Saturday, Jan 20th

Headlines:

महिला बालकल्याण

वैचारिक सीमोल्लंघन करूया

E-mail Print PDF
shraddh-kalambateवाचकहो, मागच्या लेखात आपण महिलांवर होणारे लैंगिक अन्याय, अत्याचार हे इतर अपघातांप्रमाणे एक ‘अपघात’ समजावेत यावर विस्तृत चर्चा केली. यात ज्या महिला बळी पडल्याहेत त्यांना आपण विचारांची एक नवी दिशा दिलीय. परंतु अशा तर्‍हेचे अपघात घडूच नयेत याकरता आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे आज पाहू.
पुरूषत्व म्हणजे काय? पुरूषांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी कोणती आहे? स्त्री-पुरूष संबंधांकडे समाजाची पहाण्याची मानसिकता कोणती? याला प्रसारमाध्यमं कारणीभूत आहेत का? शालेय स्तरावर आपण काही उपाययोजना करू शकतो का? प्रत्येक कुटुंबाची यात कोणती जबाबदारी आहे? इ. प्रश्‍नांची योग्य उत्तरं आपण मिळवू शकलो तर नक्कीच भविष्यात अशा घटनांना मोठ्या प्रमाणावर आळा घालू शकतो.
दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर आपल्या समाजात महिलांमध्ये खरोखरच वैचारिक क्रांती घडून आलीच. रोज अशा अत्याचारांच्या शेकडो घटना उघडकीस येताहेत. हे निश्‍चितच समाजजागृतीचं लक्षण म्हटलं पाहिजे. आता पिडीत महिला आणि तिचे कुटुंबिय आपली, आपल्या कुटुंबाची इज्जत जाईल याचा विचार न करता गुन्हेगारीविरूद्ध तक्रार करण्यास पुढे येताहेत. महिलांचं हे दुर्गेचं रूप आजच्या काळात अपेक्षित आहे.
ज्यावेळी आपण आपल्या घरातील स्त्रीच्या सुरक्षिततेची अपेक्षा करतो, त्याचवेळी आपल्या घरातील पुरूषाने दुसर्‍या स्त्रीकडे त्याच नजरेने पहाण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. यासाठी प्रत्येक मातेनं आपल्या मुलांना स्त्रियांचा आदर करणं, त्यांना सन्मानानं वागवणं, प्रसंगी त्यांचं संरक्षण करणं, त्यांना त्यांचे अधिकार देणं याची शिकवण देणं आजच्या काळाची मुख्य गरज आहे. तसा आदर्शही मुलांसमोर ठेवला गेला पाहिजे. आई -वडिलांचं नातं, वडिलांकडून आईला स्त्री म्हणून मिळणारी वागणूक, तिचा आदर, सन्मान हा त्या योग्य असला पाहिजे. तरच तसे संस्कार तुमच्या मुलांवर होणार आहेत. आजपर्यंत आपण सातच्या आत घरात, सहनशील असावं, दुसर्‍यांना उलटून बोलू नये, अशी बंधन फक्त मुलींवरच लादत आलोय. परंतु आज ही सर्व बंधनं मुलांवरही घालण्याची आपली जबाबदारी वाढली आहे.
मागच्या लेखात आपण पाहिलंय की स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाला तर तिला शीलभ्रष्ट समजू नये. तसेच आता पुरूषांची मर्दपणाची संकल्पना, पुरूषत्व यांच्याही व्याख्या बदलण्याची गरज निर्माण झालीय. स्त्री ही उपभोग्य किंवा मादी आहे ही पुरूषांची मानसिकता बदलून स्त्रीचा आदर, सन्मान करणं, तिला संरक्षण देणं म्हणजे मर्दपणा, त्यातच पुरूषांचं पुरूषत्व सामावलेलं आहे ही व्याख्या रूढ झाली पाहिजे. तसे विचार तसे संस्कार प्रत्येक मुलावर प्रत्येक पुरूषावर बिंबवले गेले पाहिजेत.
daughter_motherआपल्या समाजात पुरूषांनी रडणं, हळवं, सहनशील असणं हे कमीपणाचं समजलं जातं. या नैसर्गिक भावना दडपून, मारून टाकल्यामुळे हळुहळू पुरूष भावनाहीन बनत जातात. आणि यातूनच त्यांच्या हातून गंभीर गुन्हे, क्रूर अत्याचार घडतात. हे टाळण्यासाठी पुरूषांना सुद्धा आपलं मन मोकळं करण्याची, रडण्याची, हळवं होण्याची संधी दिली पाहिजे. अशावेळी त्यांना ‘बायकी’ म्हणून हिणवू नये.तरच पुरूषांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी बदलण्यास मदत होईल. हे संस्कार प्रत्येक घराघरात, प्रत्येक शाळेत, मुलांवर अगदी नकळत केले गेले पाहिजेत. यासाठी प्रौढांनी आपली वागणूक बदलली पाहिजे.
अत्याचारग्रस्त महिलेला समाजात पुन्हा ताठ मानेनं जगता यावं यासाठी आपल्या कायद्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. २ ऑक्टोबर २०१३ पासून बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसीड हल्ला इ. प्रकरणातील पिडीत महिला-पुरूषांच्या उपचाराकरीता शासनाने आर्थिक सहाय्यही जाहीर केलंय. सध्या ही रक्कम काही प्रकरणात कमी वाटत असली तरी पिडीत व्यक्तींचं मनोधैर्य वाढल्यास नक्कीच हातभार लागणार आहे. म्हणूनच या योजनेला ‘मनोधैर्य योजना’ असं नाव देण्यात आलं आहे.
महिलांवरील अत्याचार ही एक सामाजिक समस्या आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या निवारणासाठी पुरूषांनीही सहभाग घेतला पाहिजे. केवळ कायद्याने प्रश्‍न सुटत नसतात. त्यासाठी लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. शालेय स्तरावर मुलांना लैंगिक शिक्षण देणं काळाची गरज बनलीय. याचा गैरफायदा मुलं घेतील अशी शंका व्यक्त केली जाते. परंतु विविध प्रसार माध्यमं, मोबाईल, इंटरनेट यातून किशोरवयीन मुलांच्या हाती लैंगिक साहित्य अगदी सहज पडू लागलंय. ज्यातून त्यांना चुकीची व अर्धवट माहिती मिळते. त्याचं काय? या विषयावर मुलांशी संवाद साधून त्यांना शिक्षित करणं हा सर्वोत्तम उपाय आहे असा आमचा अनुभव व अभ्यास यातून सिद्ध झालंय.
नुकताच नवरात्रौत्सव पार पडलाय. दरवर्षी या उत्सवानंतर कुमारी मातांच्या गर्भपातांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे कशाचं लक्षण आहे? अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर काही बंधनं घातली पाहिजेत. दसर्‍याला आपण शस्त्रांची पूजा करतो. त्याचबरोबर शिस्त, संयम, सुसंस्कार, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री सन्मान अशा मुल्यशस्त्रांची पूजा केल्यास ‘वैचारिक सोनं’ लुटल्याचं समाधान आपल्याला नक्कीच मिळेल असं नाही वाटत का तुम्हाला?
तुमच्या मुलांच्या कोणत्याही समस्ये संदर्भात तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लैंगिक अत्याचार हा एक ‘अपघात’ समजा

