Saturday, Jan 20th

Headlines:

महिला बालकल्याण

ऑनर किलींग एक सामाजिक कीड

E-mail Print PDF
shraddh-kalambateगुन्हे करणारे कितीही चलाख, तल्लख बुद्धीचे, विद्याविभूषित असले तरीही कायदे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे हात त्यांच्यापेक्षाही लांब असतात. हे पुन्हा एकदा आरूषी प्रकरणात सिद्ध झालंय. आई-वडील दोघंही डॉक्टर असल्याने आपल्या अक्कल हुशारीने (?) आपलं कुकर्म आपण सहज पचवू शकू या भ्रमात त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. परंतु सफाईदारपणे गळा चिरणं हे भुरटे चोर किंवा सर्वसाामान्य माणसाला कदापि शक्य होणार नाही. हा अगदी साधा मुद्दा त्यांच्या अविवेकी बुद्धीच्या नजरेतून सुटला आणि ती दोघंही प्रत्यक्षदर्शी पुराव्याअभावी अलगद कायद्याच्या कचाट्यात सापडली आणि न्यायव्यवस्थेने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारेही गुन्हेगारांना शासन केलं जाऊ शकतं हे आरूषी प्रकरणावरून सिद्ध केलंय.
आजपर्यंत घरच्यांच्या मनाविरूद्ध प्र्रेमविवाह केलेल्या कित्येक तरूणींना, जोडप्यांना ‘ऑनर किलिंग’ला बळी पडावं लागलंय. २००९-१० साली दिल्लीसारख्या महानगरात एकामागोमाग एक झालेल्या या घराण्याच्या प्र्रतिष्ठेपायींच्या हत्यांनी सर्व समाज हादरून गेला होता. राजरोसपणे केवळ ‘प्र्रेम केलं’ या भयंकर गुन्ह्यांपायी निष्पाप जीवांची हत्या करून ‘आम्ही केलं ते योग्यच केलं’ हा बेगडी प्रतिष्ठेचा आव त्यांच्या वागण्या बोलण्यात पाहिल्यावर कुठल्याही सद्विचारी, विवेकी, तसेच माणुसकी जपणार्‍या, मानणार्‍या व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.
तलवार दाम्पत्याच्या अमानवी क्रूरतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आणि २००८ साली घडलेल्या घटनेने पुन्हा एकवार ‘ऑनर किलिंग’चा इतिहास जागवला. आपल्या आयुष्यात आपण कशाला महत्व द्यायचं हे प्रत्येक व्यक्तीगणिक ठरवायचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीने आपल्याला मिळालेलं आहे. सर्वधर्मसमभाव मानणारा आणि जपणारा असा आशिया खंडातील सर्वात मोठा देश म्हणून अभिमानाने, कौतुकाने आपल्याकडे पाहिलं जातं. आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीचा परदेशातही अभ्यास केला जातो. त्यावर चिंतन केलं जातं. कित्येकांनी आपली भारतीय संस्कृती याच कारणाने अंगिकारलेली आहे परंतु खोट्या प्रतिष्ठेच्या, घराण्याच्या आहारी जाऊन ज्या हत्या केल्या जाताहेत त्या खरोखरच सुसंस्कृत मनाला शरमेनं मान खाली घालायला लावणार्‍या आहेत.
owner-killing1‘ऑनर किलींग’ अर्थात ‘प्रतिष्ठेचे बळी’ ही सुद्धा पूर्वापार चालत आलेली एक अमानुष प्रथाच म्हणायला हवी. अगदी राजेरजवाडे, संस्थानिकांच्या काळातसुद्धा अशा घटना घडत होत्या परंतु अशी प्रकरणं उघड होत नव्हती. अशा हत्या करून त्यांचा परस्पर बंदोबस्त केला जायचा. त्यानंतर ती व्यक्ती मानसिक रूग्ण किंवा बेपत्ता असल्याच्या अफवा उठवून काही वर्षांनी त्यांचा ‘विषय’ कायमचा बंद केला जायचा.
आजचा समाज हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत चालल्याने अशा घटनांचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसतेय. कारण आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था याबाबत समाज जागृतीचं कार्य करीत आहेत. अपराध्याला शासन झालंच पाहिजे यावर आम्ही भर देतो. त्यामुळे बहुतांशी प्रकरणांत पालकांचं मतपरिवर्तन करण्यात आम्हाला चांगलंच यश मिळतंय. अशा परिस्थितीत आरूषी प्रकरणाने आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची खरोखरच झोप उडवलीय. वयात आलेल्या मुलांनी किंवा प्रौढांनी पालकांच्या मर्जीविरूद्ध प्रेमविवाह केल्यास त्यांनी तो समजून-उमजून केलाय असं आपण म्हणू शकतो. परंतु आरूषीसारख्या केवळ १३-१४ वर्षाच्या मुलीला लैंगिक संबंध, त्याचे दुष्परिणाम, प्रेमविवाह इ. गोष्टींच कितीसं ज्ञान असणार आहे? तिचं हित, अहित तिला कितीसं कळणार आहे? त्याही पुढे जाऊन आई-वडिल, घराणं, समाज यांच्या प्रतिष्ठेचं महत्व कितीसं उमजणार आहे? हे डॉक्टर पती-पत्नीला कळू नये हे दुर्दैव म्हणावं लागेल.
