Tuesday, Jan 23rd

Headlines:

आरोग्य

अत्याधुनिक उपचार देणारे कोकण कार्डियॅक सेंटर सुरू

E-mail Print PDF
lo_hospital1कित्येक वर्षापासून कोकणातील हृदयरोग रूग्णांना उपचारासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे जावे लागत असे. त्यामुळे बहुमुल्य वेळ, पैसे खर्च होत तर काहीवेळा वाटेतच पशंटच्या प्राणावर बेतले जात असे. कोकणच्या मातृभूमीतील डॉक्टरांनी सुरू केलेल्या कोकण कार्डियॅक सेंटरच्या माध्यमातून ३६५ दिवस अहोरात्र सेवा देण्याचा संकल्प करून हृदयग्रस्त रूग्णांना दिलासा दिलेला आहे. डॉ. संजय लोटलीकर व डॉ. अमेय आमोणकर यांनी हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
रूग्णांची सेवा या एकाच उद्देशाने डॉ. संजय लोटलीकर व डॉ. अमेय आमोणकर यांनी गुणवत्ता व किफायतशीर चार्जेस यांचा मिलाफ साधत या सेंटरची सुरुवात केलेली आहे. डॉ. अमेय आमोणकर हे इंटरर्व्हेशनल कार्डियालॉजिस्ट असून मुंबईच्या प्रसिद्ध सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमधून नामांकीत पदवी संपादन केलेली आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये कार्डियालॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये तसेच ठाण्याच्या विशेष हॉस्पिटलमध्ये त्यांनी इंटरव्हेशनल कार्डियॉलॉजीस्ट म्हणून काम केलेले आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेंशन या संस्थेने त्यांना स्पेशालिस्ट इन क्लिनिकल हायपरटेंशन हे सदस्यत्व बहाल केलेले आहे. विविध देशातील अत्याधुनिक हार्ट सेंटरमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेवून परदेशातील डॉक्टरांसमवेत काम केलेले आहे.
कोकण कार्डियॅक सेंटरमध्ये आठवड्याचे सर्व दिवस प्रायमरी इसीजीपासून अत्याधुनिक कोरोनरी अँजिओप्लास्टीपर्यंत सेवा उपलब्ध आहे. बाह्य रूग्णांकरिता  हृदयरोग चिकित्सा, २ डी इको कार्डिओग्राफी, ड्रेडमील स्टेस टेस्ट, होल्टर मॉनिटरींग, ऍम्युलेटरी बी.पी. मॉनिटरींग तसेच लहान मुलांकरिता पेडिऍट्रीक इकोकार्डिओग्राफी या सेवा दिल्या जातात. आधुनिक १० बेडचे आयसीयु (इन्वेंसीव्ह कार्डियॅक केअर युनिट) टेंपररी पेसमेकर व बलून पंप या सोयीनी सज्ज आहे
कोकण भूमितील अद्ययावत कॅथ लॅब कोकण कार्डियॅक सेंटरमध्ये असून कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पर्मनंट पेसमेकर इम्प्लांटेशन, बलून व्हॉल्व्होप्लास्टी, रिपल अँजिओप्लास्टी, कॉन्जीनीटल हार्ट डिसीजसाठी डिव्हाईस क्लोजर इत्यादी क्रिया केल्या जातात.lo_hospital2
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूण वयामध्ये हॉर्ट ऍटॅक येणे व त्यावेळी इमर्जन्सी ह्दयरोग सेवा मिळणे म्हणजे जीवनदानच. अशावेळी पामी प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इनफारक्शन सेवा मिळणे ही वैद्यकीय जगातात खात्रीची व मानाची समजली जाते. कोकण पट्ट्यात पामी ही प्रोसिजर करणारे कोकण कार्डियॅक हे एकमेव सेेंटर आहे. डॉ. आमोणकर हे सर्व प्रोसीजर रॅडीयल रूट (हातातील रक्तवाहिन्या) या पद्धतीने काम करीत असल्यामुळे कमीत कमी गुंतागुंतीत ही प्रोसीजर पार पडते व पेशंटला डिसचार्ज
मिळतो.
गेली अनेक वर्षे कोकणवासियांची सेवा करणारे डॉ. संजय लोटलीकर यांचे रत्नागिरीत अत्याधुनिक पद्धतीचे हार्ट सेंटर उभे करण्याचे स्वप्न होते. ते आता कोकण काडिर्ंयल सेंटरच्या रूपाने साकार झाले असून आगामी काळात या ठिकाणी बायपाससारख्या सर्जरी सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला डॉ. संजय लोटलीकर, डॉ.अमेय आमोणकर, नाडकर्णी, दिलीप पाखरे आदीजण उपस्थित
होते.