E-mail Print PDF
shraddh-kalambateदिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर महिलांवरील लैंगिक अत्याचार हा विषय ऐरणीवर आला आणि खर्‍या अर्थानं  संपूर्ण देशभर संतापाचा उद्रेक झाला. जनजागृतीची लाटही उसळली. संपूर्ण विश्‍व हे स्त्री-पुरूष संबंधांवर आधारित असल्याने अनादी काळापासून अगदी पुराणकाळातही स्त्रीवर असे अत्याचार होतच होते. परंतु त्याला देवांचा कृपाप्रसाद, वरप्राप्ती इ. नावांनी संबोधले गेले. जसजसा काळ बदलत गेला, तसतशी या अत्याचारांची व्याख्या, त्याला दिली जाणारी नावेही बदलत गेली. त्यामुळे महिलांवरील अत्याचार अलिकडेच वाढलेत का? असा प्रश्‍न आम्हांला सर्रास विचारला जातो. त्याचं उत्तर आहे, नाही. दिल्ली प्रकरणानंतर आपल्या पाठिशी जनमत आहे याची कल्पना आल्यामुळे लोक ‘निर्भय’ झालेयत, घडलेली प्रकरणं उघड होऊ लागलीयत. पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रारी दाखल होऊ लागल्यायत. म्हणून वाचकांना हे प्रमाण अलिकडेच वाढलंय असं वाटतंय इतकंच!
दिल्लीतील ‘निर्भया’नंतर ‘अबोली’ प्रकरण गाजलं. मग मात्र मुंबई, नांदेड, पिंपरी-चिंचवड, मध्यप्रदेश, लखनौ, जयपूर इ. ठिकाणची लैंगिक अत्याचारांची प्रकरणं अगदी लगोपाठ म्हणजे दिवसागणिक उघडकीस आली. लखनौमधील एका २५ वर्षीय ब्युटीशियन तरूणीवर तिचे वडील आणि लहान भाऊ सतत ९ वर्षेलैंगिक अत्याचार करीत होते. तिच्या आईची याला मूकसंमती होती. कारण तिला हे माहित असूनही तिने त्याबाबत आवाज उठवला नाही. शेवटी त्या तरूणीनेच या अत्याचाराला नुकतीच वाचा फोडली आणि आई, वडिल, भाऊ यांना अटक झाली. दुसर्‍या प्रकरणात ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या ४० वर्षीय व्यक्तीला शिक्षा म्हणून त्याच्या ८ वर्षाच्या मुलाबरोबर त्या पिडीत मुलीचे लग्न लावून देण्याचा निकाल तिथल्या जातपंचायतीने दिला. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. याचाच अर्थ आपल्या देशाचा विचार करता, प्रत्येक राज्यातील कानाकोपर्‍यात असे अत्याचार होतच आहेत.
अगदी ४ वर्षांच्या अबोध बालिकांपासून ते नव्वदीच्या वृद्धांपर्यंत! तसेच गरीब-श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, गतिमंद, मतिमंद, मनोरूग्ण, गृहिणी, उच्चपदस्थ इ. कुणीही यातून सुटलेली नाही ही खरोखरच २१ व्या शतकातील शोकांतिका म्हणावी लागेल. वाचकहो, माहिती-तंत्रज्ञान तसेच विज्ञान युगात आपण क्षणाक्षणाला आधुनिकता, प्रगती, विकास आणि विस्तार विविध शोध यांचे नवनवे टप्पे पार करतोय, परंतु स्त्री-पुरूष समानता, स्त्री-पुरूष संबंध आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र मागासलेला, बुरसटलेल्या संकल्पनांचा आणि संकुचित असाच राहिला आहे.
rape2याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न साहजिकच प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्वतः ती स्त्रीच. मग ती पिडीत स्त्री असो वा इतर स्त्रिया. एखादी स्त्री गंभीर आजारी असेल किंवा तिला एखादा अपघात झाला तर समाजाची तिला अपार सहानुभूती, प्रेम मिळतं. परंतु त्याच स्त्रीवर जर बलात्कार, विनयभंग, कुमारी माता यासारखे आघात झाले तर समाज तिच्याकडे कलुषित नजरेने बघतो. जणू यात तिचाच दोष आहे. तीच अपराधी आहे. त्यामुळे स्वतः ती पिडीत स्त्री तसेच इतर स्त्रियासुद्धा तिला भ्रष्ट, कलंकित मानतात. कारण आजही आपल्या समाजात स्त्रीच्या शीलाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व!
‘निर्भया’सारख्या प्रकरणांत तिला काहीही कल्पना नसताना अचानक तिच्यावर हल्ला होतो, अत्याचार केला जातो, अगदी क्रूरपणे तिच्यावर अनन्वित शारिरीक छळ, इजा केल्या जातात. यात तिचा काय दोष? तिची संमती नसताना तिच्या इच्छेविरूद्ध जर स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाले असतील तर तिचे शील भ्रष्ट झालेय हे कुणी ठरवायचं? पुरूषप्रधान संस्कृतीनं? प्रथमच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा अगदी अल्पावधीत सुनावण्यात आली याचाच अर्थ अत्याचार करणार्‍या पुरूषांचेही शील भ्रष्ट झाले होते आणि त्याप्रमाणे ‘निर्भया’ला आपला प्राण गमवावा लागला. त्याचप्रमाणे तुम्हालाही जगण्याचा कोणताही अधिकार नाही हे आपल्या न्यायव्यवस्थेने संपूर्ण जगाला दाखवून दिले. खर्‍या अर्थानं संपूर्ण स्त्रीजातीला योग्य न्याय मिळाला.
भगिनींनो, एखादा गंभीर आजार किंवा अपघाताच्या जखमा, औषधोपचार, शस्त्रक्रिया यांनी पूर्णपणे बर्‍या होतात आणि ती स्त्री समाजात पूर्वीप्रमाणे मानाने वावरू शकते. अगदी तसंच अत्याचारबाधित स्त्रीनेही तो एक ‘अपघात’ समजून त्याकडे दुर्लक्ष करावं. मात्र त्या अपराध्याला योग्य शासन होण्यासाठी तक्रार जरूर करावी.
त्यावेळचा शारिरीक, मानसिक छळ, वेदना, जखमा या योग्य उपचार आणि आवश्यक त्या कालावधीत भरल्या जातील. त्यानंतर मात्र आपण पूर्वीप्रमाणेच आपलं शरीर पवित्र मानलंं पाहिजे. आणि ताठ मानेनं समाजात आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे. तर आणि तरच तुमच्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता, दृष्टीकोन बदलणार आहे. यासाठी अशा प्रत्येक स्त्रीच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी, शेजार्‍यांनी, मित्रपरिवाराने तिला भक्कम आधार दिला पाहिजे. स्वयंसेतूने अशा कित्येक पिडीत, अत्याचारित महिलांना योग्य दिशा, योग्य उपचार, सल्ला, मार्गदर्शन देऊन त्यांचे पुनर्वसन केलं आहे. आज त्या स्त्रिया समाजात मानाने आपला संसार, आपलं करिअर करताहेत. हा बदल घडू शकतो हे या महिलांनी सप्रमाण दाखवून दिलंय, ते केवळ त्यांनी स्वतःकडे बघण्याची स्वतःची मानसिकता बदलल्यानेच! तुम्ही स्वतः निर्भय, खंबीर बनलात तर काय बिशाद आहे समाजाची तुमच्याकडे वाईट नजरेने बघण्याची! पटतंय ना तुम्हांला?
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