या प्रकरणात आरूषीचा काही दोष असलाच तर तो तिच्या पौगंडावस्थेचा म्हणावा लागेल. ज्यात भिन्नलिंगी आकर्षणाला मुलं बळी पडू शकतात. याशिवाय पुन्हा एकदा पालक आणि मुलं यांच्यातील नातेसंबंधाचा विषय ऐरणीवर आलेला आहे असं मला वाटतं. आरूषुीचे आई-वडिल दोघंही डॉक्टर असल्याने ते तिला किती वेळ द्यायचे? आरूषीच्या वाट्याला येणारं एकाकीपण कितपत सुसह्य होतं? घरातील पुरूष नोकर मुलीच्या सुरक्षिततेच्या संदर्भात कितपत विश्‍वासू होता? वयात आलेल्या मुलीला नोकराच्या भरवशावर किती काळ घरात एकटं ठेवावं? तिचे मित्र-मैत्रिण कोण कोण आहेत? बंगला, गाडी आणि आर्थिक संपन्नता यांनी मुलांवर पुरेसे आणि योग्य संस्कार होऊ शकतात का? मुळात तिचे आई-वडील हे तरी एकमेकांशी एकनिष्ठ होते का? असे अनेक प्रश्‍न आज प्रत्येक पालकासमोर आ वासून उभे आहेत.
वाचकहो, समाजातील या सर्व समस्या खरं म्हणजे आपणच निर्माण केलेल्या आहेत असं नाही वाटत तुम्हाला? समजा, आरूषी त्यांच्या नोकराच्या हव्यासाला बळी पडलेली आईवडिलांना समजलं त्यावेळी त्यांनी तातडीने त्या नोकराला कामावरून काढून टाकणं, पोलिसांत तक्रार देणं, मुलीला विश्‍वासात घेऊन तिचं समुपदेशन करणं, आईने मुलीसाठी आपला पेशा सोडणं, किंवा पार्टटाईम अथवा मुलीला सोबत घेऊन आपला व्यवसाय करणं असे कितीतरी पर्याय त्यांच्यासमोर होते. मग त्यांनी त्या दोघांना संपविण्याचा अगदी टोकाचा निर्णय का बरं घेतला असेल हे खरोखरच एक न सुटणारं कोडं म्हणावं लागेल.
आपल्या मुलांसाठीच आपण लग्न करून आपला संसार थाटतो. कुटुंब वाढवतो. मग अशाश्‍वत पैसा आणि प्रतिष्ठच्या बेगडी, खोट्या हव्यासापायी आपण आपल्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य का बरं उद्ध्वस्त करावं? पैसा, प्रतिष्ठा, शील, चारित्र्य यांच्या कल्पना काळाबरोबर नको का बदलायला? आणि आपली मुलं चुकत असतील तर आपणही कुठेतरी चुकतोय, कमी पडतोय हेही विसरून चालणार नाही.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क-हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नातेसंबंध जपताना...

E-mail Print PDF
shraddh-kalambateआजच्या २१ व्या शतकात वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने मानवाला भौतिक संपन्नता तर जरूर बहाल केलीय परंतु या समृद्धीबरोबरच ताणतणाव, विविध समस्या यांचाही वारसा जणू मानवाला लाभलाय. आज ज्या कुटुंबात जितकी संपन्नता जास्त तितकीच अशांतता, अस्थिरता, कटकटी, काळजी, चिंता यांचं साम्राज्यही विपुल! याउलट मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात समस्या या प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेल्या!
अशा परिस्थितीत समाजामध्ये वावरत असताना आपल्याला सर्वकाही आलबेल चाललंय असं वाटत असलं तरीही प्रत्येक नातेसंबंधात काहीना काहीतरी कुरबुरी सुरू असलेल्या पहायला मिळतात. महिला व मुलांच्या विविध तक्रार निवारण समितीवर कार्य करीत असताना त्यांना समुपदेशन करीत असताना काही गोष्टी (त्रुटी) प्रकर्षाने जाणवतात. समस्याग्र्रस्तांच्या मार्गदर्शनासाठी केलेला छोटासा प्रयत्न!
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे समस्या प्रौढांची असो वा मुलांची. ज्यावेळेस एखाद्या समस्येला सुरुवात होते त्याचवेळी आपले पालक, हितचिंतक, नातेवाईक, शेजारी किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता यापैकी जी व्यक्ती तुमच्या अधिक विश्‍वासातील असेल तिला त्या समस्येबद्दल सर्वकाही सांगा. कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. स्वतःच्या चुकांसहित सर्व परिस्थिती प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला मार्ग निश्‍चितच सापडेल. बर्‍याच प्रमाणात आमच्या असं लक्षात येतं की समस्या उद्भवल्यानंतर ८-१० वर्षानंतर ती व्यक्ती आमच्या संपर्कात येते. त्यावेळी तिच्या आयुष्यातील महत्वाची उमेदीची वर्षे अन्याय सहन करण्यात वाया गेलेली असतात ती चूक तुमच्या हातून होऊ देवू नका.
4770318674986245778_orgज्यावेळी तुम्ही एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी एखादी व्यक्ती किंवा संस्था वा कायद्याचा आधार घेता त्यावेळी ८-१० वर्षातील समस्या जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे चुटकीसरशी सुटून तुमच्या मनाप्रमाणे अपेक्षित वर्तनाबद्दल घडेल या भ्रमात राहू नका. समस्या जशी लहान लहान प्रसंगातून उग्र रूप धारण करते तद्वतच त्याचं निराकारणसुद्धा टप्प्याटप्प्यानेच होणार असतं. मानवी मन म्हणजे इलेक्ट्रॉनिक बाहुली नव्हे जे चावी देताच ताळ्यावर येईल.
