Tuesday, Jan 23rd

Headlines:

राशीभविष्य

मासिक राशिभविष्य - जानेवारी २०१६

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

दर्जा वाढेल
meshमेष ः

या महात ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणारे आहेत. अवघड कार्यात यश लाभून आपण प्रसिध्दीचे झोतात याल. मात्र शनिमहाराज आपणााला सयम व धीर धरणेस सांगत आहेत. या महात असणारी गुरु राहु युती खर्चावर नियंत्रण ठेवणेची सूचना देत आहे. तसेच धाडसी मंगळ आपणाला तब्बेतीची काळजी घेणेस सांगत आहे. घरातील कलह वेळीच शांततेने थांबवावा. विवाहइच्छुंचे विवाह या महात जुळणेची शक्यता आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना आर्थिक आवक अपेक्षित होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. स्वप्न दृष्टांत खरे होतील. सर्व प्रकारची सुखं प्राप्त होतील. तथापि आनंद संयमाने द्विगुणित करणे इष्ट होईल.

संपत्ती लाभ होईल
rishabhवृषभ ः
या महात वारसा हक्काने संपत्ती लाभ होणेची शक्यता आहे. अनेक उत्तम घटना घडवून आणणारा हा सप्ताह आहे. कलाकारांना उत्तम संधी लाभून किर्ती व प्रसिध्दी मिळेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दर्जा प्राप्त होईल. मात्र घरगुती समस्या निर्माण होणेची शक्यता असल्याने वेळीच दक्षता योग्य होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. जमीन खरेेदी योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी चालून येईल. पदाचा वापर योग्य रितीने करणे इष्ट होईल.

शब्द जपून वापरावे
mithunमिथुन ः

अखेर शब्द हे दुधारी शस्त्र आहे. ते जपून वापरणेच योग्य होईल. हा माह आर्थिकदृष्ट्या उत्तम असला तरी घरगुती समस्या वाढवणारा आहे. राहू मंगळ हे बलाढ्य ग्रह आपल्या कर्तृत्वाची व बुध्दीमत्तेची परीक्षाच घेणारे आहेत. तेव्हा आनंद संयमाने द्विगुणित करणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घेणेसाठी वेळीच बंधनात रहाणे योग्य होईल. नवीन वास्तूत प्रवेश होईल. कार्यात विघ्न आली तरी खचून जायचे नाही. धाडसाला कर्तृत्वाची व बुध्दिमत्तेची झालर लावून यश संपादन करायचेच. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. राजकीय व शासकीय क्षेत्राबाहेरील व्यक्तींना यश व आर्थिक लाभ होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

यशस्वी व्हाल
cancerकर्क ः

हाती घेतलेल्या अवघड कामात सहजपणे यश प्राप्त होऊन मानसिक स्वास्थ्य मिळेल. आपले कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व यांचं खर्‍या अर्थाने चीज होईल. मनोकामना पूर्ण करणारा हा महिना आहे. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन व्यवसाय सुरु होईल. सर्वांचे सहकार्य उत्तम लाभेल. दूरचे प्रवास योग येतील. धाडस व बुध्दीमत्ता यांचं चीज होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. हा महिना सुख, स्वास्थ्य व यश देणारा जाईल. काळ उत्तम आहे. नवीन संधीचा लाभ वेळीच घ्यावा.

मन शांत ठेवणे
lionसिंह ः

शनि महाराज जरी आपली परीक्षा घेणारे असले तरी साक्षात गुरुकृपा झाल्याने अडचणींवर मात करुन आपण प्रगतीचा वेग वाढवणार आहात. दुरचे प्रवास योग येतील. साधुसंतांचा सहवास लाभेल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धाडस व कर्तृत्व पणाला लावून यश संपादन कराल. ग्रहराज रवि आपले व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. सध्या आर्थिक गुंतवणूक न करणे इष्ट होईल. खाण्यापिण्यावर बंधने ठेवावीत अन्यथा घशाला त्रास होणेची शक्यता आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शक्यतो अलिप्त धोरण स्विकारावे हेच योग्य होईल.

शांत रहावे
kanyaकन्या ः

सध्या या महात ग्रहमान प्रतिकूल व अनेक विचारांचे, समस्यांचे, आर्थिक अडचणींचे आहे. तेव्हा माघार घेऊन व शांत राहून पुढे  जाणेच योग्य होईल. तब्बेतीची काळजी घेणे जरुरीचे आहे. अति दगदग त्रासदायक होईल. तूर्तास विवाह जुळवण्याचे काम दूर ठेवावे. सौम्य भाषाशैली ठेवणे गरजेचे आहे. मात्र शनिकृपेमुळे आर्थिक आवक अपेक्षित होईल. व्यवसायात वाढ होईल. स्थलांतर दर्शविते. वाहनापासुन सावध रहावे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरगुती समस्या वाढवू नयेत. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे.

