Tuesday, Jan 23rd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - फेब्रुवारी २०१५

E-mail Print PDF


ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

बंधनात रहावे
meshमेष ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह जरी आपली परीक्षा घेणारे असले तरी ग्रहराज रवि आपल्याला अवघड कार्यात यश देण्यासाठी आपणाला मदत करणारा आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. उष्णतेच्या विकारांबाबत वेळीच खाण्यापिण्यावर बंधन ठेवावे लागेल. स्वतंत्र व्यवसायात भरभराट होईल. शासकीय सेवेतील व्यक्तींनी काळजीपूर्वक व्यवहार व कामे करावीत व वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

उत्कर्ष होईल
rishabhवृषभ ः

आपण सध्या उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात. तेव्हा संधीचा वेळीच लाभ उठवणे योग्य होईल. कर्तृत्व, धाडस व बुध्दीमत्ता यांना वाव मिळेल व लाभ होतील. उत्तम घटना घडून मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. नवीन व्यवसायात भरभराट होईल. नवीन वास्तु खरेदी योग आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. काळ सुखात जाऊन उत्तम सहकार्य लाभेल.

किर्ती लाभेल
mithunमिथुन ः

कर्तृत्व, बुध्दीमत्ता व उपासना यांचे चीज होऊन किर्ती व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नशिब आजमावण्यासाठी एखादे लॉटरी तिकीट घेण्यास हरकत नाही. प्रतिष्ठित व्यक्तींकडून मानसन्मान मिळेल. कार्याचं चीज होईल. देव आणि दैव आपणावर खुश आहेत. महान कार्य हाती घ्याल व यश संपादन कराल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. स्वतंत्र व्यवसायात आर्थिक भरभराट होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. वडिलोेपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. काळ सुखात जाऊन मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मनोकामना पूर्ण होतील
cancerकर्क ः

अनुकुल ग्रहमान व दैवाची साथ यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. नवीन क्षेत्रात पदार्पण यशस्वी होईल. थोरामोठ्यांचे आशिर्वाद लाभतील. अनेक अवघड कामांत यश लाभून मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक भरभराट होईल. शासकीय सेवेतील व्यक्तींना बढती योग आहे. नवीन वास्तू खरेदी होईल. घरच्या व्यक्तींशी मिळतजुळत घ्यावे. अनेक प्रकारची सुखं लाभून स्वास्थ्य मिळेल. परदेशागमन योग येईल. काळ सुखात जाईल.

सावधानता बाळगावी
lionसिंह ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा महत्वाच्या व्यवहारात सावधानता बाळगणेच योग्य होईल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वाहन, वीज व गुप्त शत्रूंपासून सावध रहाणे योग्य होईल. आनंद संयमाने द्विगुणित करावा. मौल्यवान वस्तू प्रवासात नेऊ नयेत. घरगुती वाद वाढवू नयेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्येतीची वेळीच काळजी घेणे योग्य. महत्वाच्या आर्थिक बाबतीत गुप्तता पाळावी. कलागुणांचा विकास होईल. दैवी दृष्टांत खरे होतील. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

आर्थिक आवक वाढेल
kanyaकन्या ः

आर्थिक आवक वाढुन नवीन जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतील. मानसिक ताणतणाव वाढेल, तरी मन शांत ठेवून समस्या सोडवाव्यात. तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी. शत्रू मित्र बनतील. राहू- केतू तब्येतीला जपण्याच्या सूचना देत आहेत. खाण्यापिण्यावर बंधन ठेवावीत. घरात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी माघार घेऊनच पुढे जाणे व सौम्य भाषा वापरणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंनी पूर्ण खात्री झाल्याशिवाय विवाह करु नयेत. काळ उत्कर्षाचा आहे, पण कर्तृत्वाची परीक्षा घेणारा आहे.

आर्थिक लाभ होतील
tulतुळ ः

शनिच्या साडेसातीचे शेवटचे पर्व चालू आहे. तथापि, किर्तीदाता गुरु आपणाला अवघड कार्यात यश देऊन आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख वाढवणार आहे. आपणाला बुध्दिमत्तेची चुणूक दाखवता येईल. मान व प्रतिष्ठा वाढून सामाजिक दर्जा वाढेल. तब्येत उत्तम राहील. शत्रु मित्र बनतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कष्ट व कर्तृत्वाचं चीज होईल. नवीन व्यवसाय सुरु होईल. गुरुकृपेने अनेक उत्तम घटना घडून स्वास्थ्य लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंनी विवाह जुळवताना घाई करु नये. काळ सुखात जाईल.