होणार सून मी या घरची

E-mail Print PDF
shraddh-kalambateवयात येणार्‍या प्रत्येक मुलीच्या मनातलं हे गोड स्वप्न! परंतु प्रत्येकीलाच ते लाभतं अस नाही, तसेच प्रत्येकीच्या मनात  अंकुरलेलं हे स्वप्न प्रत्येक वेळी सत्यात उतरतं असंही नाही. कित्येकांच्या बाबतीत तर  अखेरच्या क्षणापर्यंत ते स्वप्न ते स्वप्नच राहतं. मग ती स्त्री असो वा पुरूष! अशा व्यक्तींचा संसार कितीही  सुखाचा झालेला असला तरीही मनातलं हे गोजिरवाणं स्वप्न अपयशी मनाच्या हिंदोळ्यांवर हळुवार फुंकर घालीत असतं हे सुखाचे क्षण ज्यांना जपता येतात, तीच माणसं आपल्या आयुष्यात सुखी, समाधानी होतात. आणि वास्तवातल्या न् मनातल्या दोन्ही ‘संसारांना’ योग्य न्याय देऊ शकतात. ही सर्व प्रस्तावना एवढ्याचसाठी, बर्‍याच काळाने झी मराठीवर ‘होणार सुन मी या घरची’ ही मालिका पहायला मिळाली आणि सारे प्रेक्षक (अगदी तरूणांपासून वृद्धांपर्यंत) जान्हवी आणि श्रीच्या अक्षरशः ‘प्रेमात’ पडलेयत. हे मला कसं कळलं? असा  प्रश्‍न तुम्हाला पडला असेल तर मला रोज भेटणार्‍या अनेक व्यक्तींशी ‘टी.व्ही आणि मालिका’ या विषयावर बोलणं निघालं की हमखास ‘होणार सून मी...’चा विषय निघतोच.
honar-sun-mi-hya-gharchi-2जान्हवीचे बाबा आणि श्रीच्या ‘आया’ प्रत्येक तरूण तरूणीला लाभले तर... जगातल्या बहुतांशी समस्या निर्माणच होणार नाहीत. जान्हवीची सावत्र आई ‘कमावती मुलगी’ हातची जाऊ नये म्हणून तिची बरीच लग्नं मोडते. शेवटी पतीच्या ऑपरेशनसाठी म्हणून आगाऊ पैसे घेऊन जान्हवीचं लग्न एका वयस्कर बिजवराशी ठरवून टाकते. आज्ञाधारक आणि सुजाण जान्हवी घरच्या अशा बिकट परिस्थितीला शरण जावून, स्वतःचं मन मारून लग्नाला होकार देते. म्हणतात ना ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ (?) त्याप्रमाणे ‘श्री’ तिच्या आयुष्यात येतो आणि एक सच्चा मित्र भेटल्याची जाणीव तिला आतून होते. परंतु वयस्कर बिजवराला दिलेला शब्द मोडण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. कारण त्यांच्या पैशावर तिच्या वडिलांचे ऑपरेशन होणार असतं. श्री तिला अनेक तर्‍हेनी पटवून द्यायचा प्रयत्न करतो. की हे स्थळ तुझ्या योग्य नाही. परंतु जान्हवी तिच्या मताशी ठाम राहते. इथूनच या कथेला एक वेगळं वळण लागतं. या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात कुठेही प्रेमातला बटबटीतपणा, भडकपणा दाखवलेला नाही. दोघांची मनं जुळल्यानंतर त्यातून अतिशय हळूवार, तरल, संवेदनशील अशी प्रेमकहाणी फुलताना दाखवलीय. ती ही परस्परांच्या मतांचा, विचारांचा, भावनांचा आदर राखून!
आज समाजात पैसा, प्रसिद्धी आणि बाह्य सौंदर्यावर भाळून अनेक प्रेमकहाण्या फुलतात आणि अल्पावधीत उद्ध्वस्तही होतात. एकतर्फी प्रेमप्रकरणातून उद्भवणार्‍या हत्या, आत्महत्या, ऍसीड हल्ले ऐकायला, पहायला मिळतात. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब सिनेमा किंवा मालिकांमधून न उमटलं तरच नवल! परंतु जान्हवी - श्रीच्या निरागस आणि सच्चा प्रेमाची उदाहरणं देखील कमी का असेनात समाजात जरूर पहायला मिळतात. पण ती पडद्यावर कोण आणणार? त्यातील धोका कोण पत्करणार? मात्र हा धोका मंदार देवस्थळी यांनी पत्करला आणि एक अभिजात कलाकृती पडद्यावर अगदी घरबसल्या पहाण्याची संधी तमाम रसिक प्रेक्षकांना मिळाली.