सावध रहावे
tulतुळ ः

आपला विजयाकडे वाटचाल करणारा प्रगतीचा रथ थांबविणेची शक्यता आहे. सत्ता व पैसा हाती आला तरी संयम व सबुरी राखणे गरजेचे आहे. मंगळ, राहू हे बलाढ्य ग्रह आपल्या विरोधात आहेत. तथापि किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने काळजीचे कारण नाही. आपण आपले उत्कर्षाचे ध्येय गाठालच. मात्र वाहन व आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करावे. सौम्य भाषाशैली ठेवावी. शब्दाला धार नसावी, आधार असावा. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

प्रगतीत वाढ होईल
ruchikवृश्‍चिक ः

बुध्दीमत्तेला धाडसाची गरज असते. आता आपण मागे वळून पाहू नये असे वाटते. सर्व समस्या दूर होऊन नवीन व्यवसायात अगर नोकरीत उत्तम यश लाभणार आहे. आपल्या आर्थिक प्रगतीची घोडदौड सुरुच राहणार आहे. नवीन वास्तुत प्रवेश करणेस उत्तम काळ आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींची अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

थांबा व पहा
dhanuधनु ः
काळोखातून जाताना जपूनच जावे लागते अन्यथा इजा होतात. या महात प्रतिकूल ग्रहमान असल्याने आर्थिक, घरगुती व व्यावसायिकदृष्ट्या त्रासाचे दर्शविते. तरी तूर्तास नवीन जबाबदार्‍या न स्विकारता माघार घेऊनच पुढे जाणे योग्य होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानतेने व काळजीपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. तथापि किर्तीदाता गुरु आपणाला सौख्य व ऐश्‍वर्य देणारा आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. कार्यात विघ्न आली तरी डगमगून जाऊ नये. यश आपलेच आहे. मन शांत ठेवून थोरामोठ्यांच्या सल्ल्याने व्यवहार करणे योग्य होईल. तूर्तास मौनाने सर्व साध्य करता येते.

लाभ होईल
makarमकर ः
आपल्या निरपेक्ष बुध्दीच्या कार्याचा, लोकोपयोगी अवघड कार्याचा गौरव होऊन आपला दर्जा उंचावणार आहे. साक्षात अर्थदाता शनि व ग्रहराज रवि आपणाला यश, आर्थिक लाभ व किर्ती मिळवून देणारे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. स्वप्न, दृष्टांत खरे होतील. गुरु महाराज तब्बेतीची काळजी घेेणेची सूचना देत आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नवीन संधी उपलब्ध होईल. कलाकारांना नवीन क्षेत्रात पदार्पण करावे लागेल.

चीज होईल
kumbhकुंभ ः

आपण लोकसेवेच्या लावलेल्या रोपट्याचं आता झाड झालं आहे व त्याची फळं आपणालाच चाखायला मिळणार आहेत. कष्ट, जिद्द व चिकाटी यांना बुध्दिमत्तेची झालर लावल्यानेच आपणाला आता यश, किर्ती व आर्थिक लाभ होणार आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होणार असून, आपणाला खर्‍या अर्थाने स्वास्थ्य व सुख मिळणार आहे. आवक- जावक समान राहील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. स्थलांतर दर्शविते. घरात उत्तम घटना घडतील. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धीर धरावा
meenमीन ः
बहुतांशी बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. तेव्हा महत्वाचे व्यवहार गुप्त ठेवणे इष्ट ठरेल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न करावेत. इस्टेटीचा व्यवहार तूर्तास दूर ठेवणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घ्यावी. शासकीय सेवेतील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे योग्य होईल. अनाठायी आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे. शक्यतो मनावर ताबा ठेवणे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तथापि ग्रहराज रवि आपली बाजू खंबीरपणे सांभाळणेस समर्थ आहे. माघार घेऊन पुढे जावे.

मासिक राशिभविष्य - नोव्हेंबर २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

किर्ती मिळेल
meshमेष ः

या महिन्यात साक्षात गुरु आपले भाग्य उजळवायला आला आहे. गुरुचे आनंदाने स्वागत करावे. यश, किर्ती आणि समृध्दी आपल्या दारात उभे आहेत. पूर्वपुण्याई फळाला येईल. आपले कष्ट, जिद्द, सच्चाई व ईश्‍वरी उपासना यांचे खर्‍या अर्थाने चीज होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा वाढून किर्ती मिळेल. सर्व तर्‍हेची सुखं व वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने होतील. आर्थिक आवक व्यापारी वर्गाला अपेक्षित होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

काळजी घ्यावी
rishabhवृषभ ः

प्रतिकूल ग्रहमानात नवीन जबाबदार्‍या व आर्थिक व्यवहार लांबणीवर टाकावेत. घरातील वाद वाढवू नयेत. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेेचे आहे. मित्र व नातेवाईक यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. तरी शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे. शेतकरी बंधुंनी जनावरांपासून सावध रहावे. या सर्वांवर मात करणेसाठी केतुमहाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. सौख्य व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. बुध्दीकारक बुध योग्य मार्ग काढून स्वास्थ्य लाभून देईल. प्रत्येक बाबतीत गुप्तता पाळणे गरजेचे आहे.