डॉ. शिवाजी मानकर यांचा होमियोपॅथीतील संशोधन प्रबंध लंडन विद्यापिठाकडून मंजूर

E-mail Print PDF
mankar-doctorकोकणातील नामवंत होमियोपॅथी विशेषज्ञ डॉ. शिवाजीराव मानकर यांनी लंडन येथील हॅनेमन कॉलेज ऑफ होमिओपॅथी या विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रबंधाला मान्यता मिळाली असून सदर विद्यापीठाने त्यांना पदव्युत्तर पदवी बहाल केली आहे. यावर्षीच्या संपूर्ण बॅचमध्ये प्रथम क्रमांक संपादन करण्याचा विक्रम डॉ. मानकर यांनी केला आहे.
मधुमेह झालेल्या रूग्णांना होणारा अल्सर आणि गँगरीन हे असाध्य विकार असतात. पण डॉ. मानकर यांनी त्यावर प्रभावी उपाय होमियोपॅथीद्वारा केले आहेत. त्यामुळे सदर रूग्णांचा पाय कापण्याचे आणि त्यांना अपंगत्व येण्याचे संकट टळले. गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी किमान ४५ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचा पाय कापण्याचे संकट रोखण्यात यश संपादन केले आहे. हे यशस्वी उपचार त्यांनी केवळ शुद्ध होमियोपॅथीच्या आधारे केले. याबाबत त्यांनी संशोधन प्रबंध तयार करून हॅनेमन कॉलेज ऑफ लंडनला सादर केला. सदर प्रबंधाला संपूर्ण हॅनेमन विद्यापीठात सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून गौरविण्यात आले आहे.
तसेच या वर्षी भारतातून संशोधन प्रबंध सादर करणार्‍या सर्व संशोधकांमध्ये डॉ. मानकर यांना प्रथम क्रमांक लाभला आहे. सदर प्र्रबंध स्वीकारला जाण्यापूर्वी नामवंत तज्ञांनी त्यांच्याशी चर्चा करून डॉ. मानकर यांच्या संशोधनाची संपूर्ण सखोल माहिती घेतली आणि त्या संशोधनाचे चिकित्सक मूल्यमापन केले. त्यानंतरच त्यांच्या प्रबंधाला मान्यता देण्यात आली. या शोध प्रबंधासाठी डॉ. मानकर यांना सी.एम. पटेल होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई येथील प्रसिद्ध होमियोपॅथिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. प्रभाकर देवाडिगा यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. शिवाजी मानकर गेली सत्तावीस वर्षे चिपळण येथे शुद्ध होमियोपॅथी उपचार करीत आहेत. विशेषतः मधुमेह आणि त्यामुळे होणार्‍या गँगरीनवर त्यांनी अत्यंत प्रभावी उपचार पद्धतीचा यशस्वी वापर केला आहे. अनेक असाध्य शारिरीक आणि मानसिक आजारांवर त्यांनी यशस्वी होमियोपॅथी उपचार केले आहेत. आता विश्‍वविख्यात विद्यापीठाने त्यांच्या संशोधन प्रबंधाला मान्यता देऊन त्यांच्या ज्ञानाचा, अध्ययनाचा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण रूग्णसेवेचा गौरव केला आहे. चिपळूण येथे बाजारपेठेत स्वामी कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे क्लिनिक आहे. मधुमेह आणि अनेक असाध्य विकारांनी ग्र्रासलेल्या रूग्णांना त्यांचा फार मोठा आधार आहे.
रत्नागिरी येथेही डॉ. मानकर यांची सेवा उपलब्ध असून दर शनिवार, रविवार व मुंबई येथे सोमवार व मंगळवार, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर येथे रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध. संपर्क ः ९४२१९६०७८७, ९५५२२१११०४.