honar-sun-mi-hya-gharchi-1सुरूवातीला जान्हवीने श्रीला अकाऊंटंट नंतर प्यून समजणं, तरीही त्याला, त्याच्या मैत्रीला स्वीकारणं. त्याची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा हलाखीची आहे असं समजून त्याला चांगली नोकरी शोधून देण्याची तयारी दाखवणं यातून तिच्या निर्व्याज, निःस्वार्थी प्रेमाची खात्री पटते. परंतु तो कंपनीचा मालक आहे असं समजल्यावर त्याच्या श्रीमंतीबाबत तिच्या मनात कोणताही हव्यास निर्माण होत नाही. किंवा जान्हवी टिपिकल मध्यमवर्गीय मुलगी आहे. यात श्रीलाही कमीपणा वाटत नाही. याहून दुसरं खरं प्रेम ते कोणतं? आजच्या तरूण पिढीला प्रेमाची ही व्याख्या समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. श्रीवर, त्याच्या श्रीमंतीवर भाळून एकतर्फी प्रेम करणारी सायली जेव्हा श्रीला ‘इंप्रेस’ करण्याचा प्रयत्न करते त्यावेळी श्री तिच्या स्त्रीत्वाचा आदर राखून तिच्याशी संयमाने बोलतो आणि तिला तिची जागा दाखवून देतो. ही वृत्ती प्रत्येक पुरूषाने परस्त्रीकडे  पहाताना अंगी बाणवण्याची आज काळाची गरज आहे. पुरूषाचं पुरूषत्व म्हणजे स्त्रियांचा आदर करणं, त्यांना संरक्षण देणं. ही मानसिकता जेव्हा समाजात रूजेल त्यावेळी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार नक्कीच थांबतील. यासाठी घराघरातल्या या छोट्या पडद्यावर अशा मालिका सादर होणं गरजेचं आहे. याचं सारं श्रेय या मालिकेच्या संपूर्ण टीमला आहे.
या मालिकेतील सर्व पात्र ‘आपली’ वाटतात. कारण आपल्या आजुबाजूला, आपल्या घरात आपण जसे वावरतो तशीच ती आपल्याला इथेही भेटतात. यातील स्त्रिया पॉश, फॅशनेबल, दागिन्यांनी मढलेल्या दाखवलेल्या नाहीत किंवा उंची फर्निचर, प्रतिष्ठेच्या अवास्तव कल्पना यांनाही थारा दिलेला नाही. मालिका पहात असताना प्रत्येकाला ती आपल्याच घरात घडतेय असं वाटून त्या त्या पात्रांच्या जागी तो स्वतःची कल्पना करू लागतो. यातच या मालिकेचं सारं श्रेय सामावलेलं आहे.
‘जान्हवीचे बाबा’ हे पात्र साकारणारा अभिनेता मनोज कोल्हटकर हा तर आमच्या शहरातला, रत्नागिरीचा तरूण. या रंगभूमीवरील नटाने आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अगदी संतांपासून दारूड्यापर्यंत. अशा या हरहुन्नरी कलाकाराने तरूण मुलांच्या वयस्कर पित्याची भूमिका वठवणं हे खरोखरच एक आव्हान होतं. आपल्या कसलेल्या अभिनयाच्या जोरावर त्याने ते यशस्वीपणे पेललंही. खरंतर चाळीशीतल्या तरूणाने अशा भूमिका स्वीकारणं हे करिअरच्या दृष्टीनं तसं ‘रिस्की’ असतं परंतु ते आव्हान त्याने आत्मविश्‍वासाने स्वीकारलं आणि समर्थपणे पेललंही.
वाचकहो, जान्हवी आणि श्रींच्या विवाहात काही समस्या निर्माण झाल्यायत. त्या तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि या मालिकेतील निखळ आनंद उपभोगा. मात्र त्याजोडीला आपलं माणुसकीचं कर्तव्य विसरू नका बरं का?
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