शनिकृपा होईल
mithunमिथुन ः

या महात आपणावर शनि महाराजांची कृपा झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. तब्बेत उत्तम राहील. आपल्या सुखात वाढ होऊन धनलाभ होऊन मित्र सहकार्य उत्तम लाभेल. उपासनेवर भर देणे गरजेचे आहे. राहू मात्र सुखात अडथळे आणणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद मिळणेची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी मिळेल. नवीन योजना सफल होतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. नवीन वास्तू खरेदी होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

चीज होईल
cancerकर्क ः

आपले कर्तृत्व, बुध्दीमत्ता, निरपेक्ष बुध्दीची सेवा लवकरच फळाला येईल. अवघड कार्यात यश लाभून किर्ती मिळेल. शनि महाराज घरच्या व्यक्तींची काळजी घेणेचा सल्ला देत आहेत. धाडसाने पुढे जाल. स्वतंत्र व्यवसायात यश लाभेल. जमीन जुमल्याचे व्यवहारातून यश लाभेल. अचानक धनलाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. आपले प्रभावी व्यक्तिमत्व उजळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी व कारखानदार यांचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडतील. सर्व प्रकारची सौख्य लाभून स्वास्थ्य लाभेल. काळ अत्यंत सुखात व चैनीत जाईल. घरगुती वाद वेळीच मिटवावेत. आनंद संयमाने द्विगुणित करावा.

नियंत्रण हवे
lionसिंह ः

पैसा आला तरी तो टिकवणे कठीण असते. सर्वच दिवस सारखे नसतात. भागिदारीत व्यवसाय त्रासदायक होईल. अचानक खर्च उभे राहतील. मनाला मुरड घालून विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेेणे उचित होईल. खाणे-पिणे बंधनात असावे अन्यथा घशाला त्रास होण्याची शक्यता आहे. घरगुती वाद विकोपाला नेऊ नयेत. मुलाबाळांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपला व परका माणूस ओळखून व्यवहार करणे इष्ट होईल. स्थलांतर दर्शविते. शनिमहाराज अडचणी निर्माण करणारे आहेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. शत्रूपासून सावध रहावे. आर्थिक आवक वाढेल.

तब्बेत सांभाळा
kanyaकन्या ः

या महिन्यात अनिष्ट ग्रह आपणाला तब्बेत सांभाळण्याचा सल्ला देत आहेत. मन शांत ठेवून व बंधनात राहून कार्यात यश मिळवावे हेच योग्य होईल. उष्णतेच्या विकारापासून सावध रहावे. शुक्र वस्त्रलाभ व धनलाभ करुन देईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. धाडसानेच पुढे जाणे योग्य होईल. गुरु महाराज मनात विचारांचे काहूर माजवतील. तरी मानसिक स्वास्थ्य बिघडवू नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरावे म्हणजे गैरसमज होणार नाही. मोह टाळावा. तूर्तास विवाहइच्छुंनी विवाह योग दूर ठेवणे लाभाचे होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

परिक्षेचा काळ
tulतुळ ः

या महिन्यातील प्रतिकूल ग्रहमान आणि परीक्षा घेणारे आहेत, तेव्हा धाडस जपून करणे गरजेेचे आहे. वाहन व वीज यापासून सावध रहावे. आर्थिक व्यवहार शक्यतो लांबणीवर टाकावेत. शब्दाला धार नसली तरी आधार असावा. स्पष्टवक्तेपणा त्रासदायक होईल. मात्र गुरुकृपेने सुख प्राप्त होऊन अनेक महत्वाची कामे मार्गी लागतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी कामात व आर्थिक व्यवहारात गुप्तता ठेवणे योग्य होईल. मोह टाळावा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

इच्छापूर्ति होईल
ruchikवृश्‍चिक ः

धाडसी, पराक्रमी मंगळ, हौशी शुक्र आणि अर्थदाता शनि हे बलाढ्य ग्रह आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा इच्छापूर्ति ही होणारच. व्यवसाय व नोकरीत अपेक्षित बदल दर्शवितो. तब्बेत उत्तम राहील. राहू कृपेने ऐश्‍वर्य व सुख लाभतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. राजकीय व शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. यश व किर्ती लाभेल. जमीन खरेदी योग आहेत. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. मात्र मित्र व नातेवाईक यांच्याशी जपून व सलोख्यानेच वागावे. कारखानदार, उद्योगपती व व्यापारी यांचे व्यवसायात बदल व वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

व्यक्तिमत्व उजळेल
dhanuधनु ः

शनिच्या साडेसातीमुळे आपण अनेक संकटांना तोंड देत आहात. आर्थिक व शारीरिक समस्या, घरगुती अडचणी अशा त्रासातून आपणाला आता सुटका होणार आहे. गुरुकृपेने आपणावर आता सुखद प्रसंग येणार आहेत. सौभाग्य सिध्दी व ऐश्‍वर्य आपणाला लाभणार आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. आर्थिक समस्या सुटून आवक वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात आनंदीआनंद होईल. व्यक्तिमत्व उजळेल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होईल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह वाढेल. सुख व स्वास्थ्य लाभेल.