भाग्य उजळेल
ruchikवृश्‍चिक ः

बलाढ्य ग्रह आपल्या बाजूने आहेत, तेव्हा सर्व प्रकारची सुखं, अर्थलाभ व स्वास्थ्य लाभेल. स्वतंत्र व्यवसायात भरघोस यश लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. शनिच्या साडेसातीचे दुसरे पर्व चालू आहे, तेव्हा शांत राहूनच प्रश्‍न मार्गी लावावेत. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकलणे योग्य होईल. कार्यात अडथळे आले तरी धाडसाने  दूर होतील. आर्थिक बाबींचे नवीन दालन सुरु होऊन जबाबदार्‍या वाढतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

स्वास्थ्य राखा
dhanuधनु ः

काळोखात धावत जाणे उचित होणार नाही. जपून व सावकाश जाणेच योग्य होईल. घरगुती अडचणी, आर्थिक गळचेपी व शारीरिक दौर्बल्य यामुळे मन शांत ठेवून ध्येय गाठणे उचित होईल. नवीन जबाबदार्‍या व नवीन योजना तूर्तास दूर ठेवाव्यात. खाण्या-पिण्यावर बंधन हवे. बुध्दीकारक बुध व ग्रहराज रवि आपणाला या सर्वांवर मात करण्यास आपल्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. कोर्टकचेरीचे निकाल लांबणीवर टाकावेत. मात्र आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नाहक प्रवासाला जावे लागेल. कलागुणांचा विकास होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्य उजळेल
makarमकर ः

देव आणि दैव आपल्याच बाजुने असल्याने अनेक अवघड कामांत यश लाभून आर्थिक उन्नती होईल. आपणाला स्वतंत्र व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. घरात उत्तम घटना घडून मानसिक स्वास्थ्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांचे चीज होईल. कलाकारांना उत्तम संधी लाभून अर्थप्राप्ती उत्तम होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. आपले भाग्य उजळून आपणाला मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. नवीन वास्तू खरेदी योग येईल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती लाभेल.

शांत रहावे
kumbhकुंभ ः

जी गोष्ट आपणाला मिळाली नाही, ती आपल्यासाठी नव्हतीच व जी आपणाला मिळाली आहे , ती फक्त आपल्यासाठीच होती असं मानलंत तरच समाधान लाभेल. कष्ट, जिद्द, चिकाटी सोडू नका. आत्मविश्‍वास वाढवा, असा सल्ला सध्याचे ग्रहमान देत आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मानसिक दुर्बलता झटकून टाकणे ईष्ट होईल. शब्द जपुन वापरावेत अन्यथा घोटाळे होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी प्रलोभनाला बळी पडू नये. प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना फलदायी होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भरभराट होईल
meenमीन ः

आपणाला अनेक प्रकारची सुखं लाभून आपली आर्थिक आवक वाढणार आहे. उत्तम घटना घडतील. धाडसी, पराक्रमी मंगळ अवघड कार्यात यश संपादन करुन देईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींना उच्चपद संभवते. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. परदेशागमन योग येईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. इच्छापूर्ती होऊन स्वास्थ्य लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

मासिक राशिभविष्य - जानेवारी २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

व्यक्तिमत्व उजळेल
meshमेष ः

निरपेक्ष बुध्दीची जनसेवा, ईश्‍वरी उपासना व थोरामोठ्यांचे आशिर्वाद यामुळे आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढून दर्जा उंचावणार आहे. गुंतागुंतीची कामे हातावेगळी होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक वाढेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध रहावे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रतिष्ठा वाढेल. इस्टेट लाभ संभवतो. व्यापारी व राजकीय तसेच सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती व उच्चपद संभवते.

सौख्य लाभेल
rishabhवृषभ ः

आता कष्ट संपले आहेत व सुखाचे मार्ग मोकळे झाले आहेत. आनंद, स्वास्थ्य व ऐश्‍वर्य लाभेल. इस्टेटीची कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक वाढेल. नवीन व्यवसायात यश लाभेल. मित्र व नातेवाईक यांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यक्तिमत्व उजळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुखं प्राप्त होतील. मानसिक दौर्बल्य झटकून टाकणे इष्ट होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मूळ घरापासून दूर जाण्याचा योग आहे. मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. काळ उत्तम जाईल.

व्यक्तिमत्व उजळेल
mithunमिथुन ः

यश, किर्ती, मानमुराद लाभून आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. अनेक अवघड कार्यात यश लाभेल. नवीन व्यवसाय सुरु होईल. नवीन वास्तू योग आहे. जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. घरगुती वाद वाढवू नयेत. वेळीच वाद सामंजस्याने सोडवावेत हे इष्ट होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. काळ सुखात जाईल. घरात उत्तम घटना घडतील.

