Thursday, Nov 23rd

Headlines:

कोकण विशेष

कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास

E-mail Print PDF
‘कोकणचा कॅलिफोर्निया’ हे कधीच पुर्ण होऊ न शकणारं स्वप्न आहे का हा प्रश्‍न का पडतो? कारण, विकासाच्या दृष्टीने होणार्‍या प्रवाहाचे पडसाद अजूनही कोकणासारख्या भागात फारसे उमटलेले नाहीत मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत, हे नक्की!0kp1
खरं तर, निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. तरीही अनेक पायाभूत सुविधांचा तुटवडा आजही कोकणात प्रकर्षाने जाणवतो. लांबच लांब समुद्रकीनारा आणि लाखो टनांवर मत्स्योत्पादन असतानाही अद्याप बंदरांचा विकास नाही. मासळीवर प्रक्रीया करणार्‍या उद्योगांची प्रगती झालीच नाही. मत्स्य व्यवसायावर आधारीत उद्योगांची प्रगती झाली तर मोठ्या प्रमाणात रोजगार
निर्मितीची क्षमता निर्माण होईल, याचा विचारच झालेला नाही. चांगलं परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग कोकणात आजवर मागासलेलाच आहे. कोकणात मच्छीमारी व्यवसायाला खूप वाव असला तरी, त्यातही चीन आपल्या कितीतरी पुढे आहे. चीनचा समुद्रकिनारा भारताच्या दुप्पट आहे, परंतू त्यांच्या मत्स्यव्यवसायाचे उत्पन्न भारताच्या २० पट आहे. ही तफावत बघता, मोठ मोठ्या रासायनिक कारखान्यांपेक्षा मच्छीमारी व्यवसायात घोडदौड करणं कोकणच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्ट्याही जास्त संयु्नतीक आहे.
कोकणात अफाट जलसंपत्ती आहे. वरुणराजाची कोकणावर कृपा असताना येथील पाण्याचा प्रश्‍न सोडविणे ही अश्‍नयप्राय गोष्ट नाही. गरज आहे ते जलव्यवस्थापन करण्याची. यासाठी गावपातळीवर नियोजन करून पावसाचे पाणी अडविण्याच्या आणि साठविण्याच्या योजना वाडीनिहाय अमलात आणल्या पाहिजेत. कोकणातील जलवाहतुकीच्या बळकटीसाठी खाड्यांवर फेरीबोटी सुरु करणं गरजेचं आहे. तसेच या खाड्यांवर पुलही झाले पाहिजेत. कोकणातल्या सर्वच खाडीपट्टयातली गावं जर फेरीबोटीने जोडली गेली तर त्या गावांना, तिथल्या व्यवसायांना आणि एकूणच अर्थकारणाला फायदा होऊ शकतो. कोकणात खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये बॉ्नसाइट, मॅगेनीज, सिलीका वाळू, तांबे, अभ्रक इत्यादी विविध प्रकारची खनिजं आढळतात. कोकणातल्या या खनिजसंपत्तीचा अपेक्षित उपयोग न होण्याचं मुख्य कारण वाहतुकीची समस्या हे आहे. कोकण हे भारतातील सर्वाधिक मोठे वीजनिर्मिती करणारे क्षेत्र आहे. पर्यावरणाला हानी न पोहचवता कोकणात उद्योग करणे श्‍नय आहे. गरज आहे ते राज्य सरकारने लक्ष देण्याची.0kp4
कोकणातील लाखो एकर पडीक जमिन ही खरं तर संपत्ती आहे. एअरपोर्ट, कृषी पर्यटन, फलोद्यान, वनशेती, औषधी वनस्पती लागवड अशा कीतीतरी प्रकल्पांसाठी ही जमिन उपयु्नत आहे. कोकण कीनारपट्टीलगतची खाजण जमिन नारळ आणि मसाल्याच्या पिकासाठी उपयु्नत आहे. मसाल्यांचा व्यवसाय हा तात्काळ उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे, याचा विचार व्हायला हवा.
कोकणात औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत. सध्या आयुर्वेदाकडे वाढलेला लोकांचा कल पाहता, त्यादृष्टीने या भागात ‘ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन’ करण्याची गरज आहे. त्याचबरोबर येथील औषधांच्या कारखान्यातही वाढ करणे श्‍नय आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, कोकण विकासासाठी पर्यटन उद्योग हा समर्थ पर्याय आहे का? याचा सविस्तर विचार व्हायला हवा.
आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे होऊ शकतील अशी कीतीतरी सुंदर स्थळे कोकण कीनार्‍यावर आहेत. कोकणातील पर्यावरणाचे संतुलन राखून पर्यटनाच्या सुविधा कशा वाढवायच्या याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कोकणातील अप्रतिम किल्ले साहसी पर्यटकांसाठी आव्हान आहे. सह्याद्रीतील किल्ले हे आश्‍चर्य आहे. या सह्याद्रीचा परिचय साहसवीरांना घडविला पाहिजे. सह्याद्रीचा म्हणावा तसा वापर अजूनही पर्यटनासाठी पुरेशा प्रमाणात झालेला दिसत नाही. कोकणातील पर्यटनस्थळांच्या माहितीचा अभाव ही अजून एक मोठी समस्या आहे. कोकणातील जागांची वैशिष्ट्ये सांगून, पर्यटकांना प्रत्यक्ष फिरवून स्थळे दाखवणारे गाईडस् तयार केले तर त्याचा चांगला फायदा पर्यटनासाठी होऊ शकतो तसेच यामुळे स्थानिक तरूणांनाही रोजगार मिळेल.
स्थानिक तरूणांच्या रोजगाराचा विचार करता, कोकणातील तरूणांना कोकणात चालणार्‍या व्यवसायांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून, त्यांना गावातच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, त्यांचा आर्थिक स्तर वाढेल आणि त्यांचे मोठया प्रमाणात होणारे स्थलांतर थांबेल.0kp5
कोकणातल्या या अनुकूल बाजूंचा विचार केला तर, समुद्रकीनारा, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, जलवाहतुक, शेती, उद्योग यादृष्टीने अनेक मोठ्या संधी कोकणात आहेत. पर्यटन आणि व्यापार उदीम यामुळे तर किनारी भागांचा चेहरामोहराच बदलून जाईल. शिवाय सरकारी तिजोरीतही महसूलापोटी भर पडेल ही अजून एक बाब. या सर्व गोष्टींचा समग्र विचार करता, कोकणच्या विकासातून राज्यावरील आर्थिक संकटही दूर करणे श्‍नय आहे. गरज आहे ते ही संकल्पना व्यापकपणे मांडण्याची. एकूण विचार करता हे लक्षात येईल की, कोकण विकासासाठी असणार्‍या पर्यायांचा गांभीर्याने विचारच केला गेलेला नाही.
कोकणातील लोकप्रतिनिधीही यासाठी जबाबदार आहेत. कोकणाकडे बघण्याचा हा दृष्टीकोन जर बदलला गेला तर एक आशावादी चित्र आपल्याला न्नकीच दिसून येईल. आता मात्र विकासाची पावले या भूमीत उमटलीच पाहिजेत. कोकणात पर्यावरण पुरक उद्योगांना कीती वाव आहे हे ठरवायला हवं. स्थानिकांना सामावून घेऊ शकतील असे उद्योग कोकणच्या विकासासाठी महत्वाचे आहेत. थोडक्यात कोकणचा औद्योगिक विकास, तिथल्या माणसांचा विकास, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम या सगळ्याचा समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे. ही वाट सरळ, सोपी नाही. योग्य नियोजन, राजकीय इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि स्थानिक नागरीकांचा सहभाग यामुळेच संपन्न कोकणाचं स्वप्न साकार होऊ शकेल. हे स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या  वकासाच्या दृष्टीने ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’तर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने होणार्‍या ‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिकेतील महत्त्वपुर्ण पाऊल.
- सुधीर मांडके
(लेखक ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘संपूर्ण कोकण विकास’ हा विषय दत्तक घेतलेला आहे.
संपन्न कोकणाचं स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या विकासाच्या दृष्टीने या फाउंडेशनततर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी सर्व
समविचारी नागरीकांनी एकत्र यावे, जेणेकरून अनेक गोष्टी करता येतील आणि दुर्लक्षित झालेल्या कोकणचा विकास आपल्याला
सर्वांना मिळून साधता येईल. ज्यामुळे कोकणातून बाहेर गेलेले चाकरमानी सुट्टीसाठी नव्हे तर कायमचे घरी परततील.)
संपर्क ः दूरध्वनी क्रमांक - (०२०) २५६७२५००, २५६५२२१३, (Email - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिके अंतर्गत समाविष्ट केले जाणारे विषय
* कोकण एअरपोर्ट
* मत्स्यव्यसाय - अल्ट्रा मॉर्डन फीशरीज, मेकनाईज फीशरीज
* जल वाहतूक - बंदरे, फेरी बोटी, खाड्यांवर पुल
* पिण्याचे पाणी - जलव्यवस्थापन
* बॅकवॉटर करता येईल का? कसे?
* कोकणातील तरुणांना प्रशिक्षण कार्यशाळा
* लाखो एकर पडीक जमिनींचा उपयोग
* ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन
हे माहितीदाखल काही विषय दिले आहेत. अजून बरेच विषय घ्यायचे आहेत.