आर्थिक लाभ होतील
makarमकर ः

अर्थदाता शनि आपणावर कृपा करणार असून, आपली आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे. नवीन व्यवसायात भरघोस यश लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढून यश व किर्ती लाभेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. आपल्या सुखात वाढ होणार आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा वाढेल. लोकोपयोगी कार्यात यश लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील. त्या दीर्घकाळ टिकतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन वास्तू खरेदी कराल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. मात्र तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काळ सुखात जाईल.

अपेक्षापूर्ति होईल
kumbhकुंभ ः

आपले कष्ट, जिद्द, चिकाटी व निरपेक्ष बुध्दीची सेवा या सर्वांचं चीज होऊन मनोकामना पूर्ण होणार आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन मित्रांशी सलगी होईल. आपल्या कर्तृृृत्वाचा व कौशल्याचा हेवा वाटावा अशी कामगिरी हातून होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढून अवघड कार्यात यश मिळेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा उंचावेल व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन नवीन योजना सफल होतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरात उत्तम घटना घडतील. वाहनापासून जपून रहावे. आर्थिक व्यवहार थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच करावेत. काळ सुखात जाईल.

घाई नको
meenमीन ः

नशिबात असल्याशिवाय व योग्य वेळ आल्याशिवाय काहीही मिळत नाही, अशी आपली स्थिती झाली आहे. सध्याचे ग्रहमान प्रतिकूल असून, दैव आणि देव आपणाला साथ देत नाहीत. तरी घाई न करणे योग्य होईल. जे आपलं आहे ते आपणाला मिळणारच आहे. त्यासाठी जास्त विचार करु नये. घरगुती समस्यांना वेळीच आवर घालावा. मानसिक ताणतणाव वाढवु नये. लवकरच आपला भाग्योदय होणार आहे. तरी सध्या काळोखात असलात तरी पुढे उजेड आहे हे ध्यानात ठेवावे. संकटांना धाडसाने सामोरे जायचे असते. यश आपलेच आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणुक करावी.

मासिक राशिभविष्य - ऑक्टोबर २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

राजमान्यता मिळेल
meshमेष ः

गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. असे असताना आपणाला अवघड कार्यात यश व किर्ती, प्रसिध्दी लाभेलच. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह उत्तमप्रकारे जुळतील. तब्बेत उत्तम राहील. शत्रुंवर मात कराल. स्वजनांशी मिळतजुळत घेणे जरुर आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सुख व धनलाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. कष्टाचं व कर्तृत्वाचं चीज होईल. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

मात कराल
rishabhवृषभ ः

कर्तृत्व धाडसानेच सिध्द होते. अडचणींवर मात करुन पुढे जाल. सध्या केतु आपणाला उत्तम साथ देणारा आहे. सर्व प्रकारची सुख व ऐश्‍वर्य प्राप्त करुन देणारा आहे, तेव्हा चिंतेचे कारण नाही. नातेवाईक व मित्र यांच्याशी सौम्य भाषेत मिळतजुळत घेणे जरुर आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना संधी मिळून प्रसिध्दी मिळेल. आपली सच्चाई व निरपेक्षबुध्दीची लोकसेवा उपयुक्त होईल. घरात शांतता ठेवावी. इच्छापूर्ति होईल.

उत्कर्ष होईल
mithunमिथुन ः

अखेर कुशाग्र बुध्दिमत्ता व निरपेक्ष सेवा यांचा फायदा होतोच, याची प्रचिती आपणाला येईल. नवीन योजनेत अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सर्व प्रकारची सुखं व ऐश्‍वर्य लाभेल. इच्छापूर्ति होईल. काळ सुखात जाईल. शत्रु मित्र बनतील. जुनी येणी वसुल होतील. तब्बेत उत्तम राहील. नवीन दर्जाची प्राप्ती होईल. कष्टाचं चीज होऊन स्वास्थ्य लाभेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. परदेशागमन होईल. अनेकांना नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्य उजळेल
cancerकर्क ः

पहाट झाली की उजाडतेच हा निसर्गनियम सत्य आहे. तसेच आपण आता भाग्योदयाच्या जवळ आला आहात तेव्हा भाग्योदय होणारच. आपले कष्ट व सच्चाई यांना योग्य तो न्याय मिळून स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनेक प्रकारची सुखं व आर्थिक आवक अपेक्षित होईल. मुलाबाळांशी मिळतजुळत घ्यावे, मात्र पदाचा गैर उपयोग करु नये. महिलांना घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने आनंद व सुख प्राप्त होईल. सरकारी क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. यश व किर्ती मिळून काळ सुखात जाईल.