परदेशागमन होईल
cancerकर्क ः

अचानकपणे परदेशागमन होईल. राहू कृपेने अनेक प्रकारची सुखं घ्याल. मात्र तब्बेतीची वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे. अनेक अवघड कार्यात यश लाभून स्वास्थ्य मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. खाण्यापिण्यावर बंधन असणे लाभाचे होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीच्या हाती घेतलेल्या योजना सफल होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जुनी येणी वसूल होतील. कोर्ट-कचेरीचे व्यवहार लांबणीवर टाकणे इष्ट होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे हितावह होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तूर्तास महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घेणे उचित होईल.

विचाराने वागा
lionसिंह ः

सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावणार आहे. अचानक आर्थिक बाबी पुढे येतील. घरगुती समस्या अचानक उद्भवतील. तथापि ग्रहराज रवि समस्यांवर मात करणेस आपल्या पाठीशी उभा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे. तब्बेतीची काळजी घेेणे जरुर आहे. थोरामोठ्यांचा सल्ला योग्यवेळी घेणे उचित होईल. अति आत्मविश्‍वास नको. मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास विजय मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. भागिदारीत व्यवसाय करु नये. अध्यात्मिक उपासना उपयुक्त होईल. संतांचा सहवास लाभेल. पोटाच्या विकारापासून वेळीच सावध रहावे. मुलाबाळांच्या तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी.

आवक वाढेल
kanyaकन्या ः

या महात आर्थिक आवक वाढणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. साडेसातीत घडलेल्या कठीण घटनांचा ठसा हृदयपटलावरुन काढून टाकावा. सध्या आपणावर शनि महाराजांची कृपा आहे. तेव्हा व्यवसायात वाढ करणे लाभदायक होईल. अनेक प्रकारची सुखं प्राप्त होतील. दैव आपल्या बाजुने आहे, तेव्हा आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. यश, किर्ती व मानमुराद मिळून स्वास्थ्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. गैरसमज दूर होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कष्टाचं व कर्तृत्वाचं चीज होऊन काळ सुखात जाईल.

धनलाभ होईल
tulतुळ ः

पैसा मिळणे कष्टाने साध्य होते. तथापि तो टिकवणे कठीण असते हे ध्यानात ठेवणे योग्य होईल. स्वजनांशी मिळतजुळत घ्यावे हेच लाभाचे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढून दर्जा उंचावेल. अनाठायी खर्च उभे राहतील, त्याची दक्षता घेणे जरुर आहे. परदेशागमन योग संभवतो. नवीन वास्तू खरेदी योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. स्वप्नदृष्टांत खरे होतील. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सौंदर्य प्रसाधनांच्या धंद्यात अपेक्षित लाभ होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक घटना घडतील.

अपेक्षापूर्ति होईल
ruchikवृश्‍चिक ः

शनिच्या साडेसातीचं मधलं पर्व चालू आहे. तरी घाबरण्याचे कारण नाही. सरळमार्गी माणसाला शनि त्रास देत नाही. राहू, केतू, रवि, बुध आपणाला उत्तम साथ देऊन प्रगतीपथावर नेणारे आहेत. अनेक प्रकारची सुखं, ऐश्‍वर्य प्राप्त होतील. दर्जा उंचावेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित पद लाभून स्वास्थ्य मिळेल. मात्र तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. गुरुकृपा झाली असल्याने अनेक गोष्टींचे निकाल आपल्या बाजूचेच होतील. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

यशस्वी व्हाल
dhanuधनु ः

अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन कष्टाचं चीज होईल. सामाजिक दर्जा वाढेल. शत्रू मित्र बनतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन वास्तूत प्रवेश होईल. धाडस व कर्तृत्व यांना उत्तम वाव मिळेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत हेच लाभाचे होईल. मानसिक ताणतणाव वाढू देऊ नये. आपला राशिस्वामी गुरु हा किर्तीदाता ग्रह आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. घरगुती समस्या वेळीच मिटवाव्यात. गुप्त व महत्वाचे व्यवहार सावधानतेनेच करावेत. वाद वाढवू नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

सौख्य लाभेल
makarमकर ः

देव आणि दैव अनुकूल असले की यश हे मिळतेच, याची प्रचिती या महात आपणाला येईल. आपण प्रगतीचे मार्गावर आहात, तेव्हा कोणतीही संधी गमावू नये. आर्थिक आवक, यश, किर्ती, मानमुराद आपल्याला मिळणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. प्रवास योग येतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. काळ सुखात जाईल.