प्रत्येक समस्याग्रस्त व्यक्तीला समस्येचं उत्तर, समाधान ताबडतोब हवं असतं. एकाच बैठकीत कोणताही सोक्षमोक्ष लागावा अशी त्यांची इच्छा असते. तसे न झाल्यास न्यायव्यवस्थेवरचा, संबंधित व्यक्तीवरचा त्यांचा विश्‍वास डळमळीत होतो. अशा व्यक्ती निराशेच्या गर्तेत सापडून जगण्याची आशाच सोडून देतात. आपण ही चूक करू नका. परस्परांना विश्‍वासात घेण्यासाठी काही काळ जाऊ देणं हे अत्यंत गरजेचं असतं.
मुलांच्या समस्येसंदर्भात प्रत्येक मुलाला स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं, त्याला काही हक्क असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बहुतांशी पालक मुलांच्या समस्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सुरूवातीला मूल लहान आहे म्हणून नंतर वयात येतंय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून एकाअर्थी त्यांच्या समस्या गंभीर, जटील करण्यास कारणीभूत ठरतात. कोणतीही समस्या सोडवताना आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव असू द्या. योग्य मार्गाने गेल्यास प्रत्येक समस्येला मार्ग हा असतोच.
काही प्रत्यक्ष घडलेल्या घटना आपण पाहू. ज्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, प्रॉपर्टी आलेली असते अशा कुटुंबातील तरूण पिढी ही बर्‍याचवेळा ऐतखाऊ बनते. त्यामुळे हळुहळू ही संपत्ती संपण्याच्या मार्गावर आली असता अशा व्यक्ती व्यवसनाधीन बनतात. अर्थार्जन, कष्ट करण्याची सवय नसल्याने एक वेळ अशी येते की, व्यसन, उपासमार यांनी अशा व्यक्ती मनोरूग्ण बनतात. काही व्यक्ती लांडीलबाडी करून विनासायास झटपट श्रीमंत होतात. परंतु हे तंत्र त्यांना पुढेही जपता आलं नाही तर मात्र अशांवरही कर्जबाजारी, उपासमारीची वेळ येते. अशा व्यक्तीसुद्धा मनोरूग्ण बनतात. बरं, अशा व्यक्ती जेव्हा आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. त्यावेळी आम्ही त्यांना वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग सुचवतो. मात्र कष्ट करण्याची त्यांची बिलकुल मानसिकता नसते. कुठूनतरी आपल्याला आयतं घबाड मिळावं आणि पुन्हा आपण पूर्वीप्रमाणेच झटपट श्रीमंत होऊ हे स्वप्न काही सत्यात उतरू शकत नाही कारण समाजाने त्यांची चांगलीस पारख केलेली असते. अशी माणसं तुम्हाला कर्ज, उसनवारी करून दैनंदिन जीवन टीपटॉप जगताना दिसतील. बढाया माराव्यात, दुसर्‍यांच्या चुका दाखवण्यात ही मंडळी पटाईत असतात.
अशा वेळी त्यांना आपल्याला जर पुन्हा ‘माणसात’ आणायचे असेल तर ‘कष्ट करून भाकरी मिळवण्याचा’ मार्ग त्यांना पटवून देणं, तशी संधी त्यांना उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा मानसिकतेतून कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली काही पाहिली आहेत.
वाचकहो, आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदायची असेल तर आपली कर्तव्य आपण सचोटीनं पाळलं पाहिजेत. यासाठी आपले परस्परांशी असलेले नातेसंबंधही प्रेम, विश्‍वास आणि अहिंसेच्या पायावर जोडलेले असले पाहिजेत. आपलं आयुष्य हे सुख-शांती, समज-गैरसमज, चढ-उतार, हेवे-दावे इत्यादीनी भरलेलं असतं. काही व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचातुर्याने यावर मात करून यातून मार्ग काढतात. परंतु प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. अशावेळी कुटुंबाहेरील तिसर्‍या व्यक्तीचा जरूर सल्ला घ्या. छोट्या मोठ्या आपत्तींनी डगमगू नका. तुमच्या कोणत्याही समस्या निवारणासाठी आम्ही आहोतच!
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

....आरोग्यम् धनसंपदा

E-mail Print PDF
shraddh-kalambateदिवाळीचा पाच दिवसांचा सण संपला असला तरी अजून निदान १०-१५ दिवस आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यात हमखास जातातच. हल्ली घरच्या फराळाचं प्रमाण खूपच कमी झालेलं असलं तरी विकतच्या फराळाचा बकाणा हा सुरूच असतो. खरं म्हणजे आपल्या प्रत्येक सणावाराचं नातं कोणत्या ना कोणत्या खाद्यपदार्थांशी जोडलेलं आहेच. त्यात शाकाहारी, लोकांसाठी गोडाचे पदार्थ जास्त असतात. परंतु मांसाहारी लोकांसाठी गोडाबरोबरच तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थांचा तोटा नसतो. एकूण काय तर, ‘दिवाळी सण मोठा, नाही खाण्या तोटा’ हेच खरं!
‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती! त्यामुळे एखाद्याचा पाहुणचार करताना विशेष लक्ष दिलं जातं ते पोटपुजेकडे! शाकाहारी पाहुणचारात श्रीखंड पुरी, बासुंदी, जिलेबी, मसालेभात यांच्या जोडीला विविध प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, लोणचं, पापड इ. तर मांसाहारी पाहुणचारात हा बेत असतोच. त्या जोडीला मासे, मटण, अंडी यांचा मारा! वडे, पुर्‍या यांची मोजदाद न केलेली बरी.