विचाराने वागावे
lionसिंह ः

चांगल्या शरीरात चांगले विचार असणे आवश्यक आहे. अचानक दुरचे प्रवास संभवतात. विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेणे जरुर व लाभदायक होईल. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहावे. वाहन जपून चालवावे. शक्यतो शांत राहून यश पदरी पाडून घ्यावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. प्रतिष्ठित व्यक्तींकडून कार्याचा गौरव होईल. प्रत्येक महत्वाचे बाबतीत सावधानता बाळगावी म्हणजे भविष्यात सुखं लाभतील. घरातील कलह वाढवू नये. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

समस्या दूर होतील
kanyaकन्या ः

बारीकसारीक ताणतणाव सोडले तर आपल्या अनेक समस्या दूर होणेच्या मार्गावर आहेत. आपण सध्या उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेले आहेत. तेव्हा यश, किर्ती व आर्थिक लाभ अपेक्षित होतीलच. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नोकरीची नवीन संधी प्राप्त होईल. महिलांना वस्त्रलाभ व चैनीच्या वस्तू खरीदल्याने आनंद होऊन स्वास्थ लाभेल. मात्र वाहनापासून जपून रहावे. घरातील कलह वाढवू नयेत. अध्यात्मिकदृष्ट्या काळ उत्तम आहे. दैवी दृष्टांत होतील. शांत राहणे योग्य, कारण काळ आपल्या बाजुचा सुख देणारा आहे. व्यापारीवर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

लाभ होतील
tulतुळ ः

साक्षात गुरुकृपा झाल्याने अनेक क्षेत्रात आघाडीवर रहाल. धनलाभ संभवतो. आरोग्य उत्तम राहील. नवीन योजना हाती घ्याल व त्या यशस्वी होतील. दुरचे प्रवास योग संभवतात. नवीन दर्जा प्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन वास्तू प्रगतीपथावर राहील. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. अनेक प्रकारची सुखं लाभतील व स्वास्थ्य लाभेल. मुलाबाळांच्या तब्बेतीकडे वेळीच लक्ष पुरवावे. शक्यतो बंधनात रहावे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

मन समाधानी ठेवावे
ruchikवृश्‍चिक ः

जे आपणाला मिळाले आहे ते देवाने आपल्यासाठीच ठेवले होते असे समजा व जे मिळाले नाही ते आपले नव्हतेच असे समजा व शांत रहावे. अखेर आपले जुने ते सोने होय. विचारपूर्वक निर्णय घेणे, जेणेकरुन उत्तरार्धात सुख प्राप्त होईल. आर्थिक आवक वाढेल. घरात उत्तम घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय सेवेतील व्यक्तींचा दर्जा वाढेल. धनलाभ दर्शवितो. भागिदारीत स्वतंत्र व्यवसाय शक्यतो करु नये. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नवीन योजना सफल होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

मार्ग मिळेल
dhanuधनु ः

आपण शनिमहाराजांच्या साडेसातीच्या फेर्‍यात असलात तरी चिंतेचे कारण नाही. चुका झाल्या अगर मुद्दाम केल्या तर शनि कठोरतेने वागवतो अन्यथा सरळमार्गी व्यक्तीला काहीही करत नाही. धाडसी मंगळ, ग्रहराज रवि यांच्या आशिर्वादाने आपल्या समस्या दूर होऊन नवीन मार्ग सापडेल व आपणाला सौख्य लाभेल. इस्टेटीचे व्यवहार आपल्या बाजुनेच होतील. अचानक अर्थलाभ संभवतो. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.

धनलाभ होईल
makarमकर ः

शनि हा अर्थदाता असून आपल्या राशीचा स्वामी आहे. त्याची कृपा आपल्यावर झाली असून, आपणाला स्वतंत्र व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होणार आहे. अनेक नवीन योजना सफल होतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळेल व मानप्रतिष्ठा वाढेल. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. महिलांना वस्त्रलाभ होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल.  विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अनेक प्रकारची सुखं लाभतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. जुनी येणी वसूल होतील. व्यापारी वर्गाचे व्याप वाढतील, अपेक्षित अर्थप्राप्ति होईल.

मन:शांती लाभेल
kumbhकुंभ ः

अपार कष्ट, निर्मळ मन व निरपेक्ष लोकसेवा यामुळे आपणाला आता दगदग कमी होऊन मानसिक सौख्य लाभणार आहे. मनातील विचार सत्यात उतरुन आपला जय होऊन आपली प्रतिष्ठा वाढेल. घरात उत्तम घटना घडतील. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. प्रवास योग येतील. वरिष्ठांची मर्जी सरकारी नोकरांनी सांभाळणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अध्यात्मिक प्रगती होईल. अनपेक्षितपणे उत्तम घटना घडून स्वास्थ्य मिळेल.

प्रतिकूल ग्रह
meenमीन ः

सध्याचे ग्रहमान आपणाला प्रतिकूल व खडतर दर्शविते, अशा वेळी शांत राहून व माघार घेऊनच यश संपादन करणे योग्य होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. तब्बेत उत्तम राहील. मनावरील ताण कमी करुन समस्या सुटतील. घरगुती समस्या व वादविवाद समंजसपणे सोडवाव्यात. लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. श्रध्दा व सबुरी बाळगणेच योग्य व लाभाचे होईल. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. विवाहइच्छुंनी काही काळ विवाह पुढे ढकलावा. विरोधकांना थंड विचारानेच तोंड द्यावे. यश आपलेच आहे.