...तर लोकमान्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल

E-mail Print PDF
shraddh-kalambateलो. टिळकांनी जनजागृती आणि समाज संघटनेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. जेणेकरून स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात एकी निर्माण होवून स्वराज्यांचं स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावं म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अशा गणपती, शिवजयंती उत्सवांची नितांत गरज होती आणि लोकमान्यांच्या दूरदर्शीपणामुळे आपण ते मिळवलंही.
आज स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षेपूर्ण झालीत. आपल्या समाजातील या सण-उत्सवांची स्थिती नेमकी काय आहे बरं? आज प्रत्येक घराघरात हे सण-उत्सव साजरे होतातच, परंतु गल्ली-बोळातून नवनवीन संस्था, संघटना केवळ यासाठी स्थापन होवून एकेका गावातून-शहरातून शेकडो हजारो मंडळं भूछत्र्यांसारखी उगवलेली दिसतात. यातून आपण नेमकं काय साध्य करतोय असा प्रश्‍न हल्ली प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनाला भेडसावू लागलाय. कर्णकर्कश लाऊडस्पीकर, बेंजो, डॉल्बी यांचे कर्णेएकमेकांना पाठ टेकून लावलेले असतात. जेवढी मंडळं तेवढ्या देणग्या, तेवढे कार्यक्रम! कार्यक्रम तरी कोणते तर आरडाओरडा करीत तासनतास आरत्या म्हणणं, रेकॉर्ड डान्स (फिल्मी), सिनेमे (बीभत्स), ऑर्केस्ट्रा इ. ज्यातून निर्माण होतं केवळ प्रदूषण.
lokmanya-tilak2याहीपेक्षा जास्त हानीकारक प्रकार सर्वत्र पहावयास मिळतोय तो परस्परांत सुरू झालेल्या जीवघेण्या स्पर्धा. ज्यात प्रतिष्ठेचा, श्रीमंतीचा प्रश्‍न अनायासे निर्माण होतो. उत्सवातील मूर्ती किती अवाढव्य आहे, तिच्या अंगावर किती तोळ्याचे दागिने आहेत, तिला मिळणार्‍या देणग्या किती लाखात, कोटीत आहेत, मंडप, देखावा, प्रतिकृती किती भव्य आहेत, तिथला प्रसाद किती महागडा आहे आणि उत्सवात किती नट-नट्या आणल्या जातात.. ययावर त्या उत्सवाची यशस्वीता मोजली जाते. यातून नेमकं होतं काय की उत्सव तर कसाबसा पार पाडला जातो परंतु आपापसातील तेढ, गट-तटांची संस्कृती, राजकारण मात्र कायम स्वरूपी वाढीस लागते. कारण अलिकडचे बहुतांशी उत्सव हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे असतात. त्यामुळे देवी-देवतांच्या पूजनापेक्षा व्यक्तीपूजेला आलेलं महत्व समाजहिताला, देशहिताला हानिकारक आहे असं नाही का वाटत तुम्हाला?
या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती आणि समाज संघटन होणं हे मूळ हेतू बाजूला पडून आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचार, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप-र्‍हास आणि निररनिराळी प्रदूषणं यांनाच सण-उत्सव म्हणतात. अशी आधुनिक व्याख्या तरूण पिढीने केली तर त्यात त्याचं काय चुकलं?
वाचकहो, आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ते प्रत्येक ऋतुमानानुसार साजरे करण्याची आपली पूर्वापार प्रथा आहे. ती जरूर पाळावी. परंतु अशा तर्‍हेने जर वाडी-वाडीत, गावा-गावात, कॉलनी-कॉलनीत दुफळी, गट-तट पडणार असतील तर पुन्हा लोकमान्यांना जन्म घ्यावा लागेल, असं खेदानं म्हणावंसं वाटतंय.
भारतासारख्या विकसनशील, लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या, खेड्यांच्या देशात तसेच भ्रष्टाचार, दहशतवाद, बेकारी, घोटाळे, कमालीचं दारिद्र्य, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आपमतलबी राजकारण यांनी पोखरल्या गेलेल्या देशात आज ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव एक नवरात्रौत्सव’, ‘एक गाव एक दहिहंडी’, ‘एक गाव एक होळी’ अशा उत्सव संकल्पनांची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच हे सर्व सण ‘इकोफ्रेंडली’ कसे साजरे करता येतील. यावरही कायद्याने नियमावली आली पाहिजे. समाज हा नेहमी काळानुरूप बदलणारा म्हणजेच ‘प्रवाही’ असला पाहिजे. परंतु सण-उत्सव साजरे करताना त्यांचा मूळ गाभा, त्यांचे प्रयोजन, त्यांचं पावित्र्य राखलं गेलं पाहजे. त्यालाच या उत्सवांच्या मिरवणुका आणि कार्यक्रमांतून गालबोट लावलं जातय हे आपल्या अधोगतीचं लक्षण आहे हे कबूल केलंच पाहिजे.
अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी मंडळं परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य मेळ घालून उत्सव साजरा करताना दिसतात. त्यांचा कित्ता इतरांनी गिरवणं ही खरोखरच काळाची गरज आहे. अलिकडे अशा स्पर्धाही घेतल्या जातात. ज्यामुळे चांगल्या प्रथा वाढीस लागतील. त्यामुळे वाईट प्रथांकडे समाजानेच पाठ फिरविल्यास त्यांना नक्कीच हळुहळू का होईना आळा बसू शकेल.
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. समाजातील लहान-थोर, गरीब-श्रीमंत सारेच हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेली चाकरमानी मंडळी हमखास आपापल्या गावी येतात. कारण श्रीगणेश ही आपली आद्यदेवता आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ आपण श्रीगणेश पूजनाने करतो. त्याचं रूपही मोठं आकर्षक आणि वैविध्यतेने नटलेलं आहे. त्याबाबत अनेक आख्यायिकाही आहेत. बोधप्रद आख्यायिका समाजाला प्रगतीपथावर नेण्यास, वाईट आचार-विचार प्रवृत्तीपासून दूर नेण्यास कारणीभूत ठरतात. आता हेच पहा ना, श्रीणेशाचे सुपाएवढे कान कशाचं बरं प्रतिक आहेत? प्र्रत्येकाने दुसर्‍याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे याचं. त्याचे बारीक डोळे प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्याचा संदेश देतात. भलं मोठ पोट कशासाठी? तर या सर्व ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टी या पोटात अर्थात मनात साठवून ठेवा आणि त्याच्या लांबलचक सोंडेने त्यातील अत्यावश्यक गोष्टी ग्रहण करून निरर्थक गोष्टींचा त्याग करा. आहे का नाही गंमत! थोडक्यात, आपल्या यशस्वी मानवी जीवनाचं सारं सार या श्रीगणेशापासून प्रगट होतं. त्याच्या असंख्य नामांतूनही आपल्याला विविध रूपं या सणाच्या निमित्ताने पहायला मिळतात.
वाचकहो, यंदाच्या वर्षी आपण आपापल्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला. परंतु पुढल्या वर्षीपासून आपण आपल्या समाजहितासाठी पर्यायाने देशहितासाठी ऐक्यभाव, बंधुभाव जपण्यासाठी, वाढविण्यासाठी ‘एक गाव..’ ही संकल्पना राबवू शकलो तर निश्‍चितच हे सण-उत्सव आपण आणखी मंगलमय, आनंददायी वातावरणात आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या वैश्‍विक भावनेनं साजरे करू शकू अस तुम्हालाही वाटतंय ना? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गोळ्या झाडून ‘महात्मे’ मरत नसतात