विचाराने वागा
kumbhकुंभ ः

ग्रहमान नाराज असले की चांगले केलेले उपकारही वाईट दिसतात. आपली परोपकारी वृत्ती निर्मळ व शुध्द मन तसेच नि:स्वार्थी प्रेम हेदेखील क्लेशकारक होऊ शकते. तेव्हा नवीन जबाबदार्‍या न स्वीकारता शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. अध्यात्मिक उपासनेवर भर द्यावा. इस्टेटीचे व्यवहार जपून व संबंधितांच्या सल्ल्यानेच करणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल, परंतु अनाठायी खर्च उभे राहतील. तब्बेतीची काळजी घ्यावी. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होईल. धाडस, कर्तृत्व व बुध्दिमत्ता यांच्या जोरावर यश लाभेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.

दर्जा उंचावेल
meenमीन ः

आपला राशीस्वामी गुरु हा किर्तीदाता ग्रह आहे. सध्या आपणावर गुरुकृपा झाली आहे. तेव्हा महत्वाची जटील कामे सहज हातावेगळी होतील. अनेक क्षेत्रात आपण आघाडीवर राहणार आहात. आनंद संयमानेच द्विगुणित करणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. मुलाबाळांच्या बाबतीत उत्तम घटना घडतील. राजकीय, सरकारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. आर्थिक आवक अपेक्षित होईल.

मासिक राशिभविष्य - डिसेंबर २०१४

E-mail Print PDF
मासिक राशिभविष्य - डिसेंबर २०१४
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

संयम हवा
meshमेष ः

हा महिना आपली सत्वपरीक्षा घेणारा आहे. तरी नवीन योजना हाती न घेता व्याप वाढवू नये. बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा विचाराने व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणे उचित होईल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाच्या कामात जास्त लक्ष केंद्रीत करावे व वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. घरातील वादविवाद वेळीच मिटवावेत. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. इस्टेटीचे व्यवहार मार्गी लागून आर्थिक आवक अपेक्षित होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. शांत राहिल्यास मनोकामना पूर्ण होतील.

लाभ होईल
rishabhवृषभ ः

बुध्दीकारक बुध व कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपल्या अनेक इच्छा पूर्ण करणारे आहेत. हे जरी असलं तरी बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. मोहाला बळी पडू नये. तब्बेतीची काळजी घ्यावी. कामात अडथळे आले तरी नाराज होऊ नये. केतूकृपेने ऐश्‍वर्य प्राप्त होईल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मनोदौर्बल्याला झटकून टाकावे. खर्चावर नियंत्रण हवे. काळ उत्तम जाईल.

आवक वाढेल
mithunमिथुन ः

या महात आपली आर्थिक आवक वाढणार आहे. नवीन योजना हाती घेऊन त्या सफल होतील. आपले कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांचे चीज होऊन सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. कौटुंबिक समस्या वेळीच आटोक्यात आणणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी वर्गाला उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. ईश्‍वरी उपासनेचं फळ मिळेल. वाहन सावधगिरीने चालवणे योग्य होईल. काळ सुखात जाईल.

यश लाभेल
cancerकर्क ः

सौंदर्य प्रसाधने, टेलरिंग, डेकोरेशन इ. क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. नवीन योजना हाती घ्याल. आपले व्यक्तिमत्व प्रतिष्ठित लोकांत उजळून निघेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अचानक जुनी येणी वसूल होतील. नवीन पिढीशी मिळतजुळत घेेणे आवश्यक आहे. स्पष्टवक्तेपणा शक्यतो टाळावा. डोळ्यांची काळजी घेणे जरुर आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. खेळात प्रावीण्य मिळेल. नवीन क्षेत्रात पदार्पण करुन आनंद मिळवाल. अवघड कार्यात यश लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल.

विजयी व्हाल
lionसिंह ः

अखेर आपले कष्ट, जिद्द व चिकाटी यांना यश लाभेलच. नवीन व्यवसायात अपेक्षित  अर्थप्राप्ती होईल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरात उत्तम घटना घडतील. महिलांना वस्त्रलाभ होईल. घरच्या कटकटी वाढण्याची शक्यता आहे. त्यांना वेळीच आवरा. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होईल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजुने लागतील. जमीन खरेदी योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

भरभराट होईल
kanyaकन्या ः

या महात आपणावर शनिकृपा होणार असून, अनेक अवघड कार्यात यश संपादन कराल. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. ताणतणाव वाढवू नयेत. काळ व वेळ आपल्याच बाजूचे आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. नवीन संधी सोडू नये. तब्बेतीची काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. नवीन योजना हाती घेऊन यशस्वी होतील. एकंदरीत हा महिना भरभराट करणारा आहे.