बरं, इतके सगळे पदार्थ बनवायचे म्हणजे गृहिणीची तारेवरची कसरत वर्णन करण्यापलिकडची! ती गृहिणी आजारी किंवा नोकरदार असेल तर हल्ली गल्लीबोळात हॉटेल्स, खानावळी आहेतच. एकूण काय तर पाहुणचारात कोणतीही उणीव राहता कामा नये. वाचकहो, पाहुणचार हा व्हायलाच हवा. परंतु अलिकडे अगदी कमी वयात, विशी-तिशीपासून तरूण पिढीला मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग अशा प्रकारच्या गंभीर व्याधी जडलेल्या दिसतात. याचं कारण काय बरं असावं. याचा कधी आपण गांभीर्याने विचार करतो का? करतो, पण कधी, एकतर अगदी आपल्या जवळची व्यक्ती अचानक आपल्यापासून दुरावते किंवा आपण स्वतःच अशा आजारांना बळी पडतो ना तेव्हा आणि याचं मुळ कारण म्हणजे आपला अयोग्य आहार-विहार आणि सध्याची जीवनपद्धती. अर्थात लाईफ स्टाईल! खरं म्हणजे ‘कळतं पण वळत नाही’ अशी आपली सर्वांचीच अवस्था झालीय. क्षणभर थांबून शांतपणे यावर विचार केला तर अगदी सहज या समस्या सुटू शकतील. पण इथे वेळ आहे कुणाला थांबायला? जेव्हा आपलं शरीरच धावायचं थांबेल तेव्हा आपण ‘जागे’ होणार. पण मित्रांनो, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, असो.
yoga-6मला वाटतं, आजपासून तरी आपण याचा गांभीर्याने विचार करूयात. आपल्या आरोग्याचं संतुलन हे आपला आहार, तो घेण्याच्या वेळा, दिवसभरात आपण करत असलेलं काम आणि त्यानुसार करायचा व्यायाम आणि घ्यायची विश्रांती यावर अवलंबून असतं. बर्‍याच जणांचा एक गोड गैरसमज असतो की एखादी व्यक्ती दिसायला गोल गरगरीत असली म्हणजे आरोग्यसंपन्न! परंतु अशी छबी बहुतांशी फसवी असते. त्यापेक्षा निरोगी सडसडीतपणा डोळ्यांना तितकासा सुखावणारा नसला तरी आरोग्याच्यादृष्टीने मात्र योग्य असू शकतो.
तुम्ही म्हणाल सणवार आणि आरोग्याचा काय संबंध? खाण्यासाठीच तर ते आपण साजरे करतो ना? आयुष्यभर या वीतभर पोटासाठीच तर राबराब राबायचं. मग त्यावर बंधनं कसली? तुमच्या या विचारांशी मात्र मी सहमत नाही. पोटपुजेला किती महत्व द्यावं यावरून एखाद्याचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन काय आहे हे निश्‍चित समजू शकतं. आज आपण फक्त दिवाळीबद्दल बोलू. दिवाळीची खरी सुरूवात होते ती वसुबारस म्हणजे गोवत्सपूजनाने. सर्वसामान्यांच्या दिवाळीची सुरूवात होते ती धनत्रयोदशीपासून. यातील धनाचा अर्थ आपण फक्त संपत्ती, पैसाअडका एवढाच घेतो.  यापुढचे चारही दिवस नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज. आपण या धनाशी संबंधितच सर्व व्यवहार करीत असतो. मग ती दिवाळीची रोषणाई असो वा फटाक्यांची आतषबाजी, भाऊबिजेची ओवाळणी असो वा पाडव्याची, लक्ष्मीपूजनाचा तर थाट काही औरच! नरकचतुर्दशीच्या दिवशी आपण संपूर्ण शरीराला तेल उटणं लावून अभ्यंगस्नान करतो. बर्‍याच मंडळींना ते आवडत नाही. मग ही प्रथा कशासाठी? तर शरीररूपी धनाची काळजी घेऊन ते धन आयुष्यभर व्याधींशिवाय उपभोगता यावं. परंतु आपलं दुर्दैव! या शरीररुपी धनाची आपण कधीच काळजी घेत नाही. त्यात मन सतत टेन्शनने भारलेलं. त्यात अहोरात्र नश्‍वर धन, संपत्ती, पैसा अडका, प्रॉपर्टी, जमीनजुमला यांच्यामागे तहानभूक हरपून धावणं. यामुळे होतं काय की अफाट धनदौलत मिळवूनही आपण व्याधीग्रस्त शरीरामुळे त्याचा उपयोग मात्र घेऊ शकत नाही. प्रसंगी पाण्यासारखा पैसा ओतूनही काही व्याधींवर उपचारही होवू शकत नाहीत. पर्यायाने या शरीररूपी धनाला कायमचं मुकावं लागतं. यासाठी केवळ एकच दिवस अभ्यंगस्नानाऐवजी अधूनमधून कायमच या धनाची आपण मनोभावे पूजा केली तर ही शरीरदेवता आपल्याला आयुष्यभर सुख, शांती आणि समृद्धी देईल.