कोकण विकासासाठी ठरणारा किमयागार - कोकण एअरपोर्ट

E-mail Print PDF
होळी, गणेशोत्सव हे कोकणातले मुख्य सण. हे सण आले की, मुंबई - पुण्यासारख्या शहरांमधून विखुरलेला कोकणी माणूस घरी म्हणजे कोकणात परतायला लागतो आणि मग बातम्यांमधून त्याचे वर्णन येऊ लागते. त्यानिमित्ताने कोकण चर्चेत येतो, पण मुळात विचार करता, कोकणाचे महत्त्व हे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? कोकणाच्या विकासाचे काय? हा प्रश्‍न कायम
अनुत्तरीतच राहतो. कोकणातल्या लोकप्रतिनिधींही कोकण विकासासाठी असणार्‍या पर्यायांचा कधीच गंभीरपणे विचार केला नाही. खरं तर, निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलं आहे, परंतू कोकणातल्या सौंदर्याला हवी तशी प्रसिद्धी अद्याप मिळालेली नाही. कारण अनेक पायाभूत सुविधांचा तुटवडा आजही कोकणात प्रकर्षाने जाणवतो. कोकणात मुख्यतः वाहतुकीच्या अत्याधुनिक सोयी होण्याची नितांत गरज आहे. त्याअनुषंगाने विकासाची पायाभरणी होईल असे म्हणता येईल. नाही म्हणायला, कोकण रेल्वे झाली, पण त्याचा चाकरमान्यांना सणासुदीला घरी परतता येण्यापलिकडे विकासाच्या दृष्टीने फारसा काही फायदा झाल्याचे ऐकीवात नाही. महाराष्ट्राने पन्नाशी गाठूनही आता बराच काळ लोटला, मात्र आजही महाराष्ट्राचा प्रमुख भाग असणार्‍या कोकणाची दशा काय? 0kp2
आणि त्याला दिशा कशी मिळेल? याचे प्रभावी उत्तर सरकारकडे नाही. कोकणचा विकास करण्याची आजच्या सरकारला खरोखरच इच्छा असेल तर जगाचा विकास पाहता, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोकणात वाहतुकीच्या उत्तम आणि आधुनिक सोयी करण्याची नितांत गरज आहे. आपल्याच देशातील लोकांना आज कोकणात जाण्यापेक्षा परदेशात जाणे सोपे वाटते. ही परिस्थिती बदलायला हवीच. परदेशातील, परराज्यातील बेगडी सुंदरता बघण्यापेक्षा आपलीच, आपल्याच मातीतील अवर्णनीय, अप्रतिम, अद्भूत निसर्गसौंदर्य बघायला लोकांना न्नकीच आवडेल. फ्नत आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जगराहाटीत त्यांना हव्या असणार्‍या सुविधा पुरवायला हव्यात. यादृष्टीने राज्य सरकारकडून उचलायला हवे असे महत्त्वाचे पाऊल म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनविणे. कोकणात जागतिक दर्जाचे सर्व सोयी सुविधांनी यु्नत असे विमानतळ झालेच पाहिजे. केरळ आणि गोव्याच्या तुलनेत कितीतरी विस्तीर्ण असा समुद्रकिनारा कोकणाला लाभलेला असुनही गोवा आणि केरळ या जागा देशातील तसेच परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, लक्षात आलं की, सर्वांत महत्वाची बाब म्हणजे, या ठिकाणांवर ये-जा करणं अत्यंत सोपं आहे. ही ठीकाणं अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सनी घेरलेली आहेत आणि इथून वेगवेगळ्या देशात जाण्यासाठी थेट फ्लाइटस् आहेत. केरळमध्ये त्रिवेंद्रम आणि कोचीन अशी दोन विमानतळे ओत. गोव्यामध्ये दाभोळी हा एक विमानतळ असून भारतामधील प्रमुख शहरांतून गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय दुबई, कुवेत या ठिकाणी गोवामार्गे जाणार्‍या काही विमानसेवा उपलब्ध आहेत. तसेच दाभोळी हा विमानतळ वास्को द गामा या शहरापासून जवळ असला तरी, पणजी शहरात सर्व विमान कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे पणजीपासून एअर इंडीयाच्या बसेस विमान उड्डाणापुर्वी आणि नंतर प्रवाशांची वाहतुक करीत असतात ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