दर्जा वाढेल
tulतुळ ः

आता शनिच्या साडेसातीचे तिसरे पर्व चालू झाले आहे. तेव्हा आपण प्रगतीपथावर राहणार आहात, नवीन मार्ग सापडतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. धाडस व पराक्रम योग्य दिशेने केल्यास यश पदरी पडेल. ऐश्‍वर्य प्राप्त होऊन अनेक घटना मनासारख्या घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तब्बेतीची काळजी घेणेसाठी बंधनात राहणे योग्य होईल. राजकीय व शासकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्व उजळेल. आर्थिक आवक वाढेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित धनलाभ संभवतो. घरात उत्तम घटना घडून काळ सुखात जाईल.

धनलाभ होईल
ruchikवृश्‍चिक ः

शनिच्या साडेसातीची धास्ती घेण्याचे कारण नाही. धाडसी, पराक्रमी मंगळ आपले व्यक्तिमत्व उजळवणार आहे. पूर्ण आत्मविश्‍वासाने अवघड कार्यात यश लाभेल. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन  अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. व्यापारी, कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन योग संभवतो. सुशिक्षित बेकारांना नोकरीचा योग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करावे. काळ आपल्या बाजूने आहे. नवीन संधी सोडू नये.

थांबा व पहा...
dhanuधनु ः

आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहात, तो क्षण जवळ आला आहे. शिजलाय पण निवायला हवेच. आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपण सदाचारी व निष्पाप वृत्तीचे आहात. आपली ईश्‍वरी सेवा आपणाला मेवा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. शनि सरळमार्गी माणसाला त्रास देत नाही. आपणाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. तसेच वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. आपला दर्जा वाढेल. श्रध्दास्थान वाढवावे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व उजळेल. लवकरच आपण उत्कर्षाच्या लाटेवर  आरुढ होणार आहात. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

इच्छापूर्ति होईल
makarमकर ः

आपले कष्ट संपले आहेत. आता सुखं लाभतील. बहुतांशी बलाढ्य ग्रह आपले नशीब उजाडण्यास आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. अनेक प्रकारची सुखं व धनलाभ आपणाला होतील. सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा वाढेल. घरात उत्तम घटना घडतील. संतांचा सहवास लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. नवीन योजना हाती घ्याल व यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भरभराट होईल
kumbhकुंभ ः

पहाट झाली की उजाडतेच हा निसर्ग नियम आहे. तसेच कष्ट संपले की भाग्य उजळतेच. हा महिना आपणाला अनेक सुखं प्राप्त करुन देणारा आहे. अध्यात्मिक उपासना सुखदायक होईल. प्रतिष्ठितांकडून गौरव होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानमुराद लाभून सुख व स्वास्थ्य प्राप्त होतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. आपण अनेकांच्या विश्‍वासाला पात्र होणार आहात. स्वप्न, दृष्टांत खरे होऊन स्वास्थ्य लाभेल.

संधी उपलब्ध होईल
meenमीन ः

या महात आपणाला नवीन संधी उपलब्ध होणार आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. संधीचा लाभ वेळीच घ्यावा. आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मानसिक ताणतणाव दुर होऊन स्वास्थ्य लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीचा योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मुलाबाळांचे बाबतीत उत्तम घटना घडून काळ सुखात जाईल.

मासिक राशिभविष्य - ऑक्टोबर २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

लाभ होतील
meshमेष ः

या महिन्यात आपणाला अनेक प्रकारचे लाभ होणार आहेत. वडिलोपार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. निरनिराळे लाभ होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची नवीन संधी लाभेल. बुध्दीकारक बुध आपल्या बुध्दिमत्तेचं चीज करेल. शारीरिक व मानसिक दौर्बल्य झटकून टाका. नवीन व्यवसायात लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. खाण्या-पिण्याचे बंधन पाळणे आवश्यक आहे. अप्रिय विषय टाळावेत. आर्थिक आवक अपेक्षित होईल. व्यापारी, उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. परदेशागमन योग येईल. ध्येय, धोरण आखून प्रयत्न केल्यास यश लाभेल.