वाचकहो, पटतंय ना तुम्हांला शरीररूपी धनाचं महत्व? याचाच अर्थ असा की, ‘शरीरमाद्यं खदुधर्मसाधनम्’ या श्‍लोकाप्रमाणे आपल्या जन्मापासून आपल्याजवळ असलेल्या धनाकडे दुर्लक्ष करून आपलं सुख आपण इतरत्र शोधत असतो. ते सोनं-नाणं, वाडे-माड्यात कसं बरं मिळणार? आपल्या पूर्वजांनी शास्त्रानुसार प्रत्येक सण-वाराचं त्या त्या ऋतुमानानुसार महत्व लक्षात घेऊन ते साजरे करण्याची परंपरा आपल्याला दिलेली आहे. त्यात कालानुरूप काही बदल अवश्य करावेत. परंतु त्याचा मूळ गाभा, मूळ हेतू, त्यामागील कारणमिमांसा मात्र विसरता कामा नयेत. आता रोज ‘शुभंकरोति
कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा’ म्हणताना त्याचा योग्य अर्थ लक्षात घेऊन ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करुयात. काय पटतंय ना? आपले विचार आमच्याशी शेअर करा.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू-९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org, email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तिची दुर्दम्य इच्छाशक्ती

E-mail Print PDF
shraddh-kalambateदुर्दैवाने वैवाहिक जीवन फार काळ टिकलं नाही. पहिली मुलगी राजश्री तीही मतिमंद, दुसरा मुलगा राकेश वंशाचा दिवा परंतु त्याचा आनंद क्षणिक ठरला. कारण आयुष्यभराचा सोबती व्यसनी, बेकार आणि मारझोड करणारा निघाल्याने स्वाभिमानी आईने (यल्लमाने) आपलं सासर सोडलं आणि दोन्ही लहानग्या मुलांना घेऊन कायमस्वरूपी माहेरी आली. घरकाम, धुणीभांडी करून स्वतःचा संसार माहेरच्या आधारावर सावरला रत्नागिरीतील झाडगांव झोपडपट्टीत गेली २० वर्षे.
यल्लमा वडार, मुळात निरक्षर. परंतु शिकण्याची जबरदस्त इच्छा त्यामुळे आपल्या लहान भावांना तरी शिक्षण मिळावे या हेतूने ती त्यांना शाळेत घेऊन जाई. तिथल्या शिक्षिकेंनी तिला लिहायला, वाचायला शिकवले. त्या आगाशेबाईंचे ऋण यल्लमा मानते. तिचे वडील ५ वी शिकलेत. तर यल्लमाच्या प्रयत्नाने तिचे दोनही लहान भाऊ ९ वी शिकले. तिचे  वडील, भाऊ अल्पशिक्षित, आई अशिक्षित गवंडीकाम करणारे परंतु विचाराने इतके प्रगल्भ की एखाद्या सुशिक्षितालाही लाजवतील. पोटभर अन्न, गरजेपुरते कपडे आणि डोक्यावर छप्पर इतपत सुरक्षित जीवन त्यांना लाभलं होतं. कारण घरातील सर्वचजण अतिशय कष्टाळू, मेहनती आणि प्रामाणिक. त्यातूनच चार पैसे बाजूला करून मुलांच्या भविष्यासाठी, अडीअडचणीसाठी ठेवावेत. ही दूरदृष्टी यल्लमाकडे होती. त्यामुळे तिने आपण पतीपासून विभक्त राहतोय याचा ‘इशू’ करुन कधी कोणापुढे हात पसरला नाही. मात्र आमच्यासारख्या संस्थेच्या आधाराने शासनाच्या विविध योजना तिने राकेशच्या शिक्षणासाठी मिळविल्या.
    yallamaअन् झोपडीचं गळकं छप्पर, पायाखाली ओलसर जमीन, मिणमिणता दिवा, आजुबाजूची प्रतिकूल परिस्थिती यातून राकेशने विशेष प्राविण्य क्षेणीत दहावीच्या परीक्षेत यशस्वी होवून आईच्या श्रमाचं चीज केलं. लहानपणापासूनच राकेश हुशार, चुणचुणीत, शिकण्याची, वाचनाची आवड असणारा, त्याचे ७ वी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीच्या न.प. शाळा नं. १ मध्ये तर ८ वी ते १० वी पर्यंतचे फाटक प्रशालेत झाले. त्यानंतर त्याने शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून इलेक्ट्रीकमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. केवळ १ टक्क्याने त्याची प्रथम श्रेणी हुकली. यापुढे त्याला इंजिनिअरिंगमध्ये डीग्री पूर्ण करण्याची इच्छा आहे.
वाचकहो, २१ व्या शतकात सुशिक्षित कुटुंबात दोनही पालक नोकरी करणारे, आर्थिक सुबत्ता असूनही आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करू शकत नाहीत. चांगल्या सुशिक्षित, घरंदाज कुटुंबातील मुलं व्यसनी, गुन्हेगार म्हणून एक सामाजिक समस्या निर्माण करताहेत. या पार्श्‍वभूमीवर यल्लमाने आपल्या मुलांवर केलेले संस्कार खरोखरच आदर्शवत आहेत. मुलगी मतिमंद असली तरी तिच्याबद्दल सांगितल्याशिवाय कुणालाही कल्पना येणार नाही इतकं तिचं वागणं, बोलणं, राहणं टापटीप!
यल्लमाला अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास प्रोत्साहन दिले ते तिच्या दोन भावांनी. कारण या दोन भावांचं शिक्षण केलं ते यल्लमानेच. यल्लमा आता परिस्थितीशी झुंज देऊन थकलीय. कारण शरीर साथ देत नाही. आयुष्याचं अर्ध शतकं आता जवळ आलंय. पण मनाची उभारी मात्र कायम आहे.
नुकतीच यल्लमाला एका मोठ्या घरकामाची संधी आली होती. परंतु आपल्या भावांच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपल्याला घर सोडता येणार नाही असे सांगून तिने व तिच्या भावांनी या मोठ्या पगाराच्या संधीवर पाणी सोडलं. स्वतःच्या उपजिविकेपुरतं सध्या ती कमावतेय. बाकी पूर्ण वेळ ती कुटुंबातील मुलांसाठी देतेय.