E-mail Print PDF
shraddh-kalambateसमाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सर्वांनाच हौतात्म्य पत्करावं लागतं का? महात्मा गांधींपासून डॉ. नरेंद्र दाभोळकरांपर्यंत सर्वांनाच याची अग्नीपरीक्षा नव्हे ‘गोळी परीक्षा’ द्यावी लागलीय. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज इ. नी काय कमी  समाजाचा रोष पत्करला? कमी हालअपेष्टा, समाजनिंदा सहन केली? परंतु या लोकोत्तर व्यक्तींच्या  काळातील कार्यामुळेच आजही त्यांचे विचार,त्यांचं कार्य समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनीही आपलं संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा, अघोरी प्रथा, नरबळी इ.  च्या निर्मुलनासाठी खर्ची घातलं. समाजजागृतीचं हे व्रत त्यांनी अखंडपणे आचरलं. कित्येक बुवा-बाबांचं  पितळ उघडं पाडलं. हे व्रत केवळ वैयक्तिक स्वरूपाचं नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रभर गेली २५ वर्षाहून अधिक काळ चालणारी ती एक लोकचळवळ बनली आणि त्यांच्या हौतात्म्यानं तर ती अजरामर झाली असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रात २२ व्या शतकाकडे झेपावताना विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ पिढी घडवली जावी अशी अपेक्षा असताना चित्र मात्र उलटंच दिसतंय. आपल्या इंटरनेटच्या युगात देवळापुढच्या रांगा दिवसेंदिवस वाढताहेत. बुवा, बाबा, महाराज यांच्या भक्तगणांची संख्या झपाट्याने वाढतेय. यात भरीस भर म्हणून गावोगावी सत्संग, बैठका यांचे स्तोम प्रचंड वाढलय. ही भविष्यकाळातील धोक्याची सूचना नाही वाटत का तुम्हाला? देव हा प्रत्येकाच्या आत्म्यात आहे आणि मनःशांती ही प्रत्येकाच्या मनात! मग ती देवळात, मठात कशी सापडणार? गेली २८ वर्षेसमस्या निवारणाचं कार्य करीत असताना असं दिसून येतं की, माणसाने आपला वैयक्तिक स्वार्थ,
narendra-dabholkar2सुख आणि ऐदी जीवन जगण्याच्या लालसेपोटी या सर्व समस्या निर्माण केलेल्या आहेत. तरूण पिढीला श्रमाची लाज वाटते. कष्ट नकोत, धडपड नको, प्रयत्न नकोत आणि दैववादी वृत्तीमुळे जे काही मिळवायचं ते आयतं, कुणाच्या तरी कृपेने,आशीर्वादाने किंवा दैवी सामर्थ्याने! या मानसिकतेमुळे माणसाची विचारशक्तीच खुंटत चाललीय. माणूस निष्क्रिय बनत चाललाय. यातूनच महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटना वाढीस लागल्यात.
वाचकहो, श्रद्धा असावी. जरूर असावी. त्यामुळे निश्‍चितच आपल्याला मानसिक बळ, शक्ती मिळत असते.
आपलं मनोधैर्य वाढत असतं. मग ती श्रद्धा तुम्ही एखाद्या देव-देवता किंवा व्यक्तीवर ठेवा. पण ती डोळस हवी. त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होता कामा नये. यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या १०-१५ दिवसातील वर्तनातपत्र, चर्चा यातून आपल्या लक्षात तो फरक आला असेलच. सध्याच्या धावपळीच्या, दगदगीच्या युगात प्रत्येकाच्या जीवनात मानसिक ताणतणाव, क्लेश यांचे अविभाज्य स्थान निर्माण झालंय. ते कुणीही टाळू शकत नाहीत. मात्र संयम, विवेक, सारासारबुद्धी यांच्या जोरावर आपलं जीवन आपण नक्कीच सुसह्य करु शकतो. परंतु हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना हे करणं जमत नाही अशा व्यक्ती मनःशांतीसाठी आपल्या जवळच्या बुवा, बाबा, महाराज यांच्या आश्रयाला जातात. म्हणूनच गल्लोगल्ली अशांचे पेव फुटलेले दिसतात. शिवाय अशाच ठिकाणी बौद्धीक, वैचारिकतेला वाव नसतो.
बिनडोकपणे समुहाच्या मानसिकतेत मिसळून हजारोंच्या संख्येने कर्मकांडात रमणे आणि स्वतःच्या, कुटुंबाच्या खर्‍या समस्येपासून दूर पळणे याला जर तुम्ही श्रद्धा आणि धर्म मानत असाल तर प्रत्येकजण सुखी व्हायला हवा होता. मग तो तसा का नाही? विचार करा. ही प्रचंड लोकशक्ती जर विधायक कामांकडे वळली तर या तथाकथित ‘महात्म्यांचं’ काय? त्यांना पैसा आणि प्रसिद्धी कशी मिळणार? म्हणूनच कोणतीही बैठक, वारी, सत्संग चुकवायचा नाही असा यांचा अलिखित दंडकच! आणि तो अगदी कटाक्षाने पाळला जातो. खंत वाटते ती याची की ही प्रचंड शक्ती आणि वेळ समाजातील विधायक कार्यासाठी वापरली गेली असती तर अनेक समस्या चुटकीसरशी सुटल्या असत्या. एकंदरीत, समाजातील दारिद्र्य, बेकारी, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, नैराश्य यांच्या चक्रव्युहात अडकलेली माणसं अंधश्रद्धेच्या गर्तेत गुरफटत चाललीयत. मग तो नांदोसचा पैशाचा पाऊस असो की, मांढरदेवीच्या जत्रेतील चेंगराचेंगरी, ७ वर्षाच्या सपनाचा नरबळी असो वा बाबांच्या आशीर्वादाने (?) होणारी पुत्रप्राप्ती. गंडेदोरे, मंत्रतंत्र, मूठ मारणे, करणी करणे, भूत उतरवणे, अंगात येणे, भविष्य सांगणे, गुप्तधन शोधून देणे, इ. मार्गाने पिडीत लोकांची शुद्ध फसवणूक केली जाते. हे आमच्याकडे येणार्‍या असंख्य प्रकरणांवरून सिद्ध होतंय.
ज्यांना त्याचे चटके बसलेत त्यांना ते पटलेलं आहेच पण तुमचं काय? विद्येचं माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यात चुकीच्या भविष्यकथनामुळे एका संपूर्ण कुटुंबाने केलेली आत्महत्या हे अंधश्रद्धेचे बळी नव्हेत का? मानवत खून प्रकरण, बोलका पत्थर, गणपतीचं दूध पिणं, उंबराला फुल येणं ही कसली द्योतकं आहेत? अंधश्रद्धेचीच ना. या अंधश्रद्धेच्या सर्वाधिक बळी ठरताहेत त्या स्त्रिया आणि अल्पवयीन मुलं. कारण त्यांची निरागसता, ‘दुर्बलता’, ‘अबलापण’, यामुळे हा समाजातील मोठा वर्ग लैगिक शोषणाचा बळी ठरतो. सध्याचं ‘आसाराम प्रकरण’ याचं ज्वलंत उदाहरण आहे.
डॉ. दाभोळकरांच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी ‘जादूटोणा विरोधी विधेयकाचा’ अध्यादेश मंजूर करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तोपर्यंत बळींची संख्या वाढतच जाणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही परंतु अजूनही कर्मकांड करणारी, धर्मांध मंडळी व अंधश्रद्धेच्या जोरावर समाजात आपलं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणारी प्रस्थं या कायद्याविरोधात जंग जंग पछाडतील. यासाठी डॉ. दाभोळकरांची ही लोकचळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. या कायद्याचं महत्व सर्वसामान्यांमध्ये रूजवणं आणि त्याचा प्रभाविपणे वापर करण्याची गरज समप्रमाण पटवून देणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे असं आपल्याला वाटत नाही का? हीच हौतात्म्य पत्करलेल्या डॉ. दाभोळकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
-श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
Jmoù`m PmSy>Z "_hmË_o' _aV ZgVmV
g_mOgwYmaUoMm dgm KoVboë`m gdmªZmM hm¡VmËå` nËH$amd§ bmJV§ H$m? _hmË_m Jm§YtnmgyZ S>m°. Za|Ð