ऐश्‍वर्य लाभेल
rishabhवृषभ ः

आर्थिक अडचणी दूर होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वतंत्र व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल व त्यात यश लाभेल. नातेवाईकांशी मिळत जुळत करुन घेणे आवश्यक. अनेक प्रकारची सुखं लाभून काळ आनंदात जाईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक वाढेल. जुनी येणी वसूल होतील. सुुशिक्षित बेकारांना नोकरीची नवीन संधी उपलब्ध होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

दर्जा वाढेल
mithunमिथुन ः

सामाजिक प्रतिष्ठा वाढून आपला दर्जा उंचावणार आहे. आपली बुध्दीमत्ता, कर्तृत्व व सामाजिक कार्याचं चीज होणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. बराच कालावधीत रेंगाळलेली महत्वाची कामे मार्गी लागतील. सुख व स्वास्थ्य लाभेल. गुरुकृपेने मनोकामना पूर्ण होतील. मात्र घरच्या जबाबदार्‍या वाढणार आहेत. अचानक धनलाभ संभवतो. जमीन- जुमला व इस्टेटीची कामे मार्गी लागतील. सामाजिक व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होऊन व्यवसायात वाढ होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अपेक्षापूर्ती होईल. घरात नवीन चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्ग आनंदी होईल.

सौख्य मिळेल
cancerकर्क ः

या महिन्यात आपल्या सुखात वाढ होणार असून, आपणाला अपेक्षित अर्थलाभ होणार आहे. शब्दाला धार नसावी तर आधार असावा म्हणजे मनं जोडली जातात. दूरचे प्रवास योग येतील. भावंडांशी जुळवून वागणे इष्ट होईल. इस्टेटीची कामे मार्गी लागतील. कार्यात अडथळे आले तरी घाबरुन जाऊ नका. यश आपलेच आहे. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित जागी बदली मिळेल. अडलेली महत्वाची कामे मार्गी लागतील. शत्रूवर मात कराल. नवीन जमीन खरेदी योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

झाले मोकळे आकाश
lionसिंह ः

आर्थिक व मानसिक त्रासाचे ढग मोकळे झाले आहेत. देव व दैव आपल्या बाजुचे आहे. काळाचा महिमा ओळखून वेळेचा वेळीच लाभ घेणे उचित होईल. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. सामाजिक प्रतिष्ठा वाढून अवघड कार्यात यश संपादन केल्याने स्वास्थ्य लाभेल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे. काळ सुखात व उत्कर्षाचा जाईल.

आत्मविश्‍वास वाढवा
kanyaकन्या ः

आता शनिच्या साडेसातीची धास्ती घेण्याचे कारण नाही. शनि महाराज आपलं गेलेलं परत घ्यायला आले आहेत. साडेसातीमधील चुका हृदय पटलावरुन काढून टाका. स्वच्छ मनाने व निधड्या छातीने व पूर्ण आत्मविश्‍वासाने यश संपादन करुन घ्या. उत्साह, आनंद वाढवा. अचानक धनलाभ संभवतो. आपणावर गुरुकृपा झाली आहे. तेव्हा अपयश विसरुन जाणे योग्य होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकाराला नवीन संधी प्राप्त होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. आपल्या कर्तृत्वाचे व बुध्दीमत्तेचे चीज होईल. ताणतणाव वाढवू नयेत. चांगले विचार यश देतील. तणाव वाढवू नयेत. चांगले विचार यश देतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल. काळ आपल्या बाजुने आहे.

सावध रहावे
tulतुळ ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. तेव्हा अशा वेळी शांत राहून, विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य होईल. कोर्टकचेरी व जमीन- जुमल्याची कामे तूर्तास दूर ठेवणे इष्ट होईल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. एकटा केतू आपणाला सुख व धनलाभ देणारा आहे. तथापि तूर्तास जबाबदार्‍या न स्वीकारणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. दैवी उपासना अशा वेळी उपयुक्त होईल. विचारपूर्वक विवाह करावा. आर्थिक लाभ अपेक्षित होतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

न्याय मिळेल
ruchikवृश्‍चिक ः

शनिची साडेसाती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. साक्षात गुरु महाराज आपणावर वरदहस्त ठेवून आहेत. तेव्हा अनेक सुखे प्राप्त होऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण कराल. लाभदायक होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. स्वतंत्र व्यवसायात यश मिळेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. मात्र मोहाला बळी पडू नये. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित धनलाभ होईल. शांतपणे, विचारपूर्वक कठीण कार्यात यश संपादन करणे योग्य होईल.