कोकणचा विकास करायचा असेल तर कोकणातही इंटरनॅशनल एअरपोर्ट असण्याची नितांत गरज आहे. कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, किंबहुना तो कोकण विकासाचा ‘किमयागार’ ठरेल यात शंका नाही. त्यामुळे असे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी तातडीने हालचाल करायला हवी. सरकारने लक्ष घालून कोकणात जागा उपलब्ध करून दिल्यास येथेही इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू करणे श्‍नय आहे. हे काम सोपे नाही. अशा स्वरुपाच्या कोणत्याही महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्यापुर्वीची मुख्य पायरी म्हणजे जागेची तसेच मार्गाची निश्‍चिती करणे. कोकणचा भूप्रदेश, डोंगर दर्‍यांची भौगोलीक रचना लक्षात घेऊन हे काम करायला हवे. यासाठी जमिनीच्या मागणीची पुर्तता करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. जेवढ्या लवकर जागा उपलब्ध होईल तेवढ्या लवकर हे काम सुरु होईल कोकणात लाखो एकर पडीक जमिन आहे. ज्या ठिकाणी गवतसुद्धा उगवत नाही. ती जागा एअरपोर्टसाठी वापरणे श्‍नय आहे. या दृष्टीने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता येईल. मुंबईपासून ३७० किलोमीटर अंतरावर असलेला रत्नागिरी जिल्हा कोकण विभाग महसूल क्षेत्रात येतो. महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचनालयाच्या पाहाणी अहवालानुसार, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय यांच्याकडील सन २०१३-१४ च्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८१६ हजार हे्नटर आहे. जंगलव्याप्त क्षेत्र ६ हजार हे्नटर असून शेतीला उपलब्ध नसलेले एकूण क्षेत्र २१९ हजार हे्नटर आहे. त्यातील बिगर शेती वापराखालील जमिन २१ हजार हे्नटर तर पडीक आणि लागवडीलायक नसलेली जमिन १९८ हजार हे्नटर आहे.
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नगिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर अशा ९ तालु्नयांचा हा रत्नागिरी जिल्हा आहे. त्यापैकी चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी या तालु्नयांच्या ठिकाणी असलेल्या पडीक जमिनीचा एअरपोर्टसाठी वापर करण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. चिपळूण तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १११ हजार ६१३ हे्नटर असून त्यातील २७ हजार
७७१ हे्नटर क्षेत्र पडीक आहे. गुहागर तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ७८ हजार ५०२ हे्नटर असून १९ हजार ७७९ हे्नटर क्षेत्र पडीक आहे तर रत्नागिरी तालु्नयाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ९२ हजार ७९६ हे्नटर असून ३४ हजार २१८ हे्नटर पडीक जमिन आहे. ही पडीक जमिन म्हणजे लागवडीलायक नसलेली जमिन. शासनाने यातील जागा एअरपोर्टसाठी उपलब्ध करून दिल्यास कोकणच्या
विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. अशाप्रकारे खुप मोठा नाही परंतू वापरण्यास सोयीचा असा एअरपोर्ट रत्नागिरीजवळ सुरू करणे श्‍नय आहे आणि त्याला मोठ्या
प्रमाणावर पब्लीसिटी दिल्यास कोकणचा विकास निश्‍चित आहे. यासाठी आज ठोस पावले उचलण्याची गरज आहे. असे झाल्यास पुढील काही वर्षात होणार्‍या विकासाला कोणीही रोखू शकणार नाही.
- सुधीर मांडके
(लेखक ‘मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘संपूर्ण कोकण विकास’ हा विषय दत्तक घेतलेला आहे.
संपन्न कोकणाचं स्वप्न साकारण्यासाठी, कोकणच्या विकासाच्या दृष्टीने या फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी सर्व
समविचारी नागरीकांनी एकत्र यावे, जेणेकरून अनेक गोष्टी करता येतील आणि दुर्लक्षित झालेल्या कोकणचा विकास आपल्याला
सर्वांना मिळून साधता येईल. ज्यामुळे कोकणातून बाहेर गेलेले चाकरमानी सुट्टीसाठी नव्हे तर कायमचे घरी परततील.)
संपर्क ः दूरध्वनी क्रमांक - (०२०) २५६७२५००, २५६५२२१३, (Email - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
‘कोकण आणि कोकणवासियांचा विकास हाच ध्यास’ या मालिके अंतर्गत समाविष्ट केले जाणारे विषय
* कोकण एअरपोर्ट
* मत्स्यव्यसाय - अल्ट्रा मॉर्डन फीशरीज, मेकनाईज फीशरीज
* जल वाहतूक - बंदरे, फेरी बोटी, खाड्यांवर पुल
* पिण्याचे पाणी - जलव्यवस्थापन
* बॅकवॉटर करता येईल का? कसे?
* कोकणातील तरुणांना प्रशिक्षण कार्यशाळा
* लाखो एकर पडीक जमिनींचा उपयोग
* ऑरगनाइज मेडीकल प्लान्टेशन
हे माहितीदाखल काही विषय दिले आहेत. अजून बरेच विषय घ्यायचे आहेत.

‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ कोकणातील कलाकारांचा ’’रत्नागिरी टायगर्स

E-mail Print PDF
ratnagiri_tigersक्रिकेट म्हणजे भारतीयांचा जणू जीव की प्राण.. कलाकारमंडळीसुद्धा त्याला अपवाद नाही, मात्र आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांना क्रिकेटची आवड जपायला वेळ मिळतोच असं नाही, नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र कलानिधीचे संस्थापक श्री नितेश राणे आणि सचिव श्री सुशांत शेलारयांनी एकत्र येत ‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वी करून दाखवलं. आता ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसर्‍या पर्वाची घोषणा करत पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाला क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एमबीसीएलच्या माध्यमातून कलाकारांचे दहा संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत.
‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसर्‍या पर्वाची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे, सुशांत शेलार आणि मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’चे दुसरं पर्व ८ ते १० मे दरम्यान पाचगणी येथे रंगणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सर्व संघांच्या शिलेदारांचे स्वागत करत दुसरं पर्व आपणही एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं.ratnagiri_tigers1कोकणातील सिद्धार्थ जाधव, अतुल तोडणकर, फैसल महाडीक, तेजस नेरुरकर, मनीषा केळकर, शिवानी सुर्वे, इम्रान महाडीक, सुमित कोमुरलेकर, वरद, नुपूर धुदावडेकर, देवेंद्र शेलार, अमित समेळ आणि वृषाली चव्हाण या कलाकारांची तगडी फौज असलेला रत्नागिरी टायगर्स हा संघ या एमबीसीएलमधून पाचगणी येथे धडाकेबाज खेळी खेळणार आहे.
‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’मध्ये ‘रत्नागिरी टायगर्स’, ‘शिलेदार ठाणे’, ‘कोहिनूर नागपूर’, ‘डॅशिंग मुंबई’, ‘शूर कोल्हापूर’, ‘मस्त पुणे’, ‘क्लासिक नाशिक’, ’फटाका औरंगाबाद’, ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ हे दहा संघ सहभागी होणार आहेत. चौकार-षट्कारांची आतषबाजी करायला कलाकारमंडळीसुद्धा सज्ज झाली आहेत. ’मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसर्‍या सीझनची धमाल झी टॉकीज वर पाहता येणार आहे.