Xm^moiH$am§n`ªV gdmªZmM `mMr A½Zrnarjm Zìho "Jmoir narjm' Úmdr bmJbr`. _hmË_m \w$bo, gm{dÌr~mB©

\w$bo, S>m°. ~m~mgmho~ Am§~oS>H$a, amOfu emhÿ _hmamO, JmS>Jo~m~m, VwH$S>moOr _hmamO B. Zr H$m` H$_r

g_mOmMm amof nËH$abm? H$_r hmbAnoîQ>m, g_mOqZXm ghZ Ho$br? na§Vw `m bmoH$moÎma ì`ŠVtÀ`m

H$mimVrb H$m`m©_wioM AmOhr Ë`m§Mo {dMma,Ë`m§M§ H$m`© g_mOmbm _mJ©Xe©H$ R>aV Amho.
S>m°. Za|Ð Xm^moiH$a `m§Zrhr Amnb§ g§nyU© Am`wî` A§YlÕm, ~wdm~mOr, OmXÿQ>moUm, AKmoar àWm, Za~ir B.

À`m {Z_w©bZmgmR>r IMu KmVb§. g_mOOmJ¥VrM§ ho d«V Ë`m§Zr AI§S>nUo AmMab§. {H$Ë`oH$ ~wdm-~m~m§M§

{nVi CKS>§ nmS>b§. ho d«V Ho$di d¡`pŠVH$ ñdê$nmM§ ZìhV§ Va g§nyU© _hmamîQ´>^a Jobr 25 dfm©hÿZ A{YH$

H$mi MmbUmar Vr EH$ bmoH$Midi ~Zbr Am{U Ë`m§À`m hm¡VmËå`mZ§ Va Vr AOam_a Pmbr Ag§ åhQ>ë`mg

dmdJ§ R>ê$ Z`o.
nwamoJm_r åhUdë`m OmUmè`m _hmamîQ´>mV 22 ì`m eVH$mH$S>o PonmdVmZm {dkmZ{ZîR>, {ddoH${ZîR> {nT>r

KS>dbr Omdr Aer Anojm AgVmZm {MÌ _mÌ CbQ>§M {XgV§`. Amnë`m B§Q>aZoQ>À`m `wJmV XodimnwT>À`m

am§Jm {Xdg|{Xdg dmT>VmhoV. ~wdm, ~m~m, _hmamO `m§À`m ^ŠVJUm§Mr g§»`m PnmQ>çmZo dmT>Vo`. `mV ^arg

^a åhUyZ JmdmoJmdr gËg§J, ~¡R>H$m `m§Mo ñVmo_ àM§S> dmT>b`. hr ^{dî`H$mimVrb YmoŠ`mMr gyMZm Zmhr

dmQ>V H$m Vwåhmbm? Xod hm àË`oH$mÀ`m AmËå`mV Amho Am{U _Z…em§Vr hr àË`oH$mÀ`m _ZmV! _J Vr

XodimV, _R>mV H$er gmnS>Uma?
Jobr 28 df}g_ñ`m {ZdmaUmM§ H$m`© H$arV AgVmZm Ag§ {XgyZ `oV§ H$s, _mUgmZo Amnbm d¡`pŠVH$ ñdmW©,

gwI Am{U EoXr OrdZ OJÊ`mÀ`m bmbgonmoQ>r `m gd© g_ñ`m {Z_m©U Ho$boë`m AmhoV. Vê$U {nT>rbm l_mMr

bmO dmQ>Vo. H$îQ> ZH$moV, YS>nS> ZH$mo, à`ËZ ZH$moV Am{U X¡ddmXr d¥Îmr_wio Oo H$mhr {_idm`M§ Vo Am`V§,

Hw$UmÀ`m Var H¥$noZo,Amerdm©XmZo qH$dm X¡dr gm_Ï`m©Zo! `m _mZ{gH$Vo_wio _mUgmMr {dMmaeŠVrM Iw§Q>V

Mmbbr`. _mUyg {ZpîH«$` ~ZV Mmbbm`. `mVyZM _{hbm§darb AÝ`m`, AË`mMmam§À`m KQ>Zm dmT>rg

bmJë`mV.
dmMH$hmo, lÕm Agmdr. Oê$a Agmdr. Ë`m_wio {ZpíMVM Amnë`mbm _mZ{gH$ ~i, eŠVr {_iV AgVo.