मासिक राशिभविष्य - सप्टेंबर २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

उत्कर्ष होईल
meshमेष ः

हा महिना आपला आनंद व उत्कर्ष द्विगुणित करणारा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. तसेच वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. मुलाबाळांचे बाबतीत उत्तम घटना घडतील. गुरुकृपा झाल्याने अनेक जुनी अपुरी कामे मार्गी लागतील. महिलांना सुख व शांती लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव प्रतिष्ठित व्यक्तींकडून होईल. नोकरदारांना उच्चपद संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना परदेशागमन योग संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धाडसाने सर्व मिळेल
rishabhवृषभ ः

अखेर पूर्ण आत्मविश्‍वासाने धाडस केल्यास यश मिळतेच याची प्रचिती आपणाला येईल. सौख्य व ऐश्‍वर्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. उत्तम घटनांचा व यश देणारा काळ आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. घरातील वाद वेळीच मिटवणे योग्य होईल. मुलाबाळांच्या गरजा वेळीच भागविणेत याव्यात. जमिनजुमला खरेदी योग आहे. केतु आपणाला सौख्य व ऐश्‍वर्य प्रदान करणारा आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

सुखात वाढ होईल
mithunमिथुन ः

साक्षात शनि महाराजांची कृपा झाल्यावर काय कमी पडणार? पैसा, प्रसिध्दी, मानमुराद, कार्याचं चीज या सर्व गोष्टी शनिकृपेने आपणाला लाभणार आहेत. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मनोकामना पूर्ण होतील. शत्रु मित्र बनतील. नातेवाईक व मित्रमंडळींची उत्तम साथ लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. जुनी येणी वसूल होतील. परदेशागमन योग येईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आर्थिक गुंतवणूक लाभदायक होईल. काळ सुखात जाईल.

गुरुकृपा होईल
cancerकर्क ः

गुरुकृपा झाली की पांगळादेखील पर्वत चढतो व मुका उत्तम वक्ता होतो. तिथे तुमचं आमचं काय? सर्व बाजुंनी उत्कर्ष व भरभराटीचा काळ आहे. इच्छापूर्ति होईल. धाडसाने, कर्तृत्वाने व कुशाग्र बुध्दिमत्तेेने अनेक क्षेत्र पादाक्रांत कराल. प्रतिष्ठितांकडून कार्याचा गौरव होईल. अनेक प्रकारची सुखं लाभतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा वाढेल. घरगुती समस्या कुशलतेने सोडवाव्यात. माघार घेऊन पुढे जाणे योग्य होईल. शब्दाला धार नसावी, आधार असावा. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित पैसा मिळेल.

सावधानता बाळगावी
lionसिंह ः

राहू, केतू, शनि व मंगळ यासारखे बलाढ्य ग्रह आपल्या बुध्दिमत्तेची व कार्याची कसोटी पाहणारे आहेत. तेव्हा पूर्ण विचाराअंती व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने महत्वाचे निर्णय घेणे लाभदायक होईल. तथापि या सर्वांवर मात करणेसाठी गुरुमहाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. उष्णतेच्या विकारापासून व वाहनांपासून सावध रहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गुरुकृपेने सर्व ठीक होईल.

आर्थिक भरभराट होईल
kanyaकन्या ः

या महिन्यात शनिकृपेने आपली आर्थिक भरभराट होणार आहे. नविन योजना हाती घ्याल. जुन्या इस्टेटीचे वाद संपुष्टात येतील. अनेक क्षेत्रात आघाडीवर रहाल. व्याप वाढून दगदग खुप होईल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. मात्र ताणतणाव वाढवू नये. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी मिळेल. विवाहइच्छुंचे अपेक्षित विवाह होतील. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल. इच्छापूर्ति होऊन समाधान लाभेल.

व्यक्तिमत्व उजळेल
tulतुळ ः

अवघड कामात यश मिळाल्याने आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. नवीन वास्तू खरेदी योग आहे. कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजुने लागतील. देव आणि दैव आपल्या बाजुने आहे. तेव्हा आपण या महिन्यात उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ होणार आहात. यश संयमाने पचवायचे असते हे ध्यानात हवे. शनि महाराज हातात आलेला पैसा टिकू देणे अवघड आहे. दूरचे प्रवास योग येतील. अनेक प्रकारची सुख प्राप्त होतील. घरात शांतता राखणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंचे विवाह होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नोकरदारांना उच्चपद संभवते. काळ सुख, शांती व समृध्दी देणारा आहे.