कोकणातील कलाकार वाढवणार ’ग्लोबल कोकण महोत्सवाची’ रंगत

E-mail Print PDF
konkan_1कोकणभूमी नेहमी सगळ्यांनाच साद घालत असते. हिरव्यागर्द नारळी-पोफळीच्या, आमराईच्या बागा, अथांग समुद्र किनारे त्यावर हेलकावे घेणारे शिडाच्या होडया, कोकणातील कला-संस्कृती आणि ती शिताफीने जतन करून ठेवणारा कोकणी माणूस अशी एक ना अनेक विशेषणं कोकणाला आपल्याला लावता येईल.
कोकणातील डोंगर दर्‍या, नदया किल्ले आणि भव्य समुद्र किनारा तसेच कोकणातील कला सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात जाण्याची गरज नाही, तर कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवात  या सौंदर्याचा अनुभव घेता येईल. ग्लोबल कोंकण महोत्सव मुंबईत गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेक्स् ग्राऊंडवर, ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
या ग्राऊंडवर भव्य कला दालन उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणार्‍या कोकणातील प्रथितयश चित्रकारांची वैशिष्टयपूर्ण कलाकृतींचे प्रदर्शन या दालनात भरवण्यात येणार आहे. तसेच कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना या कला दालनात आपली कला प्रदर्शन करण्याची संधी ग्लोबल कोकण महोत्सवाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच या कला दालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली चित्रे व शिल्पे विक्रीसाठीही उपलब्ध कण्यात आलेली आहे.
या महोत्सवामध्ये कलाकृतींच्या प्रदर्शनासोबत स्पर्धाही भरवण्यात येणार आहेत. हे यंदाच्या ग्लोबल कोकणचं खास वैशिष्टय असणार आहे. ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये आंतरमहाविद्यालयीन ग्रुप चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी तीन ते पाच विद्यार्थ्यांच्या ग्रुपने १० ु १० च्या कॅनव्हासवर कोकण या विषयावर चित्र काढून कोकण भूमी प्रतिष्ठानच्या कार्यालयात २७ एप्रिल २०१५ पर्यंत आणून दयावेत असे आवाहन ग्लोबल कोकण महोत्सवा चे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव यांनी केले आहे.konkan_2कोकणचा निसर्ग, संस्कृती, लोककला, उत्सव, कोकणातील जीवनशैली आणि खाद्य संस्कृती या विषयावर छायाचित्र व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर कोकणचं निसर्ग सौंदर्य उलगडून दाखवणार्‍या शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन ग्लोबल कोकण महोत्सवात करण्यात आले आहे. या तीनही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकास १५००० रु., द्वितीय क्रमांकास १०००० रु. आणि तृतीय क्रमांकास ५००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. कोकणचं निसर्ग वैभव जगासमोर यावं हा या स्पर्धांमागील प्रमुख उद्देश आहे.
नवोदित कलाकारांच्या चित्रांची विक्री व्हावी म्हणून ५००० स्क्वे.फूट आकाराची आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. कलाकारांनी आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचवण्याची ही अनोखी संधी ग्लोबल कोकणच्या आयोजकांनी उपलब्ध केली आहे. नवोदित कलाकारांसाठी कलादालनात पॅनेल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कलाकारांनी संपर्क करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:
आर्कि. श्रीपाद भालेराव क्युरेटर: ८०९७१३२७९९
अँड. स्वाती दिक्षित डायरेक्टर: ९८२०६०३००५
कार्यालयीन नं : ०२२-२४१५४०१०
कोकण भूमी प्रतिष्ठान आँफीस नं.
१२/८ अ, कोहिनूर मिल कंपाउंड,
महात्मा ज्योतिबा फुले रोड, नायगांव, दादर (पू).

कोंकणचे सृष्टीसौंदर्य 'व्हॉट अबाऊट सावरकर?'मध्ये

E-mail Print PDF

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

savarkar_1क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलूंनी भारतीय समाजमन ढवळून काढणाऱ्या या दूरदर्शी नेतृत्वाचे विचार हे आजच्या काळाशीसुद्धा तितकेच साधर्म्य सांगणारे आहेत. त्यांच्या जाज्वल्य विचारांची आणि वैचारिक लढ्याची गाथा लवकरच रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'सावरकरांचे देशप्रेम, त्यांचे विचार भावी पिढीला समजायला हवेत. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी मनात रुजवायला हवेत', सध्याच्या तरुणाईच्या चंगळवादी वृत्तीमुळे ती भरकटत जात आहे, या पार्श्वभूमीवर सावरकरांचा हा चित्रपट आजच्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, विवेक लागू, अतुल तोडणकर, श्रीकांत भिडे, सारा श्रवण आदींच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'व्हॉट अबाऊट सावरकर?' मध्ये सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे.

