणावर अवकृपा आहे याची जाणीव ठेवा. झटकन झालेली कामे पटकन नष्ट होतात. सावकाश परंतु हमखास यश लाभणेसाठी चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. भाऊबंदकी वाढवू नये. दैवी उपासनेवर भर द्यावा, अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कार्यात अडथळे आले तरी नाराज होऊ नये. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

lionसिंह ः कार्य-सिद्धी होईल

बलाढ्य ग्रहांची कृपा, देव आणि दैवाची साथ व थोरामोठ्यांचे आशिर्वाद आपणाला यश देणारच. अडचणींवर मात करत आपण पुढे जात आहात. आता माघार घ्यायची नाही. उत्कर्षाच्या लाटेवर आपण आरूढ आहात तेव्हा पुढे जाऊन प्रगती करायची आहे. या महात आपली अपेक्षापूर्ती होणार आहे. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. अनेक मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. व्यापारी उद्योगपती व कलाकारांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

kanyaकन्या ः ऐश्‍वर्य प्राप्त होईल

कलागुणांचा विकास करणारा शुक्र व किर्तीदाता गुरू आपणाला सर्व प्रकारची सुख व सांपत्तिक लाभ देणारा आहे. आर्थिक आवक वाढून वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. नवीन व्यवसायात यश व भरभराट होईल. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिद्धी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शाब्दिक घोटाळे होणेची शक्यता असल्याने भाषा शैलीत गोडवा ठेवावा. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या योजना सफल होतील.

tulतुळ ः विचारपूर्वक निर्णय घ्यावेत
काळोखातून जाताना धावत जावू नये अन्यतः भासदायक होते, तद्वतच अनुकुल ग्रहमान नसताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डोक्यात अनेक विचार व योजना त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. अचानक धनलाभ संभवतो. गृहसौख्य व सौभाग्य वृद्धिंगत होईल. आरोग्य उत्तम राहिल व लाभ होतील. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभून आर्थिक आवक वाढेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन स्वास्थ्य लाभेल.

ruchikवृश्चिक ः धनलाभ होईल
या महिन्यात आपणाला अचानक धनलाभ संभवतात. शत्रू मित्र बनतील. गैरसमज गैर मानले जातील. शनिची साडेसाती असली तरी शनि तुळ या उच्चराशीत आहे. तेव्हा अर्थलाभ होईल. जुन्या इस्टेटीचे कामात यश लाभून अर्थलाभ होईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. व्यक्तीमत्व उजळेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीत यश लाभेल. विवाह इच्छुकांचे विवाह उत्तम जुळतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या योजना सफल होऊन लोकसेवा घडल्याने स्वास्थ्य लाभेल. सरकारी नोकरदारांना अपेक्षित जागी बदली व बढती मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

dhanuधनु ः वैभव प्राप्त होईल
ग्रहमान अनुकुल असले तरी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून प्रगती करता येते. या महात याचीच प्रचिती आपणाला येणार आहे. नवीन वास्तू क़रेदी होईल. अनेक क्षेत्रात आघाडीवर रहाल. इस्टेटीतून आर्थिक लाभ होतील. यश, किर्ती, लाभ व स्वास्थ्य मिळणार आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व प्रसिद्धी मिळेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होवून आर्थिक आवक वाढेल. कष्टाचं चीज होईल. सौंदर्यप्रसाधनाच्या व्यापार्‍यांना व्यवसायात वाढ होऊन अर्थलाभ होईल. हा महिना सुख व स्वास्थ्य देणारा आहे.

makarमकर ः नियंत्रण हवे
आपल्या प्रगतीच्या गाडीला वेगात भरधाव पळविणे योग्य नाही. तिला ब्रेक लावावे लागतील. आपली प्रगती रोखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा विचारपूर्वक निर्णय घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल करणे योग्य होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. जुने आजार पुढे येणार नाहीत याची वेळीच काळजी घ्यावी. या सर्वांवर मात करणेस आपणाला ग्रहराज रवि पाठिंबा देणारे आहेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर टाकावीत. वाहनांपासून सावध रहावे. धनलाभ व वस्त्रलाभ होईल.

kumbhकुंभ ः कार्यसिद्धी होईल

अखेर थोडा वेळ लागला तरी आपल्याला अवघड कार्यात भरघोस यश लाभणार आहे. अनेक उत्तम घटना घडतील. व्यक्तीमत्व उजळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मुलगे व नातेवाईक यांचेकडून उत्तम सहकार्य लाभेल. जुने व्यवहार यशस्वी होतील. आपणाला प्रसिद्धी व किर्ती मिळेल. गुरु आपल्या कष्टाचं चीज करून, आपणाला उच्चपदी विराजमान करणार आहे. गर्भवतींना पुत्रप्राप्ती होईल. श्रद्धा, सबुरी व कष्ट यांचे चीज होईल. दूरचे प्रवासयोग आहेत. आर्थिक आवक वाढेल. विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीचे योग येतील. काळ सुखात जाईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल.

meenमीन ः प्रतिकुल ग्रहमान

या महिन्यात आपणाला प्रतिकुल ग्रहमानातून यश मिळवणेस मंगळ उत्तम साथ देणारा आहे. शत्रूंवर मात कराल. तब्येत उत्तम राहिल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. श्रद्धा वाढविणे गरजेचे आहे. नवीन योजना तूर्तास दूर ठेवणे योग्य होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. शुक्र अनेक प्रकारची सुख प्राप्त करून देईल. सावकाश पण हमखास यश संपादन कराल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. शांत रहाणे व नवीन योजना स्थगित करणे योग्य होईल.

Page 5 of 7