इच्छापूर्ति होईल
dhanuधनु ः

ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पहात आहात, तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपलाय. शिजलाय पण निवेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. आपल्या आर्थिक व सामाजिक समस्या दूर होणार आहेत. आपणाला नवीन दर्जा व संपत्ती लाभ होणार आहे. जमीन जुमल्याची कामे मार्गी लागतील. आपले कष्ट, सच्चाई व दैवी उपासना यांचे फळ मिळणार आहे. दृष्टांत खरे होतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित जागी बदली होईल. नवीन वास्तूत लवकरच प्रवेश कराल. शब्द जपून वापरावेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाऊन स्वास्थ्य लाभेल.

सौख्य लाभेल
makarमकर ः

आरोग्य उत्तम राहील. बहुतांशी बलाढ्य ग्रह आपल्या बाजूने असल्याने अनेक प्रकारची सुखं लाभतील. मन प्रसन्न राहील. मंगल कार्यासाठी प्रवास योग येईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. घरात उत्तम घटना घडतील. मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा लोककल्याणासाठी कराल. प्रतिष्ठा वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.  आनंद संयमाने द्विगुणित करणे इष्ट होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कष्टाचं व कर्तृत्वाचं चीज होईल. नवीन चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जाऊन स्वास्थ्य लाभेल.

उपासना करावी
kumbhकुंभ ः

हजारो रोगांवर एकच औषध म्हणजे दैवी उपासना होय. आपली निर्मळ व निरपेक्ष बुध्दीची सेवा आपणाला यश देईलच. तथापि श्रध्दा, आस्था अजुन वाढवणे गरजेचे आहे. १०/१५ वर्षांने लावलेले रोपटे फळ देते, तेव्हा उपासनेत खंड पडू देऊ नये.  अडथळे हे परीक्षा घेत असतात, शहाणपण शिकवतात, तेव्हा धाडसाने पुढे जायचं असतं. ग्रह साथ देतीलच. हिंमत असेल तर किंमत होतेच. पुढे चला. खर्चावर नियंत्रण आवश्यक. तब्येतीची काळजी घेणे जरुर आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मानमुराद मिळेल. काळ सुखात जाईल.

इच्छापूर्ति होईल
meenमीन ः

गुरुकृपा झाल्यावर अशक्य ते शक्य घडून यश लाभतेच याची प्रचिती आपणाला या महात होईल. मुलाबाळांचे बाबतीत उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त होईल. मानसिक ताण दूर करणे इष्ट. तसेच तब्बेतीची वेळीच काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. रुचेल तेच बोलावे व पचेल तेच खाणे जरुरीचे आहे. काळ सुखात जाईल.

मासिक राशिभविष्य - सप्टेंबर २०१४

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
meshमेष ः

वडिलोपार्जित इस्टेटीतून धनलाभ संभवतो. घरात उत्तम घटना घडतील. भावंडांशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. शेतकरी वर्गाने जनावरांपासून काळजी घ्यावी. ग्रहराज रवि आपल्याला उत्तम साथ देऊन गैरसमज दूर करुन सौख्य देणारे आहेत. नातेवाईक व मित्र सहकार्य उत्तम लाभेल. आवक वाढून स्वास्थ्य लाभेल. विवाह जुळतील.

सुखात वाढ होईल
rishabhवृषभ ः

आपले कष्ट, सच्चाई व निरपेक्ष बुध्दीची लोकसेवा यांचं चीज होऊन आपल्या सुखात वाढ होणार आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सर्व प्रकारची सुखं आपल्याला मिळतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. जागेचा प्रश्‍न सुटेल. दगदग जास्त करु नये. तब्बेतीची काळजी घ्यावी. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. केतुकृपेने सर्व प्रकारचे ऐश्‍वर्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. प्रतिष्ठा वाढून जनमानसात सन्मान लाभेल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्य उजळेल
mithunमिथुन ः

ज्या कामाची आपण आतुरतेने वाट पहात होता, ते काम सहजगत्या पार पडेल. आनंद व स्वास्थ्य लाभेल. यश, किर्ती व प्रसिध्दी लाभेल. नवीन योजना हाती घेऊन त्यात यश मिळवाल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. जमिनजुमला खरेदी योग आहेत. स्वतंत्र व्यवसायात आर्थिक आवक वाढेल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजुने लागतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. अनेक प्रकारची सुखं लाभून काळ सुखात जाईल.

गमन होईल
cancerकर्क ः

या महात आपणाला दूरचे प्रवास संभवतात. अचानक धनलाभ संभवतो. ताणतणाव दूर होऊन स्वास्थ्य लाभेल. जनमानसात आपला दर्जा वाढेल. शत्रू मित्र बनतील. राहू कृपेने आर्थिक आवक वाढेल व जुनी येणी वसूल होतील. सुशिक्षित बेकारांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होऊन अनेकांना परदेशागमन योग येईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांची आर्थिक आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल.