एवढ्यावरच यल्लमा समाधानी असती तर तिला नावाजण्याची काही गरज नव्हती. परंतु झोपडपट्टीतील महिलांचे बचतगट, लहान मुलांचे संस्कार वर्ग, आमच्या संस्थेचे विविध उपक्रम, सण-समारंभ यात यल्लमा जातीने लक्ष घालून आमच्या संस्थांना सहकार्य करतेय.
वाचकहो, असा त्याग करणं सर्वांनाच जमतं असं नाही. ‘मी आणि माझं कुटुंब’ यापलिकडे कोणतीही नाती दुय्यम मानून स्वार्थी, आपमतलबी झालेला समाज आपण आजुबाजूला पहातोय. आणि म्हणूनच दिवसेंदिवस नवनव्या सामाजिक समस्या उग्र रूप धारण करताहेत. अशी त्यागीवृत्ती, सामाजिक बांधिलकी जोपासणं आपल्याला जमेल का?
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
{VMr XþX©å` BÀN>meŠVr
XþX£dmZo d¡dm{hH$ OrdZ \$ma H$mi {Q>H$b§ Zmhr. n{hbr _wbJr amOlr Vrhr _{V_§X, Xþgam _wbJm amHo$e d§emMm {Xdm na§Vw Ë`mMm AmZ§X j{UH$ R>abm. H$maU Am`wî`^amMm gmo~Vr ì`gZr, ~oH$ma Am{U _maPmoS> H$aUmam {ZKmë`mZo ñdm{^_mZr AmB©Zo (`ëb_mZo) Amnb§ gmga gmoS>b§ Am{U XmoÝhr bhmZ½`m _wbm§Zm KoD$Z H$m`_ñdê$nr _mhoar Ambr. KaH$m_, YwUr^m§S>r H$ê$Z ñdV…Mm g§gma _mhoaÀ`m AmYmamda gmdabm aËZm{JarVrb PmS>Jm§d PmonS>nÅ>rV Jobr 20 df}.
`ëb_m dS>ma, _wimV {Zaja. na§Vw {eH$Ê`mMr O~aXñV BÀN>m Ë`m_wio Amnë`m bhmZ ^mdm§Zm Var {ejU {_imdo `m hoVyZo Vr Ë`m§Zm emioV KoD$Z OmB©. {VWë`m {e[jH|$Zr {Vbm {bhm`bm, dmMm`bm {eH$dbo. Ë`m AmJmeo~mBªMo F$U `ëb_m _mZVo. {VMo dS>rb 5 dr {eH$boV. Va `ëb_mÀ`m à`ËZmZo {VMo XmoZhr bhmZ ^mD$ 9 dr {eH$bo. {VMo  dS>rb, ^mD$ Aën{e{jV, AmB© A{e{jV Jd§S>rH$m_ H$aUmao na§Vw {dMmamZo BVHo$ àJë^ H$s EImÚm gw{e{jVmbmhr bmOdVrb. nmoQ>^a AÝZ, JaOonwaVo H$nS>o Am{U S>moŠ`mda N>ßna BVnV gwa{jV OrdZ Ë`m§Zm bm^b§ hmoV§. H$maU KamVrb gd©MOU A{Ve` H$îQ>miy, _ohZVr Am{U àm_m{UH$. Ë`mVyZM Mma n¡go ~mOybm H$ê$Z _wbm§À`m ^{dî`mgmR>r, AS>rAS>MUrgmR>r R>odmdoV. hr XÿaÑîQ>r `ëb_mH$S>o hmoVr. Ë`m_wio {VZo AmnU nVrnmgyZ {d^ŠV amhVmo` `mMm "Bey' H$éZ H$Yr H$moUmnwT>o hmV ngabm Zmhr. _mÌ Am_À`mgma»`m g§ñWoÀ`m AmYmamZo emgZmÀ`m {d{dY `moOZm {VZo amHo$eÀ`m {ejUmgmR>r {_i{dë`m.
AZ² PmonS>rM§ JiH§$ N>ßna, nm`mImbr Amobga O_rZ, {_U{_UVm {Xdm, AmOw~mOyMr à{VHyb n[apñWVr `mVyZ amHo$eZo {deof àm{dÊ` joUrV XhmdrÀ`m narjoV `eñdr hmodyZ AmB©À`m l_mM§ MrO Ho$b§. bhmZnUmnmgyZM amHo$e hþema, MwUMwUrV, {eH$Ê`mMr, dmMZmMr AmdS> AgUmam, Ë`mMo 7 dr n`ªVMo {ejU aËZm{JarÀ`m Z.n. emim Z§. 1 _Ü`o Va 8 dr Vo 10 dr n`ªVMo \$mQ>H$ àemboV Pmbo. Ë`mZ§Va Ë`mZo emgH$s` V§Ì{ZHo$VZ aËZm{Jar `oWyZ Mm§Jë`m JwUm§Zr CÎmrU© hmodyZ BboŠQ´>rH$_Ü`o {S>ßbmo_m nyU© Ho$bm. Ho$di 1 Q>ŠŠ`mZo Ë`mMr àW_ loUr hþH$br. `mnwT>o Ë`mbm B§{O{ZA[a¨J_Ü`o S>rJ«r nyU© H$aÊ`mMr BÀN>m Amho.