अभिषेक शिंदे आणि अवधूत गुप्तेंच्या संगीताने सजलेल्या 'व्हॉट अबाऊट सावरकर?' चित्रपटात ५ गीते असून ती अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. 'जयोस्तुते', 'जयदेव', 'वन्दे मातरम', 'कोकणची चेडवा', 'परछाई हू तेरी' अशा विविध धाटणींच्या गीतांचा प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे.

कोंकण

savarkar_2‘'व्हॉट अबाऊट सावरकर?’’ या सिनेमाचा विषय जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर असला तरी ह्या चित्रपटात गाणी आताच्या पिढीला आवडतील अशी आहेत. त्यापैकी एक कोंकण हे गाणं आहे. ह्या गाण्याचं चित्रीकरण हिरव्या माडाच्या वनात आणि कोंकणच वैभव असलेले समुद्राच्या सान्निध्यात झालेले आहे. हे गाण ऐकायला जितकं मधुर वाटत तितकच पाहायलाही सुरेख आहे.

चित्रपटाची नायिका सुनिती सिंह हि मुळची मणिपुरी आहे.अभिमान मराठे या तरूणाच्या प्रेमात आहे. दोघांचं घट्ट नातं आहे. इतक्या वर्षात तो पहिल्यांदा तीच्याशिवाय कोंकणात आलायं. समुद्रावर आल्यावर प्रकर्षाने तिची आठवण येते आणि ती जणू आपल्यासोबत tतिथे समुद्रावर आहे असं त्याला भासतं आणि ती व्यक्त होते.

जणू कोंकण माझ्यात सामावुन गेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी आहे असे ती त्याला म्हणते. रिना मदने यांचे उत्कृष्ट कॉसट्युम कोंकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतात. श्रीकांत अहिरे या नृत्य-दिग्दर्शकाने गाण्याचा रिदम छान पकडला आहे. अवधुत गुप्ते यांचं संगीत, वैशाली सामंतचा मधुर आवाज व कोंकणचे यथार्थ वर्णन करणारे अवधुत गुप्तेचे मोहक व सौंदर्यपुर्ण शब्द आपणांस मंत्रमुग्ध करतात.

"जयोस्तुते "

savarkar_3"जयोस्तुते" या गाण्याचा शब्द-न-शब्द सावरकरांनी ज्या तन्मयतेने लिहिलाआहे,की हे गाण ऐकताना श्रोत्यांना सावरकरांची आपल्या मातृभूमीबद्दल असणारी श्रद्धा,वेड,परप्रांतीयांच्या वर्चस्वातून मुक्त करण्याची आस्था,तिच्याबद्दल असणारी करुणा नक्कीच जाणवेल .

"तुजसाठी मरण ते जनन"

"तुजविण जनन ते मरण "

ह्या दोन ओळी सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या मातृभूमीशी एकरूप करतील अशा आहेत. दिग्दर्शक रुपेश कटारे सांगतात की, अवधूतने ज्याप्रकारे हे गाणं गायलं की ऐकणारा प्रत्येकजण स्वतःला या गाण्यासोबत वाहून नेईल.

कित्येक तरुणांपासून वंचित हे कमलकाव्य आहे. खास तरुण वर्गाला कमलकाव्याशी जोडण्यासाठी गाण्याचा काही भाग रॉक फॉर्ममध्ये रेकॉर्ड करण्यात आला आणि कुठेही शब्दांच्या अर्थांना धक्का न लावता अभिषेक शिंदे यांनी स्वरबद्ध केल या तरुण संगीत दिग्दर्शकाच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित आणि रुपेश कटारे, नितीन गावडे दिग्दर्शित 'व्हॉट अबाऊट सावरकर?' येत्या १७ एप्रिलला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Page 1 of 3

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End 
  • »