सौख्य लाभेल
ruchikवृश्‍चिक ः

आपले कष्ट, जिद्द व निरपेक्ष बुध्दीची सेवा याचं आपणाला फळ या महात मिळणार आहे. अर्थप्राप्ती अपेक्षित होईल. नवीन योजना यशस्वी होतील. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. राहु सर्व प्रकारची सुखं देणारा आहे, तेव्हा धाडसाने पुढे जावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी मिळेल. एकंदरीत सर्व बाजूने भरभराट होणारा काळ आहे. चैनीच्या वस्तू खरेदी होतील. काळ आपल्या बाजुने आहे. त्याचा वेळीच फायदा घ्यावा. व्यापारी वर्गातील व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्य उजळेल
dhanuधनु ः

आपली सच्चाई, ईश्‍वरी उपासना व संयम यामुळे आपले भाग्य उजळणार आहे. गुरु, बुधासारखे बुध्दिकारक व किर्ती देणारे ग्रह आपणाला उत्तम साथ देणारे असून, आपले भाग्य उजळणार आहे. मात्र तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. विवाहइच्छुंनी तूर्तास विवाह करणेचा विचार दूर सारावा. शनिची साडेसाती चालू आहे तेव्हा विचारपूर्वक योजना आखाव्यात. नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. शासकीय सेवेतील व्यक्तींना कामात गुप्तता राखावी व वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. जास्त दगदग करु नये. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ स्वास्थ्य मिळवून देणारा आहे.

किर्ती मिळेल
makarमकर ः

सर्वांना समान न्याय देणारे व सुखी करणारे आपण आहात, मग ते नातेवाईक असोत अगर मित्र असोत. यामुळे आपल्या कार्यक्षेत्र वाढत गेले असून, आपणाला यश व किर्ती लाभणार आहे. सच्चाई आणि मेहनत व ईश्‍वरी सेवा फळाला येणार आहे. अपेक्षित पैसा व यश यामुळे ऐश्‍वर्य व सुखशांती आपणाला लाभणार आहे. हे सर्व करताना तब्बेत सांभाळणे गरजेचे आहे. नवीन वास्तू खरेदी योग आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. संयमाने व विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धीर धरा
kumbhकुंभ ः

शिजलं तरी निवेपर्यंत थांबावे लागतेच. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणार आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. आपल्यावरील अन्याय दूर होऊन आपली अपेक्षापूर्ति होणार आहे. घरात आनंदीआनंद होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. डोळे व उदर यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक आवक अपेक्षित होईल. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

कसोटी आहे
meenमीन ः

आपले कर्तृत्व व दातृत्व जरी महान असले तरी बलाढ्य ग्रह आपल्या कौशल्याची व बुध्दिमत्तेची कसोटी घेणारे आहेत. तेव्हा नशिबात असल्याशिवाय व वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही हे खरं. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी काळजीपूर्वक व विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. तूर्तास विवाह योग पुढे ढकलणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घ्यावी. ताणतणाव मनावर ठेवू नये. सर्व ठीक होईल, पण शांत रहाणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला आर्थिक आवक अपेक्षित होईल.

मासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankarरमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

गुरुकृपा होईल
meshमेष ः

जन्मोजन्मीच्या पुण्याईने गुरुकृपा होत असते. गुरुकृपा झाली की माणूस अंधकारातून ज्ञानाच्या व सुबत्तेच्या प्रकाशझोतात येतोच. तेव्हा या महिन्यात आपल्या अनेक अवघड गोष्टींना चालना मिळेल व सुख, समृध्दी लाभेल. नवीन वास्तू होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. महिलावर्गात आनंदी वातावरण राहील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी व उच्चपद लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सुशिक्षित बेकारांना संधी उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

सौख्य लाभेल
rishabhवृषभ ः
आपले कष्ट व जिद्द यांना योग्य तो न्याय मिळून स्वास्थ्य लाभेल. सर्व प्रकारचे ऐश्‍वर्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुखात वाढ होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. धाडसाने पुढे जाऊन यश पदरी पाडून घ्यावे. घरातील वृध्द व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. भागिदारीत व्यवसाय करु नये. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. जबाबदार्‍या स्विकारु नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

प्रतिष्ठा वाढेल
mithunमिथुन ः

कष्ट, धाडस, कर्तृत्व यांना बुध्दिमत्तेची झालर असली म्हणजे अवघड कार्यात यश मिळून प्रतिष्ठा वाढतेच. अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. घरात शांतता नांदेल असे पहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन चिंता दूर होतील. आर्थिक व्यवहार जपून करावेत. जमिनजुमला खरेदी योग आहेत. गुरु कार्यात विघ्न निर्माण करणारा आहे. गुप्त गोष्टीत सावधानता बाळगावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

प्रभावी नेतृत्व होईल
cancerकर्क ः

शेवटी कुशाग्र बुध्दीमत्ता, कामाचा योग्य वेळी उरक व निरपेक्ष बुध्दीची सेवा यांचे उत्तम फळ मिळतेच याची प्रचिती आपणाला लवकरच येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मुलाबाळांशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. धाडसाने यश प्राप्त करुन घ्याल. नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल. आर्थिक आवक वाढेल. ताणतणाव दूर होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

गमन होईल
lionसिंह ः
या महात दुरचे प्रवास सुखकर होतील. परदेशागमनही होईल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. गुरुकृपेने सारं काही ठिक होईल. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. खाण्यापिण्याचे बाबतीत बंधनात रहाणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य व हितकारक होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. जबाबदार्‍या वाढतील. विचाराने महत्वाचे निर्णय घ्यावेत.