dmMH$hmo, 21 ì`m eVH$mV gw{e{jV Hw$Qw>§~mV XmoZhr nmbH$ ZmoH$ar H$aUmao, Am{W©H$ gw~Îmm AgyZhr Amnë`m _wbm§da `mo½` Vo g§ñH$ma H$ê$ eH$V ZmhrV. Mm§Jë`m gw{e{jV, Ka§XmO Hw$Qw>§~mVrb _wb§ ì`gZr, JwÝhoJma åhUyZ EH$ gm_m{OH$ g_ñ`m {Z_m©U H$aVmhoV. `m nmíd©^y_rda `ëb_mZo Amnë`m _wbm§da Ho$bobo g§ñH$ma IamoIaM AmXe©dV AmhoV. _wbJr _{V_§X Agbr Var {VÀ`m~Ôb gm§{JVë`m{edm` Hw$Umbmhr H$ënZm `oUma Zmhr BVH§$ {VM§ dmJU§, ~mobU§, amhU§ Q>mnQ>rn!
`ëb_mbm Aem à{VHyb n[apñWVrda _mV H$aÊ`mg àmoËgmhZ {Xbo Vo {VÀ`m XmoZ ^mdm§Zr. H$maU `m XmoZ ^mdm§M§ {ejU Ho$b§ Vo `ëb_mZoM. `ëb_m AmVm n[apñWVrer Pw§O XoD$Z WH$br`. H$maU eara gmW XoV Zmhr. Am`wî`mM§ AY© eVH§$ AmVm Odi Amb§`. nU _ZmMr C^mar _mÌ H$m`_ Amho.
ZwH$VrM `ëb_mbm EH$m _moR>çm KaH$m_mMr g§Yr Ambr hmoVr. na§Vw Amnë`m ^mdm§À`m _wbm§da Mm§Jbo g§ñH$ma ìhmdoV `mgmR>r Amnë`mbm Ka gmoS>Vm `oUma Zmhr Ago gm§JyZ {VZo d {VÀ`m ^mdm§Zr `m _moR>çm nJmamÀ`m g§Yrda nmUr gmoS>b§. ñdV…À`m Cn{O{dHo$nwaV§ gÜ`m Vr H$_mdVo`. ~mH$s nyU© doi Vr Hw$Qw>§~mVrb _wbm§gmR>r XoVo`.
EdT>çmdaM `ëb_m g_mYmZr AgVr Va {Vbm ZmdmOÊ`mMr H$mhr JaO ZìhVr. na§Vw PmonS>nÅ>rVrb _{hbm§Mo ~MVJQ>, bhmZ _wbm§Mo g§ñH$ma dJ©, Am_À`m g§ñWoMo {d{dY CnH«$_, gU-g_ma§^ `mV `ëb_m OmVrZo bj KmbyZ Am_À`m g§ñWm§Zm ghH$m`© H$aVo`.
dmMH$hmo, Agm Ë`mJ H$aU§ gdmªZmM O_V§ Ag§ Zmhr. "_r Am{U _mP§ Hw$Qw>§~' `mn{bH$S>o H$moUVrhr ZmVr Xþæ`_ _mZyZ ñdmWu, Amn_Vb~r Pmbobm g_mO AmnU AmOw~mOybm nhmVmo`. Am{U åhUyZM {Xdg|{Xdg ZdZì`m gm_m{OH$ g_ñ`m CJ« ê$n YmaU H$aVmhoV. Aer Ë`mJrd¥Îmr, gm_m{OH$ ~m§{YbH$s OmonmgU§ Amnë`mbm O_ob H$m?
-lÕm H$i§~Q>o
g§nH©$ … hoënbmB©Z ñd`§goVy
9422430362
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

त्यांच्या अंधःकारमय जीवनात प्रकाशाचे रंग भरूया

E-mail Print PDF
shraddh-kalambateमाझ्या दिराचं नुकतच आकस्मिक निधन झालं. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलीनं आम्हाला आठवण करून दिली की बाबांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. आम्ही सर्व या अकल्पित धक्क्याने कोलमडलो होतो परंतु या कोवळ्या मुलीच्या स्मरणात बाबांची अखेरची इच्छा राहिलेली पाहून आम्हाला तिचं खरोखरच कौतुक वाटलं. अशाच एका वृद्ध आजीचं अचानक निधन झालं. त्यांना स्वतःला आपण आणखी काही वर्षेनक्की जगू अशी खात्री होती. परंतु एका छोट्याशा शस्त्रक्रियेने त्यांचा घात केला. त्यांची सुद्धा नेत्रदान, देहदान करण्याची मनस्वी इच्छा होती. तसा त्यांनी अर्ज भरून संकल्पही केला होता.
या दोनही घटनांमध्ये मृत्यूनंतर बराच कालावधी गेल्याने तसेच मृतदेहाची योग्य ती काळजी न घेतल्याने त्यांचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आपल्या अगदी जवळच्या प्रिय व्यक्तींची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य मात्र आयुष्यभर राहतं.
या घटना पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच १५ ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिन सर्वत्र साजरा केला गेला. १० जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिनाचं महत्व खरं तर आपल्यासारख्या डोळस माणसांना कळणं तसं मुष्किलच! कारण ज्यांची पंचज्ञानेंद्रिये शाबूत आहेत, व्यवस्थित कार्यक्षम आहेत अशा माणसांना आपल्या धडधाकट शरीराची अजिबात फिकीर नसते या कार्यक्षम शरीराचा आपण पुरेपूर वापर करतो का? हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारून पहा म्हणजे आपल्याला ‘डोळस आंधळं’ का म्हटलं जातं याचा प्रत्यय येईल.