सुखं प्राप्त होतील
lionसिंह ः

पहाट झाली की उजाडते, हा निसर्ग नियम आहे. तसेच कष्ट, श्रध्दा व सबुरीमुळे आपला भाग्योदय होणारच. नवीन क्षेत्रात पदार्पण होईल. आर्थिक आवक वाढेल. मात्र महत्वाचे बाबतीत थोरामोठ्यांचा सल्ला उपयुक्त होईल, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. मंगळ मानसिक स्वास्थ्य उडवेल. तरी विचारानेच निर्णय घेणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. अध्यात्मिक उपासनेवर भर देणे योग्य. विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

दर्जा उंचावेल
kanyaकन्या ः

आपलं धाडस, कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांचं खर्‍या अर्थाने चीज होऊन जनमानसात आपला दर्जा उंचावणार आहे. गुरुकृपेने अनेक अवघड समस्या दूर होणार आहेत. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. खेळाडू यशस्वी होतील. साडेसातीत झालेले आर्थिक व मानसिक नुकसान भरुन निघेल. अचानक धनलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. तब्बेतीची वेळीच काळजी घेणे जरुर आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धनलाभ होईल
tulतुळ ः

अध्यात्मिक उपासनेचे फळ उशिरा का होईना, पण चांगलेच मिळते. झटकन होणारी कामं पटकन नष्ट होतात व उशिरा होणारी कामं चिरकाल टिकतात. धनलाभ व वस्त्रलाभ होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. आर्थिक आवक वाढेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. अनेक तर्‍हेची सुखं प्राप्त होतील. अनाठायी खर्चावर व तब्बेत ठीक राहील याकडे वेळीच लक्ष पुरवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल.

सौख्य लाभेल
ruchikवृश्‍चिक ः

शनि, मंगळ व केतु हे बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. साक्षात गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तेव्हा सर्व समस्या दूर होऊन सौख्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अचानक खर्च उभा राहण्याची शक्यता आहे. गुरुकृपेने सौभाग्य सिध्दी लाभेल. जनमानसात दर्जा उंचावेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. घरात उत्तम घटना घडतील. व्यापारी वर्गाला विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल.

अपेक्षापूर्ति होईल
dhanuधनु ः

शनि कृपेने अपेक्षित अर्थप्राप्ती व सुखं लाभतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. उष्णतेच्या विकाराने त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. जुनी येणी वसूल होतील. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होऊन स्वास्थ्य मिळेल. आपल्या कष्टाचं, कर्तृत्वाचं व बुध्दिमत्तेचं चीज होईल. वैरी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. हा महिना सुख, शांति व समृध्दी यांची बरकत करणारा आहे. मनोकामना पूर्ण होतील व सर्वांचे सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

सौख्य व धनलाभ होईल
makarमकर ः

अखेर कष्टाचे व निरपेक्ष बुध्दीने केलेल्या सेवेचं फळ मिळतंच याची प्रचिती आपणास येईल. घरात उत्तम व आनंददायक घटना घडतील. जुनी येणी  वसूल होतील. अनेक प्रकारची सुखं लाभतील. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. मात्र आनंद संयमाने द्विगुणित करणे योग्य होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. जनमानसात व्यक्तिमत्व उजळून येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य. आर्थिक आवक अपेक्षित होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित आर्थिक आवक होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल.

भाग्य उजळेल
kumbhकुंभ ः

आपली उदारता, परोपकार व ईश्‍वरी भक्ती यामुळेच आपले भाग्य उजळणार आहे. सच्चाई आणि सद्सद्विवेकबुध्दी आपणाला अवघड कार्यात यश देणार आहे. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक समस्या दूर होऊन नवीन व्यवसाय सुरु होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. मात्र दगदग जास्त करु नये. तब्बेतीची काळजी घ्यावी. मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. आपला राशिस्वामी शनि आहे. तो आपली आर्थिक स्थिती उत्तम करणारा आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. खर्चावर नियंत्रण हवे.

गुरुकृपा होईल
meenमीन ः

गुरुकृपा होणे हे भाग्याचे व पुण्याईचे लक्षण आहे. समस्या व दु:ख दूर होऊन अनेक नवीन मार्ग मिळतील. आनंद संयमाने द्विगुणित करणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. राहु- केतु ताणतणाव वाढवणारे असले तरी बुध्दीकारक बुध आपलीच बाजू उचलून धरणारा आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना किर्ती व उच्च पद संभवते. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी लाभेल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित आर्थिक आवक होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

Page 3 of 7