आवक वाढेल
kanyaकन्या ः

या महापासून आर्थिक आवक वाढणार आहे. जमिन खरेदी योग आहे. कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. धनलाभ होऊन प्रतिष्ठा वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. महिलांना वस्त्रलाभ होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी व आर्थिक आवक वाढेल. विचारपूर्वक जबाबदारी घेेणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण हवे. नवीन व्यवसाय सुरु करण्यास काळ उत्तम आहे. तब्बेतीची काळजी घ्यावी. वाहन सावकाश चालवावे. आनंद संयमाने द्विगुणित करावा. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ प्रगतीकारक आहे.

किर्ती मिळेल
tulतुळ ः

आपल्या धाडसी कार्याचं कौतुक प्रतिष्ठित व्यक्तींकडून होऊन आपणाला प्रसिध्दी व किर्ती मिळणार आहे. धनलाभ, मानलाभ होऊन स्वास्थ्य मिळेल. अनेक उत्तम घटना घडतील. नवीन वास्तू खरेदीचा योग आहे. आर्थिक आवक अपेक्षित राहील. नवीन योजना हाती घेण्यास उत्तम काळ आहे. अनेक प्रकारची सुख व धनलाभ होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानमुराद व उच्चपद मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

तब्बेत सांभाळा
ruchikवृश्‍चिक ः

अति पैसा रोगराई व संकट घेऊन येतो असं म्हणतात. तेव्हा अपेक्षित अर्थप्राप्ती झाली तरी दानत मोठी असावी हे योग्य. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घेणे जरुर आहे. फक्त राहू आपणाला सौख्य व ऐश्‍वर्य देणारा आहे. मिळणे सोपे, पण टिकवणेच कठीण असते. संयम राखावा. मानसिक दौर्बल्य झटकून टाकावे. आत्मविश्‍वास व श्रध्दास्थान वाढवावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन संधीचा वेळीच लाभ घ्यावा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

समाधानी व्हाल
dhanuधनु ः

हा महिना आपणाला स्वास्थ्य व समाधान मिळवून देणारा आहे. आपल्या कष्टाचे व सच्चाईचे फळ अपेक्षित मिळेल. सुखं प्राप्त होतील. विवाहइच्छुचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी येईल. स्वप्न, दृष्टांत  खरे होतील. जमीन जुमल्याचे निकाल आपल्या बाजूने लागतील. दुरचे प्रवास यशस्वी होतील. शनिची साडेसाती असल्याने नवीन जबाबदार्‍या विचारपूर्वक स्विकाराव्यात. वैरी निर्माण होणार नाहीत याची बोलताना काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवहार करु नयेत.

सौख्य व लाभ होतील
makarमकर ः

या महिन्यात अनेक प्रकारची सौख्य व अपेक्षित लाभ होणार आहेत. जुनी येणी वसुल होतील. प्रवासात मौल्यवान वस्तू जपणे आवश्यक आहे. डोळे व पोट यांची जास्त काळजी घ्यावी. घरातील वृध्द व्यक्तीची काळजी घ्यावी. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्कर्ष व मनोकामना पूर्ण करणारा काळ आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. वस्त्रलाभ होईल. घरात उत्तम घटना घडून सुख व स्वास्थ्य लाभेल. हा काळ प्रगतीकारक असून, स्वास्थ्य देणारा आहे. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होईल व अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

अपेक्षापूर्ति होईल
kumbhकुंभ ः

अखेर सच्चाईला न्याय मिळतोच हेच खरे. याची प्रचिती आपणाला या महिन्यात येईल. विझतानाचा दिवा मोठा होतो, तेव्हा शत्रूंवर मात करुन पुढे जाल व ध्येयपूर्ति होईल याची खात्री बाळगावी. मंगल कार्यासाठीचे प्रवास यशस्वी होतील. घरात अपेक्षित उत्तम घटना घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्बेतीची काळजी घ्यावी. बंधनात राहणे योग्य होईल. गुरुकृपेने व ग्रहराज रवि कृपेने या सर्वांवर मात करुन व्यक्तिमत्व उजळाल. आर्थिक लाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

सावधगिरी बाळगावी
meenमीन ः

काळोखातून जाताना जसं काळजीपूर्वक जावे लागते तसेच प्रतिकूल ग्रहमानात प्रत्येक गोष्ट निरखुन पारखून व विचारपूर्वक करावी लागते. हा महिना आपल्या बुध्दिमत्तेची व कष्टाची पारख करणारा आहे. घरातील वृध्द व्यक्तीची काळजी घेणे जरुर आहे. विवाहइच्छुंनी विचारपूर्वक होकार द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी संपादन करणे गरजेचे आहे. बुध्दीकारक बुध या सर्वातून मार्ग काढून यश देणारा आहे. आर्थिक गुंतवणूक शक्यतो टाळावी.

Page 1 of 7

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  Next 
 •  End 
 • »