ज्या व्यक्तींमध्ये एखादं किंवा काही व्यंग असतात उदा. अपंग, मूक-बधीर, अंध इ. अशा व्यक्तींची इतर ज्ञानेंद्रिये अतिशय तीव्र, अधिक कार्यक्षम असतात. अशा व्यक्ती आपल्या शारिरीक व्याधींवर यशस्वी मात करून प्रसंगी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी यांच्या बळावर एखादं अलौकीक कार्य करून दाखवतात अशी असंख्य उदाहरणं ज्यावेळी समाजात आपल्याला पहायला मिळतात त्यावेळी ‘डोळस आंधळ्यांचा’ नाकर्तेपणा विशेषत्वाने जाणवतो. कारण अशी माणसं लहानमोठ्या समस्येनं, थोड्याशा नैराश्यानं व्यसनाधीन होणं, आत्महत्या करणं अशा घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
eye_2जगातील एकूण अंध व्यक्तींच्या ३०% अंधव्यक्ती या भारतातील आहेत. त्यातील ६०% व्यक्ती या १२ वर्षाखालील आहेत. याचाच अर्थ किशोरवयीन मुलांचं प्रमाण जास्त आहे. यात दरवर्षी हजारो अंधांची भर पडतच असते. यामागे कुपोषण तसंच मानवनिर्मित व निसर्गनिर्मित कारणं आहेत. आपल्या निष्काळजीपणामुळे बर्‍याचवेळा अंधत्वाला सामोरं जावं लागतं. अलिकडे कोणताही आनंदोत्सव, मिरवणुका, लग्न हे फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय पूर्णच होत नाहीत. नुकताच गणपती, नवरात्रौत्सव, दसरा या सणांना, आपण याचा अनुभव घेतलाय. काही दिवसांवर दिव्यांचा, फटाक्यांचा सण दीपावली येऊन ठेपलाय. या आतषबाजीमुळे ध्वनीचं, हवेचं प्रदूषण तर होतच परंतु भाजणं, आग लागणं, अंधत्व येणं या प्रकारच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडतात. अशा वेळी योग्य उपचार व काळजी न घेतल्यास हे अंधत्व कायमस्वरूपी टिकू शकतं.
अशा अंध व्यक्तींना आपण नवजीवन देऊ शकतो. ते केवळ नेत्रदानाने. म्हणूनच नेत्रदान हे रक्तदानाप्रमाणेच सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या व्यक्तींना बुब्बुळाच्या आजाराने अंधत्व आलेलं आहे अशा व्यक्तींमध्ये बुब्बुळाचं रोपण केलं जातं. पूर्ण डोळा बसवला जात नाही. ज्या शहरांमध्ये या नेत्रदानाची सोय आहे अशा ठिकाणी मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्रदान झाले पाहिजे. मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर बर्फ किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतात. खोलीतील पंखा, एसी बंद करा. डोक्याखाली २ उशा ठेवा व लागलीच डॉक्टरांशी संपर्क साधा. नेत्रदान प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत होते. त्यानंतर पुढील ७२ तासांत अंध व्यक्तींवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करावी लागते. ही मोफत केली जाते.
कोणत्याही वयाच्या व्यक्तींना नेत्रदान करता येते. काही गंभीर, संसर्गजन्य आजार, मधुमेह, डोळ्यांचा कर्करोग इ. आजारात नेत्रदान करता येत नाही. मात्र चष्मा असलेल्या, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना नेत्रदान करता येतं. ‘अंधत्व निवारण’ ही राष्ट्रीय समस्या आहे. ती दिवसेंदिवस ज्वलंत होत चाललीय. कारण ज्या प्रमाणात अंधत्व वाढतंय त्या प्रमाणात नेत्रदान होत नाहीये. आपल्या समाजात आजही बर्‍याच अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे सुशिक्षित माणसेही नेत्रदानाला विरोध करतात. एखादा अवयव दान केल्याने मुक्ती मिळत नाही अशी काही लोकांची अंधश्रद्धा आहे. अशा व्यक्तींना मला विचारावंसं वाटतं की एखाद्या गंभीर आजारात, अपघातात तुम्ही एखादा अवयव काढून टाकता, त्यावेळी या मुक्तीचा विचार करता का?
जन्मापासून अंध असलेल्या व्यक्ती अंधशाळेत जाऊन आपलं शिक्षण, उच्चशिक्षण किंवा एखादी कला आत्मसात करतात परंतु नंतर आलेलं अंधत्व स्विकारणं पालकांना थोडं जड जातं. हे पालक हट्टाने आपल्या मुलांना नॉर्मल शाळेतच ठेवतात. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते. ग्रामीण भागामध्ये अशा तर्‍हेचे गैरसमज बर्‍याच प्रमाणात दिसून येतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने, नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पालकांनी योग्य निर्णय घेणं केव्हाही उत्तम! ४० टक्क्यांच्यावर अंधत्व असलेल्या मुलांना अंध शाळेत प्रवेश दिला जातो.
वाचकहो, पटलं ना तुम्हाला नेत्रदानाचं महत्व! आपल्या नेत्रदानामुळे आपण एकाचवेळी दोन व्यक्तींना हे सुंदर जग पहाण्याची, अनमोल जीवन जगण्याची, त्यांच्या अंधःकारमय जीवनात प्रकाशाचे रंग भरण्याची एक अनमोल संधी देऊ शकतो. मग आजच तुम्ही आपल्या कुटुंबाच्या साक्षीनं नेत्रदानाचा संकल्प करा. आपल्या नजिकच्या शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधा. अजूनही काही शंका असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Page 2 of 5