Amnb§ _ZmoY¡`© dmT>V AgV§. _J Vr lÕm Vwåhr EImÚm Xod-XodVm qH$dm ì`ŠVrda R>odm. nU Vr S>moig

hdr. Ë`mM§ ê$nm§Va A§YlÕoV hmoVm H$m_m Z`o. `mgmR>r lÕm Am{U A§YlÕm `mVbm \$aH$ g_OyZ KoU§

JaOoM§ Amho. Joë`m 10-15 {XdgmVrb dV©ZmVnÌ, MMm© `mVyZ Amnë`m bjmV Vmo \$aH$ Ambm AgobM.
gÜ`mÀ`m YmdnirÀ`m, XJXJrÀ`m `wJmV àË`oH$mÀ`m OrdZmV _mZ{gH$ VmUVUmd, Šboe `m§Mo A{d^mÁ`

ñWmZ {Z_m©U Pmb§`. Vo Hw$Urhr Q>miy eH$V ZmhrV. _mÌ g§`_, {ddoH$, gmamgma~wÕr `m§À`m Omoamda Amnb§

OrdZ AmnU ZŠH$sM gwgø H$é eH$Vmo. na§Vw ho gJù`m§ZmM O_V§ Ag§ Zmhr. Á`m§Zm ho H$aU§ O_V Zmhr

Aem ì`ŠVr _Z…em§VrgmR>r Amnë`m OdiÀ`m ~wdm, ~m~m, _hmamO `m§À`m Aml`mbm OmVmV. åhUyZM

JëbmoJëbr Aem§Mo nod \w$Q>bobo {XgVmV. {edm` AemM {R>H$mUr ~m¡ÕrH$, d¡Mm[aH$Vobm dmd ZgVmo.

{~ZS>moH$nUo g_whmÀ`m _mZ{gH$VoV {_giyZ hOmam|À`m g§»`oZo H$_©H$m§S>mV a_Uo Am{U ñdV…À`m, Hw$Qw>§~mÀ`m

Iè`m g_ñ`onmgyZ Xÿa niUo `mbm Oa Vwåhr lÕm Am{U Y_© _mZV Agmb Va àË`oH$OU gwIr ìhm`bm

hdm hmoVm. _J Vmo Vgm H$m Zmhr? {dMma H$am.
hr àM§S> bmoH$eŠVr Oa {dYm`H$ H$m_m§H$S>o dibr Va `m VWmH${WV "_hmËå`m§M§' H$m`? Ë`m§Zm n¡gm Am{U

à{gÕr H$er {_iUma? åhUyZM H$moUVrhr ~¡R>H$, dmar, gËg§J MwH$dm`Mm Zmhr Agm `m§Mm A{b{IV

X§S>H$M! Am{U Vmo AJXr H$Q>mjmZo nmibm OmVmo. I§V dmQ>Vo Vr `mMr H$s hr àM§S> eŠVr Am{U doi

g_mOmVrb {dYm`H$ H$m`m©gmR>r dmnabr Jobr AgVr Va AZoH$ g_ñ`m MwQ>H$sgaer gwQ>ë`m AgË`m.
EH§$XarV, g_mOmVrb Xm[aÐç, ~oH$mar, ì`gZm{YZVm, A§YlÕm, Z¡amí` `m§À`m MH«$ì`whmV AS>H$bobr

_mUg§ A§YlÕoÀ`m JV}V Jwa\$Q>V Mmbbr`V. _J Vmo Zm§XmogMm n¡emMm nmD$g Agmo H$s, _m§T>aXodrÀ`m

OÌoVrb M|JamM|Jar, 7 dfm©À`m gnZmMm Za~ir Agmo dm ~m~m§À`m Amerdm©XmZo (?) hmoUmar nwÌàmßVr.

J§S>oXmoao, _§ÌV§Ì, _yR> _maUo, H$aUr H$aUo, ^yV CVadUo, A§JmV `oUo, ^{dî` gm§JUo, JwßVYZ emoYyZ XoUo, B.

_mJm©Zo {nS>rV bmoH$m§Mr ewÕ \$gdUyH$ Ho$br OmVo. ho Am_À`mH$S>o `oUmè`m Ag§»` àH$aUm§dê$Z {gÕ hmoV§`.

Á`m§Zm Ë`mMo MQ>Ho$ ~gboV Ë`m§Zm Vo nQ>bob§ AmhoM nU Vw_M§ H$m`? {dÚoM§ _mhoaKa g_Oë`m OmUmè`m

nwÊ`mV MwH$sÀ`m ^{dî`H$WZm_wio EH$m g§nyU© Hw$Qw>§~mZo Ho$bobr AmË_hË`m ho A§YlÕoMo ~ir ZìhoV H$m?

_mZdV IyZ àH$aU, ~mobH$m nËWa, JUnVrM§ XÿY {nU§, C§~ambm \w$b `oU§ hr H$gbr ÚmoVH§$ AmhoV?

A§YlÕoMrM Zm. `m A§YlÕoÀ`m gdm©{YH$ ~ir R>aVmhoV Ë`m {ó`m Am{U Aënd`rZ _wb§. H$maU Ë`m§Mr

{ZamJgVm, "Xþ~©bVm', "A~bmnU', `m_wio hm g_mOmVrb _moR>m dJ© b¡[JH$ emofUmMm ~ir R>aVmo. gÜ`mM§

"Amgmam_ àH$aU' `mM§ Ádb§V CXmhaU Amho.
S>m°. Xm^moiH$am§À`m _¥Ë`yÀ`m Xþgè`mM {Xder "OmXÿQ>moUm {damoYr {dYo`H$mMm' AÜ`mXoe _§Oya H$aÊ`mV Ambm

Agbm Var Ë`mMr A§_b~OmdUr bdH$amV bdH$a hmoU§ AË`§V JaOoM§ Amho. ZmhrVa Vmon`ªV ~itMr g§»`m

dmT>VM OmUma ho gm§Jm`bm H$moUm Á`mo{VfmMr JaO Zmhr na§Vw AOyZhr H$_©H$m§S> H$aUmar, Y_mªY _§S>ir d

A§YlÕoÀ`m Omoamda g_mOmV Amnb§ dM©ñd àñWm{nV H$ê$ BpÀN>Umar àñW§ `m H$m`Úm{damoYmV O§J O§J

nN>mS>Vrb. `mgmR>r S>m°. Xm^moiH$am§Mr hr bmoH$Midi A{YH$ ì`mnH$ H$aÊ`mMr JaO Amho. `m H$m`ÚmM§

_hËd gd©gm_mÝ`m§_Ü`o ê$OdU§ Am{U Ë`mMm à^m{dnUo dmna H$aÊ`mMr JaO g_à_mU nQ>dyZ XoU§ ho

àË`oH$ gwOmU ZmJ[aH$mM§ H$V©ì` Amho Ag§ Amnë`mbm dmQ>V Zmhr H$m? hrM hm¡VmËå` nËH$aboë`m S>m°.

Xm^moiH$am§Zm dm{hbobr Iar lÕm§Obr R>aob.
-lÕm H$i§~Q>o
g§nH©$ … hoënbmB©Z ñd`§goVy
9422430362

Page 3 of 5